Jan 27, 2022
प्रेम

तुझीच मी हि अशी भाग - 6

Read Later
तुझीच मी हि अशी भाग - 6

टिपण - हि कथा कोणत्याही सत्य घटनेवर आधारित नाही तसेच या कथेचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही जर तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा हि विनंती.

 

तुझीच मी हि अशी

 

भाग - 6

 

 इथे रिशा खूप खुश होती. आज तिच्या आयुष्यात दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या होत्या पहिली म्हणजे तिने एक टेंडर पाटील इंडस्ट्रीजला मिळवून दिल होत. आणि दुसरी म्हणजे तिच्या पप्पानी तिच्यासाठी केबिन बनवली होती.

 

ती अजूनही ती केबिन बघण्यात गुंगच होती कि तिथे अविनाशराव पुन्हा आले आणि तिला म्हणाले,

 

“बच्चा मीट रश्मी आजपासून हि तुझी तुझी पी. ए. आहे.  शिवाय  हि अगदी वेल ट्रेन्ड आहे सो तुला ती पूर्ण सपोर्ट करेल. बरोबर ना मिस. रश्मी?"   असा प्रश्न त्यांनी रश्मीकडे बघत विचारला.

 

"एस सर.  मी माझं काम अगदी काटेकोरपणे करेन. "  त्यावर रश्मीने त्यांना होकार दर्शवला.

 

इकडे इंद्रजित  घरी जायचा वेळ झाला होता तो  जायची तयारी करतच होता तर तिथे त्याचा पी.ए. मी. कौशल राणे आला आणि त्याला पुढच्या दिवसाचं त्याच शेड्युल सांगू लागला.

 

"ओके, कौशल आय अंडरस्टॅंड."  पूर्ण बोलणं ऐकून तो ऑफिसमधून बाहेर निघून गेला.

 

त्याची कार ड्रायव्हरने ऑफिसच्या एंट्रन्सला आणून लावली होती. त्याचा ड्राइवर पवन हा ड्राइवर कम बॉडीगार्ड होता सो नेहमी तो त्याच्याबरोबरच असायचा.  इंद्रजित गाडीत  बसताच पवनने कार सुरु केली.

 

ती सरळ जाऊन देशमुख मेन्शन च्या एंट्रन्स गेटला थांबली. इंद्रजितची गाडी बघताच चहा घ्यायला बाजूला थांबलेला वाट्चमेन धावत आला आणि  एंट्रन्स चा भला मोठा असा गेट ओपन करू लागला. गेट ओपन होताच इंद्रजितची गाडी व्हाईट जागूआर दिमाखात देशमुख मेन्शन च्या एंट्रन्समध्ये प्रवेश करू लागली.

पवनने गाडी देशमुख मेन्शनच्या मुख्य द्वारावर नेवून थांबवली. तसा इंद्रजितने स्वतःच्या थ्री पीस कोट व्यवस्थित करत देशमुख मेन्शनमध्ये प्रवेश केला.

 

इंद्रजित ला आत येताना बघून हॉल मध्येच काम करत असलेले रामू काका पुढे आले आणि त्याच्या हातातील ऑफिस बॅग घेऊन ती त्याच्या रूम मध्ये ठेवायला गेले. इंद्रजित आतमध्ये येऊन हॉलमध्ये असलेल्या भल्यामोठ्या सोफासेट बसला. आणि त्याने त्याच्या लाडक्या मम्माला हाक मारली.

 

"मम्मा पाणी."

 

तशी त्याची मम्मा त्याच्यासाठी पाणी घेऊन आली.

"इंद्र नको रे स्वतःला आता एवढं दमवुस. जरा कामाचा ताण कमी कर आता.”

इंद्रजितकडे पाणी देत त्या म्हणाल्या.

 

इंद्रजित काही वेळ तसाच डोळे बंद करून सोफ्याला डोकं टेकून बसून राहिला. तश्या  त्या इंद्रजितच्या केसात मायेने हात फिरवत म्हणाल्या.

 

“ निषुने सुद्धा ऑफिस जॉईन केलाय ना मग आता त्यालापण थोडं काम देत जा."

