एकाच दिवसांत दोनदा ......

एकाच दिवसांत दोनदा प्रणावर बेतलं होतं.

                                               एकाच दिवसांत दोनदा .......

नमस्कार. मी दिलीप भिडे. माझ्याच आयुष्यात घडलेली ही घटना.

साधारण १९९० – ९१ सालातली गोष्ट असेल. माझी नागपूरला MIDC मधे फॅक्टरी होती, आणि काही कामासाठी मला एका मीटिंग साठी बैदयनाथ चौकात असलेल्या एका फॅक्टरीत जायचं होतं. दुपारची साधारण ३ वाजताची वेळ होती रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अश्या वेळी मी बैदयनाथ चौकात पोचलो. रेड सिग्नल होता आणि एक ट्रक समोर थांबला होता. मी ट्रक च्या मागे थांबलो. मी सहसा वेडा वाकडा जाऊन वाहनं ओलांडत नाही, पण त्या दिवशी काय झालं कोणास ठाऊक, मी ट्रक आणि रास्ता दुभाजक यांच्या मधून वेडी वाकडी करत स्कूटर काढली आणि U TURN घेतला. यू टर्न घेऊन मी चार पांच फूटच गेलो असेन आणि धडाम असा जबरदस्त आवाज आला. ज्या रस्त्यांनी मी आलो होतो त्याच रस्त्यांनी एक ट्रक येऊन आधी उभ्या असलेल्या ट्रक वर येऊन आदळला होता. बहुधा त्याचे ब्रेक फेल झाले असावेत, पण माझ्या अंगावर मात्र कांटा आला कारण मी जर तिथून  हललो नसतो तर दोन ट्रक च्या मधे माझाच चेंदामेंदा झाला असता. देवाचे आभार मानून मी मीटिंगला गेलो. सगळ्यांना ही घटना सांगितली. सगळ्यांनी मला “हॅप्पी बर्थ डे” म्हंटल आणि विषय संपला.

मीटिंग आटोपून मी वापस घरी  जाण्यासाठी निघालो. छत्रपती चौकात लाल  सिग्नल होता आणि समोर ट्रक होता आणि मी ट्रकच्या मागे. दुसऱ्याच क्षणी मला दुपारी घडलेल्या घटनेची आठवण झाली आणि मी उजव्या बाजूला flyover खाली थोडी जागा होती त्या जागेत शिरलो. दुसऱ्याच मिनिटाला पाठीमागून येणाऱ्या ट्रक ने उभ्या असलेल्या ट्रक ला जोरदार धडक दिली. ट्रक बहुधा न्यूट्रल गियर मधे होता तो पुढे ढकलल्या गेला. चौकातून त्या वेळी उजवी कडून वाहतूक  सुरू होती.  त्या वेळी नेमकी तिथून एक दुसरी ट्रक जात होती त्यावर जाऊन हा ट्रक धडकला. My god  एकाच दिवसांत दोनदा परमेश्वरानीच माझा जीव वाचवला होता. अर्थातच मी घरी याविषयी काहीच सांगितलं नाही. त्यामुळे कोणालाच ही घटना माहीत नाही.

*******

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com     

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all