त्या दोघी

A story about two friends from different religion.

आम्ही पुण्याहून  शारजाला काही महिन्यांपूर्वी स्थलांतर झालो. देशा बाहेर राहायला जाण्याची ही पहिली वेळ नव्हती,पण तरी घर लावणे, मुलांसाठी नवीन शाळा शोधणे, नवीन भाषा, वेगळी संस्कृती, तिथले नियम ह्या सगळ्यात रुळायला वेळ हा लागतोच.

येऊन २ महिने झाले. रूटीन चांगलं बसलं होतं. सकाळची शाळा, ऑफिस लां ,मंडळी निघाली, की मी देखील जवळच्या बागेत मॉर्निंग वॉक साठी जाऊ लागलें. हळू हळू पार्क मध्ये ओळखी होऊ लागल्या.नवीन शहरात, किंबहुना नवीन देशात, आपल्याला आपल्या माय भूमीतली  माणसं अधिक जवळची वाटू लागतं. मग ते वेगळ्या प्रांतातले असले तरी !तेव्हा वेगळं राज्य, वेगळी भारतीय भाषा हे फरक खूप नगण्य वाटू लागतात!

सकाळचा १ तास वॉक आणि नंतर अर्धा तास बागेत गप्पा हा माझ्या दिनचर्ये चा अती महत्वाचा भाग झाला. कारण,तो माझा "स्वतः साठी " चा वेळ असे. काही दिवसातच बागेत वॉक साठी येणाऱ्या ७-८ जनिंशी माझी ओळख झाली आणि आमचा गप्पांचा कट्टा रंगू लागला. भारतातील विविध प्रांतांची, भाषेची, खाद्य पदार्थ, संस्कृती ची आता जवळून ओळख होऊ लागली होती. ग्रुप मधील मैत्रिणी ह्या वेग वेगळ्या प्रांतातल्या असल्याने ते शक्य झाले.

ग्रुप मधील "त्या "दोघींनी मात्र माझे अधिक लक्ष वेधून घेतले. त्या कायम बागेत एकत्र यायच्या- जायच्या, त्यांची नक्कीच खूप जुनी मैत्री असावी, एकमेकिन विषयी खूप जिव्हाळा, प्रेम, आदर होता  ...त्या बहिणीच असाव्या असं मला वाटू लागलं. त्यांच्या त्या घट्ट मैत्री विषयी नेहेमी ग्रुप मध्ये चर्चा असायची. मला फारच उत्सुकता वाटू लागली ...काय असं ह्या दोघीमध्ये विशेष?? एक होती मानसी आणि दुसरी शहनाझ! दोघी भारतीय होत्या हेच काय ते एकमेव साम्य!

अनेक प्रश्नांनी मी भांबावले, ह्या "दोघी" दोन वेगळ्या प्रांतातल्या नसून दोन वेगळ्या धर्माच्या आहेत आणि तरीही त्या दोघी इतक्या घट्ट मैत्रिणी असू शकतात?? त्यांच्यात कधी मतभेद झाले नसतील? घरातील मंडळींना माहित असेल का ह्याची मैत्री....आणि माहित असली तरी मान्य असेल का???

पडलेल्या अनेक प्रश्नांना वाट करून द्यायची आणि त्यांची उत्तर शोधायची अस मी ठरवलं. त्या  दिवशी बागेत गप्पा मारताना मी मानसी आणि शहनाझ ला त्यांच्या मैत्री विषयी विचारलं....म्हटलं सांगा ना कशी झाली तुमची मैत्री? आधी पासून ओळखत होतात का एकमेकींना तुम्ही? बहिणी वाटता तुम्ही.... इतके साम्य आहे तुमच्या मध्ये! म्हणजे दिसण्यात नाही ...पण तुमचे विचार, स्वभाव, वागणूक आणि अश्या अनेक गोष्टी!

"अगं बहिणीच आहोत आम्ही" दोघी एका सुरात बोलल्या!   म्हणतात ना, SISTERS  FROM ANOTHER  MOTHER!  एवढं बोलून दोघी हसल्या!

"इथे परदेशात, आपण फक्त "भारतीय "असतो आणि मला आणि शहनाझला, आम्हाला दोघींना जोडणारी ही नाळ इतकी घट्ट आहे की आमच्यातले असलेले  फरक हे आम्हाला कधी दिसलेच नाहीत". मानसी चे हे शब्द माझ्या मनावर कोरले जात होते!

"आम्ही एकमेकींना फक्त एखाद्या व्यक्ती /माणसा सारखा बघतो, आणि वागतो! ती व्यक्ती आपल्याला जर मनापासून आवडली असले,तिचे विचार पटत असतील तर आपण तिला तिच्या, धर्म , जात, पोट जात, प्रांत, भाषा, गुण, दोष ह्या सगळ्यापलीकडे जाऊन, आपल्या आयुष्यात सहज सामील करू शकतो!" शहनाझचे समंजस विचार आणि तिच्या मनाची श्रीमंती तिच्या बोलण्यातून जाणवत होती.

