तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ( अंतिम भाग )

अग काय पर्याय आहे आता माझ्यापुढे? कोणाकडेच सोय होणार नाहीये माझी . एखादा वृद्धाश्रम बघावा लागणार . तुम्ही निघा . विनय आला की बघते . तो जिथे पाठवेल तिकडे जाईन." वसुधाबाई डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या . पण कीर्तीने जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि दोघेही निघाले .कीर्ती निघून गेली आणि अचानक वसुधाला आपण एकटं असल्याची जाणीव झाली . खूप हतबल झाल्याची भावना अनावर होऊन डोळ्यातून अश्रू वाहू लागले .दुपार झाली तरीही कोणीही वसुधाला फोन केला नव्हता . दुःख आणि पष्याताप यामुळे वासुधाच मन तिला दूषणे देत होतं.आज खऱ्या अर्थाने तिला एकटं वाटत होतं. वसुधा देवासमोर बसली . तिच्या डोळ्यातून पष्यातापाचे अश्रू वाहू लागले . तणावामुळे थोडा त्रास होऊ लागला होता . शेवटी धीर करून वसुधाने अनिताला फोन केला आणि येण्यास सांगितलं . सगळेजण नको नको म्हणत असतानाही अनिता तडक निघाली . तिच्या मागोमाग सगळेच घरी निघाले .वसुधाबाईंची अवस्था बघून अनिताचे डोळे भरून आले . अनिताला बघताच वसुधाचा बांध फुटला." अनिता , अनिता मला माफ कर , असं म्हणायची खरंच माझी लायकी नाही ग. मी फारच वाईट वागले तुझ्याशी . तुझी काहीही चूक नसतानाही मी सतत तुला बोल लावले . आज देवाने मला शिक्षा दिली


