तुझीच मी हि अशी भाग - 19

TUZICH MI HI ASHI PART - 19

टीप:- ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे तसेच ह्या कथेतील नाव व्यक्ती स्थळे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत या कथेचा कोणत्याच जिवित अथवा मृत व्यक्तीशी या कथेचा कोणताच संबंध नाही जर तसाच काही संबंध आलाच तर तो केवळ निव्वळ योगायोग समजावा ही विनंती.

मागील भागात आपण पाहील की .......... रिशाच लग्न कोणाबरोबर ठरवण्याच चाललय आणि तो व्यक्ती कसा आहे आणि काय करतो आणि त्यांच लग्न कोणत्या परिस्थितीत ठरलय या सर्व गोष्टींची इत्यंभूत माहीती इंद्रतजितने कौशलला काढायला सांगितली.

तर पुढे .....

तुझीच मी ही अशी

भाग - 19

अविनाशराव आणि आशिष रिशूला घेउन घरी आले. अविनाशरावांनी हाॅलमध्ये येताच अविशांना हाक मारून बाहेर बोलावल.

‘‘अविशा अविशा आहात कुठे जरा बाहेर येता का?‘‘ अविशा अविनाशरावांचा आवाज ऐकून लगेचच पदराला हात पुसतच बाहेर आल्या. आधिच त्यांना अविनाशराव लवकर घरी का आले आहेत हा प्रश्न पडलाच पण हाॅलमध्ये येताच त्यांना समोरिल दृश्य बघून भिती च वाटली.

अविशा बाहेर येताच त्यांनी बंिघतल की आशिषने रिशूला उचलून घेतल आहे आणि रिशू जवळ जवळ त्राण नाही अशिच दिसत आहे.

त्या तशाच धावत आशिष जवळ जाउन त्या दोघांना विचारू लागल्या.

‘‘आशू काय झालय रिशूला तु अस उचलून का आणतो आहेस तिला? अहो काय झालय हो हिला? माझी हसती खेळती पोर अशी का दिसते आहे मला? अहो सांगा ना?.‘‘ त्या जास्तच काळजीने विचारत होत्या. शेवटी आईचच काळीज लेकराला त्रासात बघून ते पिळवटून निघत जणू.

अविशांना शांत करत अविनाशराव आशिषला म्हणाले.

‘‘अविशा तुम्ही थोड शांत व्हा रिशूची थोडी तब्बेत बिघडली होती पण आता ठीक आहे ती. आशू थोडावेळ रिशूला सोफ्यावरच ठेव नंतर तू थोडा रिलॅक्स झालास की तीला तीच्या रूममध्ये घेउन जा. तीला अजून दोन दिवस तरी आराम करायला हवा आहे.‘‘

त्यांच बोलण ऐकून आशिष ने रिशूला थोडावेळ सोफ्यावर झोपवल. नंतर त्याला वाटल की आता तो तीला वरती नेउ शकतो तेव्हा त्याने तीला वरती तीच्या रूममध्ये घेउन गेला त्याच्या पाठोपाठ अविशासुध्दा रिशाच्या रूममध्ये गेल्या आणि तिला अलगद तिच्या बेडवर त्या दोघांनी झोपवल. अविशांनी तीच्या अंगावर पांघरूण ओढल आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि रूमच्या लाईट्स बंद केली. अविशा आणि आशिष रूमच्या बाहेर पडले तर अविशांनी आशिष चा हात पकडून त्याला थांबवत म्हणाल्या.

‘‘आशू नक्की काय झालय आज? रिशू कशी काय एवढी आजारी पडली?‘‘ त्यांनी परत त्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. तेव्हा तो त्याना खाली जाउन बोलू अस खुणवत खाली हाॅलमध्ये त्यांना घेउन आला आणि पप्पांना म्हणाला,

‘‘पप्पा मला तुमच्याशी थोड बोलायच आहे.‘‘

त्यावर अविनाशराव म्हणाले,

‘‘मला माहित आहे तु कशाबद्दल बोलणार आहेस, तरी तूच बोल तुला नक्की काय बोलायच आहे ते.‘‘

‘‘हो पप्पा तुम्ही समजता आहेत तेच बरोबर आहे. मी रिशू आणि गंधारच्या लग्नाबद्दलच बोलणार आहे. तर अस की पप्पा रिशूला जर हे लग्न करायच नसेल तर आपण तीला जबरदस्ती करणार नाही आहोत. आज तुम्हीच बघीतल तीने काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. पप्पा मला तरी वाटत आहे आपण थोड थांबूया रिशूच्या लग्नाचा विचार करण्यासाठी अजून खूप वेळ आहे आपल्याकडे सो प्लिज तूम्ही प्रकाश काकांशी बोलून घ्या या विषयावर‘‘ आशिष अगदी आर्जवी सुरात अविनाशरावांशी बोलत होता.

