Jan 19, 2022
प्रेम

त्याग (भाग ३)

Read Later
त्याग (भाग ३)

 

 

          

चार दिवस झाले तरी अन्विकाचा पत्ता नव्हता. ती नाशिक वरून परत आलीच नव्हती. अन्विकाचे

आई -बाबा काळजीत  होते. तिच्या शोधात होते. ऑफिसमध्ये गेल्यावर तिच्या बाबांना कळले की अन्विका   सेमिनारमध्ये पोहचलीच नाही बरं तिचा फोन ही बंद होता  बाबांनी व भावाने पोलीसात तक्रार केली.

 

                       जेंव्हा बाबांना कळले की ती सेमिनारमध्ये गेली नाही तेंव्हा ते मटकन  खाली बसले. त्यांना वाटले की आपल्या लेकीने आपल्याला फसवले कदाचित ती त्या मुला बरोबर पळून गेली. या गोष्टीची खात्री करण्यासाठी त्यांनी अन्विकाची रूम तपासून पाहिली. त्यांना तेथे अनिकेतच्या घरचा पत्ता मिळाला. ते तडक पोलीस घेऊन अनिकेतच्या घरी गेले.

 

                        इकडे अनिकेत ही बेचैन  होता.  अनिकेतने  तिचा मेसेज वाचून चार दिवस झाले होते.

अन्विकाचा फोन ही बंद होता. अनिकेत तिच्या ऑफिस मध्ये  ही जाऊन आला होता पण जितकी माहिती  तिच्या कुटुंबाला ऑफिस मधून मिळाली तितकीच अनिकेतला मिळाली होती. अनिकेतला  हा प्रश्न पडला होता की ती नाशिकला नाही गेली तर कोठे गेली? या विचारात तो दोन रात्री नीट झोपला ही नव्हता. त्याने ऑफिस मधून सुट्टी घेतली होती. अनिकेत त्याच्या परीने अन्विकाला  शोधण्याचा प्रयत्न करत होता. तो या सगळ्या विचारात असतानाच त्याच्या  दारा वरील  बेल वाजली. अनिकेतने  दार  उघडले तर समोर पोलीस आणि अन्विकाचे बाबा व भाऊ उभे होते.

 

इन्स्पेक्टर ,“ Mr.अनिकेत भोसले आपणच का ?”त्यांनी विचारले.

 

अनिकेत ,“ हो मीच” त्याने उत्तर दिले.

 

बाबा,“ माझी मुलगी अन्विका  कुठे आहे ? ती तुझ्याकडेच आली आहे ना ? कुठे आहे ती बोलावं तिला!” ते रागाने बोलत होते.

 

अनिकेत , “हे पहा  अंकल अन्विका माझ्याकडे नाही आली . मी ही चार दिवसा पासून तिचाच शोध घेतोय!”तो त्यांना समजावत म्हणाला.

 

बाबा, “ इंस्पेक्टर साहेब हा खोटे बोलतोय अटक करा याला  झडती घ्या याच्या  घराची आणि तुमचा पोलीसी

          खाक्या दाखवा याला मग पटापट बोलेल हा माझी मुलगी कुठे आहे?”आन्विकाचे बाबा त्वेषाने बोलत होते

पोलीस, “Mr.मोहिते थांबा जरा!  घ्या रे याच्या घराची झडती.” ते म्हणाले आणि हवालदार घराची झडती घेऊन आला आणि म्हणाला.

 

हवालदार, “ साहेब घरात कोणी नाही”

 

बाबा ,   “ बोल माझी मुलगी कुठ आहे ?”त्यांनी पुन्हा रागाने म्हणाले.

 

अनिकेत , “ खरंच मला माहिती नाही.मला ही तिची काळजी वाटतेय अंकल!”तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला.

 

इन्स्पेक्टर , “ Mr.भोसले जो पर्यंत अन्विका मोहिते सापडत नाही तो पर्यंत  तुम्ही हे शहर सोडू शकणार नाही.”ते म्हणाले.

                        

बाबा ,  साहेब यानेच लपवले आहे मा‍झ्या मुलीला!” ते म्हणाले.

 

इन्स्पेक्टर,“ सध्या आपल्याकडे याच्या विरुद्ध काही प्रूफ नाही. त्यामुळे आपण याला अटक करू शकत नाही” ते म्हणाले.

 

बाबा  ,“ पण…”

 

अद्वैत ( अन्विकाचा  भाऊ) ,” बाबा चला! याला नाही माहिती अन्विका दि कोठे आहे ते” तो समजावत म्हणाला.

                                                 अन्विकाचे बाबा ,भाऊ व पोलीस अनिकेतच्या   घरातून निघून गेले अनिकेतला ही अन्विकाची खूप काळजी वाटत होती .

 

                            आता अन्विकाला गायब होऊन सहा महिने होत आले होते.पण पोलीसांना अन्विकाचा  पत्ता लागत नव्हता. अन्विकाचे बाबा ,भाऊ सारखे पोलीस स्टेशनच्या चकरा  मारत होते . जस-जसा एक -एक दिवस  जात होता तशी अन्विका विषयीची काळजी वाढत होती. अन्विकाची आई तर तिच्या काळजीने आजारी पडली होती .

                      


 

          अन्विका गायब झाल्या  पासून अनिकेतला ही अन्न गोड लागत नव्हते. तो त्याच्या परीने अन्विकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता . त्याने अन्विकचा  फोटो फेसबुकवर अपलोड केला होता आणि तिचा पत्ता सांगणार्‍याला किंवा तिला घेऊन येणार्‍याला 50000 चे बक्षीस ठेवले होते.

