तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...( भाग 15 )

" फारच गुणी आहे बाबा विनय तुझी बायको.खरंच आम्हाला आमच्या सुनेचा खूप अभिमान आहे.अश्या वेळी माणूस खूप घाबरुन जातो पण हिने किती छान सांभाळलं सगळं...आणि आता साहीलच्या स्वागताची हि तयारी , देवाला नैवेद्य हे सगळं करायला सूचण हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे.आणि प्रेम सुद्धा किती करते मुलांवर.आणि आम्हा सगळ्यांना तर अगदी आपुलकीने जपते..." आत्या सुनेच्या कौतुकात मग्न होत्या...विनय आनंदाने अनुकडे बघत होता .पिहू आणि स्वरा अनिता बरोबर साहिलला सरप्राइज देण्यासाठी ग्रीटिंग करण्यात गुंतलेल्या होत्या.बायकोच्या अभिमानाने विनयच हृदय भरून आलं...!बराच वेळ झाला तरी कीर्ती , सुरेश आणि साहिल घरी आले नाहीत...वाट बघून सगळे कंटाळले तसा विनयने सुरेशला फोन केला पण त्याने उचलला नाही , कीर्तीने सुद्धा फोन उचलला नाही.विनयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
साहिलला घेऊन सगळे हॉस्पिटल मध्ये आले...तो अजूनही बेशुध्द होता.सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते.कीर्ती सतत रडत होती...अनिताच्या डोळ्यातले पाणी सुद्धा थांबत नव्हते...स्वरा आणि पिहू सुद्धा खूपच घाबरून गेल्या होत्या.अनिता कीर्तीला सावरण्याचा प्रयत्न करत होती...स्वरा आणि पिहुसुद्धा सुरेशच्या कुशीत शिरून रडायला लागल्या.
विनय हॉस्पिटल ची फॉर्मलिटी पूर्ण करत होता.
डॉक्टरांनी साहिलला तपासले.डोक्याला आतून मार लागला होता.वरून काहीच रक्तस्त्राव झालेला नव्हता पण तो बेशुद्ध झाल्यामुळे सगळ्या तपासण्या करणं गरजेचं होतं.
रात्र होत चालली होती.
विनयने स्वरा आणि पिहुला अनितासोबत घरी पाठवलं आणि कॅन्टीन मधून खाण्याचे पदार्थ आणून कीर्ती आणि सुरेशला जबरदस्तीने खायला लावलं.
अनिताने ही मुलींना थोडं खाऊ घालून झोपवलं.तिला एकटीला खूप भीती वाटत होती.सगळ्या तपासण्या पूर्ण होईपर्यंत काहीच सांगता येणार नव्हतं.
डॉक्टरांनी काही प्रार्थामिक तपासण्या केल्या आणि पुढचे चोवीस तास खूप क्रिटिकल असल्याचं सांगितलं.
अवघा आठ वर्षाचा तो कोवळा जीव कसं आणि किती सहन करत असेल ? एरवी एका जागी पाच मिनिटं शांत न बसणारा तो सगळ्यांचा जीव की प्राण होता पण आता त्याला या अवस्थेत बघणं कोणालाच शक्य नव्हतं.
कीर्तीने देवाचा धावा सुरू केला.सुरेशने सेकंड ओपिनियन घ्यावे म्हणून दुसऱ्या डॉक्टरशी संपर्ग साधायची तयारी सुरू केली.घरी अनिताने देव पाण्यात ठेवले....
सकाळ झाली.अनिताने आत्याला बोलावून घेतलं.त्यांना सगळी कल्पना दिली आणि मुलींना त्यांच्याकडे सोडून चहा , नाश्ता घेऊन ती तातडीने हॉस्पिटल मध्ये गेली.
थोड्या वेळात डॉक्टर आले.लवकरच साहिलचे रिपोर्ट्स मिळणार होते पण अजूनही तो शुद्धीवर आला नव्हता.साहिलचा हात हातात घेऊन कीर्ती मूकपणे अश्रू ढाळत होती...डोळे मिटून ती देवाचा धावा करत होती....
अचानक साहीलचा तिच्या हातात असलेला हात हलला...कीर्ती ने पटकन डोळे उघडले आणि..." मम्मा काय झालं ? मी कुठे आहे ..." असा क्षीण आवाज तिच्या हृदयापर्यंत आला.तिच्या काळजाच्या तुकड्याचा .साहिलचा होता तो आवाज...
कीर्तीने त्याला कुशीत घेतलं ! दोघा मायलेकरांचं प्रेम बघून तिथे असलेल्या डॉक्टरचही काळीज आनंदांनं भरलं.त्यांनी साहिलला तपासले आणि आता काही काळजी करण्याचं कारण नाही असं सांगितलं...
" साहिल एकदम ठीक आहे.कुठलीच काळजी करायचं कारण नाही.आपण सगळ्या टेस्ट केल्या आहेत .सगळं अगदी नॉर्मल आहे.पडल्यामुळे घाबरून लहान मुलांमध्ये असं होण्याची शक्यता असते.नशीब चागलं म्हणून काही झालं नाही.दोन तीन दिवस जरा आराम करू द्या त्याला बस बाकी काही नाही.काही वाटलं तर फोन करा...." डॉक्टरांच्या बोलण्यामुळे सगळ्यांच्या जीवात जीव आला.
" डॉक्टर याची मुंज आहे पुढच्या आठवड्यात.तेव्हा काय करू ? प्रोग्राम कॅन्सल करावा का ? फार काळजी वाटते साहिलची...जीवावरच बेतलं होतं पण तुमच्यामुळे सगळं ठीक झालं..." सुरेशला अजूनही टेन्शन होतं म्हणून त्याने डॉक्टर ला डायरेक्ट विचारून घेतलं.काही झालं तरी साहिलच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेण्याची त्याची तयारी नव्हती.
" नाही नाही त्याची काही गरज नाही.साहिल अगदी फीट आहे.तुम्ही प्रोग्राम करू शकता.फक्त एक दोन दिवस त्याच्याकडे लक्ष ठेवा.साहिल बेटा आता शांत पणे खेळायच.नो धडपड ओके ? बी लाईक ए गुड बॉय.काही त्रास झाला तर लगेच सांगायचं...." डॉक्टरांनी सांगितलं आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
एक खूप मोठं संकट अगदी सहज टळलं होतं.डॉक्टरांचे अनेकदा आभार मानून झाले. कीर्तीच्या डोळ्यातलं पाणी अजूनही थांबत नव्हत...
साहिल आता एकदम ठीक होता.त्याची बडबड सुरू झाली होती.घरी जाण्यासाठी तो अधीर झाला होता.हॉस्पिटलमध्ये त्याला बोर होत होतं.तो कीर्तीच्या कुशीत विसावला ! आपण ठीक आहोत तरी मम्मा का रडतेय हेच त्याला कळत नव्हत.
कीर्तीने हात जोडून डॉक्टरांचे आभार मानले " डॉक्टर खरंच तुम्ही देवासारखे धाऊन आलात.इतक्या मोठ्या संकटातून आमच्या साहिलला बाहेर काढलत.कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू " कीर्ती अजूनही भावनाविवश झाली होती.
" थँक्यू डॉक्टर अंकल.मला काय झालं ते माहीत नाही मला. पण सगळे रडतायेत म्हणजे नक्कीच मी मोठा पराक्रम केला असेल.पण आता मला छान वाटतय आणि इथे बसून बोर पण होतंय.घरी जाऊ द्या ना मला प्लीज.आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे डान्सची आणि क्रिकेट मॅच पण आहे आमची.नेक्स्ट वीक माझी मुंज आहे आणि अजून सरप्राइज प्रोग्राम पण आहे.पप्पा आपण डॉक्टर अंकलला पण बोलावू या ना ...." साहिल निरागसपणें म्हणाला ...सगळे आनंदाने हसले...
" हो खरंच डॉक्टर तुम्ही नक्की या आमच्या कडे प्रोग्रामला मी तुम्हाला इन्वीटेशन पाठवतो .तुमच्या फॅमिली सहित जरूर या...तुमचे आभार मानायला खरंच शब्दच नाहीयेत तरी पण खूप खूप आभार तुमचे..." सुरेश ने डॉक्टरांना प्रोग्रामला येण्याची विनंती केली...
डॉक्टर हसले." हो हो नक्की येणार.या आमच्या इतक्या गोड पेशंटच इन्वाइट आहे ते कसं काय सोडणार मी...आणि साहिल बेटा आता तू घरी जाऊ शकतोस.फक्त दोन दिवस नो प्रॅक्टीस आणि नो क्रिकेट .आणि घरातच आराम करायचा फक्त दोन दिवस मग तू छान एन्जॉय कर.." डॉक्टरांची परवानगी मिळाली तसा साहिल अजुनच खुश झाला...सगळे रिलॅक्स झाले...!
