Dec 01, 2021
प्रेम

तुझीच मी हि अशी भाग - 27

Read Later
तुझीच मी हि अशी भाग - 27

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

मागील भागात आपण पाहील की .......... रिशाला इंद्रजित भेटून काहितरी बोलायच आहे अस सांगतो. आणि तिला पुर्ण सस्पेन्स मध्ये ठेवत तो त्याचा काॅल कट करतो.

 

आता पुढे .....

 

तुझीच मी ही अशी

 

भाग – 27

 

रिशाचा काॅल कट होताच इंद्रने मोबाईलवर काहीतरी टाईप केल आणि मोबाईल बाजूला ठेवून त्याच काम करू लागला.

 

तर इकडे रिशू ठरल्याप्रमाणे रश्मी सोबत हाॅस्पिटलच्या साईटवर जायला निघाली ती अजूनही इंद्रजितला काय विचारायच असेल हाच विचार करत होती. बाजूला रश्मी ड्रायव्हिंग करत हाती तर रिशा तीच्याच विचारात गुंग विंडोतुन बाहेरच वातावरण अनुभवत होती.

 

तीला हे ही समजल नाही की त्या दोघी कधी हाॅस्पिटलच्या साईटवर येउन पोहोचल्या. गाडी थांबताच रश्मीने रिशाच्या हाताला हात लावून तिला तिच्या विचारातून बाहेर आणत म्हणाली.

 

‘‘हे रिशा काय ग कोणत्या विचारात आहेस एवढी?‘‘

त्यावर रिशा भानावर येत म्हणाली.

 

‘‘नाही गं काही नाही. तू गाडी का थांबवलीस?‘‘ म्हणतच तीने आजूबाजूला बघितल आणि तिला जेव्हा समजल की त्या हाॅस्पिटलच्या साईटवर पोहोचल्या आहेत तेव्हा ओशाळून म्हणाली.

‘‘आपण पोहोचलो पण?‘‘

 

‘‘हो रिशा आपण पोहोचलो सुध्दा. तू इथेच थांब मी पुढे जाउून बघून येते की मी. इंद्रजित देशमुख आणि मी. कौशल आले आहेत का ते.‘‘ अस म्हणतच रश्मी साईट च्या दिशेने पुढे गेली तर रिशाने तिचा गाॅगल डोळ्यावर लावला आणि अलगद गाडिला टेकून उभी राहीली.

 

तर इंद्रजित अर्धा तासापुर्वीच साईटवर आला होता आणि इकडे तिकडे फिरत काम पाहत होता. तेवढ्यात त्याला एक गाडी भरधाव वेगाने साईटच्या दिशेने येताना दिसली. त्याने तीकडे नजर रोखत पाहिल तर त्याला त्या गाडितून रिशा बाहेर येताना दिसली आणि आपसुकच त्याच्या चेहर्यावर एक छान अशी स्माईल आली. तो कितीतरी वेळ तीच्या सर्व हालचाली तसाच पाहत होता. जेव्हा रिशाने तीचा गाॅगल डोळ्याला लावला आणि गाडिला टेकून उभी राहीली तेव्हा तर आपसूकच त्याचा उजवा हात त्याच्या छातिच्या डाव्या साईडला जाउन थांबला आणि तो स्वतःशीच म्हणाला

‘‘हाय तेरी ये अदा कही बिन कहे ही हमे मार ना डाले.‘‘

 

 तो हळू आवाजातच म्हणाला पण त्याच्या बाजूलाच उभ्या असलेल्या कौशलला पुसटस का होईना ऐकायला गेलच आणि तो त्याला विचारत म्हणाला,

‘‘सर काही म्हणालात का?‘‘          

 

कौशलच बोलण ऐकून इंद्रजित त्याच्या विचारातून बाहेर आला आणि कौशलला म्हणाला.

‘‘नाही काही नाही. कौशल तू जा आणि मीस. रिशांच्या पी. ए. ना भेट मी आलोच काही मिनटात.‘‘

 

‘‘ओके सर.‘‘ म्हणतच कौशल तीथून निघून गेला.

 

कौशल जाताच इंद्रजितने लगेचच त्याचा मोबाईल खिशातून बाहेर काढला आणि रिशाचे त्या एकाच पोझ मधील खुप सारे फोटोज काढू लागला.

 

फोटो काढून होताच त्याने त्याचा मोबाईल पुन्हा खिशात ठेवला आणि तो ही कौशल आणि रश्मी जिथे उभे होते तिथे आला आणि रश्मीला उद्देशून म्हणाला.

‘‘सो मीस. रश्मी तूमच्या मॅडम मीस. पाटील नाही आल्या का? मला तर येणार आहेत अस बोलल्या होत्या?‘‘ तो त्याला काही माहीत नाही अस दाखवत म्हणाला.

‘‘नो सर रिशा आल्या आहेत त्या गाडी जवळ थांबल्या आहेत. मी आणते त्यांना बोलावून.‘‘ म्हणतच ती गाडीकडे जायला वळणार तोच इंद्रजित पुन्हा म्हणाला.