ह्या दोघी भारताच्या वेगळ्या प्रांतातल्या आणि धर्माच्या असल्या तरी माणूस म्हणून कसं जगावं हे त्यांना पक्क माहीत होत! दोघी घरंदाज, उच्च शिक्षित, समंजस गृहिणी आणि दोन मुलांच्या आई होत्या!

मला त्यांच्याशी बोलून खूप छान वाटत होतं, त्यांचं बोलणं  मला भावत होत.त्यांची विचार शैली, एकमेकीन विषयी त्यांची मतं, हे सगळं ऐकून मला त्यांच्या विषयी आदर वाटू लागला! मला खूप काही विचारायचं होतं, त्यांच्या कडून ऐकायचा होतं!

मानसी, शहनाझ तुम्हा दोघींच्या घरी तुमच्या मैत्री ला कस पाहिलं जातं? म्हणजे त्यांना काही आक्षेप वगैरे ? मी जरा स्पष्ट विचारते राग मानू नका ह!
हाहाहाहा....दोघी पुन्हा एक सुरात हसल्या!

"आक्षेप? तो कशाला ?" शहनाझ ने खांदे उडवत मला विचारलं?

"नाही, म्हणजे तुम्ही वेगळ्या धर्माच्या आहात तर..... " मी संकुचित आवाजात विचारलं!

"आम्ही दोघीच नव्हे, आमची कुटुंब पण एक मेक्कान चे छान मित्र आहेत! आम्ही सगळे जण नेहेमी भेटत असतो, कधी एकमेकांकडे फॅमिली डिनर ला जातो ,कधी बाहेर पिकनिकला जातो, आमच्या मुलांना घेऊन गार्डन, पार्क, पिक्चरला न्हेतो." शाहनाझ आनंदाने सांगत होती.

"अगं एवढंच नाही आम्ही दोन्ही कुटुंब रमझान ईद ,दिवाळी, गणपती, राखी पौर्णिमा असे अनेक सण एकत्र साजरा करतो!" मानसी चे हे बोलणे ऐकून मी जरा चक्रावले!

"एखादा सण म्हणजे नक्की काय असतं? आपल्या संस्कृतीची जपणूक आणि आनंदाची देवाण घेवाण! हो ना ?? मानसीने विचारले ....म्हटलं हो बरोबर!

"आम्ही तेच करतो! " शहनाझ सहज बोलून गेली! आम्हीं दोघी एकमेकींच्या धर्माचा मान ठेवतो आणि एकमेकींच्या आनंदात सहभागी होतो! मी आणि माझे कुटुंब मानसी चे घरी दिवाळीला शुभेच्छा द्यायला जाते आणि लाडू ,चिवडा, चकल्या ,करंज्या आनंदाने पोट भर खाते. तीही माझ्या घरी येते, आम्हाला ईद मुबारक करायला. मग आम्ही दोन्ही कुटुंब एकत्र शीर खूर्मा पितो आणि बिर्याणी चा आस्वाद घेत एकत्र जेवतो!

"माणुसकी जपण आणि एकमकांचे धर्म, त्याची धोरणे, पद्धती, ह्याचा मान ठेवण फार काही अवघड नसत! माणसाला माणसां सारखं वागवणे हे इतकं का अवघड करून ठेवलं आहे हेच कळत नाही? काही वाईट विचार धरणे चे लोकं, किंवा काही चुकीचे कर्म करणारे  लोक ह्यांच्या मुळे दोन धर्मांमध्ये पेटलेलं युद्ध आपल् आणि आपल्या पुढच्या पिढी चे भवितव्य धोक्यात घालत आहे." जगा आणि जगू द्या इतकं सोप्पं आहे बघ...." मानसी चे हे बोलणे ऐकून मला त्यांच्या दोघींच्या मैत्रीचा  पाया कित्ती मजबूत आहे ह्याचा अंदाज आला!

"त्या दोघींचा " मानसी आणि शहनाझ चा निरोप घेऊन मी बागेतून घरी जायला निघेल. वाटेत माझ्या डोक्यात विचारचक्र चालूच होते, ह्या दोन वेगळ्या धर्माच्या कुटुंबा ना आनंदात, मिळून मिसळून जगण्य सोप्पा मंत्र मिळाला होता! "जगा आणि जगू द्या " हा मंत्र फक्त भारताच्या बाहेर राहायला आल्यावर कळतो की ह्या मंत्रा ची जादू भारतात सुध्दा वापरता येऊ शकते?? ह्या माझ्या प्रश्नच उत्तर कुठे शोधावं ते कळेन??

@तेजल मनिष ताम्हणे