त्या भयानक रात्री ... भाग 3 (भयकथा )

Horrer story

      खूप किळसवाण होतं ते सगळं . सगळीकडे रक्तच रक्त .  घरात साधं खरचटलं तरी आरडाओरडा करणारी ती आज मात्र रक्ताच्या थारोळ्यात होती .. एक प्रकारचा उग्र वास होता तिथं , श्वास घेणंही मुश्किल होतं  .अशा परिस्थितीत सापडली होती शिवानी ... डोळ्यातुन अश्रूंच्या धारा लागल्या होत्या , आईच्या आठवणीने .. केव्हा सुदधा ती आपल्या आई ला सोडुन राहिली नव्हती .. वडिलांचं प्रेम काय असत ते माहीतच नव्हतं ..  शिवानीचे वडील ती लहान असतानाच तिला आणि  तिच्या  आईला सोडुन कुठे निघून गेले कोणालाच माहीत नाही खूप शोधलं पण कुठे नाही सापडले..   एकट्या आईने हिमतीने सांभाळल होतं तिला . आज तीच शिवानी मृत्यूच्या दारात उभी होती , आणी त्या बिचाऱ्या आईला याची कल्पना देखील नव्हती .
     
                *****************

    तिकडे तिच्या आईचा जीव तरी थोडाच राहणार होता ,दिवस निघून गेला ,रात्र संपत आली . अजून आपली लेक घरी आली नाही . खूप काळजीत होती तिची मम्मा...
    शेवटी न राहून शिवानी ची आई स्वतः बाहेर पडली अशा अपरात्री आपल्या मुलीला शोधायला . कपाटातील सरकारी परवाना असलेली छोटी बंदुक बाहेर काढली  ,  गरज भासलीच तर म्हणून , दोघीही मार्शल आर्ट ट्रेनी होत्या घरात गन वगैरे असनं सहाजीकच होत .गॅरेज मध्ये पार्क केलेली गाडी बाहेर काढली आणि निघाली भरधाव वेगाने .. शोधात आपल्या लेकीच्या , कारण शिवानी कितीही तिच्या आईबरोबर भांडली ,कितीही वेड्यासारखं वागली तरी ती तिची आई होती ,जास्त वेळ आपल्या मुलीपासून लांब राहू शकणार नव्हती . शेवटी त्या दोघीच तर होत्या एकमेकींना आधार . तिच्या काळजीपोटी तिची आई कसलाही विचार  न करता एकटी निघाली होती आपल्या लाडक्या लेकिच्या शोधात ....
     
           
                 ******************
     

     इकडे वाड्यात पाशवी , अमानवी ,निर्दयी खेळ चालू झाला होता .  मुकुंद आणि त्याची आई  आपलं सोज्ज्वळ रूप बदलून खऱ्या रुपात आले होते कारण आता नाटकाचा पर्दा फाश झाला होता .शिवानीला सर्व काही समजले होते . 
        
        हा .....हूं.... हा...... हूं आवाज करत दोघे आपल्या अक्राळ विक्राळ रुपात आले .. लाल भडक डोळे ,डोळ्यातून भळाभळा रक्त वाहत होत , अंगाच्या चिंधड्या चिंधड्या उडालेल्या , हाताची नखं एवढी मोठी की ज्याने नरमांस अगदी  सहज फाडून खाता येईल . 
       ती दोन्ही पिशाच्च , धाप - धाप पायाचा आवाज करत चालत येत होती जिकडे शिवानी लपली होती . त्या दोन्ही  पिशाच्याना माहीत होतं की आता शिवानी त्यांच्या जाळ्यात फसली आहे , आणि ती इथून कितीही प्रयत्न केला तरी बाहेर पडू  शकणार नाही . त्यामुळे ते दोघेही निश्चित होते , कारण ती कुठेही लपून राहिली तरी यांच्या हातून वाचू शकणार नव्हती , आज ती यांच भक्ष बनणार हे अटळ होत .
      
