Jan 26, 2022
नारीवादी

तुझ्यातली ताकद तूच ओळख....... लघु कथा

Read Later
तुझ्यातली ताकद तूच ओळख....... लघु कथा

तुझ्यातली ताकद तूच ओळख....... लघु कथा


©️®️शिल्पा सुतार

रमा एकदम साधी बाई, आपण भले की आपल काम भले, एकदम सांसारिक, एक मुलगा रघू, त्याला शिकून मोठ करायच हे एक स्वप्न, त्या साठी ती काबाडकष्ट करत होती, तिने कधी कोणाला त्रास दिला नाही की उलट बोलली नाही, राहणीमान ही गरिबीतल एकदम साध, काय करणार ती? तिच्या हातात काही नव्हत, राब राब राबायचं घरी आणी दुसर्‍याच्या शेतात, मिळालेले सगळे पैसे घरी नवर्‍याला रमेशला द्यायचे , रमेश ते सगळे पैसे दारूत उडवायचा

काल ही असच झाल रमा कामावरन परतली तेव्हा रमेश बाजूला दबा धरुन बसलेला होता, जशी रमा घरी आली तस रमेशने तिच्या हातातुन पैसे काढून घेतले, तिने विरोध केला,.. "अहो ते पैसे शाळेत भरायचे आहेत" ,

रमेश चिडला , तिला खाली पाडल आणि खूप मारलं,.. "मला नाही म्हणते का? ही हिम्मत तुझी" , रमेश निघून गेला, बर्‍याच वेळ रमा रडत होती,

रघु घरी आला,.. "काय झालं आई?",

"काय होणार? आजची कमाई तुझ्या बापाने नेली, उद्या शाळेची फी भरायची होती ना? ",.. रमा

"हो, आई तू काहीतरी कर बाबांच, किती लागलाय तुला, किती काम करते तू, विरोध कर या वागण्याला",.. रघु

" मी काय करू शकते एकटी बाई",.. रमा परत रडायला लागली

" आई तू काहीही करू शकते, तुझ्यातील ताकद तूच ओळख, तुला तुझ आयुष अस घालवायचा आहे का? भांडत की आरामात ते तूच ठरव ",.. रघु

त्यामुळे खरं तर रमाकडे कधीच पैसे नसायचे, काहीही घ्यायच असेल, कुठे ही जायची असेल तर आधी नवर्‍याची परवानगी घ्यावी लागायची, काय करेल ती एकटीच मजुरी करायची, नवरा आहे ते पैसे तिच्याकडून काढून घ्यायचा , दारू पिऊन भांडण करायचा , रोजच झाला होत हे, रमाच्या मनात रमेश विषयी धडकी भरली होती, आजचा दिवस नीट जावा एवढीच साधी अपेक्षा होती तिची

"रमा आज येशील का ग बाजाराला", ...... उमा

"नाही उमे नाही जमणार", .... रमा

" अग छान सामान आल आहे सुरेखा सांगत होती",.. उमा

" नाही उमा मी नाही येणार",.. रमा

सुख नाहीच माझ्या नशिबी..... विचार करत रमा भरभर हाथ चालवत होती, काम पूर्ण नाही केल की मजुरी पूर्ण मिळत नसे, रमेश हिशोब मागायचा, पैसे कमी भरले तर चिडायचा, काय करत होती तू शेतात? नुसत्या गप्पा गोष्टी, तुला फोडून काढला पाहिजे म्हणून अजून दोन तीन रट्टे मारायचा, घरी मार खायचा, परत त्याच्यासाठी काम करायचं हेच सुरू होत वर्षानुवर्ष.....

