तुझीच मी वात

हि कविता दिवाळीची आहे

कवि :- मोहन सोमलकर
दिनांक:- २०१०२२

कवितेचे शिर्षक:- तुझीच मी वात

तु आहे दिवा
तुझीच मी वात रे ॥
जरी तेल नाही
विझणार नाही तुझ्याच मी साथ रे ॥१॥

वादळात मी जळत राहिल
हवेतही मी पळत राहिल
शितल उजेड देऊनी
ज्वाला मनाची उजाळत राहिल॥२॥

तु दिवा तुझीच मी ज्योत
तुझ्या प्रेमाची मी प्रकाशज्योत !
अंधार दुर करुनि उजेड करिल
तुझ्याच प्रेमात होईल ओतप्रोत!॥३॥

तु दिवा तुझीच मी वात रे
तु देतो जगास प्रकाश ॥
मी तुझ्या आहे सोबत रे.
माझा तुझ्यासाठी रिता बाहुपाश ॥४॥

तिमिराकडुन तेजाकडे
आहे आपल्याला चालायचे .!
कितीही येवोत संकंट जरी
पाय आपुले ना डगमगायचे ॥५॥

धुंद या जगी
श्वासात श्वास रोवायचे !
पुढेच पुढे पाऊल टाकत
स्वतःजळुन दुसर्‍यास प्रकाश देत राहायचे ॥ ६॥

मोहन सोमलकर नागपुर

समाप्त