सकाळ होताच कीर्ती आणि सुरेश निघायच्या तयारीत होते .
" आई , तुझं काय ठरलं? आम्हाला निघावे लागेल आता . बोल कुठे राहणार आहेस ते ? तुला सोडून निघतो आम्ही हवंतर." कीर्तीने आईला विचारलं.
वसुधाला रात्रभर झोप लागलेली नव्हती . कुठे जाणार ? कोणीच ठेवून घ्यायला तयार नव्हतं. हे राहतं घरसुद्धा विनयच्या मित्राला भाड्याने द्यायचं होतं. आता वृद्धाश्रम हाच एक पर्याय होता .
" अग काय पर्याय आहे आता माझ्यापुढे? कोणाकडेच सोय होणार नाहीये माझी . एखादा वृद्धाश्रम बघावा लागणार . तुम्ही निघा . विनय आला की बघते . तो जिथे पाठवेल तिकडे जाईन." वसुधाबाई डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या . पण कीर्तीने जाणून बुजून दुर्लक्ष केलं आणि दोघेही निघाले .
कीर्ती निघून गेली आणि अचानक वसुधाला आपण एकटं असल्याची जाणीव झाली . खूप हतबल झाल्याची भावना अनावर होऊन डोळ्यातून अश्रू वाहू लागले .
दुपार झाली तरीही कोणीही वसुधाला फोन केला नव्हता . दुःख आणि पष्याताप यामुळे वासुधाच मन तिला दूषणे देत होतं.
आज खऱ्या अर्थाने तिला एकटं वाटत होतं. वसुधा देवासमोर बसली . तिच्या डोळ्यातून पष्यातापाचे अश्रू वाहू लागले .
तणावामुळे थोडा त्रास होऊ लागला होता . शेवटी धीर करून वसुधाने अनिताला फोन केला आणि येण्यास सांगितलं . सगळेजण नको नको म्हणत असतानाही अनिता तडक निघाली . तिच्या मागोमाग सगळेच घरी निघाले .
वसुधाबाईंची अवस्था बघून अनिताचे डोळे भरून आले . अनिताला बघताच वसुधाचा बांध फुटला.
" अनिता , अनिता मला माफ कर , असं म्हणायची खरंच माझी लायकी नाही ग. मी फारच वाईट वागले तुझ्याशी . तुझी काहीही चूक नसतानाही मी सतत तुला बोल लावले . आज देवाने मला शिक्षा दिली . मला पश्याताप झालाय खरंच .
तुझं लग्न झालं आणि सगळे तुझंच कौतुक करू लागले . तू आहेसच तशी पण तरीही माझ्या मनातली असूया मला सतत तुझ्याशी वाईट वागण्याची प्रेरणा देऊ लागली . लहान पणापासून माझं कोणी कौतुक केलं नाही . नेहेमी सगळे मला घालून पाडून बोलायचे . मला मान मिळावा यासाठी मी सतत धडपडत असायचे . पण तसं कधीच घडलं नाही . माझा स्वभाव जरी याला कारणीभूत असला तरीही माझ्या मनातली इच्छा नेहेमीच मला असं वागायला भाग पडायची . मी घरात सगळ्यात लहान असल्यामुळे माझी भावंडं नेहेमी माझ्याकडून कामे करवून घेत . अभ्यासातही मी तितकीशी हुशार नसल्यामुळे साहजिकच प्रत्येकजण मला वाटेल तशी कामे सांगायचा. लग्न झाल्यावर मात्र मी ठरवलं की घरातलं काम करायचं नाही . पण पर्याय नव्हता. माझी चिडचिड व्हायची . त्याचा दोष मी तुमच्या बाबांना दिला . त्यांच्या आई बाबांचा राग मी त्यांच्यावर काढू लागले . त्यांनी मला खूप सहन केलं . नेहेमी पाठीशी घातलं.याबद्दल मी नेहेमीच त्यांची आभारी आहे . त्यामुळे माझा स्वभाव अजूनच हेकेखोर झाला .
विनय , कीर्ती गुणी मुलं होती . बाबांचे चांगले संस्कार त्यांच्यावर होते त्यामुळे मुलं कधीही मला उलटून बोलली नाहीत . तुमचं लग्न झालं आणि मला आधिकर गाजवण्यासाठी एक हक्काची तू मिळालीस. \" सुनेचं कौतुक केलं की डोक्यावर मिरे वाटते \" असे मला अनेकांनी सांगितलं होतं.त्यामुळे साहजिकच मी तुझं कौतुक करत नव्हते आणि कोणी केलं तरीही मी त्यात मोडता घालायचे . तुझ्या प्रेमात वाहवत जाऊन विनय वेगळा राहू नये म्हणून मी वेळोवेळी त्याचे कान भरत आले . तो माझा स्वार्थ होता . माझा मुलगा माझाच रहावा हीच त्यामागे इच्छा होती . त्यापायी अशी वागत राहिले . मी वाईट नाहीये ग पण फक्त तू माझ्या ताब्यात रहविस ही इतकीच इच्छा होती माझी . त्यात अनेक लोकांकडून अनेक गोष्टी ऐकून भीतीच वाटत होती मला . माझा स्वार्थ होता तो पण सगळं प्रेमापोटीच होतं ग. मी मान्य करते माझं वागणं चुकीचं होतं. फारच चुकीचं वागले मी . देव सुद्धा मला कधी माफ करेल असं वाटत नाही .