देवाला ही माझी दया येत नाही , सासुबाई होत्या तो पर्यंत बर होत, त्या चांगल्या होत्या, घरकामात मदत होती, शिवाय तिचा मुलगा रघूला ही त्या सांभाळायच्या, मुलावर वचक होता त्यांचा , त्यामुळे रमेश तेव्हा जरा बरा वागत होता, अचानक थंडी तापाचे निम्मीत झाल.... सासुबाई गेल्या कायमच्या सोडून, त्यांचा नंतर रमेश मोकाट सुटला...... रमा काम करतांना विचारात हरवली होती

"चल ना ग रमा बाजाराला, वाटल तर मी देते पैसे", .... उमाच सुरू होत तेच

"अग बाई मी नाही म्हटली ना तुला, समजत नाही का? तुझ्या बरोबर येवून काय करू मी? तुझे पैसे आज घेतले तरी उद्या द्यावे लागतील, परत रमेश मारेन ते वेगळ, माझ्या नादी लागु नको" ,... रमा

"अग पण तू कमावते ना, तुझा हक्क नाही का काही त्या पैशांनवर? किती त्रास सहन करते" ,..... उमा विचारत होती

" नाही आहे हक्क, काय सांगू बाई तुला माझ रडगाणं", ..... रमा

बरोबरीच्या मैत्रिणी किती सुखात होत्या, स्वतःला हव ते घेत होत्या, फिरायला जात होत्या, रमा मात्र काबाडकष्ट करून अर्धी होत होती, ना हौस ना मौज दोन प्रेमाचे शब्द तिच्या नशिबात नव्हते

आता हल्ली रमा शेतात एक तास आधी यायची कामाला, त्याचे ज्यादा पैसे मिळायचे, सकाळी मार्केटला भाजी पाला जायचा, तेव्हा मदत केली तर पन्नास शंभर रुपये ज्यादा सुटायचे ते पैसे चोरून लपून ती तिच्यासाठी मुलगा रघू साठी वापरायची

रघुला पाटी पुस्तक नाही, त्याला देते आजची ज्यादा कमाई विचार करत रमा घराकडे निघाली.....

संध्याकाळ झाली, रमा शेतावरून काम करून परतली, घाईघाईने झाडलोट केलं, दिवा बत्ती केली, पाणी भरल, सकाळी वेळ नसायचा तिला कामासाठी, भाकरी भाजायला घेतल्या, एका बाजूला आमटी होत होती, उगीच स्वयंपाकाला उशीर झाला तर परत घरात भांडण मारपीट व्हायची, रोजच झाला आहे हे, कोणताही कारण पुरे होत रमेशला भांडण करायला, एक तर त्याला काही काम नाही , फक्त दारू प्यायची मारामाऱ्या करायच्या

रघु बाजूला बसून आईची धावपळ बघत होता, रघु अभ्यासात खूप हुशार होता, आईच्या कष्टाची त्याला जाण होती,

आई का हा त्रास सहन करते? त्याला समजत नव्हत? आई होती हुशार पण तिच्यात हिम्मत नव्हती, त्याने आईला समजावायच ठरवल

"आई तू दिवसभर शेतात राबते.... बाबा काहीच करत नाहीत, परत संध्याकाळी दारू पिऊन येऊन गोंधळ घालतात कसं सहन करते तू? एवढी ताकद तुझ्यात कुठून येते" ,.. रघु

"काय करणार मग मी रघु? तूच सांग, तुला बघून सगळं सहन करते मी, तू छान अभ्यास कर, शिकून मोठा हो आणि माझी सुटका कर इथुन ",.... रमा

" त्यासाठी मी कश्याला मोठ व्हायला हव, ते काम तर तू आता ही करू शकतेस, का सहन करते बाबांचं हे वागणं? काम करते ना तू? तुलाही आनंदी जगण्याचा अधिकार आहे आणि तो तू स्वतः मिळवला पाहिजे, हे घर आजीने तुला दिल ना आपण दोघ राहू इथे बाबांना तु घरात घ्यायच नाही, ते आपल्याला मारतात त्रास देतात, खूप कंटाळा आला आहे त्यांचा" ,... रघु

