(प्रेमकथा)
आत्तापर्यंत आपण पाहिलं की, श्यामा आणि किसनाच्या आयुष्यात आलेली ही तिसरी मुलगी आता तर श्यामा आणि किसनाच्या नवीन फ्लॅट वर सुद्धा गेली होती आणि तिथे जाऊन सगळ्या भिंतीवर किसना वरील प्रेम व्यक्त केलं होतं,त्यामुळे श्यामा खूपच घाबरली होती.
आता पुढे...
त्या दिवशीच्या प्रकरणामुळे किसना आणि श्यामा दोघेही खूपच एकमेकांची काळजी करु लागले होते. श्यामाला किसनावर विश्वास होता की, तिला सोडून तो कोणत्याही मुलीशी संबंध ठेवणार नाही. पण मग ही महामाया कोण होती? जी माझ्या किसनाला माझ्यापासून वेगळं करु इच्छिते. श्यामाचं डोकं विचार करुन करुन हैराण झाले होते . काही दिवसांनी किसनाला तिचे निनावी पत्र येऊ लागले होते. श्यामाने तिच्या पदाचा वापर करुन किसनावर लक्ष ठेवायला लावलं. त्याला कोणी, कुठं, कसं भेटतं ,कोण कोण मित्र मैत्रिणी आहेत ही सगळी माहिती काढायला लावली. श्यामाने केलेली इतका कडक बंदोबस्त पाहून तिला कळेना की, आता किसनाला पत्र कसे पाठवू? कसा त्याला संपर्क करु? त्यामुळे काही दिवसांनी किसनाला निनावी फोनही येऊ लागले,
पहिला फोन आला तेव्हा किसना गडबडला.
पहिला फोन आला तेव्हा किसना गडबडला.
ती : हॅलो किसना?
किसना : हो मीच बोलतोय
ती : तुझ्याशिवाय करमत नाहीये रे
किसना : कोण तुम्ही?
ती : मी तीच जी तुझ्यासाठी खूप वेडी झालीय
किसना : अहो मॅडम प्लिज मला निनावी नावाने पत्र आणि फोन करु नका. माझं आधीच माझ्या श्यामावर खूप प्रेम आहे. माझं लग्न देखील तिच्याशी ठरलं आहे.
किसना : हो मीच बोलतोय
ती : तुझ्याशिवाय करमत नाहीये रे
किसना : कोण तुम्ही?
ती : मी तीच जी तुझ्यासाठी खूप वेडी झालीय
किसना : अहो मॅडम प्लिज मला निनावी नावाने पत्र आणि फोन करु नका. माझं आधीच माझ्या श्यामावर खूप प्रेम आहे. माझं लग्न देखील तिच्याशी ठरलं आहे.
तेवढ्यात श्यामा तिकडे आली तिने किसनाच्या हातून फोन घेतला.
श्यामा : कोण आहेस गं तू? का माझ्या किसनाच्या मागे लागली आहेस?
ती : तो माझाच आहे आणि माझाच राहणार, हिम्मत असेल तर अडवून दाखव.
श्यामा : होका? तू समोर ये तर मग मी तुला बघून घेईल.
ती : येतेय उद्या, बघ उद्या तुमच्या सगळ्यांच्या समोर रंगपंचमीचा रंग त्याला लावून जाणार.
श्यामा : हो ये तू बघते मी तू कशी सुटते माझ्या तावडीतून.
तिने फोन ठेवून दिल्यावर श्यामाने लगेच तो नंबर कोणाचा आहे हे चेक केलं, पण तो नंबर तर किसनाच्या घरातील वरच्या रुमच्या लँडलाइनचा होता. सगळेजण वरती त्या खोलीत गेले, पण तिथे कोणीच नव्हतं. किसनाची काकू आणि काका सुद्धा टेन्शन मध्ये होते. उद्या रंगपंचमीच्या कार्यक्रमा मध्ये ती मुलगी कशीकाय येतेय यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते.
खूप मोठा पोलीस बंदोबस्त होता. कोणालाही विना ओळखपत्र आत सोडत नव्हते. फक्त काही मान्यवर त्यांचे मित्र मैत्रिणी, सहकारी, किसनाचे घरचे,श्यामा आणि मग कार्यक्रम रंगतदार करण्यासाठी आलेले काही डान्सर्स आणि काही तृतीयपंथी लोकं.
