तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( भाग 23 )

" गप्प बस . याद राख एक शब्दही पुढे बोलशील तर . आणि ऐक हे सगळे लंडनला गेले की मी तुझ्यासोबत राहणार नाही . मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतलाय. उरलेलं आयुष्य तरी आनंदाने जगेन मी . माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून टाकतो . तुला कुठे कसं राहायचं ते तू बघ . आता आपला काहीही संबंध नसणार . मुलांना त्रास दिलास तर बघ , माझ्याईतका वाईट कोणी नसेल . आजवर मी गप्प बसलो पण ती माझी फार मोठी चूक होती . पण यापुढे असं होणार नाही ये लक्षात ठेव ." दिलीपराव जोरात ओरडून म्हणाले . त्यांना खूपच धाप लागत होती .विनय अनिता घाबरले . " बाबा , शांत व्हा बरं आधी . बसा इकडे . नंतर बोलूया आपण . चला डॉक्टर कडे जाऊन येऊ . अनु बाबांची फाईल घेऊन ये . मी फोन करतो डॉक्टरला ." विनय म्हणाला .अनिताने बाबांना पाणी दिलं . त्यांना झोपवून त्यांचं बीपी तपासल . बीपी बरच वाढलं होतं. दोघांनाही बाबांची काळजी वाटत होती . वसुधाबाई दिलीपरावांच्या जवळ गेल्या पण त्यांनी तोंड फिरवलं." आई आता कृपा करून कुठलाही तमाशा करू नकोस . बाबांची तब्येत बघ जरा . हात जोडतो तुझ्यापुढे . जरा शांत रहा . आम्ही डॉक्टरकडे जाऊन येतो ." विनय म्हणाला ." अरे देवा , आता माझ्या नवऱ्याला , मुलालाही मी नकोशी झालिये . उचल रे मला इथे मी कोणालाच नको आहे . हाच दिवस बघण्यासाठी जिवंत ठेवलेस का मला ? बघतोयस ना बाबा माझे भोग ..." वसुधाबाई आपल्या नेहमीच्या स्वरात सुरू झाल्या पण आता मात्र कोणालाही त्यांचा विचार करावासा वाटला नाही .तिघेही डॉक्टरकडे निघून गेले .पिहू खेळायला गेलेली होती . अजून तासभर तरी ती काही घरी येणार नव्हती . पण सध्याचं घरचं वातावरण बघता अनिताने तिच्या मैत्रिणीला फोन करून बाहेर जात असल्याचं सांगितलं आणि ती परत येईपर्यंत पीहुला ' तुझ्याकडेच खेळू दे , मी घरी आले की मग तिला घेऊन येते ' असं सांगितलं .घरच्या वातावरणाचा परिणाम पिहुवर होऊ नये यासाठी अनिता नेहेमीच आटोकाट प्रयत्न करायची .


