तुझ्यासाठी कायपण - भाग ३

It's A Love Story



तुझ्यासाठी कायपण -भाग ३
(प्रेमकथा)

आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेलच की श्यामा, किसना या दोघांची ही लव स्टोरी आहे . श्यामा एक निडर, हुशार आणि कमीवयात जिल्हाधिकारी झालेली सुंदर तरुणी तर किसना हा तिचा प्रियकर जो नुकताच एम. बी. बी.एस झालाय..पण या दोघांच्या प्रेमकथेत एक तिसरीच पाहुणी सतत दिसत आहे कुठं ना कुठं. आता वेळ आली आहे त्या पाहुणीचं गुपित सांगण्याची.


"उद्या मला भेटायला जमणार नाही.उद्या मला पोलीस हेडक्वार्टर कडे जायचं आहे . उद्या योगा दिवस आहे ना, त्यामुळे नाशिक मधील सगळ्या शाळेतील मुलं तिथं असणार आहेत." श्यामाने सांगितले.

यावर किसना म्हणाला,
"तू असंच करतेस नेहमी, मला जास्त वेळ देतचं नाही."

श्यामा म्हणाली,
"हो का ? असं असतं तर मी तुझ्या कुशीत नसते ना आत्ता. असं तोंड पाडून नको बसू बरं,एक काम कर तू तिकडे पोलीस परेड मैदानावर ये. उद्या कार्यक्रम झाल्यावर तिकडेच भेटू."

ठरल्याप्रमाणे श्यामा आज पहाटे लवकर उठून तिच्या बॉडीगार्ड आणि सहकाऱ्यांसोबत पोलीस हेडक्वार्टर मैदानावर पोहोचली,तिथे कमिशनर साहेबांसोबत ती बाजूला खुर्चीवर बसली होती. समोर असंख्य प्रमाणात वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी हजर होते. तेवढ्यात तिथे त्या विद्यार्थ्यांना योगासन शिकवायला एक तरुणी पुढे आली. काळ्या रंगाचा टाईट फिट टी शर्ट, त्यावर निळसर रंगाची पॅन्ट आणि केसांचा बुचुडा बांधून ती त्या मुलांना योगासनांची वेगवेगळी आसने शिकवत होती. आसने शिकवून झाल्यावर तिने एक विशेष सेशन घेतलं, ज्या मध्ये मुलींना स्वरक्षण कसं करायचं? याबद्दल तिने मार्गदर्शन केले. शिवाय त्यांना वेगवेगळ्या युक्त्या सांगितल्या, जेणेकरुन जर कोणी अनोळखी मुलाने छेडले तर नंतर, तिथेच त्याला प्रत्युत्तर देता आले पाहिजे. तिने तिच्या एका सहकाऱ्याच्या साहाय्याने प्रात्यक्षिक देखील करुन दाखवले. सगळं झाल्यावर तिने \"सत्यम शिवम सुंदरम\" या भावगीताचा अर्थ, मुलांना तिच्या गोड आवाजातून गाणं म्हणून समजवला. तिच्या या सगळ्या गोष्टींमुळे श्यामा साहजिकच तिचं कौतुक करायला पुढे गेली.

" हॅलो मॅडम,वाह! तुम्ही आज सर्व मुलांना एकदम सुंदर मार्गदर्शन केलं. मी श्यामा,तुमचं नाव काय?" श्यामाने विचारले.

ती म्हणाली,
"तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम,मला तुमचा खूप अभिमान आहे.इतक्या कमी वयात आपल्या जिल्ह्याची सूत्र तुम्ही सांभाळत आहात. मी राधिका कारखानीस आणि प्लिज मला मॅडम वगैरे नका म्हणू."

श्यामा म्हणाली,
"कारखानीस म्हणजे कमिशनर साहेबांची तू .."

तेवढ्यात कमिशनर साहेब म्हणाले,
"हो हो हीच ती माझी मुलगी,हिच्याबद्दलच मी तुला सांगत होतो. तिने नुकतंच एम.बी.बी.एस केलंय."

यावर श्यामा म्हणाली,
"अरे वाह ग्रेट ,थांब तुझी ओळख मी किसनासोबत करुन देते.माझ्या होणाऱ्या नवऱ्याने सुद्धा नुकतंच एम.बी.बी.एस पूर्ण केलंय, तो इतक्यात येईलच."

किसनाचे नाव ऐकून राधिकाची थोडी चलबिचल झाली.