‘‘अविनाश जर ह्या नात्याचा रिशूला एवढा त्रास होत असेल तर आपल्याला थांबलच पाहिजे नंतर जर रिशूचा विचार बदललाच तर बघू. तोपर्यंत तुम्ही प्रकाश भाउजींबरोबर बोलून घ्या. हा विषय आणखी वाढण्याआधीच बोला तूम्ही. मला माझी लेक ह्या अवस्थेत बघवत नाही आहे बस.‘‘ अविशासुध्दा आशिषच्या सुरात सुर मिसळत म्हणाल्या त्यांनी तर अविनाशरावांना जशी काय ताकिदच दिली.

ह्या सर्वातच रात्रीच साडे सात कधी वाजले ते ही कोणालाच समजले नाहीत. अविशांनी रिशूसाठी साधा वरण भात केला होता. तो त्यानी तीला स्वतःच्या हातानी भरवला. तीच्या मेडीसिन्स वैगरे व्यवस्थित सर्व देउन त्यांनी तिच डोक स्वतःच्या मांडीवर ठेवून हळू हळू थोपटत तिला झोपवल. रिशू शांत झोपली आहे समजताच त्यांनी तिला प्रेमाने न्याहाळत तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिचा निस्तेज चेहरा बघून त्यांच्या डोळ्यातून अलगद एक अश्रू ओघळला त्यांनी तो एका हाताने पुसला. उठन त्यांनी तिच्या अंगावर पांघरूण ओढल आणि त्या रिशाच्या रूममधून बाहेर आल्या तर त्यांनी बघितल की अविनाशराव दारात उभे राहून त्या दोघींनाच बघत होते. त्या बोेेलणार होत्याच की अविनाशरावांनी एक बोट समोर करून त्यांना न बोलण्यास खूणवल आणि ते दोघही खाली हाॅलमध्ये आले.

खर तर जेव्हा अविशा रिशूसाठी जेवणाच ताट घेउन तिच्या रूममध्ये आल्या होत्या तेव्हाच त्यांच्या पाठोपाठ अविनाशराव तिच्या रूमजवळ आले होते पण त्या दोघींना डिस्टर्बन्स नको म्हणून ते पुढे गेले नव्हते. शिवाय ते रिशूवर थोडे रागावले ही होतेच. कारण कधीही कोणती गोष्ट त्यांच्यापासून न लपवणारी त्यांच्या लाडक्या रिशूने एवढी मोठी गोष्ट त्यांना सांगितली नाही. त्यांना त्याचच थोड वाईट वाटल होत. ;तुम्हाला ही माहीतच असे बाप लेकीच नातच वेगळ असत एखादी गोष्ट मुलगी सगळ्या जगापासन लपवेल पण ती तीच्या लाडक्या पप्पाला नक्कीच सांगते. माझही तसच आहे मला जर माझ्या पप्पांचा राग आला तर त्यांना त्यावेळी सांगते की मी तुमच्याशी बोलणार नाही पण तास दोनतासाने येउन त्यांच्याशी बोलतेच. मी माझे सर्व सिक्रेट्स पप्पांना सांगते.द्ध त्यांनी ठरवल होत की ती एकदम बरी झाली की ते या विषयावर तीच्याशी बोलतील.

रिशू ला त्या रात्री मेडीसिन्सच्या धुंदीत एक स्वप्न पडल. तिला ती वर्षभरापुर्वीची त्यांची सह्याद्रीची ट्रिप दिसत होती. ते सहा जण रान तुडवत सह्याद्री फिरत आहेत आणि फीरता फीरता ती त्या पाच जणांपासून वेगळी होउन तिच्याच धुदित चालत होती आणि पुढे जाउन ती कोणालातरी धडकली तीने बघितल तर त्या व्यक्तीचा चेहरा तीला निटसा दिसत नव्हता. ती झोपेतच बडबडत होती.