 

              एक दिवस त्याला फेसबुकवर एक मेसेज आला तो अन्विका बद्दलचा होता. एका व्यक्तीने नाशिक मधून त्याला मेसेज केला होता. त्याने लिहिले होते की त्याने अन्विकाला रेड लाईट एरिया मध्ये पाहीले होते.तिचा फोटो ही त्याने अनिकेतला पाठवला होता. ती जिथे होती. तिथला पत्ता ही पाठवला होता.

 

            अनिकेतचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की फोटोतील मुलगी त्याची अन्विकाच आहे. ती वेगळ्याच अवतारात होती.भडक मेकअप,विचित्र कपडे! पण ती अन्विकाच होती. तो उठला तडक अन्विकाच्या घरी गेला. त्याने बेल वाजवली; दार अव्दैतने उघडले.

 

अव्दैत, “ अनिकेत तू इथे !”तो आश्चर्याने म्हणाला.

 

                     अन्विकाचे बाबा आतून म्हणाले “कोण आहे अव्दैत?”

 

  पण अव्दैत काहीच बोलला नाही म्हणल्यावर बाबा दाराकडे आले आणि अनिकेतला पाहताच त्यांचा पारा चढला .

  बाबा,“ तू इथे ! आला तसा परत चालता हो इथून तुझी  हिम्मत कशी झाली इथे यायची ?”त्यांनी रागाने विचारले.

 

 अनिकेत , “अंकल ऐकून तर घ्याल का माझे? अन्विकाचा पत्ता लागला!” तो शांतपणे म्हणाला.

 

          “खरंच” हे ऐकून बाबा आणि अद्वैत एकदम ओरडले.

 

अनिकेत ,“ मी फेसबुकवर अन्विकाचा फोटो अपलोड केला होता चार महिन्यापूर्वी, आज एका व्यक्तीचा मेसेज आला होता . त्याने तिचा फोटो आणि पत्ता पण पाठवला आहे .ती नाशिक मध्येच आहे पण ......”  अनिकेत बोलायचा  थांबला.

 

बाबा , “ पण काय?अनिकेत बोल ना !” ते म्हणाले.

 

अनिकेत , “ ती रेड लाईट एरिया  मध्ये सापडली आहे.” तो शांतपणे म्हणाला.

 

                                हे ऐकून अन्विकाचे बाबा आणि  अव्दैतच्या पाया खालील जमीनच सरकली. त्यांच्या डोक्यात कोणी तरी तीव्र आघात केलाय असे ते सुन्न झाले. पण अनिकेत पूर्ण भानावर  होता. तो म्हणाला 

 

अनिकेत,“मी उद्याच नाशिकला जातोय आणि  पोलीसांना  ही सूचना दिली आहे  ते आपल्याला पूर्ण मदत करतील!”अस बोलून अनिकेत त्यांच्या उत्तराची वाट ही न पाहता निघाला सुद्धा!

 

        तरी अन्विकाचे बाबा व अव्दैत त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहताच राहिली.  अन्विका बद्दलची ही माहिती ऐकून त्यांना काही सुचत नव्हते. ते सुन्न झाले होते. अन्विकाची आई हे सगळे ऐकून हादरली होती.

 

                              अनिकेत नाशिकला जायला निघाला. त्याच्या बरोबर नागपूरचे पोलीस साध्या वेषात निघाले होते.  अनिकेत नाशिकला पोहचला व त्याने पोलीसांना  लॉजवरच थांबायला सांगीतले. तो म्हणाला 

 

अनिकेत,“ मी स्वत: त्या एरियामध्ये कस्टमर होऊन जातो आणि अन्विकाचा शोध घेतो मग आपण पुढचं ठरवू.” त्याच बोलणं इन्स्पेक्टर  जाधवला  पटलं होत . इंस्पेक्टर जाधवने त्याच्या म्हणण्याला सहमती दर्शवला.

 

                                   अनिकेत त्या  व्यक्तीने पाठवलेल्या पत्त्यावर म्हणजेच नाशिक मधील  रेड लाईट एरियात पोहचला आणि इकडे तिकडे फिरू लागला. तेथे छोट्या -छोट्या गल्ल्या होत्या व दोन मजली घरे (घरे कसली दुकाने )  दिसत होती आणि  रस्त्याच्या दोन्ही बाजूला चित्र विचित्र कपडे घातलेल्या आणि भडक मेकअप केलेल्या मुली बायका त्याला दिसत होत्या. तो जस - जसा  पुढे जाईल तस-तसा प्रत्येक बाई त्याला अडवत होती त्याच्या अंगाला झटत होती.अश्लील चाळे करून त्याला स्वतः बरोबर येण्यासाठी गळ घालत होती. पण अनिकेतचे डोळे अन्विकाला शोधत होते. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने त्याला फक्त एरियाचा पत्ता दिला होता.  नेमके ठिकाण किंवा नेमकी कोणती बिल्डींग,घर सांगीतले नव्हते .  

 

                  अनिकेतची नजर भिरभिरत होती. आता त्याने प्रत्येक घरात जाऊन अन्विकाचा शोध घ्यायचं ठरवलं.

 

अन्विका  खरच तेथे होती का ? पण ती तर कामानिमित्त घरातून निघाली  मग इथे कशी पोहचली असेल?

 

या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत.

 

©स्वामिनी चौगुले

 

        

        

                        


 

          

 

              


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Swamini Chaughule

Author

I am Crazy Read & Passionate Writer