रंगपंचमीचा खेळ तर सुरु झाला होता. भांग, दूध आणि थंडाई शिवाय वेगवेगळे स्ट्रीट फूड असा मस्त सर्वांसाठी मेन्यू होता. सर्वजण डीजेच्या गाण्यांवर ताल धरुन एकमेकांना रंग लावत होते.
\"चालून आली आज वरसान संधी
तशात भांगेची चडली या धुंदी
चिंब होऊया रंगात रंगू ये ये ये ये
हे जा रे जा तू शोधू नको तू बहाना
फुकट साधू नको रे निशाना
नको छेडू तू सर्वा दमान घे घे घे घे
हो होळीच्या निमित्ताने घालूया थैमान
मोकाट हे राण सार अताहा
ये भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचूया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचूया \"
तशात भांगेची चडली या धुंदी
चिंब होऊया रंगात रंगू ये ये ये ये
हे जा रे जा तू शोधू नको तू बहाना
फुकट साधू नको रे निशाना
नको छेडू तू सर्वा दमान घे घे घे घे
हो होळीच्या निमित्ताने घालूया थैमान
मोकाट हे राण सार अताहा
ये भांगेच्या तारेत
रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचूया
आला होळीचा सण लय भारी
चल नाचूया \"
श्यामा आणि किसना सुद्धा रंगपंचमीच्या या खेळात अगदी बेधुंद होऊन नाचत होते. सर्व डान्सर्स आणि तृतीयपंथी लोकं सुद्धा मनमुराद नाचले. सर्व कार्यक्रम आटोपून गेला. सगळे जिकडेतिकडे गेले, श्यामाला आणि किसनाच्या काका काकुला वाटलं,ती पोरगी घाबरली या सगळ्यांना म्हणून आज आलीच नाही. किसना पाणीपुरीचा शेवटचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा ठेल्याजवळ गेला, तेव्हा एक किन्नर तिथे आला,त्याने डोक्यावर पदर घेतला होता आणि तोंडाला खूप सारा रंग लावलेला होता. त्याने जोरात दोन टाळ्या वाजवल्या, मग किसना ने त्याच्याकडे पाहिलं.
"साहब जी हमारे पैसे तो दिये नही आपने आज, जरा मे भी घुमुंगी इस पैसो से और मस्त जिंदगी जी सकती हू कम से कम दो दिन तो सही." किन्नर बोलला.
किसनाने लगेच खिशातून पाचशेची नोट काढून त्याला दिली तेवढ्यात त्याने अचानक किसनाचा हात पकडला.
"काय रे बघ आले की नाही मी तुला भेटायला, तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहणार." ती म्हणाली.
किसना दचकला, पण त्याने तिचा हात पकडून ठेवला होता.
"कोण आहेस तू नक्की." किसनाने विचारलं
"अगं बाई श्यामा पडली?अरे देवा!" ती जोरात दुसरीकडे बघून ओरडली.
किसनाने श्यामाचे नाव ऐकताच तिचा हात सोडला आणि त्या दिशेला त्याने पाहिलं. पण तेवढ्यात ती त्याच्या हातातून निसटली. श्यामाने हा प्रसंग लांबून पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता श्यामा त्या मुलीच्या मागे पळू लागली. श्यामा मॅडम तिच्या मागे पळत आहे हे बघून बाकीच्या लोकांनी सर्व मैदानाचे दरवाजे बंद केले. ती पुढे पुढे , श्यामा मागे मागे असं खूपवेळ दोघी पळाल्या. पण मग पुढे एक मोठी भिंत होती. श्यामाला वाटलं की, आता ही थांबेल, कारण साडी घालून हिला तर ही मोठी भिंत पार करता येणार नाही. पण ती मुलगी खूपच चालाख होती. तिने पळता पळता तिची साडी काढली,आतमध्ये तिने वेगळे कपडे घातले होते,त्यामुळे ती पटकन ती भिंत चढून श्यामाच्या हातून निसटली. पण श्यामाने तरीही एक दगड उचलून तिला फेकून मारला.तिचं डोकं रक्तबंबाळ झालेलं पण तरीही ती तेथून पळाली.
श्यामा हे बघून अचंबित झाली,"ही नक्की कोण? हिला एवढं सगळं कसं जमतं, हिने चांगलीच तयारी केलेली आहे." श्यामा विचारांच्या गर्दीत हरवली.
क्रमश:
टीम : अहमदनगर
©® : मित्र रिषभ
©® : मित्र रिषभ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा