त्या भयानक रात्री ..भाग 4

Horrer story ...

               ********************


            इकडे वाड्यात या दोन पिशाच्यांचा आकांडतांडव चालूच होता ,कारण अचानक शिवानी कुठेतरी गायब झाली होती ,आणि ती कुठे गेली हे या पिशाच्यांच्या लक्षातच आलं नाही .  आणि जिथे शिवानी चुकून पडली तो  तळघराचा मार्ग  त्या दोन पिशाच्यांनीच  काढला होता , अचानक कोणी आलचं इथे तर त्याला समजू नये  ,आणि आपण पकडू जाण्याच्या आदी इथून खाली तळघरात जावं , म्हणजे जो कोणी आपल्याला केव्हा बघेल या शोधेल त्याला समजणारचं नाही इथल्या इथे गायब व्हावं . खाली तळघरात जावं ,,जिथं ....जिथं तर आपलं खाद्य ठेवलेलं आहे लपवून ….   या जागेबद्दल खरतर ते दोघेजणही विसरून गेले होते , की शिवानी इथे पडू शकते या लपू शकते . कारण त्या पिशाच्यांना या गुप्त रस्त्याची केव्हा गरज पडलीच नाही . कोणी एकदा आत वाड्यात चुकून आला की त्याचा शेवटचं  करून टाकायचे हे दोघे , मग यांना कशाला कोणापासून लपायची गरज लागतेय .
       वाड्याची ही बाजू तर शिवानी पासून अजून लपूनच होती . जोरात आवाज करत  ,धपकन शिवानी त्या बोगद्यासारख्या रस्त्यातून खाली पडली .तिला काही समजलेच नाही ,नक्की काय होतय आपण कुठे पडलो . ती  दोन पिशाच्च कुठे गायब झालीत ,कशाचाचं सुगावा तिला लागत नव्हता .   
    तीने स्वतःला  सावरलं आणि इकडे तिकडे ती हाथ लावून चाचपडून पाहू लागली , की नक्की आपण कुठे आहोंत . काहीतरी ओलसर ओलसर जाणवलं तिच्या हाताला , घट्टसर चिकट द्रव्य होत ते , तिने लगेच ओळखलं नक्कीच ते रक्त असणार .. वरती तिने थारोळे च्या थारोळे बघितले होते रक्ताचे ...    अजून पुढे घसरत घसरत जाऊन बघत होती ती ,काहीतरी मार्ग मिळतोय का इथून बाहेर निघण्याचा .. ती धडपडली ... कसलीतरी गाठोडी बांधून ठेवल्यासारखं वाटतं होत .
         तिने हाथ लावून बघितलं ,नक्की काय आहे त्यात .... तिच्या हाताला जी गोष्ट लागली ... पूर्ण अंगाचा थरकाप उडाला तिच्या , तिने कल्पना सुध्दा केली नव्हती अस काही असेल ,मनात सुद्धा तिच्या हा विचारआला नाही ,की इतकं पुढच्या टोकाचं तिला अनुभवाव लागणार आहे . 

       जस  पिशव्यांत सामान भरावं आणि जागा कमी पडली म्हणून रेचून रेचून कोंबाव , तसं त्यात दुसर तिसरं काही नव्हे तर अर्धी मुर्धी खावून राहिलेलं ,माणसांची प्रेतं होती त्यात ... जिकडे बघेल तिकडे  तेच ते .. कुठे  तुटलेला  हाथ  लागायचा ...  कुठे पाय ... कुठे फक्त धड तेही बिना मुंडक्याच ... कुठे  कुणाचे केस हातात यायचे डोक्याचे .. खूप किळसवाण होत ते सगळं ...  
       आता मात्र शिवानी ला समजलं होतं . ते वाड्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीत जे एवढे सगळे कपडे होते ते कुठून आले होते ,कोणाचे होते .आणि आता देखील  तिच्या अंगात तेच होते .खुप किळसवाण वाटत होतं तिला , हा सगळा प्रकार बघून .आणि स्वतःचा खूप रागही देखील येत होता .
          जर मी मम्मा बरोबर अशी भांडून ,रागावून  आले नसते तर हे सगळं घडलंच नसत माझ्या बरोबर .. तिला आता आपल्या आई ची खुप आठवण येत होती . " मम्मा प्रत्येक वेळी मी चुकल्यावर तू समजावलयंस मला , अडचणीत असल्यावर तू मदत केलीयस मला ,आता ही तूच वाचव "...  मला माहितेय तू येणार आपल्या पिल्यासाठी....     आणि जोरजोरात रडू लागली ..   आता काहीवेळाने मी असणार या गठोडयात .. मला ही असंच अर्ध मुर्ध खाऊन भरून ठेवतील या पिशव्यांत पुन्हा खाण्यासाठी.... 
      धीर संपला होता तिचा , बिलकुल हतबल होती ती .. देवच काही करेल ,अस मन म्हणत होत तिचं ,,  
      तिच्या हुंदक्याचा आवाज .. त्या दोघांपर्यत केव्हाच पोहचला होता .भीतीमुळे शिवानी ला समजल नाही आपण जोराजोरात रडायला नको होतं . आता खरा खेळ चालू झाला होता. ते दोघेही आपले अवजड पाय धप धप आवाज करत पुढे पुढे शिवनीच्या दिशेने सरकवत होते .. तिला आता हलताही येणार नव्हतं ,मार्गच नव्हता कोणता शिल्लक ,की ती तिकडे जाईल , लपून बसेल ..अशी कोणती जागाच नव्हती .....नशीब बलवत्तर म्हणून मघाशी ती चुकून इथं तळघरात पडली ,पण तरीही काही फायदा नव्हता उलट इथं पडल्यामुळे  ती तर जास्त अडकली होती .इथे  ती हलचाल ही करू शकत नव्हती . सुटकेचे सर्व मार्ग संपले होते. 