दिलीपराव रागाने तिथून निघून गेले ....
विनय अनुला समजावण्याचा प्रयत्न करत होता पण आज अनुच्या मनावर झालेला आघात खरंच खूप जिव्हारी लागणारा होता.विनयकडे तिला समजावण्यासाठी शब्दंच नव्ह्ते. तो सुद्धा खूप दुखावला गेला होता . आईचं वागणं त्यालाही त्रास देत होतं पण सध्या अनुला शांत करणं महत्त्वाचं होतं.अनुला तो जवळ घेऊन बसला होता.अनूच्या डोळ्यातलं पाणी वाहतच होतं.दिलीपराव आत आले.
" अनु बाळा , मला माफ कर .वसुधाच्या वतीने मी तुझी माफी मागतो.तिला बोलण्याचा ताळतंत्र नाहीये .तोंडाला येईल ते बोलते ती. इतकं वय झालं तरी मी तिला बदलू शकलो नाही...पण आता मात्र असह्य झालंय.विनू तू असं कर दोन चार दिवस हिला घेऊन तिच्या माहेरी जा.आणि तिथून आलात की लगेच लंडनला निघून जा.मी सुद्धा येतो तुमच्या बरोबर , मलाही आता वसुधा सोबत राहण्याची आजिबात इच्छा नाहीये..."
" बाबा अहो हे काय बोलताय तुम्ही ? आणि माझी माफी नका मागू तुम्ही. नेहमीचच आहे ना हे आईंच.आता आम्ही जाणार म्हणून माझ्या जास्तच जिव्हारी लागलं." अनु रडतच म्हणाली ! दिलीप रावांनी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला त्यांचा हात थरथरताना जाणवला तशी अनु अजूनच भावनाविवश झाली...
" अनु , विनू मी एक निर्णय घेतलाय...माझी सहनशक्ती आता संपलीय..." दिलीपराव निर्णायक सुरात बोलत होते " मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतलाय. मला आता तिच्यासोबत राहणे शक्य नाही. तिचं तिला जगू दे तिच्या विश्वात.तिला कोणाची पर्वा नाही.माझे दोन तीन मित्र आहेत तिकडे.सगळी सोय अगदी छान आहे , मी मस्त मजेत राहील तिकडे.आणि हो माझ्या निर्णयामुळे तुम्ही तुमचा लंडनला जाण्याचा निर्णय बदलणार नाही अशी शपथ घ्या आधी..."
बाबांचा निर्णय ऐकून दोघेही चकित झाले...त्यांना धक्काच बसला.बाबांचे थरथरणारे शरीर बघून खरंतर त्या दोघांना टेंशन आलं होतं.बाबांना बीपी चा त्रास होता म्हणून विनयने आधी त्यांना बसवलं , अनु सुद्धा रडणं आवरून त्यांच्यासाठी पाणी आणायला गेली.थोडावेळ कोणी काहीच बोललं नाहीं .
बराच वेळ झाला तरी तिघेही बाहेर आले नाहीत तसा वसुधा बाईंचा पारा चढला " अनिता झालं की नाही तुझं ? जेवणाची वेळ झाली . आज काही मिळणार आहे की आम्हा म्हाताऱ्याने स्वतःच करून घ्यायचं आहे ? तुझ्या बाबांना आणि नवऱ्यालाही भूक सहन होत नाही हे माहिती आहे ना तुला ? "
आता मात्र दिलीपराव संतापाने बेभान झाले . विनयची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती.दोघेही बाहेर आले.अनिता घाबरली.ती सुद्धा मागोमाग धावत बाहेर आली...
" हो ज्याला गरज आहे त्याने घ्यावं स्वतःच्या हाताने . सून आणलिये लग्न करून मोलकरीण नाहीये ती . तिच्याशी वाटेल तस वागायला . धडधाकट आहेस ना मग कर स्वतःच स्वतः नाहीतर बाई लाव बघुया कोण टिकते तुझ्यापुढे . आम्ही सगळे अनिताच्या माहेरी जाणार आहोत . तू तुझी सोय बघ . " दिलीपराव रागाने म्हणाले . त्यांना संतपामुळे त्रास होत होता . जास्त बोलता येत नव्हतं . धाप लागत होती .
" अहो काय झालंय तुम्हाला ? धाप लागते आहे ना . स्वस्थ बसा जरा . काय पढवलय या पोरीने कोणास ठावूक . ना मुलगा माझा राहिला ना नवरा ...करा काय करायचं ते . जा तिच्या माहेरी , मला एकटीला टाकून . मी जगले काय मेले काय कोणाला काय फरक पडतो..." वसुधाबाईंनी पुन्हा कांगावा सुरू केला .
