तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..! ( भाग 19 )

हॉलच्या दारातून स्टेज पर्यंत वधू वरांसाठी स्पेशल वेलकम एंट्री होती...दोन्ही बाजूला हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन सगळी पाहुणे मंडळी उभी होती..' सुटा बुटातला एक हँडसम मनुष्य दारात उभा होता... ओळखीचा वाटत होता पण नक्की कोण बरं ? ' वसुधाबाई विचार करत दारापर्यंत आल्या आणि बघतच राहिल्या...ते दिलीपराव होते . खरंच काय हँडसम दिसत होते .वसुधा बाईंच्या आवडत्या निळ्या रंगाचा सूट दिलीपरावांना खूपच शोभून दिसत होता...चेहेर्यावर प्रसन्न हास्य अगदी रूप खुलवणार होतं .दिलीपरावसुद्धा वसुधाला एकटक बघत राहिले . काय सुंदर दिसत होती वसू ! त्यांना तसं बघताना बघून वसुधा चक्क लाजली आणि पुन्हा एकदा दिलीपरावांची विकेट उडाली...सुंदर संगीताच्या तालावर वधू वर स्टेज कडे निघाले...त्यांच्यासाठी एक सुंदर कमान केलेली होती , दोन्ही बाजूंनी फुलांचा वर्षाव केला जात होता ...दोघेही स्टेज जवळ आले...बघतात ते काय ...स्टेजला केरळ च रूप दिलेलं होतं...दिलीपराव आणि वसुधाबाई दोघांनाही केरळचं खूप आकर्षण होतं , त्यांचं ते आवडतं ठिकाण होतं म्हणून ही आयडिया केलेली होती.नारळाची झाडं , तळे असा सुंदर निसर्ग रम्य देखावा मन मोहवून टाकणारा होता.स्टेजला मोठ्या नावेचा आकार देण्यात आला होता.वसुधाबाई आणि दिलीपराव नुसते बघतच राहिले...आनंदाने दोघांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता...
डॉक्टरांनी दिलीपरावाना तपासले . झालेल्या दगदगीमुळे त्यांना थकल्यासारख वाटत होतं. बाकी काळजी करण्यासारखं नव्हतं. सगळ्यांना काळजी वाटत होती..
" अहो दिलीपराव मनाने जरी तुम्ही तरुण असलात तरी शरीर नाही हा..ते अश्या धावपळीमुळे थकणारच.आता ही गोळी घ्या.. थोडं खाऊन घ्या आणि मग बोहल्यावर चढा...काय ? " डॉक्टर हसून बोलले.
अनिताने बाबांना गोळी दिली. कीर्तीने पटकन बाबांसाठी खायला आणलं.खाऊन बाबा पुन्हा थोडावेळ झोपले. उठल्यावर मग त्यांना अगदी फ्रेश वाटू लागलं होतं...आता काळजी मिटली होती.
" पोरांनो मी एकदम ठीक आहे. चला मुहूर्त नको टळायला." दिलीपराव बोलले तसे सगळेच मोठ्याने हसले .
\" बाबांना किती घाई झालिये ना लग्नाची \" असं म्हटल्यावर मात्र दिलीपराव चक्क लाजले...
काका आणि बाबांचे मित्र सोडून बाकी सगळे कामाला पळाले.गुरुजी वाटच बघत होते.वधूवरांना लवकर बोलवा म्हणून त्यांची घाई चालली होती...
वसुधाच्या मैत्रिणी आता तिच्या रूम मध्ये आल्या.पाठोपाठ मावशी , मामी वगैरे मंडळी सुद्धा जमली...सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा नवरीला नीट तयार केलं .खरंच आज किती सुंदर दिसत होत्या वसुधाबाई.इतकी सुंदर पैठणी , त्याला साजेशे दागिने , गजरा , नकातली नथ आणि कपाळावरची चंद्रकोर .मावशींनी लगेच कोणाची दृष्ट लागू नये म्हणून वसुधा ला काळा टीका लावला.
चल , चल म्हणून सगळ्यांनी वसुधाला बाहेर काढलं.
" अरे काय चाललंय हे ? आतातरी कळेल का मला ? कोणाचं लग्न आहे ? मला असं नवरीसारख सजवून कुठे नेताय ? ही पिहू का करवली सारखी माझ्या मागे येतेय ..." आता मात्र वसुधाच्या सहनशक्तीचा अंत झाला होता ...
" अगं कोणाचं म्हणजे ? तुझंच आहे की लग्न .मग उगीच तुला नवरीसारख सजवल का आम्ही ? चला चला नवरदेव वाट बघतायेत..." गीताने वसुधाला कोपरखळी मारली तश्या सगळ्या हसू लागल्या...
" पण नवरदेव जुनेच बरं का .वसू अगं अशी बघतेस काय भावजी आतुर झालेत तुला बघायला .." आशा सुद्धा सामील झाली.