       एव्हाना ते दोघे तिच्यापासून काही अंतरावरच होते ,मनात तिच्या चालूच होत ,देवा आता तूच काहीतरी कर . मला यातून बाहेर काढ ."मम्मा ये ना गं ", तूझ्या पिल्याला वाचव ना गं . तेवढ्यात तिच्या केसाला जोराचा हिसका बसला ,ती विव्हवळली .खुप जोरात .. मुकुंद नी तिचे केस पकडले होते ... तो मुकुंद वगेरे कोणी नव्हता ,ते पिशाच्च होत एक ,ज्याला नर मांस ,आणि ताज रक्ताची आस होती फक्त .. मग समोरची व्यक्ती ,लहान मूल असुदेत ,म्हातारी व्यक्ती ,या शिवानी सारखी तरुण मुलगी .. त्याला काही फरक पडणार नव्हता ...   
      जंगलात कोणी भरकटल ,रस्ता चुकलं की ह्यांची रक्ताची तहान जागी व्हायची , आपोआपचं यांना वास लागायचा . मग काळी सावली बनून जायचं आणि त्या व्यक्तिला .. घाबरवत घाबरवत इथपर्यंत आणायचं ... मग तेच नाटक चालू.... मुकुंद आणि  मुकुंद च्या आईचं ..       ती काळी सावली दुसरं ,तिसरं कोणी नसून मुकुंदच होता तो ,हे शिवानीला  आता कळून चुकलं होत . खसदिशी तिच्या मानेला जोराचा हिसका बसला . ती अचानक बसलेल्या हिसक्यामुळे कळवळली  . तिला रडताना पाहून हे दोघेजण अजूनच जोरजोरात हसायला लागले .ती ओरडत होती ,रडत होती जिवाच्या आकांताने .. पण तिथे कोणीच नव्हत तीचं ऐकायला , मेलेली ,कुजकी ,सडकी प्रेतं... ती तरी काय करणार ... त्यांची अवस्था तरी याहून काय वेगळी झाली असेल का ..  
         ते दोघेजण चित्र विचित्र आवाजातओरडत होते ... हसत होते.. खूप दिवसांनी आज आपल्याला ताज मांस खायला मिळणार .. ह ...ह.. हा...हा..ह.. ह..हहा..हह..हहा...  जोरजोरात आवाज काढून ते दोघे पिशाच्च हसत होते .
      शिवानी खूप भेदरलेली होती .  या दोघांनी तिला ओढत ओढत तळघरातुन वर आणलं .जिथून ती अचानक खाली तळघरात पडली होती त्याच रस्त्याने ..  तिथल्या एका ओंडक्यावर तिचं डोकं ठेवलं ..  बधिर झाली होती ती . काही समजत नव्हतं तिला आपल्याबरोबर हे काय होत आहे ... श्वास तेवढा चालू होता अगदी संथ .. काहीवेळाने तोही नसणार होता ...  त्या पिशाच्चीणी ने म्हणजे मुकुंद च्या आईने तिचे केस पकडले होते .. आणि मुकुंद तिकडे पडलेला ,कोयता आणण्यासाठी गेला ..  रक्त सुकलं होत त्या कोयत्यावरचं .. पण काहीच वेळांत तो कोयता पुन्हा ओल्या रक्ताने माखणार होता ...  मुकुंद हा..... हूं ...... आवाज करत तिच्याजवळ आला ,आणि त्याने कोयता उचलला  तिच्या शीर धडापासून वेगळं करण्यासाठी ... तिने किलकिल्या डोळ्यांनी बघितलं .. कोयता आता आपल्या मानेवर येऊन पडणार , आणि बस्स .. आता आपला शेवट ...  तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि" आई " म्हणत एकच किंकाळी त्या अमानवी ,निर्दयी ,पिशच्ची वाड्यात फोडली...                

