त्या रात्री काय घडल (भाग - एक)

एक हृदय स्पर्शी रहस्यमय कथा


राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कॅटेगरी : रहस्यमय कथा
संघ : ईरा संभाजीनगर
जिल्हा : औरंगाबाद / संभाजीनगर
कथेचे शीर्षक : त्या रात्री काय घडल
लेखिका : ©® धनश्री काजे

गोखले निवास...
"आज तब्बल वीस वर्षांनी या वाड्यावर पाऊल ठेवत आहे. या वीस वर्षात सगळ काही बदलल. पण जो बदलला नाही तो हा वाडा आणि या वाड्याच्या आठवणी. मला आज ही आठवतय कस उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की आम्ही या वाड्यावर यायचो खूप मस्ती करायचो. पण आज मात्र माझ्या बरोबर मस्ती करायला माझ्याशी भांडायला तो नाहीये. आज मी या वाड्यावर एकटीच आहे. एकदम एकाकी."
वेदश्री. लहानपणींच्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक भिंतीना स्पर्श करत गोखले वाडा बघत होती. आजही तिला लहानपणींच्या त्या लपण्याच्या जागा माहीत होत्या. ती त्या प्रत्येक आठवणींचा अनुभव घेत होती.
आणि अचानक एक आवाज आला आणि ती तिथेच थांबली.
"ताई, कशी आहेस? आज मला राखी नाही बांधणार?"
वेदश्री आवाज ऐकून अवाक झाली आणि गतकाळातल्या आठवणींमध्ये हरवून गेली.
भूतकाळात...
"आज्जी आज्जी आम्ही आलो."
लहानपणीचे वेदश्री आणि विरश दोघ पळत पळत येऊन आपल्या आजीला मिठी मारली. त्यांना दोघांना बघून सुलभा ताई त्या आनंदात हरवून गेल्या. खूप वर्षानी दोघांना आलेलं पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि त्या दोघांना जवळ घेत म्हणाल्या.
"आलात का बाळांनो या. आपल्या आजीची तुम्हाला आठवण आली. कसे आहात?"
आणि लाडात येऊन वेदश्री म्हणाली.
"हे काय ग आजी, तुझ हे नेहमीचच असत बघ. आम्ही आलो की लगेच तुझ्या डोळ्यात पाणी येत."
वेदश्रीच गोड बोलण ऐकून सुलभा ताईंना हसूच आलं आणि त्या आपले डोळे पुसत तिला म्हणाल्या.
"नाही हो, मी कुठे रडते. माझ्या या दोन चिमुकल्यांना खूप दिवसांनी बघितलं न म्हणून डोळ्यात पाणी आलं बस."
हे ऐकताच दोघ हसायला लागले. त्यांच्या हसण्याने तो वाडा ही आनंदून गेला.
आणि तेवढ्यात सुलभा ताईंची मुलगी प्रतिमा आणि जावई उदय वाड्यात आले. आपली पर्स सावरत प्रतिमा तर एका हातात बॅग पकडून उदय एकत्रच सुलभा ताईंच्या पाया पडतात व म्हणतात.
"आई, नमस्कार करतो."
दोघ सुलभा ताईंच्या पाया पडतात आणि सुलभा ताई त्यांच्या डोक्यावर हात ठेवत आशिर्वाद देतात.
"सुखी रहा पोरांनो. कसा झाला प्रवास?"
समोरच्या टेबलावर आपली पर्स ठेवत प्रतिमा सांगते.
"काही विचारू नकोस आई अग इथले रस्ते किती खराब झाले आहेत. आम्ही गाडी कशी आणली आमचं आम्हालाच माहीत."
सगळे गप्पा मारतच असतात की, वाड्याचा नोकर देवदत्त दोघांना पाणी घेऊन येतो. देवदत्तांना बघून प्रतिमा त्यांची विचारपूस करते.
"काय दत्ता भाऊ आहे का ओळख? कसे आहात?"
कुणीतरी आपली चौकशी करतय बघून देवदत्तांना खूप बरं वाटत ते लगेच प्रतिमाला म्हणतात.
"धाकल्या ताईस्नी कसा विसरेन मी तुम्हाला इथे आलेलं बघून लै छान वाटतय बघा. मी बघतो ना मालकीण बाईंना तुमची किती आठवण येते. आता तुम्ही आलात ना तेवा मालकीण बाई बी खुश राहतील."
प्रतिमा आणि उदय दोघ एकमेकांकडे बघून हसतात. देवदत्त पाण्याचे ग्लास घेऊन निघून जातात आणि इकडे पोरांची मस्ती सुरूच असते.