    
      शिवानी  कोपऱ्यात एका मोठ्या ओंडक्या मागे लपली होती , जेणेकरून त्या दोघांना ती सहजासहजी नजरेस पडू नये .  पण मघाशी  तिच्या तोंडून निघालेल्या  किंकाळीमुळे ती पूरती फसली होती .  त्यामुळे  जरी ती लपली असली तरी अजूनही तिने आपला हाथ तोंडावरून काढला नव्हता ,कारण तिला आता कुठचाही आवाज करून चालणार नव्हतं . नाहीतर ती जीवानिशी जाणार होती .
        
      त्या दोन्ही पिशाच्यानी जिथे शिवानी लपली होती तिथे प्रवेश केला ,म्हणजे जे तथाकथित स्वयंपाक घर होतं  तिथे . जस जसे ते दोघे पुढे येत  होते तस तसे अजून भयानक दिसत होते , शिवानी ने त्यांना बघितलं नि तिची बोबडीच वळली . आजच्या जमान्यात हे असं काही पण असू शकत याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता . कॉलेज, जीम, कराटे, गाणी , मित्र-मैत्रिणी ,मौज-मज्जा ,याशिवाय दुसरं कुठलं तीच जग नव्हतंच .  मग हे भूत पिशाच्च वगैरे सगळं तिच्या आकलनशक्ती पलीकडचं होत .

      दोघेही तिला आवाज देऊ लागले ,शिवानी ... ए बाळ शिवानी ! ये बरं बाहेर ,बघ आम्ही आलोय . तुला न्यायला  .. मग आम्ही तुला पकडणार ... तुला या ओंडक्यावर झोपवणार ... मग पहिलं तुझा गोड गोड गळा आहे ना तो कापणार .. मग त्यातून निघालेल गरम गरम  लाल रक्त पिणार ...    मग तुझे छोटे छोटे तुकडे करणार या कोयत्याने .. मग तुला खाणार ..  मग शिवानी मरणार ... मरणार .. होय ना रे मुकुंद.. हाहा ...हाहा... हह.... हह.... हाहा  ..अस ती पिशाच्चीणी , मुकुंदची आई म्हणाली आणि ते दोघेही जोरजोरात हसायला लागले ..
     शिवानी पुरती घाबरली होती ,हे सगळं एकूण ती जणू काही मेल्यात जमा झाली होती , श्वास काय तो चालू होता फक्त तिचा ..
     ते दोघेजण अजून जवळ येत होते शिवानीच्या . खरंतर अजून त्या दोघांना  ती नक्की  कुठे लपलेय हे  माहित नव्हतं . पण , ती या दोघांना बघू शकत होती . त्यांच ते अक्राळ विक्राळ रूप बघून ती पुरती हादरली होती .भीतीने कापायला लागली होती ती , तिच्या  शरीरातून सगळे त्राणचं जसं काही संपले होते . शरीर जरी साथ देत नसलं तरी तिचं मन मात्र मानत  नव्हतं काहीही करून इथून बाहेर पडायचं हेच येत होतं तिच्या मनात . त्यामुळे त्या दोन्ही पिशाच्याच्या नकळत ती हळू हळू मागे सरकत होती .. अचानक तिला समजलंच नाही काय झालं आणि ती धापदिशी कुठेतरी पडली . कशावरतरी जोरात आपटली  .

             *****************
     
        
        शिवानी नकळतपणे जिथे अचानक पडली ते तळघर त्या वाड्याच तळघर होत ... ती ज्या  मोठ्या ओंडक्याच्या मागे लपली होती त्यालाच लागून एक छोटा ओंडका होता , आणि शिवानी जशी मागे सरकली तस ते लाकूड , तो छोटा ओंडका बाजूला झाला नि ,तळघरात जायच्या गुप्त रस्त्याद्वारे ती खाली पडली . खाली जोरात आपटल्यामुळे थोडसं लागलं देखील  तिच्या कमरेला , पण जीवानिशी मरण्यापेक्षा हे असं पडून लागलं तरी बेहत्तर असं म्हणून तिने वेळ टाळली .
     तिने  त्या पिशाच्यापासून निदान तात्पुरता तरी जीव वाचवला असला तरी आता तिला समजत नव्हतं नक्की आपण कुठे आलो आहोत . अस अचानक कुठे धडपडलो आपण , कुठे पडलो . 
  तेवढ्यात तिच्या मनात विचार आला , जरी आपण तात्पुरतं त्या दोघापासून वाचलो असलो तरी ते दोघे इथेही  येणार ,आणि आपला जीव घेणार . आता अजून काहीतरी आपल्याला मार्ग शोधलाच पाहिजे . जर ह्या दोन्ही अमानवी शक्तींपासून जीव वाचवायचा असेल तर .
   