‘‘प्रिन्स चार्मिंग. माय प्रिन्स चार्मिग....‘‘ असच काहिस तिची झोपेतली ती निरागस स्माईल तापाच्या तिच्या निस्तेज चेहर्यावर वेगळीच चमक दाखवत होती.

काही वेळाने तिने स्वप्नात पाहिल की त्या व्यक्तीचा चेहरा आता तीला थोडा थोडा दिसतो आहे. जेव्हा तिला त्या व्यक्तीचा चेहरा पुर्ण दिसला तेव्हा ती मोठ्याने ओरडतच उठली.

‘‘मी. इंद्रजित देशमुख‘‘ तिने तीचे दोन्ही हात तोंडावरून फिरवले. ती थोडी शाॅक झाली होती. तीला आता तो सह्याद्रीच्या ट्रिपचा पुर्ण दिवस आठवत होता आणि त्या दिवशीची ती व्यक्ती जीला रिशू चालता चालता तंद्रीत धडकली होती. आणि त्याच वेळी रिशूला त्या व्यक्तीच्या डोळ्यांनी घायाळ केल होत. जस की लव्ह अॅट फस्ट साईट झाल होत तिला पण कामाच्या व्यापात तिने ते एक आकर्षण म्हणून सोडून दिल होत पण आता तिला कळून चूकल होत की तीला इंद्र आवडतो आणि हेच कारण होत की तिला गंधारशी लग्न करण म्हणजे एक मोठ ओझ वाटत होत आता तिला तिच्या मनातला सगळा गोंधळ पुर्ण क्लिअर झाला होता.

आता तिच्या चेहर्यावर एक आकर्षक अशी स्माईल होती. ती थोड्यावेळाने इंद्रजितचाच विचार करत झोपी गेली.

तर तिकडे इंद्रजित चा आजचा दुसरा दिवस आॅफिसमध्येच झोपायचा. तो छानपैकी झोपला होता तर त्यालापण स्वप्न पडल ते ही त्याच दिवशीच ज्या दिवशी तो त्याच्या मित्रांबरोबर सह्याद्री ट्रेकला गेला होता तो. त्याला दिसत होत की ते तीघ एका ठीकाणी थांबून तीथला निसर्ग बघत आहेत. तेवढ्यात त्याला कोणीतरी येवून धडकल त्याने त्या व्यक्तीला अलगद त्याच्या हातावर झेलल पण त्याने बघितल की ती एक मुलगी होती. जिच्या चेहर्यावर तीचे लांब सडक काळे केस आहेत. ती थोडी घाबरलेली होती. काही सेकंद तसेच उभे होते त्यानंतर त्याने तीला सरळ उभे केल तर ती मुलगी केस बाजूला करत उभी राहीली आणि इंद्रजितला त्या मुलीचा चेहरा पुर्ण दिसला. तो चेहरा दिसताच इंद्र झोपेतुन खाडकन जागा होत उठून बसला. आणि विचार करू लागला.

‘‘तर हे आहे त्या दिवशीच पुर्ण स्वप्न. त्यादिवशी सह्याद्री च्या इथे मला धडकलेली ती मुलगी म्हणजे मी. रिशा आहेत तर. म्हणूनच त्या मला ओळखीच्या वाटत होत्या तर. पण आता त्या तेवढ्या भित्र्या वाटत नाहीत. पप्पांना बिझीनेसमध्ये मदत करतायत. पण त्यांच्या लग्नाचा हा घोळ.‘‘

त्याला रिशाच्या लग्नाच आठवताच तो पुन्हा उदास झाला आणि विचार करू लागला.

‘‘त्या मला तेव्हाच आवडल्या होत्या पण अनोळखी व्यक्ती म्हणून मी दुर्लक्ष केल पण आता नाही. देवाने पुन्हा त्यांना माझ्या समोर आणल आहे म्हणजे त्याला ही हेच वाटतय की आम्ही दोघांनी एकत्र याव. मी एवढच म्हणेन की मी त्यांना माझ प्रेम पटवून देण्याचा पुर्ण प्रयत्न करेन पण इंद्र एकदम प्रेम नाही प्रेमाची पहिली पायरी म्हणजे मैत्री ती आधी करावी लागेल तुला‘‘ तो हसतच स्वतःशीच बोलत होता. त्याने तसाच उजवा हात केसावरून फिरवला आणि पुन्हा झोपी गेला.