         

                **********************************

           आई .... असा आवाज करतच तिला जाग आली .हळूहळू तिने आपले डोळे उघडले ... पाहते तर काय ,तिला प्रथम विश्वासच बसेना ,हे सत्य आहे की स्वप्न …..   नक्की झालं काय .. आपण इथे कसं..  खर म्हणजे आपण जिवंत कसं...आपण तर त्या रक्ताच्या थारोळ्यात , आपली मान ,तो कोयता ... ते दोघे ... 
       कुठे गेले .. काय झालं  .... हा विचार करत ती उठण्याचा प्रयत्न करू लागली .... पण मानेला बसलेला झटका .. जेव्हा तिच्या केसाला धरून ओढत आणलं ..  दुखावली होती मान.. पण शाबूत होती , हे महत्वाचं .. तेही तीच नशीब बलवत्तर म्हणून नाहीतर काय वाचते आणि कशाचं काय ... 
     तिची आई तिला म्हंटली .. हलू नको बाळा ,आराम कर ... खूप त्रास सहन करावा लागला ना माझ्या बबड्या ला .... आई ने अस प्रेमाने बोलताच  .. शिवानी बिलगली आईला .. आणि रडू लागली ... "मम्मा, सॉरी ना गं ! " मला माफ कर पुन्हा कधी कधी मी भांडणार नाही तुझ्याही , ना कधी अस रागाने सोसोडून जाण्याचा मूर्खपणा करणार .. आईच्या ही डोळ्यात पाणी आलं ...  हो ,माझा बेटा ... सॉरी वगैरे नको म्हणू ... बस पुन्हा कधी अस सोडुन जाणार नाही ,अस प्रॉमिस कर .. 
      प्रॉमिस ,मम्मा ! अस कधी कधी होणार नाही पुन्हा ,कधीच नाही .   
     तेवढ्यात तिथे उभा असलेला तो गावातील गुराखी ,तो बोलला .. मंग ,आमचं काम झालं असलं तर आम्ही समदी जाऊ का , ताईसाहेब.. ! 
            शिवानी गांगरली .. आता हे कोण ?   
हे तर नाहीत ना मारणार मला ? ती घाबरली आणि जोरात ओरडली .. "आई ,मला वाचव !"

      बाळा , घाबरू नको ... यांनी तर मदत केली मला ,तुझ्यापर्यंत पोहचायची ...  यांच्यामुळेच मी वाचवू शकले तुला ,त्या पिशाच्यांच्या तावडीतून .. यांचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत .. यांच्यामुळेचं मी माझ्या पोटच्या गोळ्याला वाचवू शकले ,नाहीतर तुझ्या नसण्यानं माझं काय झालं असत माझं मलाच माहीत ,अस बोलत शिवानीची आई आपले डोळे पुसू लागली ..
   तो गुराखी म्हणाला ,आता रडू नगासा ,ताईसाहेब ! देवाच्या कुरपेनं समदं आपल्या मनासारखं झालंय , आणि आता त्या दोन भूतास्निबी  त्येंची शिक्षा मिळाल्या , आता कुणाचा बी बळी न्हाय जायचा त्या जंगलात .... 
       तेवढ्यात तिथे उभे असलेले थोर पुरुष ,एक अलौकिक तेज होत त्यांच्या चेहऱ्यावर ,ते म्हणाले " स्वामी ओम ,स्वामी ओम ,श्री गुरुदेव दत्त ! " 
      आई बोलली बाळा यांना नमस्कार कर ,खूप मोठे धार्मिक व्यक्ती आहेत हे ,यांच्या सामर्थ्यामुळे त्या पिशाच्याना नष्ट करता आलं . 

        पण शिवानी च्या चेहऱ्यावर मात्र खूप मोठं प्रश्न चिन्ह होत , की हे सगळं कसं झालं ,मी कशी वाचले ,मला आईने कसं सोडवलं त्या नराधमांच्या  तावडीतून ...   आई बोलली थांब बाळ ,मी सांगते तुला सर्व ,कस झालं , काय झालं ,तुला कस वाचवलं आम्ही ...   


क्रमशः 

© VAISHU PATIL 
                         

🎭 Series Post

View all