तुझीच मी हि अशी भाग - 15

TUZICH MI HI ASHI PART - 15

टीप:. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे तसेच ह्या कथेतील नाव व्यक्ती स्थळे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत या कथेचा कोणत्याच जिवित अथवा मृत व्यक्तीशी या कथेचा कोणताच संबंध नाही जर तसाच काही संबंध आलाच तर तो केवळ निव्वळ योगायोग समजावा ही विनंती.

तूझीच मी ही अशी

भाग: 15

इंद्र आॅफिसमध्ये पोहोचला. तो सरळ त्याच्या केबिनमध्ये गेला. तिथे त्याला काहीतरी काम करणारा कौशल दिसला तर इंद्र ला येताना बघून कौशल ने त्याला विष केल.

‘‘गुड माॅर्निंग सर‘‘ इति कौशल

‘‘गुड माॅर्निंग कौशल. मी काल सांगितलेल काम झाल काय?‘‘ इंद्रने कौशल ला विचारल

‘‘हो सर झाल काम. तुम्हाला रूम बघायची असेल तर चला.‘‘ कौशल इंद्रला त्याच्या केबिनला अटॅच असलेल्या पण नविनच दरवाजाकडे इशारा करत म्हणाला.

‘‘ओके, लेट्स गो. आय वान्न सी हाउ इज माय आॅफिस रेस्ट रूम.‘‘ इंद्र त्याला बोलतच केबिनच्या त्या नविन दरवाजातून त्या रूममध्ये प्रवश करत म्हणाला.

कौशल ने इंद्रच्या केबिनच्या बाजूला असलेल्या एका केबिनला पुर्णपणे रेनोवेट करून तिला रेस्ट रूममध्ये कन्व्हर्ट करून घेतल होत. ती रूम सर्व सुविघानी संपुर्ण होती. इंद्र ने बधितल की त्या रूमला एकच डोअर आहे आणि तोपण फक्त त्याच्या केबिनमघ्येच ओपन होतो. शिवाय तिथे एक डबल बेड त्याच्या घरच्या किंग साइज बेडच्या समोर तो लहानच होता पण त्याच्यासाठी तो कम्फर्टेबल होता त्याचबरोबर एक सोफा सेट  एक कबर्ड आणि छोटासा दोन माणसांचा डायनिग टेबल सुध्दा तिथे अरेंज केल होत. त्यावर इलेक्ट्रिक केटल आणि काही कप्स सुध्दा होते त्याच्या केबिनच वाॅशरूम सूध्दा त्या रूमला अटॅच करण्यात आल होत आधि त्या वाॅशरूममध्ये बाथटब आणि शाॅवर नव्हता पण आता तिथे ते सर्व अॅड करण्यात आल होत शिवाय त्याच्या वर्कआउटच काही सामानही तेथे होत.

इंद्र ती रूम बघून खूश झाला आणि कौशल ला म्हणाला

‘‘गुड, कौशल आय रियली लाइक इट पण एक ह्या रूमची चावी माझ्याकडे असेल. आणि ह्या रूमची साफसफाई मी आॅफीसमध्ये असतानाच होईल. मी नसताना कोणी या रूममध्ये येणार नाही. ओके.‘‘

तो कौशलला इंन्स्ट्रक्शन देतच तिथून त्याच्या केबिनमध्ये आला.

‘‘ओके सर, मी लक्षात ठेवेन.‘‘ कौशल इंद्रजितला उत्तर देत म्हणाला.

‘‘आणि एक पाटील इंडस्ट्रिजमध्ये काॅल कर त्यांना उद्याच्या अर्जंट मिटींगबद्दल कळव‘‘ इंद्रजित पून्हा म्हणाला.

‘‘आके सर, आयल काॅल देम.‘‘ कौशल इंद्रजितला होकार देत म्हणाला

‘‘सो कौशल आजच माझ शेड्यूल मला सांग पटपट चल.‘‘

त्याला म्हणाला कौशलने त्याला आजच्या दिवसभराच शेड्यूल सांगितल आणि त्याच्यासाठी त्याची स्पेशल काॅफी आणण्यासाठी केबिनमधून बाहेर निघाला.

