A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session95e0c9a7221186b77463e80f2dcf0afe93e126353faea0acfdf9bbcb29a402b22aa99ce3): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Tya bhaynk ratri bhag 2
Oct 31, 2020
भयपट

त्या भयानक रात्री .. भाग 2

Read Later
त्या भयानक रात्री .. भाग 2

  बाहेर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिवानी पूर्णपणे ओलेचिंब झाली होती ,कारण ती त्या बेभान बरसणार्या  पावसातूनचं धावत पळत वाड्यापर्यंत आली होती . मुकुंद बरोबर बोलणं जरी झालं असलं तरी अजून त्याने तीला कपडे वगैरे भिजलेत याबद्दल तिला काही विचारलंच नव्हतं त्यामुळे ती तशीच ओल्या कपड्यात कुडकुडत बसली होती ,मुकुंद ने ते पाहिलं, त्याने ओळखलं शिवानीचे पूर्ण कपडे तर ओलेचिंब झालेत , कशाचाही विचार न करता पटकन  त्याने  तिला वरच्या खोलीत जाऊन  ओले कपडे बदलायला सांगितले .  
         शिवानी  स्तब्ध झाली ,म्हणजे तिला ही थंडी लागतंच होती आणि कपडे बदलण्याची खूप आवश्यकताही  होती पण तीचं मन शांत बसणाऱ्यातलं थोडीच होतं . लगेच तिच्या मनात विचार आलाचं ,इथे तर हे दोघेच आहेत . एक बॉडीबिल्डर तरुण आणि एक माझ्यापेक्षा दुप्पट वयाची बाई ,मग इथे यांच्याजवळ माझ्या मापाचे कपडे कुठून आले .             
         माझ्या मनात ना उगाच भलते सलते विचार सारखे येतात ,वेळ काय ,मी विचार काय करतेय .  असेल याची कोणी मैत्रीण वगैरे, येत असेल हा मुकुंद आपल्या मैत्रिणींना इकडे घेऊन , तसंही एवढा हँडसम ,डॅशिंग आहे हा . एक दोघी तर नक्कीच पटवल्या असतील ह्याने ,तेव्हाच म्हणला ना ,वरती रूम मध्ये तुझ्या मापाचे कपडे आहेत . बदलून ये ,अशी ओल्या कपड्यात बसू नको ..
      मरु दे ! मला काय करायचं ,कशीतरी रात्र काढायची या भयानक वाड्यात आणि सकाळी निघायचं इथून या जंगलातून ,तसंही मला खुप वैताग आला आहे या सगळ्याचा . नुसता पाऊस-पाऊस कोसळतोय जिकडे तिकडे , सगळीकडे नुसता चिखल , हा भयानक वाडा आणि त्यात ती काळी अदृश्य सावली ,जी पाठलाग करतेय माझा . कधी एकदाची बाहेर पडतेय यातून अस झालंय मला  . उद्या सकाळी उजाडल्या उजाडल्या बाहेर पडणार मी इथून , बिल्कूल देखील थांबणार नाही मी इथं या असल्या रहस्यमयी वाडयात . आणि बाहेर पडल्यावर तडक मम्मा ला भेटणार आणि सॉरी म्हणणार ..  कारण सगळी चुकी माझी होती ,मम्मा बरोबर भांडणाची सुरवात देखील मीच केली होती ,आणि तिच्यावर रागावून मीच बाहेर पडले ,मूर्खासारखं .. ती नको म्हणत असताना ,एवढं समजावत होती ती आपल्याला ..बाळा ! नको जाऊ बाहेर अशा वातावरणात , खूप पाऊस पडतोय .
      तरी आपण ऐकलं नाही तिचं , अडकलो ना मग संकटात . म्हणून मोठ्यांच सांगितलेलं  एकायचं असतं ,नाहितर असं होतं .शिवानी स्वतःलाच दोष देत होती कारण तिने तिच्या आईचं  ऐकलं असतं तर ती एवढ्या मोठ्या संकटात नसती सापडली .
     
       मुकुंद ने  तिला खुप काळजीने सांगितलं होतं ,ओले 
कपडे बदलण्यास . जरी त्याने तिला एवढं काळजीपूर्वक सांगितलं असलं तरी  शिवानी या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ होती की त्याच्या या प्रेमळ बोलण्यामागे खूप मोठं असुरी कारस्थान शिजत आहे .
      