वसुधा खरंच लाजली ! नव्या नवरीची लाली खरंच तिच्या गालावर दिसू लागली ...
आश्चर्य , लाज , आनंद असे सगळे भाव तिच्या चेहेऱ्यावर अगदी शोभून दिसत होते. डोळे पाणावले होतेच...
" काय आई कसं वाटलं सरप्राइज ? " किर्तीने विचारलं
" बाळा खूप छान मोठं सरप्राइज दिलत तुम्ही. हे सगळं मुद्दामून करत होतात तर तुम्ही.आणि आम्हाला वाटलं तुम्ही विसरलात.बाकी सगळे कुठे आहेत आणि तुझे बाबा ? " आईंनी लेकीला मिठी मारत विचारलं .
" आज्जी काय भारी दिसतेय ग तू .अगं आजोबा केव्हाचे तयार आहेत. तुला माहितीये आजोबा घोड्यावर बसले होते आणि मग आम्ही सगळे मस्त डान्स करत होतो .आजोबांनी सुद्धा डान्स केला आणि आजोबा पण काय मस्त दिसतायत अगदी हँडसम ...चल ना पटकन...ते गुरुजी कधीचे बोलावतायेत..." करवलीच्या वेशात नटलेली पिहू म्हणाली.
वसुधाबाई हे सगळ ऐकून अजुनच चकित झाल्या.दिलीपराव स्वतः कधी नाचणे सोडाच पण दुसऱ्यांनाही नाचताना बघून नावे ठेवणाऱ्यातले होते . ते स्वतः धुंद होऊन नाचले यावर विश्वास ठेवणे कठीणच होते .
" आज्जी हे तर काहीच नाही , अजून खूप सरप्राइज बाकी आहे ..बी रेडी ..." साहिल म्हणाला ...
" आता अजून काय काय बघायचं आहे ? काय ग कीर्ती सांग ना ...ताई , आशा तुम्हीतरी सांगा ना काहीतरी..." वसुधाबाई सगळ्यांना विचारून दमल्या , तेव्हड्यात \" वधू वरांनी ताबडतोब यावे \" अशी हाक आली आणि सगळ्या वसुधाला घेऊन निघाल्या...
हॉलच्या दारातून स्टेज पर्यंत वधू वरांसाठी स्पेशल वेलकम एंट्री होती...दोन्ही बाजूला हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन सगळी पाहुणे मंडळी उभी होती..
\" सुटा बुटातला एक हँडसम मनुष्य दारात उभा होता... ओळखीचा वाटत होता पण नक्की कोण बरं ? \" वसुधाबाई विचार करत दारापर्यंत आल्या आणि बघतच राहिल्या...ते दिलीपराव होते . खरंच काय हँडसम दिसत होते .वसुधा बाईंच्या आवडत्या निळ्या रंगाचा सूट दिलीपरावांना खूपच शोभून दिसत होता...चेहेर्यावर प्रसन्न हास्य अगदी रूप खुलवणार होतं .
दिलीपरावसुद्धा वसुधाला एकटक बघत राहिले . काय सुंदर दिसत होती वसू ! त्यांना तसं बघताना बघून वसुधा चक्क लाजली आणि पुन्हा एकदा दिलीपरावांची विकेट उडाली...
सुंदर संगीताच्या तालावर वधू वर स्टेज कडे निघाले...त्यांच्यासाठी एक सुंदर कमान केलेली होती , दोन्ही बाजूंनी फुलांचा वर्षाव केला जात होता ...दोघेही स्टेज जवळ आले...बघतात ते काय ...स्टेजला केरळ च रूप दिलेलं होतं...दिलीपराव आणि वसुधाबाई दोघांनाही केरळचं खूप आकर्षण होतं , त्यांचं ते आवडतं ठिकाण होतं म्हणून ही आयडिया केलेली होती.नारळाची झाडं , तळे असा सुंदर निसर्ग रम्य देखावा मन मोहवून टाकणारा होता.स्टेजला मोठ्या नावेचा आकार देण्यात आला होता.वसुधाबाई आणि दिलीपराव नुसते बघतच राहिले...आनंदाने दोघांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता...
गुरुजींनी मंत्र सुरू केले...लग्नाच्या विधिना सुरुवात झाली...
" अहो मुलं काय आपलं खरंच लग्न लावतात की काय हो ? मला तर मी स्वप्नातच आहे असं वाटतं " वसुधाबाई हळूच दिलीपरावांच्या कानात पुटपुटल्या.
"अग हो ...अजून खरं वाटत नाही ना ...मी तर मस्त घोड्यावर बसून वरातीत मिरवून देखील आलो...मस्त डान्स सुद्धा केला ...आहेस कुठे...भानावर ये हे खरं आहे..." दिलीपरावांनी हळूच वसुधाबाईना चिमटा काढला आणि हे खरं आहे याची जाणीव करून दिली...
