तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( भाग 29 )

" हे बघ कीर्ती ती तुझी आई असली तरीही त्यांना आपल्याकडे घेऊन जाणं मला मान्य नाही . काहीही झालं तरी चूक आहे त्यांची .आणि त्यांचं हे वागणं मलाही सहन होणार नाही . त्यांना आपल्याकडे नेऊन विनय आणि बाबांनाही नाराज करायचं नाहीये मला . त्यांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था बघ . त्यांचे भाऊ , बहीण आहेत किंवा इथेही राहू शकतात त्या आरामात . अधून मधून तू येऊ शकतेस. तुला काय ठरवायचं ते ठरव पण आई आपल्याकडे राहणं शक्य नाही ." सुरेश जोरात बोलत होता . कीर्ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण तो काही ऐकायला तयार नव्हता .आपल्या जावयाचं बोलणं ऐकून वसुधाला धक्काच बसला.सुरेश खूप चांगला होता . त्याने नेहेमीच वासुधाबाई आणि दिलीपरावाना आई वडिलांसारखं मानलं होतं. पण आज अचानक असं काय झालं होतं ते त्यांना कळत नव्हतं . आता तर खरी गरज होती . पण तरीही कीर्ती ऐकणार नाही , ती आपल्याच बाजूने असेल , गरज पडली तर ती भांडेल सगळ्यांशी आपल्यासाठी याची वसुधाला पक्की खात्री होती .कीर्ती बाहेर आली . तिचा चेहेरा रडवेला झाला . ती आईजवळ येऊन बसली आणि रडु लागली . ती काय बोलते ते ऐकण्यासाठी वसुधाबाई आसुसलेल्या होत्या ." आई मला माफ कर स्पष्टच बोलते पण तुला आमच्याघरी नाही नाही राहता येणार . असं कर सध्या मावशीकडे किंवा मामाकडे रहा काही दिवस मग बघुया . हे घर विनयने त्याच्या मित्राला भाड्याने दिलंय . तो काही दिवसातच येणार आहे त्यामुळे तुला इथेही नाही राहता येणार . असं करू मावशीला फोन करू आणि बोलू तिच्याशी . ती तुला नाही म्हणणार नाही . विनय किंवा बाबांशी उगीच वाद घालण्यात अर्थ नाही . त्यांचा निर्णय पक्का आहे . आणि बाबांची तब्येत खराब झाली तुझ्यामुळे हे नाही सांगितलं तू ? अग निदान बाबांचा तरी विचार करायचा ना त्यांना काही झालं तर कोण जवाबदार ? अजूनही विचार कर , कर तू माफी मागितली आणि सगळ्यांना प्रेमाने विनवलस तर सगळं ठीक होईल . नाहीतर तू ठरव काय करायचं ते . नाहीतर एखादा वृद्धाश्रम बघ .आम्हाला उद्या निघाव लागेल . सांग तसं काय ते . जेवणाची सोय काय आहे ? भूक लागलीय . की बाहेर जावं लागणार आहे जेवायला ? " कीर्तीचं बोलणं वसुधाच्या काळजाला घरे पाडत होतं. पायाखालची जमीन सरकते आहे असं वाटतं होतं. ' ताई आणि दादा आधीच आपल्या विरूध्द झालेत हे कोणत्या शब्दात सांगायचं कीर्तीला ? आपले सख्खे बहीण , भाऊ , नवरा इतकंच नाहीतर पोटची लेकही आपल्या विरुद्ध झालेत ? आता काय करायचं ? माफी मागितली तर नेहमीसाठी मिंध व्हावं लागेल . पण खरंच इतकं चुकलं आपलं ? हे सगळेजण फारच टोकाचा विचार करतायेत . विनुशी बोलावं का ? अनिताशी बोलावं ती नक्की सांगेल सगळ्यांना . आता तीच एक शेवटची आशा दिसत होती . अनिताला इथे ठेवून घ्यावं थोडे दिवस मग आपोआप सगळे पहिल्यासारखे होईल .


