तुझीच मी हि अशी भाग - 9

TUZICH MI HI ASHI PART - 9

टिपण :- हि कथा पूर्णपणे काल्पनिक आहे तसेच कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी या कथेचा कोणताच संबंध नाही. तस आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हि विनंती.

तुझीच मी हि अशी

भाग : - ९

इंद्रजित ऑफिसला पोहोचला तो सरळ त्याच्या केबिनकडे जाऊ लागला. त्याला ऑफिसमध्ये येताना बघून ऑफिसमधील स्टाफ एक एक उभे राहून त्याला गुड मॉर्निंग विश करू लागले. तो त्यांना रिप्लाय देतच त्याच्या केबिनमध्ये एंटर झाला.

ऑफिस च काम करता करता कधी दुपारचे पाऊणे तीन वाजले हे त्याच त्याला समजलं नाही. तो कामात पूर्णपणे बुडालेलाच होता. त्याच्या पी.ए. ला त्याची हि सवय माहित होती त्यामुळे तो त्याला पाटील इंडस्ट्रीज बरोबर तीन वाजता असलेल्या मिटटींग ची आठवण करण्यासाठी केबिन मध्ये आला.

"सर, तीन वाजता पाटील इंडस्ट्रीजबरोबर हॉस्पिटल बद्दल मिटटींग आहे." इति कौशल

"अरे हो कौशल मी विसरलोच होतो. थँक यु. आठवण केल्याबद्दल." इति इंद्रजित

"सर, त्यात थँक यु कश्याला? माझं कामाचं आहे ते." इति कौशल

"ओके ओके, कौशल तू हो पुढे. मिटटींग च्या अररेंजमेंट्स बघ मी आलोच." इति इंद्रजित

इंद्रजितच्या सांगण्याप्रमाणे कौशल मिटटींग रूम मध्ये जाऊन अररेंजमेंट्स चेक करू लागला.  सगळं व्यवस्थित असल्याची खात्री करून त्याने इंद्रजित ला तस सांगितलं. व स्वतः मिटटींगचा तिने होईपर्यंत तिथेच थांबून राहिला.

रिशा तीन ला दहा मिनिट्स असतानाच कल्याणी टेक्सटाईल्स च्या ऑफिसमध्ये पोहोचली व ऑफिसच्या रिसेप्शन ला थांबूनच आशिष ची वाट बघू लागली. तिने त्याला कॉल करून विचारायचं म्हणून कॉल केला तर आशिष ने पहिल्याच रिंग मध्ये तिचा कॉल रिसिव्ह केला तशी रिशा बोलू लागली,

"हॅलो, दादा कुठे आहेस तू? येतो आहेस ना कल्याणी टेक्सटाईल्स च्या ऑफिसमध्ये मिटटींगसाठी?" इति रिशा

"अगं, हो हो मला बोलू तर दे किती ते प्रश्न. येतोय मी रस्त्यातच आहे, पाच मिनिटातच पोहोचेन." त्याच बोलणं ऐकून रिशा स्वतःशीच हसली आणि म्हणाली

" ओके, दादा सॉरी ते थोडं टेन्शन मुले झालं."

"इट्स ओके, बच्चा मी येतो तिथे मग बोलू. तू टेन्शन नको घेऊ मी आहे." इट आशिष

कॉल कट करून तीन आशिष ची वाट पाहू लागली.

बरोबर पाचव्या मिनिटाला आशिष कल्याणी टेक्सटाईल्स च्या ऑफिसमध्ये एंटर झाला. त्याने रिसेप्शनला थोडं इथे तिथे पाहिलं तर त्याला थोड पुढे उभी असलेली रिशा दिसली. तो तिच्याजवळ जाऊन तिला बोल्ला.

"रिशू, आता कसलं टेन्शन आलाय तुला? ज्याचं टेन्शन यायला हवं होत ते तर तू अगदी कॉन्फिडन्टली केलास. आणि हि तर फक्त मित्तीणग आहे. मग?"