" मला जमेल का अस विरोध करायला ? ते मारतील खूप आपल्याला", ..... रमा विचारात हरवली

" का नाही जमणार, मी आहे ना, त्यांनी तुला मारल तर तू ही मार त्यांना, चुकीच्या गोष्टीना विरोध हवा.... खर तर तू हे फार आधी करायला हव होत",.. रघु

निर्धाराने ती उठली आणि खोलीला आतून टाळ लावल, आज तिच्यात मुलाच्या आधारामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आली होती, आता ती नवर्‍याबरोबर लढायला तयार होती

जरा वेळाने रमेश आला, जोरजोरात दार वाजवु लागला तसं रमाने आतून सांगितल,.." आपला संबंध संपला मी दार उघडणार नाही" , रमेश दार बडवत राहिला,

"माजली का तू, एकदा दार उघड मग दाखवतो तुला इंगा, चांगली बडवायला पाहिजे तुला, दार उघड, तो घरावर दगड मारत होता, बर्‍याच वेळ बडबड सुरू होती त्याची,

" आता रे काय करायच रघू?", ... रमा घाबरली होती

"आई हीच वेळ आहे धडा शिकव बाबांना" ,... रघु

तस रघु ने दार उघडलं..... रमेश आत यायचा प्रयत्न करत होता

"आई मार बाबांना" ,... रघु

"अरे मी कशी मारणार? नको रे" ,.. रमा

"कर हिम्मत, आज नाही केल तर कधीच नाही तुझी सुटका, वर आज ही तुला खूप मार बसेल ",...... रघु सांगत होता

रमाने धीर एकवटून रमेशला एक जोरदार थोबाडीत दिली आणि बाहेर ढकलून दिल, या पुढे या घराच्या आसपास दिसला तरी पाय मोडुन हातात देईन,

रमेश घाबरून बाजूला जावून पडला, रात्र भर तो तिथे तळमळत होता,

दुसर्‍या दिवशी रमा उठली,.." रघु अरे मी कामाला गेली आणि रमेशने वाट अडवली तर काय करू मी?",

"आई जे काल रात्री केल तेच कर.... मार चांगल बाबांना, तू घाबरू नको, मी आलो असतो सोबत, पण तुझा लढा तुलाच लठावा लागेन",.. रघु

रमा कामाला निघाली, आणी अपेक्षीत अस तेच झाल, रमेशने वाट अडवली, रमा पैसे दे मला , रमा वर ओरडत होता, ती जुमानत नाही म्हणून तिला मारायला धावला, तुला दाखवतो चांगला इंगा, तस रमाने बाजूला पडलेल लाकुड हातात घेतल, रमेशची चांगली धुलाई केली, तो घाबरला, खाली पडला, त्याची ताकद आता कमी पडत होती, धमकी देत तिथून पळाला,

आता रमाला विश्वास वाटत होता, ती आता रमेशला घाबरणार नव्हती, माझ्या पासून दूर राहायच समजल का रमेश , हात मलाही आहेत, मलाही मारता येत,

जर अन्याय होत असेल तर अन्याय विरुद्धच हा लढा लढायला पाहिजे , त्यात कोणी आपली मदत करत नाही, शेवटी स्वतःला होणार त्रास स्वतः कमी करू शकतो, आनंदी जगणं सर्वस्वी आपल्या हातात आहे आणि त्या साठी प्रयत्न करायला हवेत

शेतात उमा भेटली, आज रमा खूप आनंदात होती,

"उमे कधी जायचं ग बाई बाजाराला, मला पण घ्यायच्या आहेत बर्‍याच वस्तू, रघु साठी पुस्तक ", ...... उमा आश्चर्याने रमा कडे बघत होती, रमा भरभरून बोलत होती, अतिशय छान असा आत्म विश्वास तिच्यात आला होता,

उमा खुश झाली होती , रमाने हिम्मत दाखवली होती, तिने तिचा आनंद शोधला होता, स्वतःच्या आयुष्यात बदल घडवला होता.........ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now