तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( भाग 25 )

पीहू आणि अनिता मॉलमध्ये पोचल्या . बाबा आणि विनय त्यांची वाटच बघत होते . पिहू दोघांना बिलगली . खूप एक्साईटेड होती ती . पिहूची अखंड बडबड सुरु होती . आजोबांना मूव्ही बद्दल सांगण्यात ती रमली होती .विनयने हळूच अनिताला आईबद्दल विचारले ." बर्या आहेत त्या . झालेल्या गोष्टीचा त्यांच्यावर फारसा परिणाम झालेला नाहीये . नेहमीसारखच वागत होत्या त्या . मी गेले तेव्हा चिवडा लाडू खात होत्या . मी बाबांबद्दल सांगितलं फक्त आणि ते सुद्धा तुटकपणे. घरी जातांना भाजी पोळी घेऊन गेले होते त्यांच्यासाठी . मला माफ कर पण खरंच त्यांच्याशी बोलण्याची किंवा त्यांच्यासमोर जाण्याचीही इच्छा नव्हती रे मला . येताना फक्त सांगितलं आणि निघाले . " अनिता विनयला सांगत होती ते बाबांनी ऐकलं." बरं केलंस. बघ मी म्हणालो होतो ना तुम्हाला त्या बाईला काहीच वाटत नाही . फार स्वार्थी आहे ती . आता मात्र तिला चांगलाच धडा शिकवायला हवाय . अनुबेटा तू आजिबात वाईट वाटून घेऊ नकोस . यापुढे तू तिच्यासाठी काहीही केलेलं मला आवडणार नाही . आता बास्स. " बाबा म्हणाले .
पीहू आणि अनिता मॉलमध्ये पोचल्या . बाबा आणि विनय त्यांची वाटच बघत होते . पिहू दोघांना बिलगली . खूप एक्साईटेड होती ती . पिहूची अखंड बडबड सुरु होती . आजोबांना मूव्ही बद्दल सांगण्यात ती रमली होती .
विनयने हळूच अनिताला आईबद्दल विचारले .
" बर्या आहेत त्या . झालेल्या गोष्टीचा त्यांच्यावर फारसा परिणाम झालेला नाहीये . नेहमीसारखच वागत होत्या त्या . मी गेले तेव्हा चिवडा लाडू खात होत्या . मी बाबांबद्दल सांगितलं फक्त आणि ते सुद्धा तुटकपणे. घरी जातांना भाजी पोळी घेऊन गेले होते त्यांच्यासाठी . मला माफ कर पण खरंच त्यांच्याशी बोलण्याची किंवा त्यांच्यासमोर जाण्याचीही इच्छा नव्हती रे मला . येताना फक्त सांगितलं आणि निघाले . " अनिता विनयला सांगत होती ते बाबांनी ऐकलं.
" बरं केलंस. बघ मी म्हणालो होतो ना तुम्हाला त्या बाईला काहीच वाटत नाही . फार स्वार्थी आहे ती . आता मात्र तिला चांगलाच धडा शिकवायला हवाय . अनुबेटा तू आजिबात वाईट वाटून घेऊ नकोस . यापुढे तू तिच्यासाठी काहीही केलेलं मला आवडणार नाही . आता बास्स. " बाबा म्हणाले .
" बाबा , तुम्ही आजिबात विचार करू नका आता . शांत व्हा बरं. चला काय खायचं तुम्हाला ? " विनय विषय बडलत म्हणाला .
" हो बाबा आता सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल . पण तब्येतीला जपायच तुम्ही . साधं काहीतरी खाऊया . तेलकट, हेवी नको सध्यातरी . तुमची आवडती दाल खिचडी खायची का बाबा ? " अनिता म्हणाली .
" मला पिझ्झा हवा " पीहू म्हणाली . अनिता तिला दटावित होती पण आजोबा नातीच्या मदतीला धावून आले .