                 *****************************

             
            इकडे शिवानी ची आई ,गाडीत चालवत चालवत एकच विचार करत होती ,कुठे गेली असेल माझी लाडकी . असं एवढं कोणी रागवतं का आपल्या आईवर .... शिवानीच्या आठवणीने तिची आई अगदी व्याकूळ झाली होती . मन बिल्कुल थाऱ्यावर नव्हतं तिचं .     
                हा सगळा विचार करत असतानाच ,अचानक तिच्या आईला आठवलं ,मागच्या वेळी जेव्हा ती रागावली होती ,तेव्हाही शिवानी असंच घर सोडून निघून गेली होती . तेव्हाही शिवानीच्या आईने खूप वेळ शिवानीची  वाट बघितली तरी शिवानी घरी परत आली नव्हती ,  तेव्हाही शिवानीची आई अशीच घाबरली होती . आणि अशीच शोधाशोध करत असताना तिला कोणाचातरी फोन आला होता आणि त्यांनीच ही खबर सांगितली होती की त्यांनी शिवानीला एकटीला जंगलात गाडीबरोबर बघितलं आहे . 
        हे कळताच क्षणाचा विलंब ही न लावता शिवानीची आई स्वतःची गाडी घेऊन , सरळ जंगलाच्या दिशेने गेली होती कारण कसंही करून शिवानीला लवकर शोधन गरजेचं होतं . जंगलात थोडं पुढे जाताचं तिच्या आईला तिथे एक गाडी उभी दिसली . तिच्या आईने लगेच ओळखलं की ही गाडी शिवानीचीचं आहे . आई गाडीतून खाली उतरून बघते तर ही शहाणी पोरगी तिथे एकटीचं  बसली होती वेड्यासारखी  रडत ..  
        तिथले वनाधिकारी  शिवानीच्या आईच्या ओळखीचे होते ,त्या वनाधिकाऱ्यांना  , गाई चारायला घेऊन आलेल्या एका गुराख्यानं सांगितल की  ,एक मुलगी जंगलात एकटीच रडत बसलेय . चांगल्या घरातली वाटतेय . विचारपूस केली तरी काहीच बोलेना .   मग हे वनाधिकारी स्वतः  गेले तिथे बघायला की  कोण आहे मुलगी ,का अशी जंगलात आलेय एकटी .शिवानीला बघताच त्यांनी शिवानीला ओळखलं आणि शिवानीच्या आईला फोन केला होता . तेव्हा जाऊन  कुठे शिवानी सापडली होती .
    

     

