तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ...! ( भाग 5 )

खूप बरं वाटलं...सारखी धास्ती लागून राहिली होती...मी आज माझ्या क्लास मधल्या मुलांना सांगितलं...आणि दुसऱ्या एका क्लास चा नंबर दिला...उगीच नुकसान कशाला करायचं मुलांचं ? बरं झालं यावर्षीची सुट्टी अजून संपली नाहीये ...तुला एक गंमत सांगू ? मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सांगुनच टाकलं की तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या...कसाही करा पण आमच्या मुलांना तुम्हीच शिकवायच...इतकं भरून आलं ना मला ...खूप आनंद झाला...करू का मी तिकडे गेल्यावर ऑनलाईन क्लास सुरू ? तसं मी साध्याच काही सांगितलं नाहीये...कळवते म्हणाले नुसतं..." अनिता मुलांचे गणित आणि सायन्स चे क्लास घ्यायची आणि अधून मधून श्लोक , ड्रॉईंग , क्राफ्ट अश्या गोष्टी फ्री मध्ये शिकवायची...सगळ्या मुलांची आवडती टीचर होती अनु..." हो मॅडम , आपण जरा सेट्ल झालो की नक्की कर तुला हवं ते...तू तर लाडकी ना सगळ्यांची...आमच्या वाट्याला कुठे येणार तुम्ही..." विनयने अनुला चिडवल..." पुरे आता , कामाला लागा खूप कामं आहेत मिस्टर...आणि बॅग सुद्धा भरायचीये...कपडे कुठले न्यायचे ते काढून ठेव म्हणजे मी पॅकिंग करते...आणि आपण परत कधी येणार ? म्हणजे त्याप्रमाणे पॅकिंग करते..." अनिताने विनयला आवरलं" आपण रविवारी सकाळी निघू तिथून...मी मुद्दाम एक दिवस जास्त ठेवलाय आपल्यासाठी...शुक्रवारी काम झालं की दुपारपासून आपण मोकळे...मस्त एन्जॉय करूया...तीन वर्ष झाले आपण कुठेच गेलो नाही फिरायला...आता मस्त मज्जा करूया मग पुढचे काही महिने खूप हेक्टिक होतील ....तू आहेस .म्हणून खूप काळजी कमी होते माझी...किती काम करतेस तू...घरचं , बाहेरचं कुठलही काम किती सहजतेने करून टाकतेस ग राज क्या है ..." विनयला आज बायकोचं किती कौतुक करू असं झालं होतं...
आई बाबांच्या वागण्यामुळे विनय खूप व्यथित झाला होता...अनिताला हे वागणं नवीन नव्हतं पण तरीही या परिस्थीत त्यांनी थोडेतरी समजून घ्यायला हवे होते... तसही सगळं त्यांच्याच मनाप्रमाणे होणार होतं आणि ताई भाऊजी होतेच सोबत पण तरीही ते असे का वागत असतील म्हणून विनयला खूपच काळजी वाटत होती...पण आता सावरणं गरजेचं होतं , खूप कामे बाकी होती... व्हिसा इंटरव्ह्यू नीट व्हायला हवा होता तरच पुढचं काम सुरू होणार होतं...
अनिता विनयच्या जवळ बसली..." काळजी करू नकोस रे राजा , तसं काही नसेल . आपलं जाणं आई बाबांना अजूनही एक्सेप्ट करणं अवघड आहे ना ...साहजिकच आहे रे त्यांना वाईट वाटणं , इतका महत्त्वाचा निर्णय घेताना तू जवळ असावस असं वाटणारच ना त्यांना...आणि ही आपली कामं किती महत्त्वाची आहेत याची त्यांना जाणीव नाही ना.. चल बरं फ्रेश हो , जेवण कर मग सगळं कामाचं बोलूया..." अनिताने स्वतःच्या मनातले दुःख नेहेमीप्रमाणे दाबून विनायच मन हलकं करायचा प्रयत्न केला...
" अनु किती सांभाळतेस ग सगळ्यांच मन...मी खरंच खूप भाग्यवान आहे म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस..." विनयने अनुला मिठीत घेतलं...
रात्री दोघांनी मिळून सगळे डॉक्युमेंट बघितले... विनयने अनिताला व्हिसा इंटरव्ह्यू साठी विचारल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या.अनिताने सगळं नीट समजावून घेतलं आणि आवश्यक गोष्टी नोट करून घेतल्या. पिहू लहान असल्यामुळे तसा तिला काही प्रश्न विचारण्याची वेळ येणार नव्हती पण तरीही विनयने तिलाही काय बोलायचे , कसे वागायचे हे समजून सांगितले...हॉटेल बुकिंग , फ्लाईट च बुकिंग सगळं कंपनीने केलं होतं त्यामुळे काळजी नव्हती...विमानाने जायचं , मस्त मोठ्या हॉटेलमध्ये राहायचं ...! पिहू खूप खुश होती..पण विनय आणि अनिता मात्र खूप टेंशन मध्ये होते....