" हो बाळा हवं ते खा . तिला खाऊ दे ना हवं ते आणि तुम्हीही खा काय हवं ते . मी खातो खिचडी . " असं म्हणून आजोबा आणि नात पिझ्झाच्या काऊंटर कडे निघाले .
पिहुचे आजोबांवर आणि आजोबांचे पीहुवर खूप प्रेम होते . त्यांची मस्त गट्टी होती . पिहुसोबत बाबा लवकर नॉर्मल होतील याची खात्री विनय अनिताला होती .
सगळ्यांनी मस्तपैकी खाल्लं. मूव्हीची वेळ होतंच आली होती मग सगळे थिएटर कडे गेले .
" आजोबा तुम्ही माझ्याजवळ बसा . मी तुम्हाला स्टोरी सांगते म्हणजे कळेल तुम्हाला . " पिहूने आजोबांना बॅकग्राऊंड सांगायला सुरुवात केली . बाबा लक्ष देऊन ऐकत होते . पिहुला अनेक प्रश्न विचारत होते .
बाबांना असं आनंदी बघून विनय अनिता सुद्धा शांत झाले . पण \" आता पुढे काय ? \" हा प्रश्न दोघांनाही भेडसावत होता .
बाबा आणि पिहु अगदी मन लावून आनंदाने मज्जा घेत मूव्ही बघत होते . अनिता आणि विनय एकमेकांचा हात हातात घेऊन बसले होते .
मूव्ही संपला . रात्री घरी जाऊन काही करायला नको म्हणून परत सगळे फूड मॉलला गेले . पिहु खेळायला पळाली.
सगळ्यांनाच खूप काही बोलायचं होतं पण शब्द काही साथ देत नव्हते .
शेवटी दिलीपराव म्हणाले \" " मी काय म्हणतो आपण सगळे काही दिवस अनिताच्या माहेरी जाऊया . हवंतर जवळपास फिरून येऊया मस्त . जरा सगळ्यांसोबत आनंदात वेळ घालवू .विनू असं कर रिसॉर्ट बुक कर एखादं छानस म्हणजे सगळ्यांच छान वेळ घालवता येईल . कीर्ती आणि जवईबापूसुद्धा येणार आहेत ना चार दिवसांनी त्यांनाही तिकडेच बोलाव. सध्या मला आणि तुम्हाला शांततेची गरज आहे . उद्याच निघुया सकाळी . आणि फक्त आपण चौघेच जाणार आहोत . तुझी आई नाही येणार आपल्यासोबत ."
विनयने अनिताकडे बघून मान डोलावली . आईला एकटं सोडून जाणं खरंतर त्याला पटत नव्हतं पण आता इलाज नव्हता. तसही इथे काही भीती नव्हती . शेजारी चांगले होते आणि आईलाही इथे राहण्याची सवय होतीच .त्यामुळे काळजी नसणार होती .
विनयने जवळचं रिसॉर्ट बुक करायचं ठरवलं होतं म्हणजे काही गरज पडलीच तर पटकन येणं शक्य होतं.
" हो बाबा . ठीक आहे . आपल्या मावशींना सांगते स्वयंपाक आणि बाकी सगळी कामं करतील त्या . बाकी सोसायटीत सुद्धा सगळे चांगले आहेत त्यामुळे काळजी नाही तशी .मी माईला फोन करून सांगते आपण उद्या येतोय असं . कीर्तीताईंना सुद्धा काहीच सांगितलं नाही आपण " अनिता म्हणाली .
" हो कर फोन . पण कीर्तीला जास्त काही सांगू नकोस आताच . फक्त डायरेक्ट रिसॉर्टवर या असच सांग . घरी काय झालंय आणि माझ्या तब्येतीच काही सांगू नकोस उगीच काळजीत पडेल पोर . तुझ्या आईनी अजून तरी काही सांगितलेलं दिसत नाहीये तिला नाहीतर फोन आलाच असता तिचा . " दिलीपराव म्हणाले .