"अरे दादा तस नाही रे, त्यांचे रुल्स अँड रेगुलेशन्स काय असतील याच टेन्शन आलाय." इति रिशा

"ओके, तस असेल ना तर मी आलोय ना आता. मी बघतो काय ते ओके बाकी त्यांच्या कंडिशन्स एवढ्या काय जास्त नसतील. आणि एक म्हणजे हि कंपनी माझ्या मित्राचीच आहे आज सकाळीच त्याच्याशी बोलणं झालाय माझं तशी काय अडचण आलीच तर त्यांच्याशी बोलूनच आपण ती सॉल्व करून घेऊ." इति आशिष

"चालेल. मग जाऊया का मिटटींगला फक्त दोन मिनिट्स राहिलीत. वेळेत जायला हवं. इति रिशा आशिष बरोबर बोलून तिला थोडं स्थिर वाटत होत नाहीतर काहीवेळापूर्वी तिची खूप चलबिचल झाली होती.

ते दोघे हि मिटटींग रूम बद्दल रिसेप्शनवर विचारून त्याप्रमाणे मिटटींग रूम पर्यंत पोहोचले. त्यांना तिथे कौशल दिसला.

रिशा ला कौशल ने ओळखलं आणि बिसिनेस वर्ल्ड ची बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे त्याला आशिषबद्दलहि माहिती होतीच त्याने पुढे येऊन त्या दोघांना विश केलं.

"वेलकम मिस. रिशा अँड मी. आशिष पाटील, मी कौशल मी. इंद्रजित देशमुखांचा पी.ए. तुम्ही प्लिज मिटटींग रूम मध्ये बस मी सराना बोलावून आणतो."  असं  बोलतच त्याने रिसेप्शन ला कॉल करून पाणी आणि दोन कॉफी मिटटींग रूम ला पाठवण्यास सांगितली. व स्वतः इंद्रजितला ते आल्याचं इन्फॉर्म करण्यास गेला.

इंद्रजित ला ते दोघे आल्याचं समजताच तो हि मिटटींग रूम ला पोहोचला. त्याने हात हॅन्डशेक पुढे करतच आशिषला स्वतः चा इंट्रो देऊ लागला.

"हॅलो, मी. आशिष पाटील मी इंद्रजित देशमुख कल्याणी टेक्सटाईल्स चा सी.इ.ओ."

"हॅलो, मी. इंद्रजित निकें तो मीट यु. बूट आपण तर पहिल्यांदाच भेटतोय मग तुम्ही मला कस ओळखलंत?" इती आशिष

"मी. आशिष तुम्हाला कस नाही ओळखणार तुम्ही म्हणजे कन्स्ट्रुक्टशन जगातलं उभारत नाव असलेलं व्यक्तिमत्व, तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर पाटील इंडस्ट्रीजला नवीन ओळख दिलीत." इति इंद्रजित

"मी. इंद्रजित बस करा खूप झालं हे अति झालं मी फक्त माझ्या पप्पांची कामत मदत करतोय इतकंच. एवढं मोठं काही नाही त्यात." इति आशिष

"बाय द वे तुम्ही मला अहो जाओ नका करू. मी तुमच्यापेक्षा लहान असेन त्यामुळे फक्त इंद्रजितच म्हणा. अँड हॅलो मिस. रिशा." इती इंद्रजित

रिशाने त्याला एक छान अशी सामील दिली. त्यावर इंद्रजित म्हणाला

"लेट्स स्टार्ट मिटटींग" असं म्हणत ते सर्व आपापल्या जागेवर बसले व त्यांची मिटटींग सुरु झाली. मिट्टीग चालू असताना इंद्र अधून मधून रिशाकडे बघत होता. त्याला त्याचेच आश्चर्य वाटत होत कि तो असं का करतोय? याच.