राधिका म्हणाली,
"नाही नको मॅडम ,मी त्यांना नंतर कधीतरी भेटेल.आत्ता मी खूप घाईत आहे. अजून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मला प्रात्यक्षिक करुन दाखवायची आहेत."

श्यामा म्हणाली,
"अरे हो चालेल तू जा, ते काम जास्त महत्त्वाचे आहे."

राधिका तिथून गेल्यावर पाच मिनिटांत किसना तिथे आला.

श्यामा किसनाची ओळख करुन देताना म्हणाली,
"कमिशनर साहेब हा पहा हा आहे किसना, तुम्हाला ह्याला भेटायचं होतं ना?"

कमिशनर म्हणाले,
"अरे तर तू आहेस, तो ज्याने आमच्या निडर श्यामाच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल आणलीस. श्यामा तू ह्याला निवडलं आहेस, म्हणजे यात नक्की काहीतरी खास असणारच. माझ्या राधिकासाठी तुझा कोणी भाऊ आहे का?"

श्यामा हसून म्हणाली,
"नाही ना सर, किसना सारखे मुलं देव एकदाच बनवतो, त्याची झेरॉक्स अजिबात बनवत नाही."

कमिशनर साहेब म्हणाले,
"आत्तापासूनच तुझी कशी बाजू घेतेय बघ."

श्यामा ,किसना आणि कमिशनर साहेब गप्पा मारत होते आणि इकडे झुडुपाआड लपलेली राधिका रागाने डोळे लालेलाल करत श्यामाकडे बघत होती.


रात्री श्यामा आणि किसना डिनरला गेले होते. मस्त कँडल लाईट डिनर होता. श्यामाच्या आवडीची पनीर शामसवेरा किसनाने ऑर्डर केली होती. दोघेही गप्पा मारत मारत जेवणाचा आनंद लुटत होते. तेवढ्यात तिथे एक वेटर आला त्याने एक चिठ्ठी किसनाकडे देऊन म्हणाला,
"बाहेर एक मॅडम आलेल्या, त्यांनी तुम्हाला ही चिठ्ठी द्यायला लावली."
श्यामाने लगेच ती स्वतःकडे घेऊन ती उघडून वाचू लागली,

\" दिस सरता सरेना रात पुरता पुरेना
जीवघेणी ओढ तुझी मिटता मिटेना
गुलाबाच्या फुलाला काट्यांचा हेवा नसतो
राधेशिवाय कृष्ण अपूर्णच असतो \"

-तुझीच राधा


चिठ्ठीतील मजकूर वाचून श्यामाला खूप राग आला होता.

श्यामा किसनाला रागात म्हणाली,
"ही कोण आहे? तू माझ्यापासून काय लपवत आहेस?"

काहीही न कळलेला किसना म्हणाला,
"कोण ? बघू त्यात काय लिहलं आहे?अरे देवा ही कोण कुठली? मला नाही माहिती गं. खरच मला माहिती नाही."

श्यामा म्हणाली,
"मला ठाऊक आहे की, कॉलेजमध्ये तुझ्या भरपूर मैत्रिणी होत्या, ही नक्की त्यापैकी नाही ना?"

यावर किसना म्हणाला,
"राहू दे हो,कॉलेजमध्ये खूप मुली माझ्यावर मरायच्या, पण केवळ माझी गर्लफ्रेंड ही जिल्हाधिकारी आहे, या कारणाने कोणी माझ्यावर भाळली नाही. रादर मी देखील कोणाच्या जवळ गेलो नाही. माझी काय टाप आहे का? तुला सोडून दुसऱ्या मुलीकडे बघण्याची."

श्यामा चिडून म्हणाली,
"तू अजूनही चेष्टाच कर. बाय मी आता जाते."

"अगं पण हे राहिलेलं जेवण." किसनाने विचारले.

श्यामा म्हणाली,
"मूर्ख तुला जेवणाचं पडलंय, देवा माझ्याच नशिबी हा वेडा बांधलास तू. तूच खा हे सगळं जाते मी बाय."

किसना विचारात पडला की नंतर, कोण असेल बरं ही?असं बिनधास्तपणे इथं चिठ्ठी का पाठवली असेल? ही आणि ती कॉलेजमध्ये गाणं म्हणणारी एकच तर नसेल ना?

क्रमश :

टीम: अहमदनगर
©® : मित्र रिषभ

🎭 Series Post

View all