कौशल केबिनमधून गेला आणि इकडे इंद्रजितची काम सुरू झाली.

रिशाच्या घरी रिशा आॅफिसला जाण्यासाठी निघाली. ती खाली आली तर तीने बघितल की तीचे पप्पा अजून घरीच होते. ते आॅफिसला गेले नव्हते. ती शिड्या उतरून खाली येताच त्यांना म्हणाली

‘‘साॅरी पप्पा मला आज उठायला थोडा उशीर झाला त्यासाठी पण तूम्ही अजून आॅफिसला गेला नाहीत?‘‘

ती बोलत च होती की पप्पानी तीला हात धरून डायनिंग टेबलवर आणून बसवल आणि म्हणाले

‘‘हो बाळा, काय असत ना? काही वेळा अस होत ना की पप्पाल्या त्याच्या मुलांची काळजी वाटते. की माझी मुल कोणत्या एका गोष्टीच टेन्शन तर घेत नाहीत ना? तर त्याबद्दल त्यांच्याशी बोलावस वाटत पप्पाला म्हणून म्हटल आज आपण एकत्रच आॅफिसला जाउया. म्हणून थांबलो. बाकी काही नाही.‘‘

ते स्वतः ही तिथेच तिच्या बाजूला बसले त्यांनी अविशांना सांगितल होत की ते रिशाबरोबरच नाश्ता करतील. म्हणून रिशाला खाली आलेल बघून त्या सूध्दा त्या दोघांना वाढायला आल्या होत्या. रिशा त्या दोघांना ती अगदी व्यवस्थित आहे असच दाखवत होती पण तीला माहीत नव्हत की तीचे हे हावभाव तीच्या पप्पाने रात्री डिनरच्या वेळेसच ओळखले होते पण उद्या बोलू असा विचार करून ते गप्प राहीले.

‘‘पप्पा मी आणि टेन्शन नाही ओ. आय अॅम आॅल राइट.‘‘ अस म्हणतच तीने स्वतःची नजर नाश्त्यावर रोखली आणि नाश्ता करू लागली.

‘‘बाळा तूला तूझ्या फिलिंग्स आमच्यापासून लपवायची काही एक गरज नाही आहे. आम्ही हे लग्न तूझ्यावर लादणार नाही आहोत. तूला जर योग्य वाटल तरच आपण विचार करू नाहीतर नाही आणि मी प्रकाशला बोललो आहे कालच की आपण आधी निर्णय नाही घेत आहोत जर गंधार ह्या लग्नाला तयार असेल तरच आपण विचार करू आणि त्यानंतर पण थोडा वेळ घेउन कळवू म्हणून.‘‘ त्यानी तीला बर्यापैकी समजावण्याचा प्रयत्न केला.

रिशा त्यांच बोलण ऐकून थोडी रिलॅक्स झाली आणि त्यांना म्हणाली.

‘‘थॅंक यु पप्पा, पण एक विचारू?‘‘

ती त्याना विचारत म्हणाली

‘‘हो बाळा विचार ना. तू कधीपासून मला काही विचारण्यासाठी अस बोलू लागलीस.‘‘अविनाशराव म्हणाले

‘‘तस नाही ओ पप्पा. ते जाउदे मला सांगा तूम्हाला काय वाटत? ह्या बद्दल आणि गंधारबद्दल?‘‘ तीने थोड अडकत अडकत अविनाशरावांना विचारल

‘‘माझ म्हणशिल तर मला गंधार पसंत आहे पण एक तो नक्की तो तूलाही पसंत पडायला हवा तरच नाही तर मी ही तूझ्यासोबत च आहे. तू म्हणशिल तेच होईल.‘‘ ते तिला ठळक शब्दात बोलले.

‘‘ओके पप्पा मी ही विचार करूनच सांगेन. चला आता आपल्याला आॅफिसला जायला उशिर होतोय.‘‘ अस म्हणतच तीने तिची बॅग ओव्हर कोट आणि तीचा गाॅगल उचलला आणि तीच्या आईला बाय बोलून ती बाहेर निघाली. तीच्या पाठोपाठच अविनाशरावही बाहेर निघाले.