मिटटींग संपताच आशिष बोलला

"ओके. इंद्रजित पुढच्या काही दिवसात तू आम्हाला हॉस्पिटलची जागा दाखवायला आमच्यासोबत चल. आणि एक महत्वाचं हे प्रोजेक्ट रिशा हॅन्डल करणार आहे सो तू नेहमी तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये रहा."

"ओके. आशिष मी माझं शेड्युल चेक करून तुमच्या ऑफिसला त्याबद्दल कळवतो." इती इंद्र

"मग आम्ही आता निघतो." म्हणतच आशिषने पुन्हा एकदा इंद्रजितशी हात मिळवला व रिक्षा आणि तो एकत्रच कल्याणी टेक्सटाईल्स च्या ऑफिसमधून बाहेर निघाले.

रिशा आणि आशिष ऑफिसला न सरळ घरीच गेले तर घरी नवीनच दृश्य होत. अविशा अविनाशरावांना कोणाचेतरी फोटोज दाखवत होत्या तर अविनाशराव अगदी नाईलाज असल्याप्रमाणे ते बघत बसले होते. अविशा त्यांना फोटो दाखवतच म्हणाल्या

"हि कशी वाटते तुम्हाला? मग हि तरी बघा किती सुंदर आहे ना?" त्यावर अविनाश राव म्हणाले

 "अहो आपलं सकाळीच बोलणं झालय ना आशूला एवढ्यात लग्न नाही करायचंय मग तरी तुम्ही त्याच नाव त्याला न विचारता वधु वर सूचक मंडळात घातलत? अहो त्याला समजलं ना तर त्याला हे पटणार नाही."

"माहितीय मला पण आधी आपण बघू चांगली वाटलीच तर आशूला सांगू तुम्हालाही माहित आहेच मुलगी शोधायलाच किती वेळ लागतो म्हणून मीच सुरुवात केली." इति अविशा

ते दोघे पाठमोरे बसलेले असल्याने त्यांना रिशा आणि आशिष आलेले समजलं नाही.

"काय आई? तू माझ नाव वधू वर सूचक मंडळात रजिस्टर केलंयस?" इति आशिष

आशिष चा आवाज ऐकून ते दोघे उठून उभे राहिले समोर आशिष आणि रिशू ला बघून आई थोडी स्थिर झालीच आणि नन्तर स्वतःला सावरून बोलली

"अरे आशु मी असं म्हटलं कि मुलगी बघायला काय हरकत आहे थोडा वेळ जाईल मग तुला हवं तेव्हा लग्न करता येईल." इति अविशा

"अगं पण आई." आशिष जरा चिडूनच बोलला

"आशु सांग आता आईला मला माहितीय तू मला थोडेदिवस थांबायला बोलला होतास पण आता पाणी डोक्यावरुन जातंय. तुझी आई काय ऐकून घेत नाही आहे आज तुझं नाव वधू वर सूचक मंडळात रजिस्टर केलंय उद्या लग्न ठरवून मोकळी होईल त्यापेक्षा तुझ्या मनात जे काही आहे ते सांग. मी आहे तुझ्याबरोबर" इति अविनाश

"आई माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मी लग्न करेन तर तिच्याशीच बाकी कोणाशीही नाही." आशिष थोडं घाबरतच बोलला.

क्रमशः

या कथेला तुमच्या मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसाबद्दल मी तुमची खरच खूप आभारी आहे. कथा लिहिण्याची माझी पहिलीच वेळ आहे. हि कथा मी कोणत्या पानावर किंवा कशावर आधीच लिहून ठेवली नाही आहे. त्यामुळे मला यात पुढे काय होईल हे हि माहित नाही आहे. मी फक्त माझी कल्पना इरा वर लिहितेय आणि त्यातूनच 'तुझीच मी हि अशी' हि कथा साकारतेय.

वाचकहो तुम्ही असेच या कथेच्या शेवटच्या भागापर्यंत माझ्या सोबत राहा.

धन्यवाद.....

तुमचीच निकी....

🎭 Series Post

View all