                     

                          *********
         
          

           तिकडे शिवानी ची मम्मा खूप काळजीत होती ,एकुलती एक तिची लेक , तिच्यावर अशी रागावून कुठे निघून गेली होती ,कोणास ठाऊक ...  
      सारं काही केलं ,पोलिसांत तक्रार केली . पाहुण्यांना ,मित्र-मैत्रिणींना , ट्युशन,डान्स कलासेस,  सगळीकडे विचारून  झालं . शिवानीचा कुठेचं काही पत्ता लागत नव्हता .तिचा फोन ही कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर लागत होता, तिच्या मम्माला समजेना काय करावं ,कुठे शोधावं आपल्या मुलीला ... विचार करून करून वेडं व्हायची वेळ आली होती शिवानीच्या आईची .  राहून राहून तिच्या मनात हेच येत होतं ,काही वाईट तर झालं नसेल ना माझ्या पोरीबरोबर . धीर द्यायला ही कोण नव्हतं बिचारीजवळ . इकडे ती एकटी आई लेकीच्या काळजीत आणि तिकडे तिची लेक संकटात , आसुरी कैदेत .
    
      
                      
                     *************
       

         इकडे शिवानी दुसरी कपडे घालून खाली आली .. पण जी कपडे तिने घातली होती .मळकटलेली आणि कुजकट , घाणेरडा वास येणारी होती . तरीही नाईलाज  थंडीपासून वाचण्यासाठी तिला हे करणं भागचं होत ..  

      राहून राहून तिच्या मनात येत होतं ,ही अशी घाणेरडी कपडे कशी काय आली असतील .तीही एवढी सगळी .
    त्यात मुलांचे शर्ट, पॅन्ट, साडी , ड्रेस खूप प्रकारचे कपडे होते . तिच्या मनात होत पण तिने याविषयी मुकुंदला विचारणं टाळलं ....  
      खाली येऊन बघते तर मुकुंद च्या आईनी जेवणाचं ताट आणलं होतं तिच्यासाठी . तिने या दोघांना विचारलं देखील तुम्ही नाही का जेवणार या दोघांनी नाकारार्थी माना हलवल्या.  तिला बिचारीला काय माहीत यांना जेवण नाही तर .... मनुष्याच ताज गरम रक्त आणि मांस खाल्याशिवाय झोप नाही लागत ...
       ती बिचारी शिवानी ,पळून पळून दमलेली ,थकलेली असल्यामुळे पोटाला सपाटून भूकही लागली होती . यांनी एवढ्या लगेच स्वयंपाक कसा बनवला हा देखील विचार करण्याची तिची क्षमता नव्हती . भुकेपुढे मेंदु काम करणं बंद झाला होता . 
     घरी असल्यावर हेचं का बनवलं म्हणून नाक मुरडत जेवणारी  , ही भाजी नाही आवडत मला तुला संगीतलं ना नको बनवत जाऊ , असं आईला म्हणणारी शिवानी जास्त आढेवेढे ना घेता मुकुंदच्या आईने आणलेलं ताट स्वतःच्या हातात घेतल आणि तिथेच सोफ्यावर बसली  .ताटात भात आणि वाटीत काहीतरी रस्स्यासारखं होत . तिने त्यात हाथ बुडवताच ... काहीतरी गिळगिळीत ,किळसवाण तिच्या हाताला लागल ....  ते जे काही होत ते रक्तासारखं लालभडक होत . हे सगळं बघून होती नव्हती तेवढी सगळी भुक अगदी पळून गेली तिची .           

            शिवानी आतून हादरली हे काय आहे ,तिने लगेच भापलं ... इथे नक्कीच काहीतरी भयंकर आहे ..  पण ते माझ्या डोळ्यांना दिसत नाही . माझ्यापासून लपवलं जातंय .. कधी न घाबरणारी शिवानी , आता  या वेळेला खुप घाबरली होती .
    कारण तिच्याबरोबर कोणी नव्हतं ,ती एकटी सापडली होती या नरभक्षक पिशाच्यांच्या जाळ्यात ... तिला काहीही करून यातून बाहेर निघणं भागच होत ,नाहीतर ती जीवानिशी जाणार होती ...तिने हळूच एका डोळ्याने त्या दोघांकडे बघितलं .. ते दोघेजण हिच्याकडेच बघत होते , आशाळभूत नजरेने , की केव्हा एकदा ही पोरगी त्यांच्या जाळ्यात फसतेय आणि केव्हा एकदा मनुष्य देहाचा स्वाद चाखायला मिळतोय . कारण खूप दिवस झाले ते दोघेही उपाशी होते . भुकेलेले होते नर मांसाचे .
   
