तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ...! ( भाग 16 )

कीर्ती आणि साहिल जिजामाता आणि शिवबाच्या वेशात होते.सुरेशसुद्धा शहाजीच्या वेशात शोभून दिसत होता.मागे असणारा किल्ल्याचा देखावा सगळ्या सोहळ्याला शोभणारा होता.अगदी शाही थाट होता.तुताऱ्या आणि शेहेनाईच्या सुमधुर संगीताच्या साथीने सोहळा अगदी छान पार पडला.सगळ्यांनी साहिलला भरभरून आशीर्वाद दिले.बाकीची मंडळी पंगतीला बसली.आज सगळीच मुलं आपापल्या आई सोबत जेवायला बसणार होती.आईच्या हाताने घास घेणार होती.हा आगळा वेगळा सोहळा सगळ्यांसाठीच आनंददायी होता.कितीतरी मायलेक खूप दिवसांनी असे जोडीने जेवत होते...शिवबा , जिजाऊ , शहाजी आग्रहाने सगळ्यांना वाढत होते त्यामुळे पंगतीला अजुनच स्वाद चढला होता.सगळ्यांनी मस्त फोटो सेशन करून घेतले...


हॉल वर पोचल्या पोचल्या कीर्तीने आधी त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या रूम्स ताब्यात घेतल्या.सामान ठेवलं आणि अनिता सोबत सगळी व्यवस्था नीट आहे ना हे बघायला गेली.
हॉल वाल्यांनी सगळीकडे नीट स्वच्छता करून ठेवली होती.बहुतेक सगळं ठीक होतं.सगळी तयारी झालेली होती. डेकोरेशन अजून चालुच होतं.सुरेश पाहुण्यांच्या स्वागताची तयारी बघत होता.विनय नाश्त्याची सोय बघत होता.बाबा सगळीकडे फिरून कुठे काही राहिलं नाहीये ना हे बघत होते.
" भावजी आधी तुम्ही तयार व्हा बरं , मी साहिलला तयार करते .गुरुजी आले की विधी सुरू करायचे लगेचच.पाहुण्यांचे आम्ही बघतो तुम्ही सगळे विधी व्यवस्थित करा.ताई सुद्धा गेल्यात तयार व्हायला." अनिताने सुरेशला तयार व्हायला पाठवलं आणि तिने स्वतः साहिलला छान तयार करून पूजेला बसवलं.
हळू हळू एक एक पाहुणे येत होते.सुरेशचे भाऊ भावजय स्वागताला दारात हजर होते . पिहू आणि स्वरा सुद्धा सोबत होत्याच.आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे गुलाबपाणी आणि फुलांच्या पाकळ्यांनी सुंदर स्वागत केले जात होते.अनिताचे भाऊ वहिनी सगळ्या पाहुण्यांना त्यांच्या रूम मध्ये फ्रेश व्हायला घेऊन जात होते आणि कोणाला काय हवं नको ते बघत होते.
मुंजिचे विधी सुरू झाले होते.गुरुजी अगदी छान साग्रसंगीत विधी करत होते आणि साहिलसुद्धा आनंदाने सांगितलेलं सगळं करत होता.
आता सगळे पाहुणे आले होते.आत्या , मामा , मावशी सगळेच मदतीला होते.आज फक्त जवळचे सगळे नातेवाईक मुक्कामाला आलेले होते बाकी सगळे जण उद्या येणार होते.
सगळीकडे आनंदाच वातावरण होतं.खूप दिवसांनी सगळे एकत्र जमले होते त्यामुळे गप्पांना उधाण आलं होतं.सगळ्यांनी सरबत पिऊन तयार व्हायला सुरुवात केली.लवकरच मातृभोजन सुरू होणार होतं आणि मग सगळ्यांची जेवणं होणार होती.
मातृभोजनासाठी खूप छान व्यवस्था केली होती.कीर्तीने साहीलच्या काही मित्रांना त्यांच्या आई बरोबर आमंत्रण दिलं होतं.सोबतच काही गरीब मुलांनाही आई बरोबर जेवणासाठी बोलावलं होतं.साहिलने कीर्तीबरोबरच अनुलासुद्धा आपल्या जवळ बसवलं.तिचे डोळे भरून आले.आलेल्या प्रत्येकालाच साहिलच खूप कौतुक वाटलं.
कीर्ती आणि साहिल जिजामाता आणि शिवबाच्या वेशात होते.सुरेशसुद्धा शहाजीच्या वेशात शोभून दिसत होता.मागे असणारा किल्ल्याचा देखावा सगळ्या सोहळ्याला शोभणारा होता.अगदी शाही थाट होता.तुताऱ्या आणि शेहेनाईच्या सुमधुर संगीताच्या साथीने सोहळा अगदी छान पार पडला.
सगळ्यांनी साहिलला भरभरून आशीर्वाद दिले.बाकीची मंडळी पंगतीला बसली.आज सगळीच मुलं आपापल्या आई सोबत जेवायला बसणार होती.आईच्या हाताने घास घेणार होती.हा आगळा वेगळा सोहळा सगळ्यांसाठीच आनंददायी होता.कितीतरी मायलेक खूप दिवसांनी असे जोडीने जेवत होते...
