Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

तुझ्यासाठी कायपण - भाग ४

Read Later
तुझ्यासाठी कायपण - भाग ४


तुझ्यासाठी कायपण - भाग ४
(प्रेमकथा)

आत्तापर्यंत तुम्ही वाचलं की ,श्यामा किसना यांच्या लवस्टोरी मध्ये एक तिसरी व्यक्ती सतत किसनाच्या मागावर आहे, आधीच्या भागात श्यामा आणि किसन ज्या हॉटेलात जेवायला गेलेले तिथेही त्या मुलीने वेटरमार्फत चिठ्ठी पाठवली होती ,त्यामुळे श्यामा आणि किसनामध्ये थोडे वाद झाले होते आणि श्यामा तिथून निघून गेली होती.

आता वाचा पुढे...


किसना वर रागावलेली श्यामा लगेच त्या हॉटेलबाहेर गेली आणि तिच्या गाडीत जाऊन बसली. ड्रायव्हर बाहेर एका टपरीवर सिगारेट ओढत होता. मॅडम आलेल्या पाहून तो तसाच ती सिगारेट तिथेच विझवून गाडीजवळ आला आणि तेवढ्यात किसना तिकडे आला,त्याची टोपी काढून त्याने स्वतःच्या डोक्यावर घातली,ड्रायव्हरला डोळा मारुन तो ड्रायव्हर सीटवर जाऊन बसला.

किसना म्हणाला,
"किधर जाना है मेमसाब ?"

श्यामाला माहीत नव्हतं की तो किसना आहे. श्यामा बोलली,
"किधर मतलब?घर चलो अब."

किसना गाडी चालवत होता आणि मुद्दाम तिथे बसल्याबसल्या श्यामाला कॉल करत होता. श्यामा चिडून फोन कट करत होती. दोन तीन वेळा कट केल्यावर किसना बोलला,
"उठालो मेमसाब फोन,आशिकको इतना तडपाना अच्छा नही जी."

श्यामा म्हणाली ,
"लेकीन आशिकको थोडा दिमाग तो चाहीए, आखिर कबतक ये बचपना चलेगा."

तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की, हा ड्रायव्हर कधी पर्सनल बोलत नाही आणि याला काय माहिती माझ्या आशिकचा कॉल आलाय ते . तिने मुद्दाम किसनाला कॉल केला, फोनची रिंगटोन वाजली आणि चोर पकडला गेला.

किसनाने मागे वळून बघितलं आणि हसू लागला.

श्यामा रागात बोलली,
"गाडी थांबव."

"का?" किसनाने विचारले

"गाडी थांबव बावळट." श्यामा म्हणाली.

"अगं पण बाहेर तर पाऊस सुरु आहे, तू भिजलीस तर..." किसना म्हणाला

"गाडी थांबवतो की नाही.थांब मीच दरवाजा उघडते." श्यामा म्हणाली

"नको नको चालत्या गाडीतून बाहेर पडशील गं. थांब गाडी थांबवतो." किसना बोलला

किसनाने दरवाजा उघडला.श्यामा बाहेर आली. एकटी भुरभुर पडणाऱ्या पावसात चालू लागली, तर अचानक कोणीतरी तिच्या डोक्यावर छत्री धरुन बाजूने चालू लागला, तिने त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं.

किसना गाणं म्हणू लागला,
"प्यार हुआ इकरार हुआ है,
प्यार से फिर क्यू डरता है दिल,
प्यार हुआ इकरार हुआ है,
प्यार से फिर क्यू डरता है दिल. "

रुसलेली श्यामा त्याला गाण्यातूनच उत्तर देऊ लागली,
"कहता है दिल
मेरा आशिक है बेवकूफ,
मालूम नही,
है कहा मंजिल."

किसनाला कळलं की ही खूपच रुसलीये म्हणून त्याने अजून एक गाणं म्हणायला सुरुवात केली,
"अच्छा जी मै हारा चलो मान जाओ ना ,
व्हेरी सॉरी मेरी सखी,
अब भाव खाओ ना."

श्यामा म्हणाली,
"देखी सबकी यारी,
अब दिल जलाओ ना."

"छोट्या नकट्या नाकावरती एवढा मोठा राग,
ओय होय कातील डोळ्यामध्ये मिर्चीवाली आग.
मीच आज राती खाल्ली थोडी माती
अब माफ करना साथी,
अब हात देना हाती
चिडचिड विडचिड तेरी होगयी काफी,
दे माफी
अच्छा जी मै हारा,
चल मान जाओ ना." किसना म्हणाला.

किसनाची ही निरागस, लाडात आलेली भावना बघून श्यामा लगेच विरघळली आणि हसू लागली. तिला हसताना पाहून किसनाला खूप हायसं वाटलं. त्या दोघांनी राहिलेलं जेवण जवळचं असलेल्या एका वडापावच्या गाडीवर भजे पावावर ताव मारुन पूर्ण केलं.

किसना बोलला,
"आपलं नविन घर जवळच आहे. इथून तर आज तिकडे जायचं का झोपायला? "

"उमम्म्मsss...बरं चल जाऊया.हो पण एका अटीवर तिकडे फक्त तू आणि मी असेन म्हटल्यावर उगाच लाडात यायचं नाही बरं का." श्यामा बोलली.

किसना म्हणाला,
"लाडात व्हय आणि मी? ना बाबा ना,मी कधी लाडात येतो. मला तर अजिबात जमतचं नाही."

"ओहो,बरं चला ड्रामेबाज." श्यामा म्हणाली.

दोघेही त्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या फ्लॅटमध्ये गेले. दरवाजा उघडला आणि लाईट्स लावून आत गेले.

श्यामा बोलली,
"तू इथेच बस हॉलमध्ये मी आलेच, थोडं रुममध्ये जाऊन फ्रेश होऊन येते."

किसना म्हणाला ,
"हो चल मीपण येतो."

"हट नालायक ,गुपचुप इथं बस."
श्यामा म्हणाली

श्यामा हसतहसत तिच्या रुममध्ये गेली, लाईट्स लावले, बाथरुममध्ये गेली आणि समोरील दृष्य पाहून किसनाचे नाव घेऊन जोरात किंचाळली.

किसना लगेच जोरात पळत तिच्या रुममध्ये गेला. ती दिसली नाही, म्हणून बाथरुमचा दरवाजा हळूच लोटून पाहिला, तर ती खाली बसून डोळ्यांवर हात ठेवून रडत बसलेली होती.

किसना म्हणाला,
"श्यामा,ये वेडाबाई काय झालं, इथं का बसली आहेस?"

श्यामाने रडतरडत किसनाला घट्ट आवळून धरलं आणि समोरील भिंतीकडे बोट केलं.

समोर सगळ्या भिंतीवर लाल रंगाने कोणीतरी किसनाबद्दल काही वाक्ये लिहिली होती.

\"किसना फक्त माझा आहे.
माझ्याशिवाय तो कुणाचा होऊच शकत नाही.\"

\"किसना आय लव यू ,तू जिधर मे उधर.\"

\"किसना तू माझा नाही झाला,तर मी तुला कोणाचंही होऊ देणार नाही.\"

असे एक ना अनेक वाक्य त्या भिंतीवर होते. श्यामा रडतरडत तर किसना रागाने त्या भिंतीकडे बघत होता...

क्रमश:

टीम : अहमदनगर
©® :मित्र रिषभ
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मित्र रिषभ

Writer

Like to write fictional stories

//