इंद्रजिच्या आॅफिसमध्ये तो अजूनही त्याच्या कामातच गुंतलेला होता. तेवढ्यात त्याला आठवल की त्याला त्याचे कपडे आणि बाकी काही लागणार्या वस्तू मागवून घ्यायच्या आहेत. त्याने लगेचच त्याच्या मम्माला काॅल केला. काही रिंग होताच त्याच्या मम्माने काॅल रिसिव्ह केलो आणि म्हणाल्या

‘‘हॅलो, इंद्र बोल. काही काम होत का?‘‘

‘‘हो ग मम्मा, मी आजपासून आॅफिसमध्ये राहणार आहे माहीत आहे ना तूला? तर मी माझे कपडे आणि काहि लागणार्या वस्तू आणायला विसरलो. तर तू प्लिज त्या पॅक करून ठेव ना मी कौशलला ते रिसिव्ह करायला पाठवतो. ओके.‘‘ मम्माला उत्तर देत इंद्र म्हणाला

‘‘ओके इंद्र पण अरे रूम झाली का तयार. म्हणजे तू नक्की रहाणार कुठे हे सांग मला.‘‘ मम्मा नी त्याला प्रतिप्रश्न केला.

‘‘हो मम्मा रूम झाली तयार. म्हणूनच तूला सांगतोय ना बॅग पाठवायला. तूझी बॅग पॅक करून झाली की मला काॅल कर मग मी कौशलला पाठवतो घरी. ओके ना?‘‘

इंद्रने त्यांना उत्तर दिले.

‘‘इंद्र तू त्याला कश्याला पाठवतो आहेस. मीच येते तूझी बॅग घेउन, मला ही तूझी ती रूम बघायची आहे. सो मी येते आहे.‘‘त्यानी त्याला ठणकाउन सांगितल.

‘‘ओके मम्मा ये मग तूच.‘‘ इंद्र त्यांना होकार देत म्हणाला. त्याने फोन ठेवला आणि पून्हा कामात मग्न झाला.

अविनाशराव अणि रिशा आॅफिसला पोहोचले तेव्हा त्यांना आॅफिसला पोहोचायला दुपारचे बारा वाजले होते. ते दोघेही आपआपल्या केबिनमध्ये गेले.

रिशा जेव्हा तिच्या केबिनमध्ये गेली तेव्हा तीच्या मागोमाग तीची पी.ए. रश्मी सूध्दा केबिनमध्दे येउन तीच्या समोर उभी राहीली. आणि तीला तीच आजच शेड्युल सांगू लागली. ते सांगून झाल्यावर ती म्हणाली

‘‘आणि मॅम,‘‘ ती पुढे बोलणार त्या आधीच रिशा म्हणाली

‘‘रश्मी तुम्ही माझ्याहून वयाने आणि अनुभवाने मोठ्या आहात. त्यामुळे कीतीवेळा मी तूम्हाला सांगितल आहे की तूम्ही मला फक्त रिशाच म्हणा. तरी तूमच तेच चालू आहे. आता लक्षात ठेवा नाहीतर जेवढ्यावेळा तूम्ही मला मॅम म्हणाल तेवढ जास्तिच काम मी तूम्हाला देईन. चालेल तूम्हाला?‘‘ ती तीला सरळ धमकावतच म्हणाली.

‘‘ओके नाही म्हणणार यापुढे रिशाच म्हणेन पण ते जास्तिच काम नको देउ.‘‘ अस म्हणाली ती थोडी घाबरण्याचे एक्सपे्रशन करतच म्हणाली तर त्यावर त्या दोघीही खळखळून हसल्या.

‘‘ओके तर रिशा उद्या दुपार नंतर साडेतीन वाजता तुझी कल्याणी टेक्स्टाइल्समध्ये हाॅस्पिटलच्या प्रोजेक्ट संदर्भात एक अर्जंट मीटींग आहे. त्यांच्या आॅफिसमधून आताच काॅल आला होता.‘‘ रश्मी म्हणाली

‘‘मिटींग आणि उद्या पण नक्की कशाबद्दल मिटींग आहे काय सांगितल आहे का त्यांनी.‘‘ रिशाने तीला विचारल.