तेवढ्यात वेदश्री आठवणींमधून जागी होते तोच मागून एक आवाज येतो.
"मॅडम, तुमचं सामान."
वेदश्रीचा ड्रायव्हर सामान घेऊन येतो. त्याला पाहून वेदश्री म्हणते.
"हो, ठेवा इथे सामान मी बघते."
ड्रायव्हर वेदश्रीच सामान ठेऊन निघून जातो आणि वेदश्री परत वाडा पाहण्यात मग्न होते.
काही वेळा नंतर...
ती वाडा बघतच असते की परत तेच वाड्याचे नोकर देवदत्त पाण्याचा ग्लास घेऊन येतात.
"ताई साहेब पाणी. कसा झाला प्रवास?"
पाण्याचा ग्लास हातात घेत वेदश्री सांगते.
"प्रवास कसला? पाहिले इकडे येण्याची ओढ असायची. पण आता अस काही उरलच नाही. ठीक झाला प्रवास. माझं सोडा तुम्ही कसे आहात?"
वेदश्री कडून पाण्याचा ग्लास घेत देवदत्त सांगतात.
"मी बरा आहे. आमच्या धाकल्या ताईसाहेब कश्या आहेत. खूप वर्षात त्यांना भेटणच झाल नाही. त्या घटने नंतर तुम्ही सगळे जे निघून गेलात ते परत आलाच नाहीत आणि आज इतक्या वर्षांनी तुम्ही येताय."
देवदत्तांच बोलण ऐकून वेदश्रीच्या डोळ्यात पाणी येत. ती आपले डोळे पुसत सांगते.
"काय करणार दत्ता काका. आमच्या पैकी कुणीच ती घटना आज ही विसरू शकत नाही तो क्षण नुसता आठवला तरी अंगावर काटा उभा रहातो. मी त्यावेळेस खूपच लहान होते. पण समोर काही तरी चुकीच घडत आहे एवढं मला कळत होतं. आज हा वाडा विकायचं मनात नसत तर मी आले ही नसते."
देवदत्त तिची समजूत काढतात.
"अस नका म्हणू ताई. मी सुद्धा आहेच की इथे आणि वाड्याच म्हणाल तर लहान तोंडी मोठा घास घेतोय. कशाला हा वाडा विकताय? इथे तुम्हा दोघांच्या किती तरी आठवणी जपल्या गेल्या आहेत. जुन्या वास्तू अस आजकाल कुठे पाहायला मिळतात."
वेदश्री गालातच हसते आणि म्हणते.
"तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे काका. पण पैशासाठी करावं लागणार सगळ मला काय करणार."
देवदत्त पाण्याचा ग्लास घेतात आणि निघून जातात. वेदश्री आपल समान घेऊन वाडा बघत बघत आपल्या खोलीत येते आणि समान लावून फ्रेश होते.
काही वेळा नंतर...
देवदत्त वेदश्री च्या खोलीत येतात आणि तिला विचारतात.
"ताई जेवायला काय करू?"
वेदश्री खूपच थकलेली असते त्यामुळे तीला फारशी भूक ही नसते. थकलेल्या आवाजातच ती म्हणते.
"दत्ताकाका मला भूक मी खूप थकलीये आता झोपते सकाळी बघूत."
हे ऐकल्यावर नोकर देवदत्त तिथून निघून जातात आणि वेदश्रीला झोप लागते.
रात्री बरोबर 12 :30 ची वेळ:
थकल्यामुळे वेदश्री ला झोप लागते. आणि त्याच वेळी एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो. आणि तिची झोप मोडते. आणि ती आपल्या खोलीतून बाहेर येते. व आवाजाच्या दिशेने जाऊ लागते.
काही अंतर चालल्या नंतर...
एका कोनाड्यात तिला एक लहान मुलगा दिसतो त्या मिणमिणत्या प्रकाशात तिला त्याचा अंधुकसा चेहरा दिसत असतो. तो मुलगा तिच्याकडे काही क्षण नुसता बघतच रहातो त्याच्या डोळ्यात पाणी असत. वेदश्री त्याच्याकडे एक पाऊल टाकते आणि अचानक तो निघून जातो. वेदश्री मात्र या घटनेचा विचार करू लागते. तिला तो चेहरा ओळखीचा वाटतो. आणि त्या चेहऱ्याचा विचार करता करताच खोलीत झोपायला निघून जाते.
क्रमशः

लेखिका : धनश्री काजे
जिल्हा : औरंगाबाद / संभाजीनगर



🎭 Series Post

View all