" पैश्यांची व्यवस्था कशी करायची रे ? आपल्या बजेट पेक्षा बरेच पैसे जास्त लागणार आहेत ना आई बाबांच्या फ्लॅट साठी ...शिवाय फर्निचर सुद्धा करावं लागेल...सामान वगैरे शिफ्टिंग , आपलीही खरेदी खर्च बराच होणार...काळजी वाटतेय मला खूप...हवं तर माझे दागिने ठेवून लोन काढुया नाहीतर विकले तरी चालतील..."
" नाही नाही , अगं काय बोलतेयस तू हे ? तुझ्या दागिन्यांचा विषय आजिबात काढायचा नाही...पैसे आहेत आपल्या अकाऊंटला ...तुझ्याही क्लासेस चे पैसे जमावले आहेस ना तू ते ही तसेच ठेव... भावजी बोललेत बिल्डरशी सगळे पैसे लगेच भरायची गरज नाही... थोडं लोन घेऊया सध्या आणि मग लंडन ला गेलो की पगारही जास्त मिळेल ना मग काही प्रोब्लेम येणार नाही...शिवाय आपल्या या घराचं भाड येईल त्यात आई बाबांचा खर्च भागेल आणि येणारा भाडेकरू डीपॉझिट देईल ना त्यातूनही बाकी खर्च भागतील .तू आईबात पैशांची काळजी करू नकोस...आपल्या तिकिटांचा आणि हा व्हिसाचा वगैरे खर्च कंपनीतर्फे होणार आहे ....तेव्हा काळजी नसावी..." विनयने तिची सगळी काळजी चुटकीसरशी दूर केली तशी अनु गोड हसली...
" खूप बरं वाटलं...सारखी धास्ती लागून राहिली होती...मी आज माझ्या क्लास मधल्या मुलांना सांगितलं...आणि दुसऱ्या एका क्लास चा नंबर दिला...उगीच नुकसान कशाला करायचं मुलांचं ? बरं झालं यावर्षीची सुट्टी अजून संपली नाहीये ...तुला एक गंमत सांगू ? मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सांगुनच टाकलं की तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या...कसाही करा पण आमच्या मुलांना तुम्हीच शिकवायच...इतकं भरून आलं ना मला ...खूप आनंद झाला...करू का मी तिकडे गेल्यावर ऑनलाईन क्लास सुरू ? तसं मी साध्याच काही सांगितलं नाहीये...कळवते म्हणाले नुसतं..." अनिता मुलांचे गणित आणि सायन्स चे क्लास घ्यायची आणि अधून मधून श्लोक , ड्रॉईंग , क्राफ्ट अश्या गोष्टी फ्री मध्ये शिकवायची...सगळ्या मुलांची आवडती टीचर होती अनु...
" हो मॅडम , आपण जरा सेट्ल झालो की नक्की कर तुला हवं ते...तू तर लाडकी ना सगळ्यांची...आमच्या वाट्याला कुठे येणार तुम्ही..." विनयने अनुला चिडवल...
" पुरे आता , कामाला लागा खूप कामं आहेत मिस्टर...आणि बॅग सुद्धा भरायचीये...कपडे कुठले न्यायचे ते काढून ठेव म्हणजे मी पॅकिंग करते...आणि आपण परत कधी येणार ? म्हणजे त्याप्रमाणे पॅकिंग करते..." अनिताने विनयला आवरलं
" आपण रविवारी सकाळी निघू तिथून...मी मुद्दाम एक दिवस जास्त ठेवलाय आपल्यासाठी...शुक्रवारी काम झालं की दुपारपासून आपण मोकळे...मस्त एन्जॉय करूया...तीन वर्ष झाले आपण कुठेच गेलो नाही फिरायला...आता मस्त मज्जा करूया मग पुढचे काही महिने खूप हेक्टिक होतील ....तू आहेस .म्हणून खूप काळजी कमी होते माझी...किती काम करतेस तू...घरचं , बाहेरचं कुठलही काम किती सहजतेने करून टाकतेस ग राज क्या है ..." विनयला आज बायकोचं किती कौतुक करू असं झालं होतं...
" मला वाटतंय की तुला काहीच तयारी करायची नाहीये फक्त माझं कौतुकाच्या बदल्यात व्हिसा देणार आहेत वाटतं...मग हा ऑफीसर खुश , आयुष्यभराचा व्हिसा दिला तुम्हाला..." अनुही मस्करीच्या मुड मध्ये आली होती...
दोघांच्या आवाजाने झोपलेली पिहू उठून आली आणि आपले आई बाबा इतक्या रात्री इतके खुश , आणि इतके हसत का आहेत हेच तिला कळेना...दोघे गालातल्या गालात हसत पिहूला झोपवून कामाला लागले...
दुसरा दिवस अत्यंत धावपळीचा होता...अनुला तर आज दिवस पुरणार नव्हता... पिहू शाळेत गेली तशी तिने पटपट घरातली कामे आवरली...विनयच्या ऑफिसला निघता निघता सतत सूचना सुरू होत्या...