 

 (तर या आहेत इंद्रजित च्या माताश्री म्हणजे प्रीती प्रतापराव देशमुख, अगदी नेहमी प्रसन्न राहणार असं त्यांचं व्यक्तिमत्व.)

 

"हो गं मम्मा देईन त्यालापण काम पुढे जाऊन. सध्या तो काम शिकून घेतोय पुढे त्याला एक्सपेरियन्स झाला कि सांगेन त्यालापण काम. ओके ना?"

तो डोळे उघडून मम्मा कडे बोलला.

थोड्यावेळाने तो उठून स्वतःच्या रूमकडे निघाला. शिड्या चढत असताना त्याला वरून आपल्याच विचारात मग्न शिड्या उतरत येणारी इरा दिसली तर त्याने पुढे होऊन तिच्या डोक्यात तापली मारली. तशी ती भानावर येऊन ओरडली.

 

"ए दादू काश्याला उगाचच माझी कळ काढतोस? माझी मी जात होते ना माझ्या वाटेनं तर तू का मध्ये येतोस?" असं म्हणत एवढुसं तोंड करून इरा त्याच्याकडे बघू लागली.

 

(तर हि आहे इंद्रजित ची छोटी बहीण देशमुख कुटुंबाच शेंडेफळ इरा हि प्रतापराव आणि प्रीती यांची मुलगी, इंद्रजितच्या लाडाने बिघडलेली. इंद्र च आणि तिचे प्रत्येक भाव बहिणी प्रमाणे होणारे छोटे छोटे वाद आणि भांडण घराला घरपण आणि इंद्रजितला कामापासून थोडा अराम देत असत तर निषाद आणि इरा ची जोडी म्हणजे खिल्लारी घरात जर कोणतं कांड झालाच तर ते ह्या दोघांनीच केलेलं असेल हे नक्की. इरा दिसायला इंद्रजितच फिमेल व्हरसिओन फक्त थोडी नाजूक आणि बोलकी)

 

"ओले ओले, उगी उगी बाळा रडू नको." असं म्हणत इंद्र तिथून पळाला.

 

आणि तो काय बोलला हे लक्षात येताच इरा म्हणाली

 

" थांब आज्जूला तुझं नाव सांगते, कि तू मला मारलस" असं म्हणत ती ओरडत तिच्या आज्जूकडे गेली.

 

"आज्जू दादुने मला मारलं."

 

ती त्यांच्या रूम मध्ये गेली तर तिने बघितलं कि आजी आरामखुर्ची वर बसून कोणतीतरी पुस्तक वाचतेय. इरा चा आवाज ऐकून त्यांनी हातातलं पुस्तक बाजूला ठेवलं आणि दरवाजाकडे बघितलं व म्हणाल्या.

 

"काय झालं इरु कोणी मारलं माझ्या लाडक्या नातीला ?"

 

(तर ह्या आहेत कल्याणी प्रकाश देशमुख. इंद्राची आजी कम आई, सध्या त्यांचं वय झालाय पण मुलांचा आनंद आणि सुखी परिवार बघून त्यांची जगण्याची इच्छाशक्ती थोडी जास्त आहे. शिवाय त्यांचे पती हि त्यांच्या बरोबर आहेत.)

 

"काही नाही गं आज्जू. कोणी नाही काय केलं. ते असाच दादूला जरा दम दिला एवढंच" इरा म्हणाली

 

"अस्स होय. मग ठीक आहे मी म्हटलं कोणी ज्याने मारलं माझ्या नातीला त्याचा कणाच धरून ओढते. बार मग आता राहील.) आजी बोलल्या त्यावर इरा म्हणाली 

 

"तू आणि दादूचा कान ओढणार,  आज्जू मलातरी हे सांगू नकोस. दादू म्हणजे तुझ्या आँखोंका तारा आहे ना? तू त्याला मरण तर सोड साधं ओरडू पण शकत नाहीस." असं म्हणत इरा आजीला वेगवेगळे एक्स्प्रेशन करून दाखवू लागली.

 

क्रमशः

तुमच्या कंमेंट्स वाचून  खूप छान वाटत. असाच तुमचा प्रतिसाद असू द्या.

धन्यवाद ....

 

तुमचीच निकी....

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Nikee

......

Simple and hardworking