पण आता मात्र मला माझी चूक लक्षात आली आहे.शक्य असल्यास मला माफ करा . मी वृद्धाश्रमात राहायला तयार आहे . यापुढे माझ्याकडून तुम्हा कोणालाही कसलाच त्रास होणार नाही . पण मला माफ करा...हे ओझं घेऊन जगणं अशक्य आहे आता ...माफ करा मला..." बोलता बोलता वसुधाला चक्कर आली ...
शुध्दीवर आल्यावर वसुधाला तिची सगळी माणसं आजूबाजूला दिसली . दिलीपराव आणि विनय तिच्या जवळच बसून होते . तिला बघून त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद बघून तिचे डोळे पाणावले .
" अहो , विनू तुम्ही माफ केलं ना मला . यापुढे कधीच अशी वागणार नाही मी . खूप चुकलं माझं. त्याचीच शिक्षा दिली मला देवाने ....मी पापी आहे , फार फर वाईट वाटले मी तुमच्या सगळ्यांशी . त्या पोरीची तर मी खूप अपराधी आहे . माई , अप्पा मी हात जोडून माफी मागते तुमची . तुमच्या मुलीला मी खूप त्रास दिला..." वसुधा ओक्साबोक्शी रडू लागली . धाप लागल्यामुळे तिला बोलताही येत नव्हतं.
" आई शांत हो , शांत हो बघू आधी " विनय म्हणाला .
" वसु मी तुला कधीच माफ केलय. तुला तुझी चूक समजली यातच सगळं आलं" दिलीपराव म्हणाले .
" वसुधाताई आमच्या मनात तुमच्याबद्दल काहीच नाही . तुम्ही स्वतःला आजिबात त्रास करून घेऊ नका बरं . " माई आपुलकीने म्हणाल्या .
वसुधाची नजर अनिताला शोधत होती . अनिताने त्यांना माफ करायला हवं होतं .
वसुधाबाईंनी अनिताला बोलावलं . अनिता आली पण काहीही न बोलता गप्प बसून राहिली . तिच्या डोळ्यात उदास भावना होत्या . वसुधाबाई उठून तिच्याजवळ गेल्या . त्यांनी हात जोडले . अनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
" आई अहो काय करताय हे ? तुम्हाला तुमची चूक कळली ना त्यासाठीच आम्हा सगळ्यांची ही युक्ती होती . तुम्हाला त्रास द्यावा हा उद्देश नव्हता पण झालेली चूक तुम्ही मान्य करावी हे सगळ्यांना वाटत होतं. तुमच्या वागण्याचा मला त्रास नेहेमीच व्हायचा . पण म्हणून मी कधीही विनयला तुमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न कधीही केला नाही . यापुढेही अस कधीच घडणार नाही . माझ्या माई अप्पांचे संस्कारच आहेत तसे .
तुम्हाला माझे कौतुक आहे , प्रेम आहे पण तुम्ही नेहेमी माझा दुस्वास केलात याचं खूप वाईट वाटतं मला . मी तुमचं सगळं करेन पण आता मात्र बदल्यात मला तुमची माया मिळालीच पाहिजे . आम्हा सगळ्यांना तुमचं प्रेम हवंय आई . तुमचं आशीर्वाद नेहेमीच हवा आहे . द्याल ना इतकं ? "
" हो पोरी हो . आणि यापुढे मी चुकले तर हक्काने ओरडा मला सगळे . आणि माझ्याकडून लाड करून घ्या . माझा आशीर्वाद नेहेमीच आहे तुमच्या पाठीशी . " वसुधाबाई अनिताला जवळ घेत म्हणाल्या .
" आणि आम्हाला नाही वाटतं ? " असं म्हणून विनय आणि कीर्ती आईला बिलागले .
" सगळं प्रेम मुलांनाच वाटून टाकू नका बरं का . थोडफार आमच्या साठीही असू दे ! " दिलीपराव म्हणाले तश्या वसुधाबाई \" इश्श काहीतरीच तुमचं \" असं म्हणून अगदी गोड लाजल्या .
सगळेच मनसोक्त हसले .
काही दिवसातच अनिता , विनय आणि पिहु ठरल्याप्रमाणे लंडनला गेले . आई बाबा त्यांच्या नवीन घरात आनंदात राहू लागले . कीर्तीचा संसार सुद्धा सुखात सुरू होता . वसुधाबाईंनी आता सासर माहेरच्या आणि मुख्य म्हणजे अनिताच्या माहेरच्या मंडळींना नेहेमी बोलावणे सुरू केले . सगळ्यांचाच वेळ आनंदात जात होता . विनय , अनिता आणि पिहूसुद्धा नवीन आयुष्यात रमले .
काही दिवसांतच अनिताने आनंदाची बातमी दिली . दोन्ही कडचे आज्जी आजोबा नातवंडांच्या स्वागताला लंडनला हजर झाले .
\" कृष्णा \" च्या जन्माने घराचे खऱ्या अर्थाने गोकुळ झाले ...!!

तुमच्या सगळ्यांचे अभिप्राय लेखनाला नेहेमीच प्रोत्साहन देतात . कथेला इतक्या छान छान कॉमेंट्स मिळाल्यात त्याबद्दल वाचकांचे खूप खूप आभार . काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे शेवटचा भाग उशिरा पोस्ट झाला त्याबद्दल क्षमस्व !
असेच भरभरून प्रेम यापुढेही मिळत राहील अशी आशा करते.

©®स्मिता भोस्कर चिद्रवार.

🎭 Series Post

View all