Feb 22, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

त्याचे तुटक वागणं भाग तीन

Read Later
त्याचे तुटक वागणं भाग तीन

त्याचे तुटक वागणं  भाग 3 गेल्या भागात आपण पाहीले की राजचे आई बाबा लग्नाला गेले होते. राज नाराज होता कारण आई बाबा त्याच्यासोबत काकाच्या function ला  आले नव्हते. राज रात्री घरी आला तर पाहतो तर आई बाबा अजून आले नव्हते .त्याने आई बाबाला फोन लावला , दोघांनी  फोन उचलला  नाही राज चिंतीती झाला . तोच राकेश नावाच्या व्यक्तीचा फोन आला . त्याच्या बाबांचा मित्र होता.पाहू पुढे राकेश : “राज , नीट ऐक मी काय बोलतो आहे. तुझ्या आई बाबांचा अपघात झाला आहे. दोघांना मी दवाखान्यात आणले आहे. राजला रडू आले. रडक्या स्वरात तो राकेशला म्हणाला .“कोणत्या दवाखान्यात आहे आई बाबा ? “अपोलो” राकेश म्हणाला “ठीक आहे मी लगेच येतो.” राज म्हणाला राजच्या अंगातून अवसान गळून गेले.कसाबसा तो निघाला.डोळ्यासमोर अंधाऱ्या  आल्या. दवाखान्यात पोहोचलाराकेश त्याची वाट पहात  बसला होता. “कसे  आहे आई बाबा” राज रडकुंडीला येवून विचारू लागला . राकेशने राजच्या पाठीवर हात ठेवला .“काळजी करू नको , अमोल आणि वाहिनीला काही होणार नाही.” राकेशने दिलेले धीराचे  शब्द ऐकून राजला  जरा हायसे वाटले. आवंढा गिळत राज म्हणाला “कसा  झाला अपघात ?” राकेश “समोरून कारमध्ये  पोरं  दारू प्यायलेली , त्यांचा तोल  गेला आणि अमोलच्या गाडीवर आदळली , अमोलच्या पायाला मार लागला आहे, वहिनीच्या कंबरेला  मार लागला आहे. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावे लागेल”  राजला प्रचंड राग  आला त्या दारुड्या पोरांचा . आज त्यांच्या हलगर्जीपणामुळे आई बाबांची अशी अवस्था झाली. डॉक्टर आले . राजला त्यांनी सांगितले .  ऑपरेशनची  प्रोसीजर . राजची फॉर्मवर सही घेण्यात आली. सही करत असताना त्याचा हात  थरथरत  होता. पाय थंड पडले होते. राकेश काका  त्याला धीर देत होते. काळजी करू नको.होईल  सर्व ठीक .ऑपरेशन होत  असताना राकेश आणि राज ot  च्या बाहेर फेऱ्या मारत होते. राजच्या छातीत धडधड होत  होते. राकेशसुद्धा तिथे असलेलया  गणपती बाप्पा  समोर सतत हात जोडून प्रार्थना करत होता.  सोबतीला राकेश होता, म्हणून बरं  राजला  थोडा आधार होता. राजला एक एक मिनिटसुद्धा तासाच्या बरोबरीचा वाटत होता. कधी एकदाचे आई बाबाला पाहतो आहे असे झाले. त्याला अमेय काकाची आठवण झाली . त्याने अमेयला  फोन केला. राज “काका, आई बाबांचा अपघात झाला आहे, ते दवाखान्यात आहे. आता ऑपरेशन साठी नेहले आहे .”  अमेय काळजीच्या  सुरात म्हणाला “ओहह, फार वाईट वाटले . मी सध्या मीटिंग मध्ये आले. मी मीटिंग झाली की लगेच येतो. काळजी घे”  राज “ठीक आहे काका”   थोड्या वेळाने डॉक्टर आले. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचे सांगितले. राजच्या जीवात  जीव आला. इतका वेळ धरून ठेवलेला धीर आता गळून पडला. तो रडू लागला . राकेशने गणपती बाप्पा समोर हात जोडले. राकेश “राज , रडू नकोस बाळा  , मी तुला म्हणालो होतो ना अमोल आणि वहिनीला काही होणार नाही. दोघांनी  खूप पुण्य कमावले आहे. तुझ्या आजी आजोबांची खूप सेवा केली आहे. आजी अगदी बेड रीडन  होती तरीही अमोल आणि वहिनीने लहान बाळाला  जपतात  अगदी तसेच जपले आहे. तुझे आजी आजोबा नाही जगात पण  त्यांचे आशीर्वाद निरंतर सोबतीला आहे राज”   डॉक्टर म्हणाले “आता तुम्ही त्यांना पाहू शकता”

राज लगबगीने गेला . आई बाबाला  पाहून खुश झाला . राकेशसुद्धा खुश झाला. दुसऱ्या दिवशी राकेशची बायको अमोल आणि राधा साठी न्याहरी , जेवण घेवून  आली.अगदी राजसाठीसुद्धा .  त्या चार दिवसांत राकेश आणि त्याची बायको खूप मदत करत होते. एकदाचा डिस्चार्ज मिळाला . राज आई बाबाला  घरी घेवून  गेला. त्याने पंधरा  दिवसाची सुट्टी काढली. आई बाबाची काळजी घेवू लागला . राकेश रोज येवून अमोल आणि राधाची चौकशी करत होता.  एक दिवस सकाळीच राकेश आला “राकेश , आम्ही दोघेही ठणठणीत आहो आता , किती ती  धावपळ करशील.” अमोल म्हणाला . “अमोल , काय रे मी काय परका आहे का. माझ्या मित्रासाठी इतके  तर केलेच पाहिजे.”  राकेश अमोलचा हात पकडत म्हणाला . त्याच्या डोळ्यात पाणी तरळले .  राज तिथेच उभा होता त्याला राकेश  आणि अमोलच्या मैत्रीचा  हेवा वाटला.  राकेश निघून गेला . राज आई बाबांशी बोलू लागला . “किती चांगले आहेत राकेश काका , तुमच्या दोघांसाठी त्यांनी खूप धावपळ केली. आताही न चुकता रोज येतात.”  अमोल “ राज, माझ्यासाठी  राकेश सर्वात मोठी संपत्ती  आहे. माझ्या जीवाभावाचा  मित्र आहे . त्याचा सारखा मित्र नशीबवान लोकांनाच  मिळतो. राज “मी राकेश  काकाला  पहिल्यांदाच पाहीले . याआधी  कधी पाहीले नव्हते. कुठे असतात ते” अमोल “त्याचा गवर्नमेंट जॉब , सतत बदली त्यामुळे एका  ठिकाणी नसतोच तो पण  आम्ही नेहमी फोनवर एकमेकांशी  संपर्कात होतो. आता तो रिटायर झाला. इथेच शिफ्ट झाला आता. आमच्यामुळे  त्याच्या एकुलत्या एक मुलाचे लग्न असूनही त्याला तिथे राहता आले नाही. “   “काय , म्हणजे त्या दिवशी राकेश काकाच्या मुलाचे लग्न  होते. ?”  राजने  आश्चर्यचकीत  होऊन  विचारले.  अमोल “हो राज , त्या दिवशी त्याच्याच मुलांचे लग्न होते. आमचे असे झाले हे त्याला कळले की तो लगेच निघाला .”  हे ऐकून राजच्या मनात राकेश काका विषयी आदर  कैकपटीने वाढला होता.  राज “ठीक आहे तुम्ही दोघे आराम करा”  राज मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी निघून गेला.  अचानक त्याला आठवण झाली. आपण अमेय काकाला सांगितले होते. ते आले तर नाही आणि त्यानंतर साधी  विचारपूस केली नाही. राजला आशा होती की अमेय येईल . अमेय आला तर नाही पण  त्यानंतर  राजला एक  फोनही नाही.”   आता राज समजून गेला होता. अमेय काकाचे गोड  बोलणे फक्त वरवरचे होते. त्याच्यात आत्मीयता मुळीच नव्हती. जर  त्यांना खरोखर  प्रेम असते तर ते आले असते. ज्या  माणसाला प्रेम असते तो कितीही व्यस्त असला तरी देखील तो आपल्या माणसासाठी वेळ काढतो . आपले तर राकेश काका आहे. स्वत:च्या मुलाचे लग्न असून देखील राकेश काका, बाबा आई सोबत आले आणि हे अमेय काका मीटिंग  आहे म्हणून स्वत:च्या भावाला अपघात झाला तरी बघायला आले नाही.        त्याला खूप राग  आला, आई बाबासोबत आपण ह्या माणसासाठी किती तुटक वागलो ह्यामुळे स्वताचीच  चिडही आली.  तो घरी गेला .  गेल्या गेल्या त्याने आई बाबांची माफी मागितली.अमोल् :”माफी  कशासाठी ?”  राज : “ बाबा ते मी तुम्हाला , आईला  चुकीचे समजलो आणि चुकीचा वागलो त्यासाठी , मला कळून चुकले की तुम्ही अमेय काकांच्या पार्टीला का नाही आला . मी तुमचा  अपघात झाला तेव्हा अमेय काकाला  फोन केला होता. तेव्हा ते म्हणाले मीटिंग संपल्यावर येईल. मला आशा होती. ते येतील . आले तर नाहीच  पण साधी   विचारपूस केली नाही. मला अजिबात आवडले नाही. असे कसे वागू शकतात ते. स्वत:च्या भावाच्या दु:खात सामील होऊ शकत नाही , वेळ देऊ शकत नाही. त्यापेक्षा  राकेश काका  आपले आहे. त्यांना तुमच्याविषयी  प्रेम आहे काळजी आहे.बाबा मी त्यांना ब्लॉक केले आहे ,अशी माणसं  काय आपली म्हणायची जी आपल्या सुखदुखात  आपल्या सोबत नाही.”  क्रमश : आता अमोल आणि राधा चुकीचे नाही हे अमोलला  कळले होते. अजून कथेत एक twist  आहे . तो  मिस  करू  नका . आजचा भाग कसं वाटला नक्की सांगा. अश्विनी ओगले .मनातले मनापासून .    


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..

//