तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( भाग 30 )

वसुधा घरातलं शेंडेफळ म्हणून सगळे नेहेमी तिचा लाड करायचे . चुका झाकून न्यायचे . पण आता मात्र साथीला कोणीच नव्हतं.खऱ्या अर्थाने वसुधा आता हतबल झाली . सगळंकाही प्लॅन प्रमाणे सुरू होतं. वसुधाला अश्रू अनावर झाले . बराच वेळ गेला . कीर्ती घरात असूनसुद्धा आईकडे फिरकली नाही .वसुधाने आपली बॅग भरली होती . पण ती भरलेली बॅग घेऊन जायला तिच्या हक्काचं ठिकाणचं राहिलं नव्हतं.काय करावं काहीच सुचत नव्हतं . कीर्तीला थोडे दिवस रहा म्हणून गळ घालून झाली होती . पण तिने स्पष्ट नकार दिला . निदान सगळी मंडळी परत येईपर्यंत तरी कीर्तीने आपल्याबरोबर राहावं अशी वासुधाबाईंची इच्छा होती . पण सकाळी परत जायचं हे कीर्ती आणि सुरेशने पक्क ठरवलं होतं.आईला असं एकटं सोडून जाणं खरंतर कीर्तीला नको वाटत होतं , तब्येतही जरा खालावलेली वाटत होती . पण प्लॅन प्रमाणे वागायचं होतं. आणि सगळेजण परत जवळच्या रिसॉर्टवरच असनार होते त्यामुळे काही प्रोब्लेम नव्हता .
कीर्तीच्या बोलण्याने दुःखी झालेल्या वसुधाला अगदी रडू आवरत नव्हतं पण आता पर्याय नव्हता. तिने अनिताला फोन लावला .
" अनु , कशी आहेस ग ? सगळं ठीक आहे ना तिकडं ? कधी येणार तुम्ही ? बाबा , विनू कसे आहेत? पीहूची खूपच आठवण येतेय ग. आणि खरं सांगू का ? मला तुम्हा सगळ्यांशिवाय आजिबात राहवत नाहीये . इथे मी कशी राहतेय माझं मलाच माहिती . तब्येत सुद्धा बरी नाही माझी . तुम्ही सगळे निघून गेलात आणि वाटलं माझं आयुष्य संपले . मी रागात काहीतरी बोलले त्याचा इतका मोठा इशू केलाय तुम्ही सगळ्यांनी ? तुझे बाबा तर म्हातारचळ लागल्यासारखे वागतायेत . मलाही एखाद्या वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आली आहे. कीर्ती आलीय इथे पण तिच्याकडे जाऊन राहणे योग्य नाही ना . मुलीकडे कशी राहू मी ? काय करायचं मी म्हातारीने ? देवा उचल मला आता . हाच दिवस बघण्यासाठी इतकं केलं मी सगळ्यांसाठी ..." आपल्या बोलण्याने अनिताचे मन नक्कीच विरघळेल याची खात्री वसुधाला होती .
" इकडे आम्ही मजेत आहोत . तुमची तब्येत बरी नसेल तर डॉक्टरकडे जाऊन या. शांता तर म्हणत होती की सगळं ठीक आहे . तुम्ही व्यवस्थित चमचमीत जेवण जेवतात आहात , तुमच्या पार्टीबद्दलही समजलं आम्हाला . एकूणच तुम्ही खुश आहात हे कळलं . आई , मी इतकी वर्ष तुमच्यासाठी माझ्या परीने खूप केलं . कधीही तुम्हाला माझ्या माईपेक्षा कमी समजलं नाही . पण तुम्हाला माझं काहीही आवडत नाही . त्यामुळे आता तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही मजेत रहा . आमचा तुम्हाला नेहेमीच त्रास झाला, आता नाही होणार . आम्ही पाच दिवसांनी येऊ आणि लगेच दोन दिवसांत लंडनला जाऊ . तोपर्यंत तुम्ही तुमचा डिसिजन कळवा . विनयच सुध्दा हेच म्हणणं आहे . फोन स्पीकर वर आहे त्यामुळे आम्ही सगळेच ऐकतोय . तुमचं ठरलं की सांगा . आम्ही येण्याआधी जायचं असेल तर किल्ली शेजारी देऊन जा . ठेवते आता फोन . " अनिता ठरल्याप्रमाणे बोलत होती . खरंतर तिला याचा खुप त्रास होत होता पण आता मात्र आईंना अद्दल घडवायची असे सगळ्यांनीच ठरवले होते .
अनिताच हे बोलणं वसुधासाठी अगदी नवीन होतं. आजवर ती असं कधीच बोलली नव्हती . विनयच सुद्धा हेच मत होतं आणि स्पीकर वर असूनही तो आपल्याशी एकही शब्द बोलला नाही म्हणजे आता सगळंच संपलं याची वसुधाला जाणीव झाली . आपली नाटकं आता कोणापुढे चालणार नाहीत याची खात्रीच झाली .
वसुधाने शेवटचा प्रयत्न म्हणून बहिणीला आणि भावाला फोन करायचा ठरवला . दोघेही अगदी सुखवस्तू होते . आपली पाठची बहीण काही जड होणार नव्हती त्यांना .