           "आताही तिकडेच नसेल का गेली ही जंगलात ". हे मनात येताच शिवानीच्या आईने पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने गाडी वळवली . कारण तिला माहीत होतं . मागच्यावेळीही शिवानी जंगलातच गेली होती रागावून , आताही सगळीकडे शोधलं कुठेही सापडली नाही . मग शेवटचाचं पर्याय उरतो ,जिथे अजून शिवानीला आपण शोधलं नाही ते म्हणजे जंगल , कारण मागच्यावेळीही शिवानी तिथेच सापडली होती . 
       जंगलाचा विचार  मनात येताच काळजात धस्स झालं शिवानीच्या आईच्या , कारणही तसंच होत .  त्या वनाधिकाऱ्यांनी आणि त्या गुराख्यानं जे सांगितलं होतं , ते काळीज चिरणार होत .    तेव्हा शिवानीला गाडीत बसवलं असल्यामुळे शिवानीला याबद्दल काहीच माहीत नव्हतं ,आणि तिच्यापुढे सांगणही उचित ठरल नसत म्हणून त्या वन अधिकार्यांनी तिला गाडीत बसवल्यावरच तिच्या आई ला सांगितलं , हे पहा मॅडम ! सगळ्याच जागा सारख्याच असतील अस नाही . काही चांगल्या काही वाईटही असतात . त्यांना दुजोरा देत गुराखी पण हुंकारला ,हो हो ताई साहेब .
        शिवानी ची आई म्हणाली मी समजले नाही तुम्हाला काय म्हणायचंय ...
       वन अधिकारी म्हणले जंगलात येताना ,पाटी दिसली नाही का तुम्हाला ,,त्यावर काय लिहिले होते ..
    दिवस मावळल्यानंतर जंगलात कोणीही  थांबू नये , प्रवेश करू नये . हिंस्र प्राणी हल्ला करण्याची शक्यता आहे .
     मी ही संध्याकाळ व्हायच्या आत इथून निघतो , जास्त पावसाळ्यात तर इथे फिरकत ही नाही . तेवढ्यात गुराखी  बोलला , "ताई साहेब , रातच इंदारच हित कुणिबी यत न्हाय " .. आणि आलंच तर मागारी जीत्त जात न्हाय .. लय वाईट शक्ती हाय बघा हित ,पुरगिला हितनं फूड ,हिथ यवून दिवू नगा, न्हायतर लय अवघड हुन बसल ... हा सगळा प्रसंग शिवानी च्या आईच्या डोळ्यापुढे उभा राहिला .. (खरंतर सावज तेव्हाच टिपलं होत फक्त वेळ आली नव्हती, त्या दुष्ट शक्तींन डाव तेव्हाच खेळला होता फक्त हे समजलं मात्र कोणाला नव्हतं ) ..तेव्हापासून शिवानी खूप हट्टी झाली होती ,सारख कशाना कशा वरून ती आई बरोबर भांडायची, निघून जायची धमकी द्यायची पण तिच्या आई ने याकडे जास्त लक्ष दिले नाही ,हे वयच असत अस वागायचं म्हणून विषय सोडून दिला .
     हे सगळं आठवत असतानाच जोराचा ब्रेक मारला शिवानीच्या आईने आपल्या  गाडीला .. समोर व्हाईट रंगाची ,आताच दोन महिन्यांमागे शिवानीला गिफ्ट केलेली कार , बंद पडलेल्या अवस्थेत दिसली . शिवानीची आई गाडीतुन खाली उतरली .
, आणि बंद पडलेल्या शिवानीच्या गाडीजवळ गेली.  गाडीची खूप वाईट अवस्था झाली होती . संपूर्ण गाडी चिखलाने माखली होती  .हेड लाइट बंद पडल्या होत्या ,गाडीच्या इंजिन मधून धूर निघत होता ..  अजून गाडी गरम होती ,याचा अर्थ खूप वेळ झाला नव्हता शिवानीला गाडीतुन उतरून ,म्हणजे ती इथेच कुठेतरी असणार ..
      बघु कुठे सापडतेय का , हा विचार करत तिची आई चालू पावसात रस्तावरून खाली उतरली नि शिवानी च्या शोधात निघाली त्या जंगलात ,चिखलातून तिला हाका मारत .. पण तिला शिवानी कुठेच सापडली नाही....  थोडं पुढं गेल्यावर तुटलेली चप्पल दिसली ,हातात उचलून पाहिल्यावर ती शिवानीचीच होती हे आईने ओळखले . ती मटकन खाली बसली ,हमसून हमसून रडू लागली . जीव की प्राण होती तिची लेक तिच्या साठी , तीला ती अशी गमवू शकणार नव्हती , तिच्याशिवाय त्या आईला होतच कोण ?  
       जर शिवानी ला सुखरूप परत आणायचं असेल तर अस हाथ पाय गाळून बसून चालणार नाही .. मलाच खंबीर व्हायला पाहिजे ,अस म्हणत शिवानी ची आई तडक उठली नि पुढे आजून काय पुरावा मिळतो का पाहूं लागली , थोड्याच अंतरावर तिला काहीतरी चमकताना दिसलं ,  ते कव्हर होत शिवानी च्या मोबाईल फोन च .. पण शिवानी कुठेच दिसत नव्हती , ना आवाज देत होती .
    तिच्या आईला कळून चुकलं की हे प्रकरण दिसतंय तस सोपं नाही .आपल्याला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे आपल्या मुलीला परत आणण्यासाठी..  ती तडक मागे फिरली . गाडी स्टार्ट करून जंगलापलीकडे जे गाव होत तिथे जायला निघाली..


क्रमशः ...


© vaishu patil 

🎭 Series Post

View all