‘‘तस काही सांगितल नाही आहे. पण ते म्हणाले की ही मिटींग फक्त तूझ्या आणि कल्याणी टेक्स्टाइल्सच्या सी.ई.ओ. मी. इंद्रजित मध्येच होणार आहे. आणि ती ही त्यांच्या केबिमध्येच होईल.‘‘ रश्मी तीचा विषय पुर्ण करत म्हणाली.

‘‘ओके मग ठीक आहे. तू ही तयार रहा. आपण दोघी जाउ उद्या मिटींगला.‘‘ रिशा म्हणाली.

रश्मीने तीला मान हलवतच होकार दिला आणि ती रिशाच्या केबिनमधून बाहेर गेली.

रात्रीचे आठ वाजले होते. इंद्रजितच्या मम्माने त्याच्या डिनरचा टिफिन आॅफिसमध्ये पाठवून दिला होता. आणि निषाद सुध्दा आॅफिस सुटल्यावर तिथेच त्याच्या केबिनमध्येच होता. त्याला जेव्हा हे समजल की साक्षीमुळे इंद्रजित काही दिवस आॅफिसमध्येच राहणार आहे तेव्हा त्याने हे रणजितला सांगायचा विचार केला होता पण इंद्रजित ने त्याला तस करण्यास नकार दिला होता म्हणून तो गप्प होता. पण इंद्रजितला थोडी सोबत म्हणून तो तिथे त्याच्याबरोबर काहीवेळ बोलत थांबला होता.

तो रात्री आठ वाजता घरी गेला. निषाद गेल्याबरोबर इंद्रजित ने टिफिन उचला आणि तो केबिन निट आतून लाॅक करून रेस्ट रूममध्ये गेला आणि डिनर करून शांत झोपी गेला.

इकडे रिशाकडे सर्व डिनर करत होते. छान शांत वातावरणात डिनर करून झाल त्यांच आणि ते सर्व हाॅलमध्ये येउन बोलत बसले होते. तर तेवढ्यात अविनाशराव म्हणाले.

‘‘तर रिशू बाळा अविशा आणि आशू आज संध्याकाळी आॅफिसमध्ये मला प्रकाशचा काॅल आला होता.‘‘ ते एवढ बोलून थांबले.

प्रकाशच नाव ऐकताच रिशू थोडी शांत झाली आणि हे त्या तीघांनाही समजल.

‘‘अहो, मग काय म्हणाले ते. गंधारच काय म्हणण आहे. काही बोलले का भाउजी.‘‘

त्या थोड्या शांत आवाजातच म्हणाल्या त्याना रिशूला बघून थोड टेन्शन् आल होत.

‘‘प्रकाश म्हणाला की त्याने गंधारला विचारल आपल्या रिशू बद्दल आणि गंधारने ह्या लग्नासाठी होकार कळवला आहे. ते सर्व आपल्या निर्णयाची वाट बघतायत आता. त्यांच म्हणण आहे की जर जमल तर दोन्ही साखरपूडे एकदम करून टाकू.‘‘ अविनाशरावांनी त्याना सांगितल

‘‘अहो पप्पा पण आपल काय ठरल होत. आपण रिशूला विचारूनच पुढच ठरवू, हो ना? मग आता हे काय?‘‘ आशिष रिशाकडे बघतच म्हणाला.

‘‘अरे हो रे आशू मी म्हणालो आहे त्याला मी रिशाशी बोलूनच काय तो निर्णय घेइेन. अस तो हो म्हणाला आहे.‘‘ ते तसेच रिशूच्या बाजूला जाउन बसत म्हणाले आणि पुढे म्हणाले

‘‘रिशू तूझा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे पण एक नक्की की गंधारला आपण निट ओळखतो त्यामुळे तो आणि त्याच्या घरचे कसे आहेत हे आपल्याला माहित आहेच म्हणून मी एवढच म्हणीन अनोळखी पेक्षा ओळखीचे बरे.‘‘

क्रमशः

तूमच्या कमेन्टस वाचून मला खूप आनंद होतो. आजचा अपडेट वाचून तूम्हाला कस वाटल ते नक्की कळवा.

धन्यवाद.....

तुमचीच निकी........

🎭 Series Post

View all