" ताई , ताई असं कसं झालं सांगू तुला ? मी घरी काय झालं ते तुला सांगितलं होतं ना आणि आता तर डोक्यावरून पाणी गेलंय. कीर्ती आणि जावईबापू आलेत इकडे . पण कोणीच मला समजून घेत नाहीये . मी नकोशी झालेय सगळ्यांना . तुझ्याकडे येते आता . उद्या सकाळी निघते कीर्ती बरोबर . " वसुधाने हक्काने बहिणीला फोन केला .
" अग थांब वसू , इतकी घायकुतीला येऊ नकोस . तुझी चुक मान्य केलीस का ते सांग आधी . तू माफी मागितली आणि तरीही घरचे सगळे असे वागतील हे काही खरं नाही . मी तुला पक्की ओळखून आहे . तू काही कोणाची माफी मागितली नसणार . आणि माझ्याकडे मी तुला ठेवून घेतली असती ग , धाकटी बहीण तू माझी , मला जड नाहीस . पण अग मी सुद्धा मुलासोबत राहते . सून काय म्हणेल माझी ? आणि तुझ्यामुळे मी कोणाचा रोष नक्कीच नाही ओढवून घेणार . तुला राग येईल पण स्पष्टच बोलते , तुझ्या स्वभावामुळे माझ्या घरात कोणतेही ताण तणाव नकोत मला . तुझी सूनच तुझा जाच कशी सहन करते ते तिलाच माहीत . आमच्याकडे असं वागणं आजिबात चालणार नाही . बाकी काही मदत लागली तर सांग . पण माझ्या घरी तुझी काही सोय होऊ शकणार नाही हे नक्की . कळव मला काय होतंय ते . काळजी घे ." आशाताईंनी अगदी स्पष्टपणे नकार दिला . वसुधाला फर वाईट वाटलं . आपली सख्खी ताई अशी खरंच वागू शकते ? हा नकार खूप त्रासदायक होता .
आता शेवटचा पर्याय म्हणून वसुधाने भावाला फोन केला .
" वसु हे बघ आधी मला सांग की तू दिलीपरावांची माफी मागितली की नाही ? आणि अनिताने तुला माफ केलच असेल . फारच गुणाची आणि संस्कारी आहे ती पोर. आजवर किती सहन केलं तिने पण कधी तोंडातून ब्र काढला नाही . आणि इथे येऊन राहायचं म्हणतेयस ना तर कधीही ये . माझं घर तुला नेहेमीच उघडं आहे , पण दिलीपराव सोबत असतील तरच तुमचं इथे स्वागत आहे . तुझ्या माणसांना दुखावून , त्यांना त्रास देऊन इथे यायची हिम्मत कधीही करू नकोस . नशिबाने देव माणसं भेटलियेत तुला . त्यांचा आब राख . सगळं ठीक झालं की हक्काने या . तू आणि दिलीपराव इथेच राहिलात तरी आनंदच होईल आम्हाला . तुझ्या वागण्यामुळे नेहेमी मान खाली घालावी लागते आम्हाला . लहान आहेस म्हणुन नेहेमी पाठीशी घातली तुला , आता यापुढे हे नाही चालणार . नीट वाग . सगळं ठीक झालं की कळव मला . " दादाने तर अगदी प्रखर शब्दांत वसुधाचा समाचार घेतला. तसा तो आधीपासूनच खूप प्रेमळ होता पण चूक झाली की खैर नसायची . वसुधा घरातलं शेंडेफळ म्हणून सगळे नेहेमी तिचा लाड करायचे . चुका झाकून न्यायचे . पण आता मात्र साथीला कोणीच नव्हतं.
खऱ्या अर्थाने वसुधा आता हतबल झाली . सगळंकाही प्लॅन प्रमाणे सुरू होतं. वसुधाला अश्रू अनावर झाले . बराच वेळ गेला . कीर्ती घरात असूनसुद्धा आईकडे फिरकली नाही .
वसुधाने आपली बॅग भरली होती . पण ती भरलेली बॅग घेऊन जायला तिच्या हक्काचं ठिकाणचं राहिलं नव्हतं.
काय करावं काहीच सुचत नव्हतं . कीर्तीला थोडे दिवस रहा म्हणून गळ घालून झाली होती . पण तिने स्पष्ट नकार दिला . निदान सगळी मंडळी परत येईपर्यंत तरी कीर्तीने आपल्याबरोबर राहावं अशी वासुधाबाईंची इच्छा होती . पण सकाळी परत जायचं हे कीर्ती आणि सुरेशने पक्क ठरवलं होतं.
आईला असं एकटं सोडून जाणं खरंतर कीर्तीला नको वाटत होतं , तब्येतही जरा खालावलेली वाटत होती . पण प्लॅन प्रमाणे वागायचं होतं. आणि सगळेजण परत जवळच्या रिसॉर्टवरच असनार होते त्यामुळे काही प्रोब्लेम नव्हता .
पुढे काय होईल ? काय असेल वसुधाचा निर्णय ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

🎭 Series Post

View all