तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( भाग 22 )

" अनु बाळा , मला माफ कर . वसुधाच्या वतीने मी तुझी माफी मागतो.तिला बोलण्याचा ताळतंत्र नाहीये .तोंडाला येईल ते बोलते ती.इतकं वय झालं तरी मी तिला बदलू शकलो नाही.पण आता मात्र असह्य झालंय.विनू तू असं कर दोन चार दिवस हिला घेऊन तिच्या माहेरी जा.आणि तिथून आलात की लगेच लंडनला निघून जा.मी सुद्धा येतो तुमच्या बरोबर , मलाही आता वसुधा सोबत राहण्याची आजिबात इच्छा नाहीये." " बाबा अहो हे काय बोलताय तुम्ही ? आणि माझी माफी नका मागू तुम्ही. नेहमीचच आहे ना हे आईंच.आता आम्ही जाणार म्हणून माझ्या जास्तच जिव्हारी लागलं..." अनु रडतच म्हणाली ! दिलीपरावांनी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला त्यांचा हात थरथरताना जाणवला तशी अनु अजूनच भावनाविवश झाली..." अनु , विनू मी एक निर्णय घेतलाय.माझी सहनशक्ती आता संपलीय..." दिलीपराव निर्णायक सुरात बोलत होते " मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतलाय. मला आता तिच्यासोबत राहणे शक्य नाही. तिचं तिला जगू दे तिच्या विश्वात.तिला कोणाची पर्वा नाही...माझे दोन तीन मित्र आहेत तिकडे...सगळी सोय अगदी छान आहे , मी मस्त मजेत राहील तिकडे.आणि हो माझ्या निर्णयामुळे तुम्ही तुमचा लंडनला जाण्याचा निर्णय बदलणार नाही अशी शपथ घ्या आधी. तुम्ही सेटल झालात की मी येईन अधून मधून " बाबांचा निर्णय ऐकून दोघेही चकित झाले.त्यांना धक्काच बसला.बाबांचे थरथरणारे शरीर बघून खरंतर त्या दोघांना टेंशन आलं होतं.बाबांना बीपी चा त्रास होता म्हणून विनयने आधी त्यांना बसवलं , अनु सुद्धा रडणं आवरून त्यांच्यासाठी पाणी आणायला गेली.थोडावेळ कोणी काहीच बोललं नाहीं .बराच वेळ झाला तरी तिघेही बाहेर आले नाहीत तसा वसुधा बाईंचा पारा चढला

