Mar 01, 2024
प्रेम

तुझीच मी हि अशी भाग - 20

Read Later
तुझीच मी हि अशी भाग - 20

टिपण - हि कथा कोणत्याही सत्य घटनेवर आधारित नाही तसेच या कथेचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही जर तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा हि विनंती.

 

मागील भागात आपण पाहील की .......... रिशा आणि इंद्रजितला दोघांनाही त्यांच्या सह्याद्री ट्रीपच्या भेटीची आठवण झाली. आणि दोघांनाही त्यांच्या एकमेकांनविषयीच्या भावनांची सुध्दा जाणिव झाली. तर इंद्रने रिशूच लग्न मोडायच अगदी मनावरच घेतल आहे.

 

तर पुढे .....

 

तुझीच मी ही अशी

 

भाग - 20

 

‘‘सर गंधार त्याच्या पप्पांना म्हणजेच प्रकाशरावांना त्यांच्या बिझीनेसमध्ये मदत करतो. मुलगा तसा आहे चांगला अगदी त्याच्या पप्पांच्या पाउलावर पाउल ठेउन चालणारा‘‘ कौशल एक एक गोष्ट निट इंद्रजितला सांगत होता.

कौशलच बोलण ऐकून इंद्र मनातल्या मनात स्वतःलाच म्हणाला ‘‘मुलगा चांगला आहे बरोबर आहे पण मी माझ्या रिशूच लग्न त्याच्या बरोबर होताना कस बघू.‘‘

इंद्रने पुढे त्याला विचारल ‘‘तो चांगला आहे मान्य आहे पण काहीतरी असेलच ना की ज्याने त्याच रिशांशी ठरलेल लग्न थांबवता येउ शकत.‘‘

‘‘सर तस म्हणाल तर आहे एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गंधारच काॅलेजच्या वेळेपासून एका मुलीवर प्रेम आहे परंतू त्याची कधीच तीला त्याबाबतीत विचारण्याची हिंमत झाली नाही.‘‘ इति कौशल

‘‘अरे म्हणजे ह्याच आधिच कोणावर तरी प्रेम आहे तरीही हा मीस. रिशांशी लग्न करायला तयार झाला. अस कस?‘‘

इंद्रजित विचार करत म्हणाला

‘‘सर त्याच झाल अस की प्रकाशरावांच्या आई शोभा ह्या अविनाशरावांना त्यांचा मानसपुत्र मानतात आणि आता गायत्री आशिष च लग्न ठरल्यामुळे त्यांच नात जुळणार पण ते अजून घट्ट व्हावेत म्हणून शोभांनी अविनाशरावांकडे मीस. रिशांचा हात गंधारसाठी मागीतला पण झाल अस की त्यांनी गंधारला या लग्नासाठी तयार केल ते अस सांगून की त्यांना हे लग्न जमल तर खुप आनंद होईल. म्हणून गंधार या लग्नासाठी तयार झाला.‘‘

कौशल त्याच बोलण पुढे सांगत म्हणाला.

‘‘ओके, मग गंधारच ज्या मुलीवर प्रेम आहे तीची काही माहीती मिळाली आहे का? तीच नाव ती राहते कुठे? काय करते? इत्या.‘‘

इंद्रजितने पुन्हा त्याला विचारले.

‘‘सर तिच नाव आहे दिक्षा सरपोतदार, तीचे पप्पा राजकारणात सक्रीय आहेत. पण ते तुमच्या पप्पांचे कट्टर विरोधी आहेत. मागील वर्षी तुमच्या पप्पांना आमदारकीच्या निवडणूकीत हरवणारे आणि सध्याचे आमदार माननिय आमदार उत्तमराव सरपोतदार यांची एकुलते एक कन्यारत्न. आणि राजकारणी घराण हेच कारण आहे की ज्यामुळे गंधारने दिक्षाजवळ त्याच प्रेम कधी कबूल केल नाही.‘‘

‘‘ओके, बरोबर आहे गंधारच मी अस ऐकलय की त्या उत्तमरावांचा पुतण्या राजीव हा गंुड प्रवृत्तीचा आहे. पण तू हे नाही सांगितलस की ती दिक्षा काय करते नक्की.‘‘ इंद्र थोडा विचार करत म्हणाला.

‘‘सर दिक्षा ह्या एक समाजसेविका आहेत त्यांना गरीब आणि अनाथांनसाठी काम करायला आवडत. आणि एक म्हणजे त्यांना त्यांच्या पप्पांच्या उत्तराधिकारी म्हणून पण ओळखल जात.‘‘

कौशलने त्याच्याकडे असलेली सर्व माहीती पुर्ण इंद्रजितला सांगितली.

‘‘वेलडन कौशल, छान काम केल आहेस तू. यापुढच काम आता मी करेन. पण एक कर की गंधारबरोबर माझी मीटिंग फिक्स कर आणि मुख्य म्हणजे मीस. रिशांचा काॅन्टॅक्ट नंबर मला सेन्ड कर. त्यांच्या तब्बेतीविषयी विचारपूस करायची आहे.‘‘ इंद्रजितने पुढची काम अक्षरशः कौशलवर लादली. त्यावर कौशल म्हणाला.

‘‘ओके सर पण मी. गंधारबरोबर कधीची मिटींग फिक्स करू आज की उद्याची?‘‘

‘‘आज संध्याकाळचीच कर शक्यतो.‘‘ इति इंद्रजित

‘‘आणि सर मी मीस. रिशांचा नंबर तुम्हाला सेन्ड केलाय बघा.‘‘ कौशल त्याच्या मोबाइलमध्ये काहीतरी करत इंद्रजितला म्हणाला. त्याने इंद्रजितला नंबरचा मॅसेज केला होता.

इंद्रजितने मॅसेज चेक केला. आणि म्हणाला ‘‘ओके, आयल काॅल हर लेटर. यू कॅन गो नाउ.‘‘

‘‘ओके सर.‘‘ कौशल म्हणाला आणि इंद्रजितच्या केबिनमधून बाहेर पडला.

कौशल बाहेर जाताच इंद्रने हातातल काम बाजूला ठेवल आणि चेअरला मागे टेकून आरामालत बसला. आता त्याच्या चेहर्यावरची स्माईल बघण्यासारखी होती.

 

इकडे रिशा सकाळी तिच्या टाइमलाच उठली. आज तिचा चेहरा थोडा फ्रेश वाटत होता. तीने तीची एक्झरसाइझ केली आणि अंघोळ वैगरे करून खाली हाॅल मध्ये आली. तर तीने बघितल की पप्पा आणि तीचा दादा आॅफिसला जायला तयार होती. ती दोन दिवस आॅफिसला जाणार नव्हती तरीही त्यांच्याबरोबरच नाश्ता करायला बसली.

‘‘बच्चा कशी आहे आता तुझी तब्बेत?‘‘ आशिषने तीला विचारल.

‘‘दादा आता बर वाटत आहे. काल मला नक्की काय झालेल तेच समजल नाही रे. पण साॅरी रे माझ्यामुळे कालच्या साठी.‘‘ रिशू म्हणाली.

तीच बोलण आशिष आणि अविनाशराव दोघांनाही जर खटकल पण आशिष बोलायच्या आधीच अविनाशराव म्हणाले.

‘‘वा रिशू साॅरी बोलून तू तर आम्हाला परकच केलस ग. मी तूझा बाप आहे आणि हा तूझा सख्खा मोठा भाउ, आम्हाला तूझी काळजी वाटत होती म्हणून आम्ही काल ते सगळ केल. काय मोठी साॅरी बोलणार.‘‘

त्यांच्या बोलण्यावरून रिशूला  समजल की ते खुपच हर्ट झाले आहेत. ती तशीच जागेवरून उठली आणि त्यांच्या समोर खुर्चीजवळ खाली बसत त्यांना म्हणाली.

‘‘पप्पा साॅरी यासाठी की मी तुम्हाला माझ्या मनात काय आहे ते मी तुम्हाला सांगितल नाही आणि त्याचा त्रास मलाच झाला म्हणून आणि परिणामी तुम्हालाही.‘‘

‘‘रिशू पण तू आम्हाला ही सांगू शकत होतीस तू काय विचार करते आहेस ते तूझ्यावर कोणी या लग्नासाठी जबरदस्ती करणार नव्हत. पण उलट तू आजारपण ओढवून घेतलस.‘‘ अविनाशराव म्हणाले.

‘‘पप्पा आधि मला पण नक्की माहीत नव्हत मी का ह्या लग्नासाठी तयार नाही आहे पण आता सगळ क्लिअर आहे. पण एवढ नक्की की माझा ह्या लग्नासाठी नकार आहे. बाकी तूम्हाला मी वेळ आली की सांगेन.‘‘ रिशू ठामपणे म्हणाली.

‘‘ओके रिशू मी तस कळवतो प्रकाशला आणि सोबतच आशू आणि गायूच्या लग्नाच कस करायच विचारतो.‘‘

अविनाशराव तिला आश्वस्त करत म्हणाले.

‘‘ओके पप्पा.‘‘ ती त्यांना मिठी मारतच म्हणाली.

नाश्ता झाला तस अविनाशराव आणि आशिष रिशाला आराम करण्यास सांगून आॅफिससाठी बाहेर पडून गेले.

