Jan 27, 2022
प्रेम

तुझीच मी हि अशी भाग - 3

Read Later
तुझीच मी हि अशी भाग - 3

तुझीच मी हि अशी

 

भाग - ३

 

टिपण - हि कथा कोणत्याही सत्य घटनेवर आधारित नाही तसेच या कथेचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही जर तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा हि विनंती.

 

 

रिशा  इंद्रजितच्या ग्रुप गेल्यानांतर इंद्रजित आणि त्याचे मित्र जाऊ लागले. काही वेळात रिशाचा ग्रुपसुद्धा तिथे पोहोचला तर रिशाला तिथे इंद्रजित आणि त्याचे मित्र दिसली तशी रिशा मेघाच्या आड लपायचा निष्फळ प्रयत्न करू लागली परंतु इंद्रजित ला ती दिसलीच आणि तो  म्हणाला

 

"कशी आहे हि? इडियट आहे एकदम, लपायची काय गरज होती सरळ ओळख न दाखवता निघून जायचं होत ना. अरे पण मी का तीचा एवढा विचार करतोय? चल हट इंद्र. नको तिकडे लक्ष नको देऊ."

 

त्याने त्याकडे जास्त लक्ष दिला नाही पण तरी त्याच्या चेहऱ्यावर छान असं स्मितहास्य होत जे त्याने सफाईदारपणे सर्वांच्या नकळत लपवलं आणि त्याच्या मित्रांसोबत पुढे जाऊ लागला.

 

त्याचबरोबर तो मित्रांना म्हणाला

 

"चला रे लवकर आपल्याला घरी  जायचंय. घरी वेळेवर पोहोचलं पाहिजे. उद्या ऑफिसमध्ये खुप महत्वाची मिटिंग आहे ती मलाच अटेन्ड करायची आहे."

 

रिशा आणि तिचे मित्र सुद्धा आज परतीच्या प्रवासाला लागणार होते. दोन रात्री तीन दिवस त्यांनी खूप मजा मस्ती केली होती. त्यांची हि कॉलेज ग्रुप म्हणून शेवटची ट्रिप होती म्हणून त्यांनी ती पूर्णपणे मजामस्ती करत घालवली. ते सगळे आता पुन्हा टेंन्टच्या ठिकाणी जाणार होते तिथे आता काही सामान नव्हते पण राज ची जीप जिने ते सर्व आले होते ती तिथेच होती म्हणून ते तिकडे जाण्यासाठी निघाले. तिथे पोहोचल्यावर सोहमने गाडी चालवायला घेतली व अदिती त्याच्या बाजूच्या सीट वर बसली तर बाकी चौघे पाटी बसले. तीन दिवसाच्या माजमस्तीचा थकवा आता त्यांना चांगलाच जाणवत होता. ड्रायविंग सीट बदलत सोहम राज आणि रिक्षा आळीपाळीने गाडी चालवत होते. असेच ते पुन्हा कोल्हापुरात एंटर झाले आधी त्यांनी अदिती आणि मेघाला घरी सोडलं मग रिशा आणि गायत्रीला रिशा च्या घरी म्हणजे पाटीलवाड्यात सोडलं कारण गायत्री आज रात्री रिशाच्या घरीच राहणार होती. मग सोहम ला त्याच्या घरी सोडून राज त्याच्या घरी गेला.

 

इकडे इंद्रजितसुद्धा त्याच्या घरी पोहोचला होता घर कसलं तो तर महालच होता. प्रवेशद्वारावर दिमाखात देशमुख मेन्शन असं नाव झळकत होत. खूप रात्र झाली असल्याने घरात सगळे झोपले होते म्हणून तो कोणालाही डिस्टर्ब न करता वरती असलेल्या त्याच्या आलिशान अश्या असलेल्या बेडरूम मध्ये जाऊन फ्रेश झाला होऊन मग झोपी गेला.