" आई अग काय बोलतेस तू हे ? असं कसं काय वाटलं तुला.आम्ही दोघेही तुला इतका सन्मान देतो आणि ती अनु तर किती करत असते तुझ्यासाठी.कधी काही कमी पडू दिलं नाही तुम्हाला ..माझ्यापेक्षाही जास्त काळजी घेते ती तुमची आणि तू असं बोललीस तिला ? " विनयचा संताप अनावर झाला होता...
पण वसुधा बाईना मात्र आपल्या बोलण्याचा आजिबात पश्याताप झालेला दिसत नव्हता. उलट आपला मुलगा आपल्या विरुद्ध सुनेची बाजू घेतोय याचा त्यांना राग आला " काय दिवस आलेत रे देवा ! हेच दिवस दाखविण्यासाठी जिवंत ठेवलास का अजून ? एकुलता एक मुलगा , किती खस्ता खाऊन वाढवलं त्याला पण आता पाहा कसा बायकोचा बैल झालाय आणि आईशी भांडतोय ..." आईचा नेहमीसारखा त्रागा सुरू झाला आणि विनय रागाने आत निघून गेला.अनुची समजूत कशी काढावी हेच त्याला कळत नव्हते.
" आता पुरे कर तुझी नाटकं.अश्या वागण्याने कायमची गमावून बसशिल आपल्या मुलाला.आणि मी सुद्धा सहन नाही करून घेणार आता तुझं हे वागणं.नाहीतर माझ्यासोबत राहायची गरज नाही.लगेच माफी माग अनूची आणि यापुढे असं वागणं बंद अशी शपथ घे .नाहीतर तुला तुझा रस्ता मोकळा आहे..." दिलीप रावांचा संयम आता संपला होता...
त्यांचा असा पारा चाढलेला बघून खरंतर त्या मनातून घाबरल्या होत्या पण एकदम अशी पडती बाजू घेऊन चूक मान्य करणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. " आपला नवरा काय करेल ? फार तर दोन चार दिवस रागावेल मग येईल सरळ .आणि विनय तर काय थोडावेळ चीड चीड करेल आणि मग स्वतःच येईल मागे.आता जर आपण माफी मागितली तर आपलं वर्चस्व नाहीसं होईल आणि यापुढे नेहेमीच आपल्याला नमतं घ्यावं लागेल " अशा बुरसटलेल्या विचारांमुळे वसुधा बाई माफी मागायला तयार नव्हत्या...
दिलीपराव रागाने तिथून निघून गेले .
विनय अनुला समजावण्याचा प्रयत्न करत होता . पण आज अनुच्या मनावर झालेला आघात खरंच खूप जिव्हारी लागणारा होता.आधीच लंडनला जाण्याच्या विचाराने सगळे खूप हळवे झाले होते .विनयकडे तिला समजावण्यासाठी शब्दंच नव्ह्ते.तो सुद्धा खूप दुखावला गेला होता.आईचं वागणं त्यालाही त्रास देत होतं पण सध्या अनुला शांत करणं महत्त्वाचं होतं.अनुला तो जवळ घेऊन बसला होता.अनूच्या डोळ्यातलं पाणी वाहतच होतं.दिलीपराव आत आले...
" अनु बाळा , मला माफ कर . वसुधाच्या वतीने मी तुझी माफी मागतो.तिला बोलण्याचा ताळतंत्र नाहीये .तोंडाला येईल ते बोलते ती.इतकं वय झालं तरी मी तिला बदलू शकलो नाही.पण आता मात्र असह्य झालंय.विनू तू असं कर दोन चार दिवस हिला घेऊन तिच्या माहेरी जा.आणि तिथून आलात की लगेच लंडनला निघून जा.मी सुद्धा येतो तुमच्या बरोबर , मलाही आता वसुधा सोबत राहण्याची आजिबात इच्छा नाहीये."
" बाबा अहो हे काय बोलताय तुम्ही ? आणि माझी माफी नका मागू तुम्ही. नेहमीचच आहे ना हे आईंच.आता आम्ही जाणार म्हणून माझ्या जास्तच जिव्हारी लागलं..." अनु रडतच म्हणाली ! दिलीपरावांनी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला त्यांचा हात थरथरताना जाणवला तशी अनु अजूनच भावनाविवश झाली...
" अनु , विनू मी एक निर्णय घेतलाय.माझी सहनशक्ती आता संपलीय..." दिलीपराव निर्णायक सुरात बोलत होते " मी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतलाय. मला आता तिच्यासोबत राहणे शक्य नाही. तिचं तिला जगू दे तिच्या विश्वात.तिला कोणाची पर्वा नाही...माझे दोन तीन मित्र आहेत तिकडे...सगळी सोय अगदी छान आहे , मी मस्त मजेत राहील तिकडे.आणि हो माझ्या निर्णयामुळे तुम्ही तुमचा लंडनला जाण्याचा निर्णय बदलणार नाही अशी शपथ घ्या आधी. तुम्ही सेटल झालात की मी येईन अधून मधून "
बाबांचा निर्णय ऐकून दोघेही चकित झाले.त्यांना धक्काच बसला.बाबांचे थरथरणारे शरीर बघून खरंतर त्या दोघांना टेंशन आलं होतं.बाबांना बीपी चा त्रास होता म्हणून विनयने आधी त्यांना बसवलं , अनु सुद्धा रडणं आवरून त्यांच्यासाठी पाणी आणायला गेली.थोडावेळ कोणी काहीच बोललं नाहीं .
बराच वेळ झाला तरी तिघेही बाहेर आले नाहीत तसा वसुधा बाईंचा पारा चढला " अनिता झालं की नाही तुझं...जेवणाची वेळ झाली . आज काही मिळणार आहे की आम्हा म्हाताऱ्याने स्वतःच करून घ्यायचं आहे ? तुझ्या बाबांना आणि नवऱ्यालाही भूक सहन होत नाही हे माहिती आहे ना तुला ? "
आता मात्र दिलीपराव संतापाने बेभान झाले . विनयची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती.दोघेही बाहेर आले.अनिता घाबरली.ती सुद्धा मागोमाग धावत बाहेर आली...
" काय बाई आहेस तू वसुधा ? आज खरंच मला लाज वाटते तुझी . ही बिचारी पोर वाटेल ते बोलणं सहन करते म्हणून कशीही वागवशिल तू तिला ? आज सगळी लिमिट क्रॉस केलीस तू . इतके सोन्यासारखे लेक , सून मिळालेत आपल्याला पण तुला मात्र किंमत नाही तिची . माझीच चूक झाली.अनुबेटा माफ कर मला.मी इतकी वेळ येऊ द्यायला नको होती . ही बाई स्वतःच्या सासू सासऱ्याला नेहेमी पाण्यात बघायची . कधीही त्यांना सुखाने राहू दिलं नाही आणि आता स्वतःच्या सूनेकडून तिने सगळं हातात द्यावं ही आपेक्षा .
मी माझा निर्णय घेतलाय . माझ्या मुलांना मी तो सांगितलाय . आम्ही सगळे काही दिवस अनुच्या माहेरी जात आहोत . तू मस्त रहा . परत आल्यावर हे तिघ लंडनला जातील आणि मी वृद्धाश्रमात जाणार आहे . तुझं काय ते तू बघ . आता मला यापुढे तुझ्यासोबत राहणे शक्य नाही .
अनु , विनयला कुठल्याही बंधनात अडकवशील तर याद राख . ते लंडनला जाणार हे नक्की ."


कथा आवडल्यास लाईक करायला विसरु नका. तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या.

🎭 Series Post

View all