Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

तुझ्यासाठी कायपण - भाग १

Read Later
तुझ्यासाठी कायपण - भाग १


तुझ्यासाठी कायपण भाग १
विषय:- प्रेमकथा


"अरे किसना तुला नक्की खात्री आहे का? की, ती तुला आज घ्यायला येईल. अरे ती इतकी मोठी कलेक्टर मॅडम, तिला वेळ तरी असेल का तुला घेऊन जायला?"

किसना म्हणाला,
"तिला यावंच लागेल.नाही आली तर, तिला माझा ओरडा बसेल ना."

रमेश म्हणाला,
"आज आपला एमबीबीएसचा शेवटचा पेपर आहे. काही महिन्यांनी निकाल लागेल मग आपण सगळे डॉक्टर बनणार."

यावर किसना म्हणाला,
"यस ,मग माझ्या काका-काकूने सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप पूर्ण करणार आणि पूर्ण प्रशिक्षण घेतले की डॉक्टर बनणार."

सुजय म्हणाला,
"बरं चला आता पेपर तरी देऊयात आधी,मग पुढचं पुढं बघूया. आधीच रात्रभर अभ्यास केल्यामुळे माझी झोप झाली नाहीये. चला पटकन पेपर देऊ आणि मग सगळे रात्रीच्या रेल्वेने आपापल्या घरी रवाना होऊ."

सगळेजण परीक्षा हॉलमध्ये पेपर देण्यात मग्न होते. शेवटचे काही दहा मिनिटं राहिले असतील .
तेवढ्यात कॉलेजच्या साऊंड सिस्टीम रुममध्ये एक तरुणी घुसली.

तिचे ते कुरळे झुपकेदार केस, काळेभोर काजळ तिच्या टपोऱ्या डोळ्यांभोवती अगदी शोभून दिसत होते. तिने त्या रुममधील लाईट्स ऑन केले आणि माईक सिस्टीम ऑन करुन सगळे स्पिकर चालू केले जेणेकरुन कॉलेजच्या मोठमोठ्या भोंग्यातून ती जे काही बोलत आहे ते ऐकू जाईल आणि ती तिच्या सुंदर आवाजात गाऊ लागली,


"वह है रँगीला छैल छबीला
वह है नटखट वह जमुनातट
फेरे लगाये मुरली बजाये
गोपियों के संग रास रचाए
मुरली बजैया रास रचैया
श्याम सलोना है"

सगळे मुलं अचानक पेपर लिहिता लिहिता अचंबित झाले, हे कोण आहे? कोण गातं आहे? त्या रुममध्ये कोण असेल? अशी सगळ्यांची एकमेकांना बघून रिऍक्शन येत होती.

किसनाच्या आजूबाजूला दुसऱ्या बेंचवर बसलेले रमेश आणि सुजय हळू आवाजात किसनाला एकत्र म्हणाले,
"आयला किसना कलेक्टर बाई चक्क आपल्या कॉलेजमध्ये आल्यात. वाह! खास तुझ्यासाठी गाणं म्हणतेय."

किसनाला काय बोलावं आणि काय नाही ते कळेना, त्याला खूप भारी वाटत होतं.
शेवटचे दहा मिनिटं राहिले होते, म्हणून त्याने उरलेला पेपर न लिहिता मॅडमकडे दिला आणि बाहेर पळाला,त्याचे मित्रही त्याच्या मागे मागे गेले.
ती अजूनही गातच होती.

"जो है अलबेला मदनैनोवाला
जिस की दीवानी ब्रिज की हर बाला
वह किसना है,वह किसना है
वह किसना है ,किसना है"


"अरे किसना चल पळ पटकन ,आपण वरती तिसऱ्या मजल्यावरील साऊंड सिस्टीम रुमकडे जाऊ."

किसना वेड्यासारखा पळत पळत जात होता , त्याच्या मागे त्याचे मित्रही पळत होते.

तिचे गाणं म्हणणं सुरुचं होतं.