अमोलच्या प्लॅन नुसार सगळ्यांनी एकत्र येऊन एक सॉलिड प्लॅन बनवला . एकमेकांना विश करून कीर्ती , सुरेश आणि मुलं घरी येऊन धडकली . मुलांना यात आजिबात पडू द्यायचं नाही याची काळजी सगळेच घेणार होते .
वसुधाबाई उदास चेहरा करून बसल्या होत्या . अंगावर जुनी , कशीतरी नेसलेली साडी होती . घरही अस्थाव्यस्त दिसत होतं. कीर्तीला बघताच आईनी लगेच लेकीच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली . सुरेश पाणी घेऊन आला . मुलांना त्यांनी मुद्दामच रिसॉर्टवरच राहू दिलं होतं.
" बघ ग काय अवस्था झालीय तुझ्या आईची . तुझा भाऊ , वहिनी इतकंच काय तुझे बाबाही मला एकटीला टाकून निघून गेले . तुला कितीदा फोन केला पण तुलाही वेळ नव्हताच आईशी बोलायला. कुणाला कुणाला म्हणून पर्वा नाही माझी . वय झालं माझं आता गरज संपली ..देवा उचल आता मला , इथे मी कोणालाही नकोय ." वसुधाबाईंनी नेहेमीप्रमाणेच कांगावा करत जोरात रडायला सुरुवात केली .
कीर्ती आणि सुरेश आपल्याला काहीच माहिती नाही असं दाखवत बसून होते .
" आई शांत हो बरं आधी . पाणी पी . चहा करू का तुझ्यासाठी ? मग सगळं सांग मला . सगळे कुठे गेले ? आणि तुला एकटीला सोडून असे कसे गेले ? आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही . अनिता , विनू किती काळजी घेतात तुझी . तुझी सून तर किती सेवा करते तुझी . फार नशीबवान आहेस तू या बाबतीत. ती असं वागणं शक्यच नाही . एकतर तू गंमत करतेय नाहीतर नक्कीच मोठं काहीतरी रामायण झालंय घरात . तू काही बोललीस का कोणाला ? सगळं सांग बर मला सविस्तर. कोणीच कसं काही बोललं नाही मला ? परकीच मानता का मला ? " कीर्ती म्हणाली .
" अग विशेष काहीच नाही . पण आम्ही इकडे आलो आणि अनिताची तिच्या माहेरच्यांना बोलावण्याची प्लांनिग सुरू झाली . आम्हा दोघांना तुझ्याकडे लगेच पाठवणार होते . आमची अडचण होणार ना त्यांना आता . इतकंच बोलले ग मी तर सगळ्यांनीच मला धारेवर धरलं. तुझे बाबा तर इतके चिडले की विचारूच नको . वृद्धाश्रमात जायचं म्हणतायेत एकटेच . आता या वयात मला सोडून एकटं राहायचं खुळ लागलंय त्यांना . तुझा भाऊ तर निघून जाणार बायकोला घेऊन परदेशात . ती बया काही त्याला परत येऊ देणार नाही . तिनेच काहीतरी पढवल असणार दोघांनाही . त्याशिवाय ते दोघं माझ्या विरूध्द जाणार नाहीत . आता तिघेही मला एकटीला टाकून तिच्या माहेरी निघून गेलेत . इतकी जड झाले मी आता त्यांना . कशी राहिले असेल मी एकटी दोन दिवस विचार करू शकतेस . तू माझी लेक आहेस . तूच एका आईचं मन समजू शकतेस . सगळ्यांना चांगली समज दे . तुझं नक्की ऐकतील तुझे बाबा . विनयसुध्दा नक्की ऐकेल . सुरेशराव तुम्हीसुद्धा सांगा सगळ्यांना . तुमचा शब्द कोणी मोडणार नाही . तोपर्यंत मला घेऊन चल तुझ्याकडे . मग कसे सरळ येतात बघ सगळे ." बसुधाबाई म्हणाल्या .
" हे बघा आई टाळी एका हाताने वाजत नसते . तुम्हाला राग येऊ देऊ नका पण तुम्ही मला मुलगा मानता म्हणून त्या हक्काने सांगतोय . विनय , अनिता किती शांत आणि संयमी आहेत ते आम्हाला चांगलंच माहिती आहे . तुम्हाला ते दोघंही किती मान देतात ते सुद्धा आम्ही बघतोय कित्तेक वर्ष . आणि तुमचं सुद्धा काहीतरी चुकल्याशिवय बाबा इतका टोकाचा निर्णय घेणार नाहीत . अजून काही झालंय का ? तुम्ही काही लपवत तर नाही ना आमच्यापासून ? कीर्ती तू विनंयला फोन कर . त्यांनाही इकडे बोलावून घे . सगळे बसून काहीतरी मार्ग काढू. " सुरेश म्हणाला .
" रागात बोलून गेले मी . पण त्यांचं इतकं काय ? मी काहीच बोलायचं नाही का घरात ? आणि तुझे बाबा म्हणत होते माफी माग म्हणून . पण तूच सांग मी जर अशी माफी मागत राहिले तर काय धाक राहील माझा ? मी काही माफी मागणार नाही .घर म्हणजे भांड्याला भांडं लागणारच ना . त्याचा इतका बाऊ का करतायेत सगळे ? आणि तू सरळ खडसावून सांग सगळ्यांना आईशी असं कसं वागलात म्हणून जाब विचार चांगला . आणि जास्तच केलं तर सरळ मला घेऊन चल तुझ्याकडे . मग बघ कसे सरळ येतील . इतकी वर्ष ही पोरं तोंड वर करून बोलत नव्हती माझ्याशी आणि आता बघ . मी बॅग भरते चल जाऊ आपण . मागे मागे येतील मग आपसूकच." वासुधाबाई म्हणाल्या .
आपली लेक आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार याची त्यांना खात्री होतीच .
कीर्तीने विनयला फोन केला . दोघांचं बोलणं झालं आणि कीर्तीचा चेहेरा उतरला . विनय , अनिता आणि बाबा आपल्या मतावर ठाम होते . वसुधाबाई आता आपलं काही खरं नाही हे ओळखून होत्या . आता किर्तीकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता . पुन्हा डोळ्यातून पाणी काढत त्या कीर्ती जवळ बसून राहिल्या . मुलीचं मन आईसाठी नक्कीच वळेल ह्याची खात्री त्यांना होतीच . जावई सुद्धा भला माणूस होता . त्यामुळे त्यांची सगळी सोय अगदी नीट होणार होती .
पण हे सगळं ऐकून सुरेश मात्र नाराज दिसत होता . त्याने कीर्तीला आत बोलावलं . दोघेही मुद्दाम दार उघडं ठेवून , आईला ऐकू जाईल अशा आवाजात मोठ्याने बोलत होते .
" हे बघ कीर्ती ती तुझी आई असली तरीही त्यांना आपल्याकडे घेऊन जाणं मला मान्य नाही . काहीही झालं तरी चूक आहे त्यांची .आणि त्यांचं हे वागणं मलाही सहन होणार नाही . त्यांना आपल्याकडे नेऊन विनय आणि बाबांनाही नाराज करायचं नाहीये मला . त्यांची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था बघ . त्यांचे भाऊ , बहीण आहेत किंवा इथेही राहू शकतात त्या आरामात . अधून मधून तू येऊ शकतेस. तुला काय ठरवायचं ते ठरव पण आई आपल्याकडे राहणं शक्य नाही ." सुरेश जोरात बोलत होता . कीर्ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण तो काही ऐकायला तयार नव्हता .
आपल्या जावयाचं बोलणं ऐकून वसुधाला धक्काच बसला.सुरेश खूप चांगला होता . त्याने नेहेमीच वासुधाबाई आणि दिलीपरावाना आई वडिलांसारखं मानलं होतं. पण आज अचानक असं काय झालं होतं ते त्यांना कळत नव्हतं . आता तर खरी गरज होती . पण तरीही कीर्ती ऐकणार नाही , ती आपल्याच बाजूने असेल , गरज पडली तर ती भांडेल सगळ्यांशी आपल्यासाठी याची वसुधाला पक्की खात्री होती .
कीर्ती बाहेर आली . तिचा चेहेरा रडवेला झाला . ती आईजवळ येऊन बसली आणि रडु लागली . ती काय बोलते ते ऐकण्यासाठी वसुधाबाई आसुसलेल्या होत्या .
" आई मला माफ कर स्पष्टच बोलते पण तुला आमच्याघरी नाही नाही राहता येणार . असं कर सध्या मावशीकडे किंवा मामाकडे रहा काही दिवस मग बघुया . हे घर विनयने त्याच्या मित्राला भाड्याने दिलंय . तो काही दिवसातच येणार आहे त्यामुळे तुला इथेही नाही राहता येणार . असं करू मावशीला फोन करू आणि बोलू तिच्याशी . ती तुला नाही म्हणणार नाही . विनय किंवा बाबांशी उगीच वाद घालण्यात अर्थ नाही . त्यांचा निर्णय पक्का आहे . आणि बाबांची तब्येत खराब झाली तुझ्यामुळे हे नाही सांगितलं तू ? अग निदान बाबांचा तरी विचार करायचा ना त्यांना काही झालं तर कोण जवाबदार ?
अजूनही विचार कर , कर तू माफी मागितली आणि सगळ्यांना प्रेमाने विनवलस तर सगळं ठीक होईल . नाहीतर तू ठरव काय करायचं ते . नाहीतर एखादा वृद्धाश्रम बघ .आम्हाला उद्या निघाव लागेल . सांग तसं काय ते .
जेवणाची सोय काय आहे ? भूक लागलीय . की बाहेर जावं लागणार आहे जेवायला ? " कीर्तीचं बोलणं वसुधाच्या काळजाला घरे पाडत होतं. पायाखालची जमीन सरकते आहे असं वाटतं होतं.
\" ताई आणि दादा आधीच आपल्या विरूध्द झालेत हे कोणत्या शब्दात सांगायचं कीर्तीला ?
आपले सख्खे बहीण , भाऊ , नवरा इतकंच नाहीतर पोटची लेकही आपल्या विरुद्ध झालेत ? आता काय करायचं ? माफी मागितली तर नेहमीसाठी मिंध व्हावं लागेल . पण खरंच इतकं चुकलं आपलं ? हे सगळेजण फारच टोकाचा विचार करतायेत . विनुशी बोलावं का ? अनिताशी बोलावं ती नक्की सांगेल सगळ्यांना . आता तीच एक शेवटची आशा दिसत होती . अनिताला इथे ठेवून घ्यावं थोडे दिवस मग आपोआप सगळे पहिल्यासारखे होईल . \" वासुधाबाईनी मनाशी विचार पक्का केला आणि अनिताला फोन करायला आत निघून गेल्या .
कीर्ती आणि सुरेश शांतपणे बसून होते. आईचा निर्णय काय असेल याची सगळ्यांनाच काळजी होती . कीर्तीने हळूच मावशीला फोन केला . मावशीने दोघी बहिणीमधलं संभाषण कीर्तीला सांगितलं. मामासुद्धा आपल्याच बाजूने आहे हे ऐकल्यावर कीर्तीला अजूनच हायस वाटलं . काहीही झालं तरी दोघेही वसुधाला आपल्या घरी ठेऊन घ्यायला नकार देतील याची खात्री करून कीर्तीने फोन ठेवला .
पुढे काय होईल ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा .

🎭 Series Post

View all