अनिताने माईला फोन करून फक्त आपण येत असल्याचं सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला . कीर्ती ताईलासुद्धा फक्त आपण माहेरी जाणार आहोत आणि तुम्ही रिसॉर्टवर या असं सांगितलं .
सगळे घरी परत आले . वासुधाबाई टीव्ही बघत बसल्या होत्या . " किती उशीर ? मी घरी एकटी आहे ना ? " त्यांचं नेहेमीप्रमाणे सुरू झालं .
" अनिताने सांगितलं होतं ना उशीर होईल म्हणून ? मग तरीही का विचारतेस ? उद्या आम्ही अनिताच्या माहेरी जाणार आहोत . आपल्या कामवाल्या मावशिंकडून काय काम करून घ्यायची ती करून घे . आम्ही पाच सहा दिवसात परत येऊ . पैसे आहेतच तुझ्याकडे गरज पडली तर . फोनही आहे . मजेत रहा तू . " विनय म्हणाला आणि आईच्या उत्तराची वाटही न बघता रूम मध्ये निघून गेला . बाबाही पिहुला घेऊन तिच्या रूम मध्ये झोपायला गेले .
अनिता हळूच किचन मध्ये डोकावून आई जेवल्याची खात्री करून घेऊन आली होती .
रूम मध्ये आल्याबरोबर अनिता रडू लागली . इतक्या वेळ तिच्या भावना तिने आवरून ठेवल्या होत्या . पण आता मात्र तिचा बांध फुटला.
" काय होऊन बसलं रे हे ? असे का वागतात आई बाबा ? आता काय करायचं ? जाणं कॅन्सल करूया का ? आई कश्याही वागल्या तरी त्यांना असं एकटं सोडून जाणं पटत नाहीये मला . "
" हो ग मलाही त्रास होतोय . पण बाबांचही बरोबरच आहे ना . शेवटी आईला कळातयलाच हवी तिची चूक . आता माघार नाही घ्यायची . सगळ्यांच्या सुखासाठी आपल्याला हे करायलाच हवं . काळजी करू नकोस आपण जवळच असू . गरज पडली तर लगेच येऊ शकतो . तुझ्या मैत्रिणींना लक्ष ठेवायला सांग . " विनयने अनिताला शांत केलं आणि तिला बॅग भरायला सांगितलं. तो गुपचूप बाबांचे कपडे आणि बाकी समान त्यांच्या रूम मधून घेऊन आला . आई हॉलमध्ये टीव्ही बघत होती . तिच्या नकळत विनय सामान घेऊन आला . उगीच पुन्हा वादाला तोंड नको म्हणून ही खबरदारी घेतली होती .
अनिताने सगळं पॅकिंग केलं . उद्या सकाळी लवकर निघायचं होतं .
वसुधाबाईना खूप काही बोलायचं होतं पण कोणीच त्यांच्याशी बोलायला थांबलं नाही . सगळेजण काहीतरी कारस्थान नक्कीच करतायेत आपल्या विरुद्ध याची त्यांना खात्री पटली . उद्या दोघं गेले की दीलीपरावांशी गोडी गुलाबीने सगळं काढून घ्यायचं त्यांनी ठरवलं. पण दिलीपराव त्यांना एकटीला सोडून जातील असं त्यांना आजिबात वाटलं नाही .
किर्तिशीसुद्धा बोलायला हवं . आज फोन केला पण ती बाहेर होती म्हणून बोलणं झालंच नाही नीट . ह्या दोघांनी काहीही सांगायच्या आत आपण तिच्याशी बोललेल बरं. नाहीतर काहीबाही भरवतील तिला आपल्याबद्दल . की उद्या आजारी पडावं सकाळी ? म्हणजे आपोआप सगळं कँसल होईल आणि आपल्या दिमतीला हजर असतील सगळे . वसुधाबाईंनी मनातल्या मनात सगळं प्लांनिग केलं . आपलं घरातील स्थान कोणत्याही परिस्थितीत अढळ राहील याची त्या पूर्ण काळजी घेणार होत्या .

🎭 Series Post

View all