" प्यार में डूबी प्यार में खोयी
प्यार की धून में जागी न सोयी
प्यार में डूबी प्यार में खोयी
प्यार की धून में जागी न सोयी
दुनिया से है वह अंजानी
सब कहते है प्रेम की दीवानी
किसना से मिलती है भूल के हर बंधन
किसना की ही माला जपती है वह जोगन "


किसना आणि त्याचे मित्र त्या रुमच्या बाहेर उभे होते. किसनाचा श्वास खूपच फुलत होता. खूप दिवसांनी म्हणजे जवळपास एक वर्षांनी तो तिला बघणार होता, त्याने मित्रांना बाहेर उभं रहायला सांगितलं आणि तो एकटाच आत गेला.
आतमध्ये जाऊन पाहतो, तर त्याला ती कुठंच दिसली नाही. पण गाणं तरीही वाजत होतं. तिने उरलेलं गाणं टेप रेकॉर्ड मध्ये लावलं होतं. किसना थोडा हिरमुसला, पण त्याने तिच्या आवाजातील रेकॉर्डिंग असलेली ती कॅसेट मात्र स्वतःजवळ ठेवली.

बाहेर आल्यावर त्याचे मित्र विचारु लागले

"काय रे कुठं आहेत वहिनी ? तू एकटाच बाहेर का आला ?"

किसना म्हणाला,
"मला असा वैताग द्यायला तिला खूप आवडतं, कारण तिला माहिती आहे की, तिचा किसना तिच्यावर खूप प्रेम करतो. जाऊदेत, एखाद्या वेळेस ती आता डायरेक्ट रेल्वेस्टेशनवर आपल्याला भेटेल. चला होस्टेलला जाऊ आणि आपलं सगळं आवरुन घेऊ."

-----------------------------------------------------------


नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कॉटनची फिकट पिवळ्या रंगाची गोल साडी घातलेली, एका क्लिप मध्ये अडकवलेले केस आणि चेहऱ्यावर कोणत्याही मेकअप शिवाय निर्मळ तेज असलेली \" श्यामा पोतनीस \" तिच्या टेबलवर असलेली बेल जोरजोरात वाजवत होती.

तेवढ्यात घाबरत घाबरत घामाघूम झालेला तिचा पी.ए. अमोल तिच्याजवळ आला.

" काय झालं मॅडम ? काही हवंय का?" अमोलने विचारले.

श्यामा चिडून म्हणाली,
"काय झालंय? हे वर तोंड करुन मलाच तुम्ही विचारताय. अहो ही फाईल तुम्हीच तयार केली ना, या मधील डॉक्युमेंटेशन तुम्हीच बनवलं ना, तुम्हाला काही नाही वाटलं का? ही फाईल बनवताना."

अमोल म्हणाला,
"म्हणजे? मी माझं काम चोख बजावलं नाही का मॅडम?"

श्यामा म्हणाली,
"प्रश्न काम केलं की नाही? याचा नाहीये.प्रश्न त्यात काय लिहलंय? याचा आहे. तुम्हाला खरंच काही राग, संताप नाही आला का? ही सगळी माहिती गोळा करताना. इथे हे सगळं नीट वाचून माझ्या पायाखालची जमीन हलली आहे. माझा नुसता संताप होत आहे. जर मी यावर काही लवकरात लवकर ऍक्शन नाही घेतली,तर मी अभिमानाने जिल्हाधिकारी म्हणून या शहरात वावरु शकणार नाही.
अहो, ही फक्त गुन्ह्याची फाईल नाहीये, यात असंख्य बलात्कारांनी उध्वस्त झालेल्या मुलींच्या कहाण्या आहेत. अहो, वरती वार्षिक गुन्हा फाईल सादर करताना माझं मन मला स्वस्थ बसू देणार नाही. लगेच मीडियाला बोलवा एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेते मी.
कळू द्या या नराधम मुलांना की,बलात्कार केला की,आता त्यांची सहज सुटका नाही, कारण आता श्यामा नावाचं वादळ त्यांना शांत झोप लागूच देणार नाही. बलात्कार झाला की, तात्काळ लवकरात लवकर शिक्षा मंजूर व्हायलाच हवी, याची दक्षता मी खुद्द घेईल.
नाशकात रामभूमीमध्ये हे असले पाप पुन्हा पुन्हा घडायलाच नको, यावर आळा घालायलाच हवा."

क्रमश:
©®मित्र रिषभ
टीम अहमदनगर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मित्र रिषभ

Writer

Like to write fictional stories

//