शिवबा , जिजाऊ , शहाजी आग्रहाने सगळ्यांना वाढत होते त्यामुळे पंगतीला अजुनच स्वाद चढला होता.
सगळ्यांनी मस्त फोटो सेशन करून घेतले...
सकाळी खूप लवकर उठून घरचे सगळे पुन्हा मुंजीच्या विधीसाठी तयार झाले.बटू खूपच गोड दिसत होता.नऊवारी साडी आणि अगदी खास मराठमोळा साजशृंगार करून अनिता आणि कीर्ती तयार होत्या.सुरेश आणि विनय धोतर , कुर्ता आणि खास पुणेरी पगडी घालून सज्ज होते.पिहु आणि स्वरा सुंदर परकर पोलके घालून मिरवत होत्या.मावशींनी आग्रहाने आईंना कीर्ती - अनिताने गुपचूप आणलेली नऊवारी साडी नेसायला लावली.बाबाही मस्त सिल्कचा धोतर - कुर्ता घालून मस्त तयार झाले होते...
पोरीनी आठवणीने आपल्या साठी नऊवारी आणली याचा आनंद आता आईच्या चेहेर्यावर झळकत होता.
पाहुणे यायला सुरुवात झाली होती.
अनिता , विनय , आई , बाबा , पिहू , स्वरा अगदी मराठमोळ्या पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करत होते.तुतर्या वाजत होत्या... बँड वालेही अगदी धोतर , कुर्ता आणि फेटे घालून तयार होते.हॉल अगदी सुंदर सजवलेला होता.हॉलला पेशवे वाड्याचा लूक दिला होता आणि सगळी सजावट सुद्धा तशीच होती.पाहुण्यांसाठी खास भारतीय बैठक होती.
सगळे जण आता बटूची आतुरतेने वाट बघत होते...साहिल अगदी दृष्ट लागावा असा राजबिंडा दिसत होता.त्याच्यासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या.ढोल ताशे वाजत होते.मोठ्या थाटात साहिलला स्टेज वर आणण्यात आलं...अगदी योग्य मुहूर्त साधून मूंज झाली...साहिलने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले...आजी आजोबांचे आशीर्वाद घेताना त्यांचे पाणावलेले डोळे बघून साहिल गोंधळला...पण आजोबांनी लगेच हसून त्याला आशीर्वाद दिले आणि त्याला सोन्याचे सुंदर लॉकेट सरप्राइज देऊन त्याचा गोंधळ संपवला आणि त्याला खुश केलं...
मामा मामिकडून त्याने त्याच्या पसंतीचं ब्रासलेट आधीच घेतलं होतं ....
प्रत्येकाने कौतुकाने अगदी घसघशीत आहेर आणि भरभरून आशिर्वाद दिले.आज्जीने साहिलची दृष्ट काढली.कीर्तीला अचानक आपला लेक खूप मोठा झाल्याचं जाणवलं आणि तिचे डोळे भरून आले..
मग पुन्हा फोटो सेशन...आता सगळ्यांनी फॅमिली फोटो काढले.प्रत्येकाने आपापल्या फॅमिली सोबत फोटो काढून हौस भागवून घेतली.
असे फोटो , तसे फोटो , सगळ्या बहिणी , सगळे भाऊ , सगळी मुलं , फक्त मोठी मंडळी , दोन पिढ्या , तीन पिढ्या , आजोळ , माहेर , सासर असं सगळं सेटिंग करता करता फोटोग्राफर ची मात्र वाट लागली ...
जेवण वाढणारे सुद्धा अगदी शाही पोशाखात होते.घरची मंडळी सुद्धा अगदी आग्रहाने वाढत होती...
मुंजीनंतर सुद्धा जेवणाचा शाही थाट होता...चांदीच्या ताटात पंचपकवान्ने , ताटाभोवती महिरप सगळे अगदी तृप्त होऊन गेले...
जेवणानंतर साहीलच्या सगळ्या बाललीला दाखवणारा एक छान व्हिडिओ दाखवण्यात आला...त्याच्या बाललीलेत सगळे रमून गेले...
सगळ्यांनी नेहेमीच आठवणीत ठेवावा असा तो सोहळा होता...
पुन्हा पुन्हा भरभरून कौतुक आणि आशीर्वाद देऊन आता बरीच मंडळी जायला निघाली.अनिता , पिहू , स्वरा सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देऊन त्यांचे आवर्जून आभार मानत होत्या...बटू मात्र थकून गेला होता...आजीच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपून गेला...
आता सगळं संपल तरी सगळे का थांबले आहेत तेच आई बाबांना कळत नव्हतं...त्यांच्या दृष्टीने सोहळा संपला होता पण आता एक जबरदस्त सरप्राइज त्यांची वाट बघत होतं...!

कसं असेल सरप्राइज ? आई बाबांना मुलांनी दिलेलं सरप्राइज आवडेल का ? जाणून घेऊया पुढील भागात...!

🎭 Series Post

View all