त्याची होणारी फरफट

Tyachi Pharphat
आई कुमुदला तिच्या खोलीत उठवायला गेली होती, बघते तर ती १० वाजले तरी गाढ झोपलीच होती, कमाल आहे बाबा आजकालच्या ह्या मुलींची, जस्या माहेरी तश्याच सासरीही आणि इथे मेली सासू अजूनही जबाबदाऱ्या उचलतेच आहे हो.
नवऱ्याला निदान आजच्या दिवशी तरी लवकर उठून डबा करून द्यायचा तर दूरच साधे औक्षणही करायचे भान रहात नाही आजकालच्या ह्या पोरींना.. आहो ह्या पोरी कसल्या आता बायकांना म्हणावे, पोरी म्हणावे तर अगदी पोरी सारखेच वागतात, जराही भान नाही की जबाबदारी नाही, जबाबदारी तर सोडाच ज्याच्यावर इतके प्रेम उतू जाते त्या नवऱ्याला साधे वाढदिवसाच्या दिवशी औक्षण ही नाही, मग त्या वेळेस सासुबाई आठवते पण रात्री २ वाजेपर्यंत पार्टी करतात दोघेच तेव्हा बरी सासू आठवत नाही यांना, इतके काय secret म्हणायचे वाढदिवसाच्या दिवसाचे, जन्म तर मीच दिला ना.
कुमुद आणि अविनाश यांचा काल रात्री १२ वाजता छान secret birthday प्लॅन होता, सगळ्यांच्या समोर तर झालाच पण नंतर ते त्यांच्या room मध्ये जाऊन २ वाजेपर्यंत गप्पा करत बसले होते. तिने त्याला एक gift ही दिले होते. मस्त mood मध्ये होते, कितीतरी दिवसांनी हा योग आला होता, आला कसला आणला होता, अवी तसा बाहेरगावी जॉब करत असल्याने त्याला निदान हा दिवस घरच्यांच्या सोबत आणि लाडक्या बायको सोबत घालवायचा होता, तरी त्याला काम आले आणि त्याला निघावे लागले.

इकडे खूप जागरण झाल्यामुळे तोच म्हणाला आज डबा नको तू आज बिनधास्त झोप, मी ऑफिसमध्ये खाऊन घेईल आणि म्हणून ती बराच वेळ अगदी १० पर्यंत झोपूनच होती, आधीच ठरले होते पण सासू बाईला हे कुठे आवडले होते तिचे वागणे.
ती खडबडून जागी झाली, चटकन बाहेर पळत आली, डोक्यावर हात मारला, अरे हा कुठे गेला हा उशिरा जाणार होता, त्याचे औक्षण करायचे राहून गेले आणि डबाही नाही दिला, आता तिला खूप वाईट वाटत होते. आपण इतक्या उशिरापर्यंत झोपलो आणि कोणी उठवलेही नाही.
सासुबाई नेहमी उठवत असतात आज मुद्दाम त्यांनी मला मी कशी हलगर्जी पणा करते हे दाखवून देण्यासाठी उठवले नसणार आणि ते तसेच गेले असणार, माझ्याबद्दल काही तरी नक्की वाईट साईट भरवले असणार आजही त्यांनी, आणि ते तळतळत गेले असणार.
 इकडे तिने लगेच नवऱ्याला फोन लावला आणि दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली की मी नेमके किती उशिरा उठले, डबा नाही, औक्षण नाही ,त्यात तुम्ही तर उठवलेच नाही, नेहमी आई कटकट करून उठवतात आज त्यांनीही उठवायचे तर त्यांनीही मुदाम उठवले नाही. नाहीतर मी तुला बिना औक्षण केल्याचे जाऊच दिले नसते रे.

तो तिकडून ,अग असू दे ,काही फरक पडत नाही मला, जसा रोजचा दिवस तसा हा ही एक दिवस समज आणि आईला दोष देऊ नकोस तू, तिची चूक नाही, ती उलट आली होती तुला उठवायला पण मीच तिला सांगितले होते की ती दमली आहे, तिची झोप होऊ दे ,म्हणूनच ती आली नाही. रोजच का तुला कोणी उठवायला हवे ग, आईची duty आहे जशी रोजच तुला उठवा आणि उठवले की परत तूच तिला नाव ठेवा.
तिला तिची चूक कळली. तिला खरे ते कळले आता. जे नेहमी आपण सासू म्हणून त्यांच्या प्रत्येक कृतीकडे चुकीच्या नजरे पहातो ते कमी करणे खूप गरजेचे आहे हे कळले,नाहीतर नवरा बायको मध्ये दुरावा यायला वेळ लागणार नाही, त्याची ही आमच्या ह्या असमांजस वागण्यामुळे फरफट होणार नाही.