" पिहूच्या शाळेचं काम आधी करून टाक , मग बँकेत जा पैसे ट्रान्स्फर करावे लागतील ना , इतकी मोठी अमाऊंट पाठवायची आहे बघ मॅनेजरशी बोलून आजच काम झालं तर बरं होईल , उद्या निघताना धावपळ नको व्हायला... बरं झालं आपल्या दोघांचं जॉइंट अकाऊंट आहे , म्हणून तुला करता येतात ही कामं ते नाहीतर मलाच सुट्टी घ्यावी लागली असती...तसा थोडावेळ येऊ शकतो मी गरज पडली तर...फोन कर मला तसा...सगळे डिटेल्स दिले आहेत तुला..."
" मी जाते बँकेत मॅनेजर ओळखीचे आहेत ना त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही...त्यांचा मुलगा क्लासला येतो माझ्याकडे म्हणून विशेष मान देतात मला...पण इतकी मोठी अमाऊंट आहे...मला भीती वाटते...तू येच बाबा मला नको एकटीला इतकी जवाबदारी...मी बोलते मॅनेजरशी आणि सांगते तुला कसं काय होतंय ते...मला वाटतं की आपण डायरेक्ट बिल्डर ला पैसे पाठवण्यापेक्षा भावजींकडे पाठवू या का उगीच रिस्क कश्याला घ्यायची ? आपण ओळखतही नाही त्या माणसाला...आणि तसाही भावजी सोबत असणारच ना बाबा काही एकटे नाही करणार काही..." अनिताने आपली काळजी व्यक्त केली ...
" हो ग बरोबरच आहे तुझं , तसच करूया...मी बोलतो भावजींशी... यू आर ग्रेट ...खरंच कसं सुचत तुला हे सगळं इतक्या गडबडीत...आता जास्त वेळ नाही ग कौतुकाला पण आपण शनिवारी कसर भरून काढू..." अनूच्या गालावरचे फुललेले गुलाब बघून इच्छा नसतानाही विनय ऑफिसला गेला...
ठरल्याप्रमाणे अनिताने सगळी कामे पार पाडली...विनय थोड्या वेळासाठी बँकेत आला आणि मॅनेजरच्या ओळखीमुळे पटकन काम झालं...आता जवळ जवळ सगळी तयारी झाली होती...फक्त बॅग भरायची तेवढी बाकी होती ...घरी परत येताना अनूच्या मनात एक विचार आला आणि तिने विनयला सरप्राइज द्यायचं ठरवलं...इतकी छान बातमी देऊनही आपण विनयला काहीच स्पेशल देऊ शकलो नाही याची खंत तिला वाटली आणि आज काही झालं तरी विनयला खुश करायचं असं तिने ठरवलं !
घरी आल्यावर अनुने आई बाबांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही , मग तिने ताईच्या फोन वर फोन केला तर " आई बाबा झोपलेत...मी ही कामात आहे नंतर बोलू..." असं तुटकपणे बोलून ताईने फोन कट केला...अनुच्या ह्रुदयात पुन्हा कालवा कालव झाली...अजूनही सगळे मनात अढी धरून बसलेत की काय अशी शंका येऊ लागली...
विनयने पैसे पाठवून भावजीना कळवल...आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या...दोन तीन दिवसांत सगळी प्रोसेस पूर्ण झाली की आई बाबांना पाठवण्याची विनंती सुद्धा केली...
अनुने घरचं सगळं आवरून सरप्राइज ची तयारी केली...मनात चल - बिचल सुरूच होती...पण त्याला काहीच इलाज नव्हता... व्हिसा इंटरव्ह्यू झाला की ताईकडे जाण्याचं दोघांनी ठरवलंच होतं...मग त्यांचा राग दूर नक्कीच होणार होता...
" अनु अगं आता भावजींचा फोन आला होता , ती बिल्डर म्हणे पंधरा दिवस कुठेतरी बाहेरगावी गेलाय त्यामुळे सध्या थांबावं लागणार फ्लॅट साठी...पण एका दृष्टीने बरच झालं...आपल्याला जाता येईल तिकडे वेळेवर आणि मुख्य म्हणजे आई बाबांना बर वाटेल...आता काळजी करू नको...येतोच मी तासाभरात..." विनयच्या बोलण्याने अनिताला खूपच बरं वाटलं...
तिने तिच्या आईला ही आनंदाची बातमी दिली...आईच्या बोलण्यातून आनंद आणि समाधान ऐकून तिला खूप आधार वाटला ! आता खऱ्या अर्थाने आनंदी मनाने ती विनयला सरप्राइज द्यायला तयार होती... पिहू सुद्धा एकदम एक्सायटेड होती बाबाला सरप्राइज करायला...दोघी मायलेकी अगदी आतुर होऊन विनयची वाट बघत होत्या....

🎭 Series Post

View all