त्याचेबाबा
नर्स ने मुलगा झाला असे सांगतात समीरने आनंदाने उडी मारली. बाजारातून पेढे घेऊनच तो घरी पोहोचला.
देवा समोर प्रसाद ठेवून नमस्कार करून तो पॅकेट घेऊन बाबांच्या समोर उभा राहिला त्यांना पेढा देऊन "मुलगा झाला "म्हणत त्याने नमस्कार केला.
"वा sवा sछान ,पाठीवर हात ठेवत बाबा म्हणाले" म्हणजे आता तू ही ‘मुलाचा बाप’ म्हणजे बाबा झाला."
त्यांचे ते ‘मुलाचा बाप झाला’ हे वाक्य समीरच्या मनात खोलवर पोहोचले.जवाबदारी च्या जाणीवेन क्षणात त्याला तोआता बाबांच्या जागी असल्याचा भास होऊ लागला.
समीर ला आपलं बालपण आठवल
आपलं सगळं शेअर करायला आई असायची पण काही अडलं चुकलं तर मात्र बाबांसमोर उभ रहावं लागे. बाबांचा कायम मनात एक धाक असे त्यावेळी मात्र बाबा त्याला नेहमी सिनेमातल्या विलन सारखे वाटायचे .
बाबां फार शिस्त प्रीय,
अगदी खेळून आल्यावर चपला नीट ठेवल्या नाही वरूनही ओरडणारे बाबा, त्याच्या आठवीच्या परीक्षेच्या वेळी कंपास नीट लावला की नाही? मॅट्रिकच्या परीक्षेच्या आधी सकाळी लवकर कसा उठत नाही वरून शिक्षा करणारे बाबा,
नीट च्या परिक्षेच्या वेळी चा प्रसंग समीर च्या डोळ्या समोर उभा राहिला. पहिल्या अटेम्ट ला मार्क कमी पडले दुसर्या वेळी बाबांनी सरळ सांगितले फोन फक्त कामापुरता वापर सोशल मीडिया बंद, कोचिंग क्लास लावून दिला पण स्कूटर घेऊन दिली नाही.सायकल वर जावे लागेल क्लास ची फीस भरपूर आहे मला परवडत नाही तरी पण भरेन ही शेवटची.

समीर ला खूप दडपण आले होते. पण रात्री बाबा आई शी बोलताना ऐकले होते मला भरोसा आहे यावेळी होईल पास. मग मात्र समीर ने पूर्ण जोर लावून अभ्यास केला व सफल झाला.
आपल्या उज्वल भविष्य करता वर वर कडकपणा धरणारे बाबा,आईच्या शब्दात वरुन काटेरी आतून फणसासारखे आतून रसाळ असे...
आपल्या उज्वल भविष्य करता वर वर कडकपणा धरणारे बाबा,आईच्या शब्दात वरुन काटेरी आतून फणसासारखे आतून रसाळ असे...
आता समीर ला जाणवले आता त्याच्या खांद्यावर आपली जबाबदारी टाकून निर्धास्त झालेला त्याचा बाबा ,आणि ही नवीन जबाबदारी पेलण्यासाठी खांद्याला बळकटपणा देणाऱा बाबांच्या तोंडून ‘आता तू मुलाचा बाप झाला ‘ऐकल्यावर बाबा आपल्यात झिरपत चालले असे जाणवायला लागले ..
बाप होण्याची जबाबदारी नी त्यातून येणारा कडकपणा आता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उजळ भाग वाटू लागला आणि आता ती जबाबदारी पेलायला त्याला बळ हवेआहे
असे जाणवतात तो त्यांच्यातल्या बाबांपुढे नतमस्तक झाला .
------------------------------------------
©® प्रतिभा परांजपे
असे जाणवतात तो त्यांच्यातल्या बाबांपुढे नतमस्तक झाला .
------------------------------------------
©® प्रतिभा परांजपे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा