तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( भाग 26 )

' आपण राहू शकतो की असच मजेत . हाताशी बाई आहे . सगळी कामे ती करेल .गार्डन मध्ये फिरायला जायचं , आपल्या मैत्रिणी आहेतच विरंगुळा म्हणून . उद्या मैत्रीणीना बोलवावं का घरी ? वेळ जाईल चांगला .' वसुधाने मनाशी विचार केला . आता कीर्ती आली की सगळं नीट होईल याची त्यांना खात्री होती .दुसऱ्या दिवशी वसुधाने आपल्या काही मैत्रिणींना घरी आमंत्रण दिले . त्या सगळ्यासुद्धा तश्याच कजाग होत्या . सतत सुनांची गाऱ्हाणी करत वेळ घालवायच्या . बहुतेकींच्या सूना त्यामुळे वेगळ्याच राहत होत्या . अनीतासारखी सून मिळाल्यामुळे सगळ्यांनाच वसुधाचा हेवा वाटायचा. वसुधाबाई सुद्धा न चुकता स्वतः कशी सुनेला धाकात ठेवलीय , घरात कसा माझाच दबदबा असतो हे अगदी रंगवून सगळ्यांना सांगत असत.शांताला तिखट मिठाच्या पुऱ्या , गाजर हलवा करायला सांगून वर पुन्हा बाहेरून ढोकळा , बर्फी , कचोरी आणायला सांगून वसुधाबाई तयार होऊन मैत्रिणींची वाट बघत बसल्या . इतकं सगळं होऊनही त्यांना कुठलीही अपराधीपणाची भावना आजिबात शिवली नव्हती. तिकडे अनु , विनय आणि जरी दाखवत नसले तरीही दिलीपराव सुद्धा वासुधाच्या काळजीत बुडाले होते आणि इकडे मात्र वसुधा मस्त पार्टीमध्ये रंगली होती ...
वासुधाबाईनी सकाळी सगळे निघण्याच्या वेळी काय काय नाटकं करायची त्याची अगदी छान तयारी केली होती . एकदम चक्कर आली असं सांगायचं आणि सगळ्यांना जाण्यापासून परावृत्त करायचं अशी नामी योजना होती . रात्री बराचवेळ जागून त्यांनी ही क्लृप्ती शोधून काढली होती .
झोपायला उशीर झाला त्यामुळे सकाळी जरा उशीराच जाग आली आणि बघते तो काय ? घरात अगदी सामसूम होती . विनयच्या रुमच दारही उघडच होतं. वसुधाबाई लगबगीने बघायला गेल्या पण घरात कोणीच नव्हतं . आणि हे काय दिलीपरावसुद्धा घरात नव्हते .\" फिरायला गेले असतील \" असं वाटून वसुधाबाई पेपर वाचत बसल्या . बराच वेळ झाला . दिलीपराव परत आले नव्हते . फोनही बंद येत होता त्यांचा .
न राहवून त्यांनी शेवटी विनयला फोन केला. " निघालात का बेटा ? फारच लवकर उठून गेलात तुम्ही ? मला सांगूनही गेला नाहीत ? तुझे बाबाही अजून आले नाहीत फिरून . मला खूप एकट एकट वाटतंय . लवकर या . कीर्ती आणि जवईबापू सुद्धा येणार आहेत ना तोपर्यंत यालच तुम्ही परत . फोन करत रहा ." वसुधाबाईंनी आपला स्वर शक्य तितका मधाळ ठेवला होता .
" तू झोपली होतीस ना म्हणून नाही उठवलं. आणि रात्री सांगितलं होतंच ना तुला आम्ही सगळे जाणार आहोत म्हणून . बाबाही आहेत आमच्यासोबत . तुला काय हवं ते काम करून घे मावशींकडून. आणि तू तर आहेसच सुगरण . तुला हवं ते कर . पैसे भरपूर आहेत तुझ्याकडे . आमचा त्रास नाही होणार तुला आता ." विनय तुटकपणें बोलला.
आता मात्र वासुधाच्या पायाखालची जमीन सरकली! आपला नवरा आपल्याला एकटीला सोडून असा निघून जाईल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं . \" विनय , अनीतासुद्धा आजपर्यंत कधीच असे तूटकपणे वागले नव्हते . छोट्या मोठ्या कुरबुरी तर नेहेमीच होत असत पण लगेच सगळं नॉर्मल व्हायचं. आपल्याशी कोणीही असं वागल नव्हतं. किती मान द्यायचे आपल्याला सगळे , यावेळी जरा जास्तच चुकीचं वागलो आपण . पण हे असं कसं वागू शकतात ? आपल्या बायकोला एकटीला सोडून सरळ निघून गेले ? बोललेही नाहीत आपल्याशी ? ते म्हणाले ते वृद्धाश्रमाची गोष्ट खरी आहे की काय ? हे काय होऊन बसलं ? देवा आता या वयात हा दिवस दाखवणार आहेस का तु ? मी कशी राहणार एकटी ? नाही नाही असं कदापि होणार नाही . माझा मुलगा , सून मुळी असं काही घडूच देणार नाहीत . पण आता तर गेले सगळे मला सोडून ? काय करावं ? कीर्तीला फोन करून सांगावं सगळं. ती नक्कीच माझ्या पाठीशी उभी राहील . तिचं ऐकतात सगळे .\" वसुधाने मनाशी विचार केला आणि लगेच कीर्तीला फोन केला .
पण " अग मी शॉपिंगला आले आहे . बरीच शॉपिंग करायची आहे विनय , अनिता आणि पीहुसाठी. काही अर्जंट नाही ना ? नसेल तर निवांत बोलू . मला खूप वेळ लागेल बाहेर आणि तिकडे येणारच आहोत ना आम्ही आता मग मनसोक्त बोलता येईल ." कीर्ती म्हणाली .
" बरं बरं ठीक आहे . काही अर्जंट नाही . तुला वेळ मिळाला की कर फोन " आता गडबडीत किर्तीशी काहीच बोलला येणार नव्हतं म्हणून बसुधाने फोन ठेवून दिला .
काहीवेळ वसुधाबाई तश्याच बसून राहिल्या . पण आजिबात करमत नव्हतं . भूकही लागली होती . पण काहीच करायची सवय नव्हती . अनिता सगळं गरम गरम हातात द्यायची . औषधं घ्यायची होती मग काहीतरी खावं तर लागणारच होतं. घरात चिवडा , लाडू , शंकरपाळी होती तीच खाऊन वसुधाने औषधं घेतली . आणि टीव्ही बघत बसून राहिली .
थोड्या वेळाने कामवाल्या मावशी आल्या .
" आज्जी काय झालं ? आज घर असं कसं घाण, अस्ताव्यस्त आहे ? ताई नाहीत का घरी ? आणि तुम्ही एकट्याच घरात ? " शांता मावशीने चौकशी केली . रोज अनु घर अगदी नीटनेटके ठेवायची . पण कालपासून तिने काहीच आवरलं नव्हतं . वसुधाबाई तर काहीच न करता बसून राहिल्या होत्या .
" तुला काय करायचंय ग नसत्या चौकश्या ? सगळे काही कामासाठी गावाला गेले आहेत . तू सगळं आवरून घे . माझ्यासाठी स्वयंपाक सुद्धा करून दे . पिठलं कर छान खमंग आणि दोन तीन भाकरी कर . दोन चार पापडही तळून ठेव आणि मिरच्या पण आहेत दह्यातल्या त्या सुद्धा तळून दे . कुकर जाताना लाव मी करीन बंद . दही असेल फ्रिजमध्ये . ताकही दोन ग्लास करून ठेव . आटप लवकर . बाकीची कामे उरक आधी मग शेवटी स्वयंपाक कर म्हणजे गरम राहील . आणि संध्याकाळी पण ये स्वयंपाकाला." वसुधाबाईंनी शांताला ऑर्डर सोडली .
तितक्यात शांताला अनीताचा फोन आलाच . आई काय सांगतील ती कामं करून द्यायची गळ तिने घातली . शांताने आनंदाने होकार दिला . वासुधाबाईंचा स्वभाव तिला आजिबात आवडत नव्हता. त्यांचं कुठलही काम करायची तिची इच्छा नव्हती . पण अनिताने नेहेमीच शांताला सर्वतोपरी मदत केली होती . अनिताच्या लाघवी स्वभावामुळे तिला कोणीही नाही म्हणणं शक्य नव्हतं . अनिता नेहेमीच तिला प्रेमाने खाऊ घालायची , मुलांसाठी खाऊ द्यायची , सणावाराला मिठाई , कपडे , गरजेच्या वेळी पैसे अगदी सढळ हाताने द्यायची . त्यामुळे शांताने सगळी कामं अगदी चोख पार पडली आणि ती निघून गेली .
वसुधाबाईंनी गरम गरम जेवण केलं . मग मस्त झोप काढली . नंतर मात्र त्यांना अगदीच एकटं एकटं वाटू लागलं.
आपल्या बहिणीला तरी निदान आपली कदर असेल म्हणून त्यांनी आपल्या बहिणीला फोन करून सगळी हकीगत सांगितली . पण झालं उलटच. आशाताईंना वसुधाची बाजू पूर्णपणे चुकीची वाटली . त्यांनी वसुधालाच सुनावलं आणि तिला सगळ्यांची माफी मागायला सांगितलं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी सावर अशी ताकीदच वसुधाला दिली . म्हातारपणी आपल्या बहिणीला एकटी राहावं लागू नये म्हणून ताईची कळकळ होती ती . आपल्या बहिणीचा स्वभाव आशाताई जाणून होती . नशिबाने अनितासारखी सून मिळाली होती म्हणून सगळं निभावलं होतं. तिच्या वागण्यामुळे आता मात्र त्रास होऊ नये अशी ताईची इच्छा होती .
काही वेळातच वासुधाच्या भावांचे फोन आले . आशाताईंनी दोन्हीं भावना सगळ सांगितलं होतं. दोघेही वसुधावर खूप चिडले , रागावले . वसुधाने माफी मागून प्रकरण ताबडतोब मिटवावे अशी दोघांनीही तिला समज दिली .
आता मात्र वसुधा काळजीत पडली . तिचे सख्खे बहीण , भाऊसुद्धा तिच्या विरुद्ध झाले होते . खरंच इतकं चुकलं का आपलं ? विचार करत असतांनाच शांता आली .
तिने बाकीची कामे आवरली आणि रात्रीसाठी खमंग थालीपीठ तयार केले . शांता गेली की वासुधाने जेवण केलं. शांताच्या हाताला छान चव होती . वसुधाला चमचमीत खाण्याची आवड होती . पण वयोमानानुसार सहन होत नसे म्हणून अनिता नेहेमीच त्यांना साधं सुध खा म्हणून मागे लागायची . पण आता मात्र त्यांना मनासारखं खायला मिळत होतं.
\" आपण राहू शकतो की असच मजेत . हाताशी बाई आहे . सगळी कामे ती करेल .गार्डन मध्ये फिरायला जायचं , आपल्या मैत्रिणी आहेतच विरंगुळा म्हणून . उद्या मैत्रीणीना बोलवावं का घरी ? वेळ जाईल चांगला .\" वसुधाने मनाशी विचार केला . आता कीर्ती आली की सगळं नीट होईल याची त्यांना खात्री होती .
दुसऱ्या दिवशी वसुधाने आपल्या काही मैत्रिणींना घरी आमंत्रण दिले . त्या सगळ्यासुद्धा तश्याच कजाग होत्या . सतत सुनांची गाऱ्हाणी करत वेळ घालवायच्या . बहुतेकींच्या सूना त्यामुळे वेगळ्याच राहत होत्या . अनीतासारखी सून मिळाल्यामुळे सगळ्यांनाच वसुधाचा हेवा वाटायचा. वसुधाबाई सुद्धा न चुकता स्वतः कशी सुनेला धाकात ठेवलीय , घरात कसा माझाच दबदबा असतो हे अगदी रंगवून सगळ्यांना सांगत असत.
शांताला तिखट मिठाच्या पुऱ्या , गाजर हलवा करायला सांगून वर पुन्हा बाहेरून ढोकळा , बर्फी , कचोरी आणायला सांगून वसुधाबाई तयार होऊन मैत्रिणींची वाट बघत बसल्या .
इतकं सगळं होऊनही त्यांना कुठलीही अपराधीपणाची भावना आजिबात शिवली नव्हती.
तिकडे अनु , विनय आणि जरी दाखवत नसले तरीही दिलीपराव सुद्धा वासुधाच्या काळजीत बुडाले होते आणि इकडे मात्र वसुधा मस्त पार्टीमध्ये रंगली होती ...

🎭 Series Post

View all