        पण त्यांना काय माहीत , ही जी समोर बसलेली आहे ती त्यांच्यापेक्षा हुशार आहे . तिने लगेच जाणलं जे काही पाणी मुरत आहे ते  इथेचं या दोघांजवळ .शिवानी अचानक ऊठून उभी राहिली आणि बोलली , माझं जेवून झालं आहे ,तसंही मला भूक अशी नव्हतीच ,खूप थकलेय मी , मला विश्रांतीची गरज आहे  ....  
    तेवढ्यात  मुकुंदची आई उठली , शिवानीच्या हातातून तिचं ताट घ्यायला ,पण  शिवानीने चपळाई करत ताट स्वतःच्याच  हातात ठेवलं आणि बोलली .. राहुद्या आई मी ठेवते ना ताट आत स्वयंपाक घरात , आणि या दोघांना कळायच्या आत ती स्वयंपाक घरात गेली सुदधा .. कारण तिला या सगळ्या गोष्टीचा छडा लावायचा होता ,की जेवण म्हणून मुकुंदच्या आईने तिला ताटात काय वाढलं  होतं . नक्की काय करस्थान चालू आहे माझ्याविरुद्ध या दोघांचं . म्हणून तीने ठरवलं स्वयंपाक खोलीतचं जाऊन बघावं लागणार , या माय लेकराचं नक्की काय चालू  आहे . 
       शिवानी स्वयंपाक खोलीत गेली . तिने तिथे जे बघितलं ,ते ती स्वप्नात सुदधा केव्हा विचार करू शकणार नाही एवढं भयंकर होतं .... 

     ते समोरचं दृश्य बघून तिच्या पोटातून होत नव्हत ते उचंबळून बाहेर आलं . स्वयंपाक घर थोडीच होत ते ,कसाई-खाना होता तो , त्यापेक्षाही भयंकर  ...    
     
           सगळीकडे लाकडाचे ओंडके ,त्यावर मोठं मोठे धारदार कोयते .....  जिथं तिथं रक्ताची थारोळी  , मांसाचे छोटे छोटे तुकडे जिकडे तिकडे पसरलेले . शिवानीला स्वतःवर विश्वासचं बसेना की ती जे हे बघतेय ते सर्व खरं आहे . पण ते  मांसाचे तुकडे नक्की कशाचे ? हे कोडं तिला अजून उलगडलं नव्हतं .. ते रक्त कशाचं ,आणि मला जे जेवण म्हणून द्यायचा प्रयत्न केला ते काय होतं . 
      कितीही शांत रहायचा प्रयत्न केला तरी विचार करून करून आणि समोर ते अमानवी दृश्य बघून तिच्या तोंडून एक जोराची किंकाळी बाहेर पडली ... 
        बाहेर बसलेले ते दोन भक्षक समजून गेले ,  आपला डाव आता फसलेला आहे . जे काही करायचं ते लवकर करायला हवं , नाहीतर हातात आलेलं सावज निसटून जायचं . 
     दोघेही उठुन उभे राहिले . मुकुंद त्याच्या आईला जोरात ओरडला तुला  काय गरज होती ,तिच्या हातात ताट द्यायची . बघ ,कळलं ना आता तिला सगळं .. चल आता लवकर चल !  नाहींतर ती निघून जाईल. आपलं आयतं हाती आलेलं घबाड आपल्या हातून निसटेल .
     शिवानी ने जाणलं की तीने किंचाळून चूक केली आहे  . आता त्या दोघांना कळणार .  आता आपली खैर नाही ., तिने तसाचं हाथ आपल्या तोंडावर ठेवला आणि लपायला जागा शोधू लागली .त्या खोलीत जिथे शिवानी होती तिथे सगळीकडे अंधारच अंधार पसरला होता , थोडासा कुठूनतरी चंद्राच्या छोट्याशा कवडशाचा उजेड  आत येत होता . त्या मिणमिणत्या प्रकाशात धडपडत ती लपायला जागा शोधू लागली . तिथे खूप सारे लाकडाचे ओंडके होते . त्यातला एक मोठा ओंडका शोधून ती त्याच्यामागे लपली , जेणे करून निदान थोड्या वेळेपूरतं तरी ती या दोघापासून लपून राहील आणि पुढचा मार्ग कसा शोधायचा याचा विचार करेल .
       पण शिवानीसाठी हे सगळं घडणं खूप अनपेक्षित होतं . असं सगळं आपल्यासोबत घडू शकतं याचा पुसटसा देखील विचार केला नसेलं त्या बिचारीने , जेव्हा आईबरोबर भांडून घरातून बाहेर पडली होती . तिच्या समोर जे घडत होतं ते खूप किळसवाण होतं . सगळीकडे  रक्तच रक्त ,नजर जाईल तिकडे फक्त मांसाचे तुकडे बाकी  काही नाही .
     घरात साधं खरचटलं तरी आरडाओरडा करणारी ती मात्र आज रक्ताच्या थारोळ्यात होती .. 


क्रमशः 

    © VAISHU PATIL