सकाळी उठून इंद्रने त्याची प्रातःविधी ची सगळी काम आटपली आणि छान फ्रेश मुड मध्ये तो त्याच्या रेस्टरूमचा दरवाजा निट बंद करून केबिनमध्ये दाखल झाला.

तो त्याच्या कामात व्यस्त झाला. आज त्याच्या चेहर्यावर एक वेगळीच चमक होती. आणि त्याची स्माईल तर नेहमी प्रमाणे कीलर होती.

तो काम करत होता तेवढ्यात कौशल त्याला विचारून केबिनमध्ये दाखल झाला.

इंद्रने हातातली फाइल चेक करतच त्याला विचारल,

‘‘कोेैशल मी काल तूला काहीतरी काम सांगितल होत? लक्षात आहे ना?‘‘

‘‘हो सर आहे लक्षात मी आणलीय माहीती काढून. मी मीस. रिशांच्या पी.ए. रश्मीशी बोलून त्यांच लग्न कोणाशी ठरत आहे अस विचारल आणि त्यांना हे ही सांगितल की त्या ह्या विषयाबद्दल कोणालाही काही बोलणार नाहीत. आधि तर त्या सांगण्यास तयार नव्हत्या पण नंतर त्यांना मी आजच्या प्रकाराचा संबंध त्या व्यक्तीशी असू शकतो हे त्यांना सांगितल तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीच नाव सांगितल. तर मीस. रिशांच लग्न ज्या व्यक्तीशी ठरत आहे तो म्हणजे गंधार प्रकाश शिंदे. शिंदे गारमेंट्सचे सर्वेसर्वा मी. प्रकाश शिंदे यांचा ज्येष्ठ पुत्र.‘‘

कौशल सांगता सांगता थांबला.

‘‘एक मिनिट कौशल शिंदे गारमेंट्स म्हणजे आपल्या एका युनिटचा कच्चा माल येतो ती कंपनी काय?‘‘

‘‘हो सर तेच आहेत हे. मला त्यांच नाव फक्त हव होत म्हणून मी मीसत्र रश्मी शी काॅन्टॅक्ट केला बाकी माहीती मी काढली ती अशी की ....  मी. अविनाश आणि मी. प्रकाश हे बालपणीचे मित्र आहेत परिणारी मीस. रिशा आणि मी. प्रकाश यांची कनिष्ठ कन्या गायत्री शिंदे ह्या बेस्ट फ्रेंड आहेत. त्यामुळे गायत्री यांच मीस. रिशांच्या घरी नेहमीच येण जाण आशिष आणि गायत्री यांच प्रेम झाल आणि हे मी. अविनाश पाटिल आणि त्यांच्या पत्नी अविशा पाटिल यांना समजताच त्यांनी मी. प्रकाश शिंदेंनकडे गायत्रीला आशिष साठी मागणी घातली. आणि गायत्री आशिष च लग्न ठरवल पण त्याचबरोबर तिथेच मी. प्रकाश यांच्या आई शोभा शिंदे यांनी मीस. रिशांचा हात गंधार साठी मी. अविनाश यांच्याकडे मागितला.‘‘

कौशल पुन्हा बोलता बोलता थांबला. त्याला थांबलेल बघून इंद्रजितने त्याल विचारल.

‘‘ओके कौशल पण गंधार बद्दल काही माहिती आहे का? जस की त्याच वैयक्तीक आयुष्य. तो कसा आहे वैगरे.‘‘

क्रमशः

तुझीच मी ही अशी चा आजचा हा 19 वा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.

तर पुढच्या भागात आपण बघु की कौशल इंद्रजितला गंधारबद्दल अजून काय काय माहीती देतो. पण आता एवढ तर नक्की इंद्र रिशूच लग्न मोडण्यासाठी सगळे प्रयत्न नक्की करणार.

आणि कमेंन्ट्स लिहायला विसरू नका हं.

धन्यवाद.......

तुमचीच निकी........

🎭 Series Post

View all