‘‘मीस. रश्मी तूम्ही इथेच थांबा मी घेउन येतो त्यांना.‘‘ एवढ घाई घाईत बोलच इंद्र तीथून निसटला सुध्दा.

त्याची अशी गडबड बघून काही क्षण रश्मी आणि कौशल दोघेही गोंधळलेच पण ते काही बोलायच्या आधीच इंद्रजित तिथून निघूनही गेलेला होता. ते दोघेहि तसेच तो गेला त्या दिशेने बघतच राहीले काही वेळ.

तर इकडे इंद्र रिशाच्या गाडीजवळ आला आणि रिशाच्या जवळ येतच तो म्हणाला.

‘‘मीस. रिशा कश्या आहात? आता तुमची तब्बेत कशी आहे?‘‘

इंद्रजितचा आवाज ऐकून रिशा जरा दचकली ती आताही त्याच्या विचारातच होती आणि त्याला अस अचानक समोर आलेल पाहून ती थोडी गोंधळली होती पण तीने लगेचच स्वतःला सावरल आणि ती तीच्यातला नेहमीचा काॅन्फीडन्स परत आणत म्हणाली.

 

‘‘हो मी आता एकदम उत्तम आहे. पहा एकदम ठणठणीत.‘‘ म्हणतच तीने इंद्रजितकडे बघत त्याला एक छानस स्माईल दिल.

 

‘‘ते तर दिसतच आहे. आज तूम्ही तशाच दिसत आहात जश्या मी तुम्हाला पहिल्यांदा पाहील होत. त्या काॅन्फरन्स हाॅलमध्ये तुमच्या चेहर्यावर हाच काॅन्फीडन्स होता त्या दिवशी.‘‘ तो हसतच म्हणाला.

त्यावर रिशा त्याला म्हणाली

‘‘मी. इंद्रजित कदाचित तूम्ही विसरलात पण काॅन्फरन्स वाली आपली झालेली आपली भेट दुसरी भेट होती. पहिली भेट तर आपली केव्हाच झाली होती.‘‘

 

ती बोलत असताना आता तीच्या चेहर्यावर एक खट्याळ स्माईल होती. तीच वाक्य ऐकताच इंद्रने तीला काही उत्तर दिल नाही तर त्या विरूध्द त्या त्याचा मोबाइल खिशातून बाहेर काढला आणि त्यावर काहीतरी करत त्याने मोबाईल कानाला लावत म्हणाला

‘‘हॅलो, कौशल कार ची की घेउून ये मला जरा बाहेर जायच आहे.‘‘ एव्हढ बोलून त्याने काॅल कट करत पुन्हा रिशाकडे बघत उभा राहीला तर रिशाने त्याची नजर स्वतःवर आहे ओळखून इकडे तिकडे पाहू लागली.

 

तेव्हढ्यात तीथे कौशल आणि रश्मी दोघेही येउन पोहोचले. कौशल इंद्रजितकडे कीज देत म्हणाला.

‘‘सर कुठे जायच आहे?‘‘

 

‘‘कौशल तू इथेच थांब मीस. रश्मींना कम्पनी दे मी आणि मीस. रिशा आलोच काही वेळात.‘‘

म्हणत त्याने रिशाकडे बघितल आणि तीला त्याच्याबरोबर येण्यास सांगत तो त्याच्या कारच्या दिशेने निघाला.

 

रिशाने रश्मीकडे बघत तीच्या हातून तीच्या कारची की घेतली आणि तीने तीच्या कारचा डोअर ओपन करून त्यातून स्वतःची आॅफिस बॅग घेतली आणि ती तीला डोळ्यानी येते अस सांगून इंद्रच्या मागे गेली.

 

इंद्रने कार जवळ येवून ड्रायव्हिंग सिटच्या बाजूच्या सिटचा डोअर रिशासाठी ओपन केला आणि तीला आतमध्ये बसण्यासाठी खुणवल.

 

तशी रिशा त्याच्या सांगण्याप्रमाणे सिटवर जावून बसली. ती बसताच इंद्र स्वतः ड्रायव्हिंग सिटवर जाउन बसला आणि त्याने गाडी स्टार्ट करण्याआधी रिशाला म्हणाला

 

‘‘मीस. रिशा मी तूम्हाला सकाळी म्हटल्याप्रमाणे आज आता मी तुम्हाला काहीतरी विचारणार आहे आणि त्यासाठीच आपण एका ठीकाणी जात आहोत.‘‘ अस म्हणाला आणि त्याने पुन्हा त्याच्या मोबाईलवर काहीतरी टाईप करून त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि गाडी स्टार्ट करून त्याने गाडी साईटच्या जागेतून बाहेर काढून पुन्हा शहराच्या दिशेने घेतली.

 

 

 

 

क्रमशः

तुझीच मी ही अशी चा आजचा हा 27 वा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.

आणि प्लिज कमेंन्ट्स लिहायला विसरू नका.

 

धन्यवाद.......

 

तुमचीच निकी........

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Nikee

......

Simple and hardworking