" अजून लग्न व्हायचंय बरं का , आतापासून एकमेकांच्या कानात कुजबुज चाललीये ह्यांची.शोभत का हे वसू " मिनाताईंनी दोघांना चिडवल तसा एकच हशा पिकला.नवरी आणि नवरदेव दोघेही मस्त लाजले...
लग्नाचे मुख्य विधी साग्रसंगीत पार पडले.दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि पुन्हा एकदा वसुधा आणि दिलीपच लग्न झालं !
कीर्ती आणि सूरेशंने कन्यादान केलं...मुलीचं कन्यादान आई वडील करतात पण इथे तर मुलीनेच आईच कन्यादान केलं होतं...सगळ्यांचे डोळे पाणावले ! असा अभूतपूर्व सोहळा बघणारे आप्तेष्ट जोडप्याला भरभरून आशीर्वाद देत होते... अनेकांना दिलीप - वसुधाचा हेवा सुद्धा वाटत होता...
सगळा हॉल आनंदाने भरून गेला होता .मुलांना तर खूपच मज्जा वाटत होती...आज्जी आजोबांचं लग्न बघणारे नातवंड म्हणून त्यांना खूप भारी वाटत होतं...
आई बाबांनी मुलांना मिठीत घेतलं...मग पुन्हा मस्त फोटो सेशन झालं...जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा सुंदर दिसत होता...कीर्ती आणि अनिता दोघीही अगदी सारखी नऊवारी नेसून मिरवत होत्या.सगळ्यांनी \" नणंद भावजया अगदी गौराई सारख्या दिसतात \" म्हणून त्यांचं कौतुक केलं ...
मनसोक्त फोटो काढून झाले आणि आता आई बाबांना पुन्हा रूम मध्ये पाठवण्यात आलं.सगळे पुन्हा गायब झाले.आता कपडे बदलून घ्यावेत असं वाटतं असतानाच अनिता तिकडे आली.तिने आईना दुसरी साडी काढून दिली आणि आता फ्रेश होऊन तयार व्हा असं सांगितलं. विनय बाबांना दुसऱ्या रूम मध्ये घेऊन गेला आणि त्यांना त्यांचे कपडे दिले...
" आता अजून काय ग...झालं ना सगळं ? खूप छान झालं बरं सगळं ...माझ्या कीर्तीला भारी हौस ग सगळ्याची...जावईबापू सुद्धा किती करतात आमच्यासाठी . तुम्ही सगळ्यांनी मस्त केलं सगळं...पण आता अजून काय राहिलं ? " वसुधाबाई म्हणाल्या.
" आई आता अजून सरप्राइज बाकी आहे .चला बरं पटकन फ्रेश होऊन साडी नेसा मी तुम्हाला बाकीची तयारी करून देते.मी येते लगेच तयार होऊन तोपर्यंत." अनिता तयार व्हायला निघून गेली...
मस्त गुलाबी मोती वर्क ची साडी नेसून वसुधा तयार झाली ...सोबत पाणीदार मोत्याचा चार पदरी हार , छोटंसं डायमंडच मंगळसूत्र , केसात मोत्याचा गजरा घालून तिचं खुललेल वेगळं मोहक रूप बघून ती स्वतःवर पुन्हा एकदा मोहित झाली. मोत्याचे दागिने वसुधाला खास आवडत असत .
दिलीप राव छानसा मोती कलर चा सिल्कचा कुर्ता पायजमा घालून अगदी रुबाबदार दिसत होते...
कीर्ती आणि अनिता पुन्हा एकदा सुंदर एकसारखा घागरा घालून तयार होत्या... पिहू आणि स्वरा सुद्धा एकसारखा मस्त घागरा घालून मिरवत होत्या...विनय , सुरेश आणि साहिल शेरवानी घालून पुढच्या परफॉर्मन्सच्या तयारीत गुंतले होते...
वसुधा बाईंच्या बहिणी अगदी एकसारखी जरीची कांजीवरम घालून नटल्या होत्या.त्यांची वहिनी आणि मैत्रिणी सुद्धा त्यात सामील होत्या...
स्टेज पुन्हा एकदा सजवल जात होतं ...तोपर्यंत सगळ्यांनी मस्तपैकी इडली , सांबार आणि वड्यांचा समाचार घेतला आणि आईस्क्रिम खात खुर्च्यांवर स्थानापन्न झाले...
स्टेजला आता छान घराचं रूप दिलं होतं...वसुधा बाई आणि दिलीपराव सुद्धा थोडं खाऊन फ्रेश झाले होते...बाहेर काय चाललंय याची त्यांना काहीच कल्पना नव्हती...
सगळी मंडळी आता वाट बघत होती...आता काय सरप्राइज असेल याची सगळ्यांना खुप उत्सुत्कता होती...!!

कसा होईल पुढचा सोहळा ? आई बाबांना सरप्राइज आवडेल का ? जाणून घेऊया पुढील भागात...

🎭 Series Post

View all