" गप्प बस . याद राख एक शब्दही पुढे बोलशील तर . आणि ऐक हे सगळे लंडनला गेले की मी तुझ्यासोबत राहणार नाही . मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतलाय. उरलेलं आयुष्य तरी आनंदाने जगेन मी . माझी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून टाकतो . तुला कुठे कसं राहायचं ते तू बघ . आता आपला काहीही संबंध नसणार . मुलांना त्रास दिलास तर बघ , माझ्याईतका वाईट कोणी नसेल . आजवर मी गप्प बसलो पण ती माझी फार मोठी चूक होती . पण यापुढे असं होणार नाही ये लक्षात ठेव ." दिलीपराव जोरात ओरडून म्हणाले . त्यांना खूपच धाप लागत होती .
विनय अनिता घाबरले .
" बाबा , शांत व्हा बरं आधी . बसा इकडे . नंतर बोलूया आपण . चला डॉक्टर कडे जाऊन येऊ . अनु बाबांची फाईल घेऊन ये . मी फोन करतो डॉक्टरला ." विनय म्हणाला .
अनिताने बाबांना पाणी दिलं . त्यांना झोपवून त्यांचं बीपी तपासल . बीपी बरच वाढलं होतं. दोघांनाही बाबांची काळजी वाटत होती . वसुधाबाई दिलीपरावांच्या जवळ गेल्या पण त्यांनी तोंड फिरवलं.
" आई आता कृपा करून कुठलाही तमाशा करू नकोस . बाबांची तब्येत बघ जरा . हात जोडतो तुझ्यापुढे . जरा शांत रहा . आम्ही डॉक्टरकडे जाऊन येतो ." विनय म्हणाला .
" अरे देवा , आता माझ्या नवऱ्याला , मुलालाही मी नकोशी झालिये . उचल रे मला इथे मी कोणालाच नको आहे . हाच दिवस बघण्यासाठी जिवंत ठेवलेस का मला ? बघतोयस ना बाबा माझे भोग ..." वसुधाबाई आपल्या नेहमीच्या स्वरात सुरू झाल्या पण आता मात्र कोणालाही त्यांचा विचार करावासा वाटला नाही .
तिघेही डॉक्टरकडे निघून गेले .
पिहू खेळायला गेलेली होती . अजून तासभर तरी ती काही घरी येणार नव्हती . पण सध्याचं घरचं वातावरण बघता अनिताने तिच्या मैत्रिणीला फोन करून बाहेर जात असल्याचं सांगितलं आणि ती परत येईपर्यंत पीहुला \" तुझ्याकडेच खेळू दे , मी घरी आले की मग तिला घेऊन येते \" असं सांगितलं .
घरच्या वातावरणाचा परिणाम पिहुवर होऊ नये यासाठी अनिता नेहेमीच आटोकाट प्रयत्न करायची .
डॉक्टर नेहेमीचे ओळखीचेच होते . आई बाबांची नेहमीची ट्रीटमेंट डॉक्टर जोशीच करायचे . फॅमिली डॉक्टर असल्यामुळे एक प्रकारचा आपलेपणा होता.
" काय म्हणताय दिलीपराव ? आठवण आली म्हणायची आमची . इथे झोपा शांत मी चेक करतो . " डॉक्टर जोशींनी प्रेमाने तपासले.
" आपण पटकन इ.सी.जी करून घेऊया "
थोड्याच वेळात डॉक्टर परत केबिनमध्ये आले . दिलीपराव सोबत नव्हते . विनय अनिताच्या चेहेर्यावर काळजी दिसत होती .
" दिलीपरावांचा बीपी वाढला आहे . थोडी शंका आली म्हणून मी टेस्ट केली . जास्त नाही पण थोडा प्रोब्लेम नक्कीच आहे . त्यांचं वय बघता खूप काळजी घेणे आवश्यक आहे . मी तुम्हाला घाबरवत नाही पण सध्यातरी त्यांना त्रास होईल , टेन्शन येईल असं काही घडू देऊ नका . त्यांच्या मनासारखं वागा . घरी काही प्रोब्लेम आहे का ? इतक्या वर्षांत मी दिलीपरावांना अश्या टेन्शनमध्ये बघितलं नाहीये . मी औषधं देतो ती त्यांना द्या . त्यामुळे रिलीफ मिळेल पण यापुढे काळजी घ्या . जमलं तर नवीन वातावरणात , त्यांच्या आवडीची माणसं असतील तिथे थोडे दिवस त्यांना घेऊन जा . नक्कीच लवकर नॉर्मल होतील ते ."
डॉक्टर म्हणाले तशी अनिता विनयची काळजी अजूनच वाढली .घरच्या गोष्टी सध्या फारच वरच्या थराला गेल्या होत्या . अश्या परिस्थितीत टेन्शन येणं साहजिकच होतं. बाबांना आणि सगळ्यांनाच सध्या शांततेची, समाधानाची गरज होती . पण वासुधाबाई असताना ते खरंच शक्य होणार होतं का ?


कथा आवडल्यास लाईक करायला विसरू नका.

तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या.

🎭 Series Post

View all