 

१ वर्षानंतर -

         

रिशाला कॉलेज पूर्ण करून आज वर्ष झालं होत. शेवटच्या वर्षाची एक्झाम दिल्यानंतर काही दिवसातच रिशाने तिच्या पप्पा आणि दादाला मदत म्हणून त्यांचाच बिझिनेस जॉईन केला होता. आज तिची एक महत्वाची मिटिंग होती त्यांना आज खूप मोठं टेंडर मिळणार होत त्याच्या प्रेसेंटेशन साठी तिला कल्याणी टेक्सटाईल्समध्ये जावं लागणार होत  आणि त्या टेंडर च्या प्रेसेंटेशन ची जबाबदारी तिच्या पप्पा आणि दादानं तिच्यावर टाकली होती. सकाळपासुन तिची नुसती  धावपळ सुरु होती. तीच आवरून ती फॉर्मल वियरमध्ये शिड्या उतरत खाली येत होती तर तिची आई तिला कौतुकाने बघत होती.

 

कॉलेज मध्ये जाताना एखादी कॉलेज गर्ल सारखी तयार होणारी त्यांची रिशू हल्ली त्यांना ह्या अश्याच अवतारात दिसायची. चेहऱ्यावर फुल कॉन्फिडन्स व्हाईट  फॉर्मल शर्ट ग्रे कलर पॅन्ट आणि हातात ग्रे कलरचाच थ्री पीस चा ओव्हर कोट हाय पोनीटेल उंच पुरी अशी रिशू खूप सुंदर दिसत होती. अगदी परफेक्ट बिझिनेस वुमन वाटत होती ती. तिच्या पाटील इंडस्ट्रीजच्या स्टाफ आणि क्लाएंट्सवरती तिच्या या छबीच चांगलच इम्प्रेशन पडायच.

 

तीने खाली येऊन आधी आईला मिठी मारली तशी तिची आई म्हणाली

 

"माझी लेक छान दिसतेय आज माझीच नजर लागेल" तिला असं म्हणून स्वतःच्या डोळ्यातील काजळ घेऊन ते तिच्या कानाच्या मागे लावलं त्यांनी. (ह्या आहेत अविशा अविनाश पाटील रिशाच्या आई एक साध्याश्या गृहिणी त्यांचं पूर्ण जागाच त्यांचे अहो आणि त्यांची दोन मुलं यांच्याभोवती फिरत)

 

तस रिशा म्हणाली "मुलांना आईची नजर कधीच लागत नाही"

 

आणि मग जाऊन पप्पांच्या बाजूला डाईनिंग टेबल वर नाश्ता करायला बसली. तसा तिच्या पप्पानी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला त्यांना नेहमीच त्यांच्या दोन्ही अभिमान वाटायचा कि ते दोघंही कधीच चुकीच्या मार्गाने गेली नव्हती याच पूर्ण श्रेय ते त्यांच्या पत्नीला म्हणजे अविशाना द्यायचे कारण त्या शिकल्या सावरलेल्या असून सुद्धा त्यांनी नेहमी त्यांचा पूर्ण लक्ष घर आणि मुलांकडे दिला. (तर हे आहेत मी. अविनाश पाटील रिशाचे पप्पा आणि पाटिल इंडस्ट्रीझचे सर्वेसर्वा )

 

नाश्ता झाल्यावर रिशा पप्पा आणि दादाला भेटून ती मिटिंगसाठी निघणा होती.नाश्ता झाला तसा तिन आई पप्पांच्या नमस्कार केला व मग ती दादाच्या समोर जाऊन ऊभी राहीली तसा तो म्हणाला,

 

“बेस्ट आँफ लक रिशु”

 

व त्याने एका बाजूने तिला मिठी मारत तिला हाय फाय दिला.. ( तर हा आहे रिशाचा मोठा भाऊ आशिष पाटिल दिसायला रुबाबदार आणि जबरदस्त व्यक्तिमत्व उंच आणि धारदार नजर असा. )

 

क्रमशः

आजचा भाग मी पोस्ट करत आहे तरी वाचक हो वाचून झाल्यावर तुमच्या कंमेंट्स लिहायला विसरू नका कारण मी नवीनच असल्याने मला त्या वाचून माझ्या चुका आणि माझ्या लिखाणात मला न दिसलेले बारकावे समजतात व मी त्याप्रमाणे माझ्यात आणि परिणामी माझ्या लिखाणात बदल करण्याचा प्रयत्न करते.

 

धन्यवाद ....

 

तुमचीच निकी....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Nikee

......

Simple and hardworking