सुरेश डॉक्टरांशी बोलून बाकीच्या फॉर्मलीटी पूर्ण करायला गेला.थोड्याच वेळात सगळी प्रोसेस पूर्ण झाली की घरी जाता येणार होतं...
अनिताने साहिलला जवळ घेतलं.त्याच्या चेहेर्यावर दिसणारा आनंद बघून सगळेजण कालपासूनचा त्रास आणि टेन्शन जणू विसरूनच गेले होते.कीर्तीच्या डोळ्यात सुद्धा आता आनंद दिसत होता.
" ताई मी घरी जाऊ का ? तुम्हाला अजून वेळ लागेल सगळ्या फॉर्मलीटी पूर्ण करून यायला.आत्याचे दोनदा फोन येऊन गेलेत.मुलीही खूप बावरून गेल्या आहेत.साहिल बाळा खायला मस्त खाऊ करते तुझ्यासाठी ये लवकर " अनु त्याला पुन्हा एकदा कुरवाळून म्हणाली.
" हो ठीक आहे .निघ तू .विनय तू ही जा घरी .आम्ही येतोच थोड्या वेळात...आता काही काळजीचं कारण नाही " कीर्ती म्हणाली तसे विनय आणि अनिता घरी निघाले...
घरी पोचताच स्वरा आणि पिहू अनिताच्या गळ्यात पडल्या...दोघीही खूप घाबरल्या होत्या.साहिल म्हणजे दोघींचा लाडका भाऊ होता.घरातलं शेंडेफळ म्हणून साहिल खूपच आवडता होता...
" अगं साहिल एकदम ठीक आहे.थोड्या वेळात घरी येतोय आपला लाडका." अनिता म्हणाली तश्या पिहू आणि स्वरा खूप आंनंदल्या.आत्या सुद्धा सगळं ठीक आहे म्हणून देवापुढे दिवा लावायला गेल्या...
अनिताने लगेच साहिलचा आवडता शिरा करून देवाला नैवेद्य दाखवला...विनयला पाठवून अनिताने पनीर , मटार आणि डेकोरेशनच सामान आणून घेतलं.
मुली आणि विनयने मिळून घर सजवल आणि अनिताने साहिल च्या आवडीचे पदार्थ तयार केले.पनीर बटर मसाला , मटार पुलाव , बुंदी रायता आणि शिरा बघून स्वारी खुश होणार होती.
औक्षण करण्यासाठी आरतीच ताट तयार करून अनिता आणि सगळी मंडळी साहिलची वाट बघत बसली...
आत्या आणि मामांना अनीताच खूप कौतुक वाटलं.इतक्या अवघड परिस्थीत सुद्धा तिने सगळं किती छान सांभाळलं होतं.
" फारच गुणी आहे बाबा विनय तुझी बायको.खरंच आम्हाला आमच्या सुनेचा खूप अभिमान आहे.अश्या वेळी माणूस खूप घाबरुन जातो पण हिने किती छान सांभाळलं सगळं...आणि आता साहीलच्या स्वागताची हि तयारी , देवाला नैवेद्य हे सगळं करायला सूचण हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे.आणि प्रेम सुद्धा किती करते मुलांवर.आणि आम्हा सगळ्यांना तर अगदी आपुलकीने जपते..." आत्या सुनेच्या कौतुकात मग्न होत्या...
विनय आनंदाने अनुकडे बघत होता .पिहू आणि स्वरा अनिता बरोबर साहिलला सरप्राइज देण्यासाठी ग्रीटिंग करण्यात गुंतलेल्या होत्या.बायकोच्या अभिमानाने विनयच हृदय भरून आलं...!
बराच वेळ झाला तरी कीर्ती , सुरेश आणि साहिल घरी आले नाहीत...वाट बघून सगळे कंटाळले तसा विनयने सुरेशला फोन केला पण त्याने उचलला नाही , कीर्तीने सुद्धा फोन उचलला नाही.विनयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.


पुंढे काय होईल ? साहिल घरी आल्यामुळे सगळ्यांची चिंता खरंच मिटेल ना ? प्रोग्राम नीट पार पडेल का ? जाणून घेऊया पुढील भागात...!

🎭 Series Post

View all