ते गेलेत तशी रिशू थोडावेळ आईशी बोलत बसली आणि नंतर आराम करण्यासाठी रूममध्ये परत आली. ती रूममध्ये आलीच होती की तीचा मोबाईल वाजला. तीने नंबर बघीतला तर अननोन नंबर वरून काॅल येत होता. ती रिसिव्ह करू की नको हा विचार करतच होती की तो काॅल डिस्कनेक्ट झाला. ती तो परत टेबलवर ठेवणार तोच पुन्हा रिंग वाजायला लागली. तीने बघितल तर पुन्हा तोच अननोन नंबर होता. मग तीने काॅल रिसिव्ह केला आणि बोलू लागली.

‘‘हॅलो..... हॅलो... हॅलो.... हॅलो....‘‘ अस तीन चार वेळा हॅलो करून तीने रागाने काॅल कट केला आणि स्वतःशीच बोलली.

‘‘अरे बोलायच नसत मग काॅल तरी कशाला करतात हे लोक.‘‘ ती बडबड करत होतीच की पुन्हा काॅल आला. तीने काॅल रिसिव्ह केला आणि म्हणाली.

‘‘हॅलो बोलायच असेल तर बोला. उगाच माझा आणि तूमचाही वेळ नका वाया घालवू.‘‘ काॅल करणार्या व्यक्तीला लगेचच समजल की ती चिडली आहे. अजून चिडायला नको म्हणून ती व्यक्ती बोलली.

‘‘हॅलो, मीस. रिशा पाटील ना आपण,‘‘ समोरून विचारल गेल.

‘‘हो पण आपण कोण?‘‘ ती विचार करत मनातच म्हणाली ‘‘हा आवाज तर इंद्रजित सारखा वाटतोय. पण ते कशाला मला काॅल करतील?‘‘

थोड्या वेळाने समोरून पुन्हा तोच आवाज आला.

‘‘मीस. रिशा मी इंद्रजित कल्याणी टेक्स्टाइल्सचा सी.इ.ओ.‘‘ त्याच स्पष्टीकरण ऐकून रिशू जरा स्तब्ध झाली. तीच्याकडून काही उत्तर आल नाही म्हणून इंद्रजित पुन्हा म्हणाला.

‘‘मीस. रिशा अहो मीस. रिशा आहात ना काॅल वर की कुठे गेलात. मीस. रिशा?‘‘ तो तीला काॅलवरून हाक मारत म्हणाला. त्याच वाक्य ऐकून रिशा पुढे म्हणाली.

‘‘हा. मी. देशमुख बोला काय म्हणताय? आज काॅल कशाबद्दल केलात? आज मी घरीच आराम करणार आहे सो आॅफिसला नाही गेले आहे आणि कालसाठी खरच खुप साॅरी. माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी‘‘

‘‘मीस. रिशा त्यात साॅरी कशाला तुम्ही आजारी पडलात यात तुमची काय चुक, पण आता कशी आहे तुमची तब्बेत हेच विचारायला काॅल केला होता.‘‘ इंद्र म्हणाला.

‘‘हा आता ठीक आहे मी. तरीपण पप्पांनी हे दोन दिवस घरीच रहायला सांगितलय.‘‘ ती नाराजीच्या स्वरात म्हणाली.

‘‘बरोबरच आहे त्यांच आराम करा काम काय होतच राहतील. आणि एक तूमच्या मनात जे काय असेल ते कोणाशी तरी बोलत जा. बर वाटेल तूम्हालाच.‘‘ इंद्र म्हणाला.

‘‘मी. देशमुख अस का म्हणालात. मी काय कोणाला नाही सांगितल.‘‘ रिशाने जरा चमकूनच तीला त्याच बोलण समजल नाही अशा अविर्भावात त्याला म्हणाली.

‘‘काही नाही. काळजी घ्या.‘‘ एवढ बोलून त्यान घाईने काॅल कट केला. रिशाला त्याच अस वागण अनपेक्षीतच होत तरी तीने त्याकडे जास्त लक्ष दीला नाही. पण ती आज पुन्हा एकदा खुश झाली होती. कारण काय तर इंद्र आज तिच्याशी आॅफिसशिवाय दुसरच काहीतरी बोलला होता.

 

क्रमशः

 

तुझीच मी ही अशी चा आजचा हा 20 वा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.

पुढच्या भागात आपण बघू की इंद्र गंधारला भेटून त्याच्याशी काय बोलतो आणि इथून पुढे आपण रिशू आणि इंद्रची नवीनच सुरू होणारी प्रेमकहाणी अनुभवणार आहोत.

वाचकहो अशीच शेवटपर्यंत साथ असु द्या तुमची. मी लवकरात लवकर पुढचे भाग देण्याचा प्रयत्न करेन आणि एक कमेंन्ट्स लिहायला विसरू नका.

 

धन्यवाद.......

 

तुमचीच निकी........

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Nikee

......

Simple and hardworking

//