तुझीच मी हि अशी भाग - 10

TUZICH MI HI ASHI PART - 10

टीप:- ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे तसेच ह्या कथेतील नाव व्यक्ती स्थळे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत या कथेचा कोणत्याच जिवित अथवा मृत व्यक्तीशी या कथेचा कोणताच संबंध नाही जर तसाच काही संबंध आलाच तर तो केवळ निव्वळ योगायोग समजावा ही विनंती.

तूझीच मी ही अशी

भाग: 10

’’काय दादा तूझ प्रेम आहे? हे कधी झाल? मला काहीच कस माहीत नाही?’’

 रिशू आवाक होउून आषिष कडे पाहत म्हणाली  त्यावर अविशा तिला टोकतच पूढे म्हणाल्या

’’रिशू बाळ तु जरा गप्प बस मला जरा ह्याला काही प्रश्न विचारू देत तोपर्यंत तू थोड्यावेळल त्या सोफ्यावर निवांत बस.’’

अविशा रिशूला सोफ्याकडे बोट दाखवत म्हणाल्या. व स्वतः पुन्हा आशिष जवळ येवून उभ्या रहात म्हणाल्या

’’आशू काय म्हणालास तुझ कोणा मुलीवर प्रेम आहे.’’ अविशा आशिष ला उद्देशून म्हणाल्या.

’’हो आई माझ एका मुलीवर प्रेम आहे आणि मी हे सर्व पप्पाना जवळ जवळ वर्षभरापुर्वी सांगितल आहे आणि त्यांना मी पसंत केलेली मुलगी पसंत ही आहे. माझी खात्री आहे तूला आणि रिशूलासुध्दा माझी पसंत नक्की आवडेल. बरोबर ना पप्पा?’’

’’हो अविशा मला आशूने सांगितल आहे त्याच्या प्रेमाविषयी आणि हे ही खर आहे की मला मुलगी पसंत आहे मी तर तेव्हाच लग्नासाठी म्हणत होतो मी लगेच तीच्या वडीलांशी बोलायलासध्दा तयार होतो पण,’’

एवढ बोलून अविनाशराव गप्प बसले. त्यांना गप्प झालेल पाहून अविशा म्हणाल्या,

’’आता पण का? तुम्हाला मुलगी पसंत आहे म्हणजे ती मुलगी नक्कीच चांगली असणार यात काहीच शंका नाही. मग काय झाल. सांगा ना हो. इथे माझा जीव टांगणीला लागलाय आणि तुम्ही दोघे काही नीट सांगत नाही आहात.’’

अविशांचा गोंधळ पाहून अविनाशराव पून्हा म्हणाले

’’अहो, ह्यासाठी आशूचाच नकार होता त्याच अस म्हणण आहे की त्याला त्याच स्वतःच नाव करायच आहे आणि त्या मुलीला ही तीच करीअर करायच आहे. म्हणून तो मला यावर एवढ्यात काय विषय नको अस म्हणाला म्हणून मी काही बोललो नाही आणि तूम्हालाही त्याबद्दल काही सांगितल नाही.’’

त्यांच बोलण ऐकून अविशा पुढे म्हणाल्या

’’ओके ठीक आहे एवढच ना मी म्हटल काही मोठी अडचण आहे की काय. ते सोडा आता मला सांगा मुलगी कोण आहे ती?’

त्यांच्या या प्रश्नावर आशिष त्यांना उत्तर देत म्हणाला

’’आई तीला तु आणि रिशू तर चांगलेच ओळखता बघा विचार करून काही समजतय काय?’’

’’मी ओळखते अशा कोणा मुलीला आणि रिशूसुध्दा ओळखते’’ त्या बडबड करतच रिशाला हाक मारत म्हणाल्या

’’रिशु बाळ इथे ये आणि हा आशू बघ काय म्हणतो आपण त्या मुलीला ओळखतो म्हणे तुला कोणी आठवतय का अस? जरा सांग बघू’’

त्यावर रिशू थोडा विचार करतच म्हणाली

’’नाही ग आई मला तर काहीच समजत नाही आहे की दादा ला जी मुलगी आवडते तीला तु ही आणि परिणामी मी ही ओळखते. अस कस होउ शकत?’’

तीच्या चेहर्यावरचा तो भला मोठा प्रश्न चिन्ह बघून तीचा पप्पा आशिष ला उद्देशून म्हणाले

’’आशू आता जास्त ताणत नको बसू नाहीतर ह्या दोघी तूझा आणि तूझ्याबरोबर माझाही जीव घेतील त्या आधीच ह्यांना सगळ व्यवस्थीत सांगून टाक.’’

त्यांना होकार देत आशिष पूढे म्हणाला

’’आई रिशू मला जी मुलगी आवडते ती म्हणजे रिशूची सख्खी मैत्रीण गायत्री प्रकाश शिंदे’’

’’काय म्हणालास दादा गायू आणि तू हे कधी झाल?’’

त्याच वाक्य पूर्ण होताच रिशू जवळ जवळ ओरडलीच

तीला तोडतच अविशा खूश होतच आशूकडे बघत म्हणाल्या

’’गायत्री व्वा आशू मानल पाहीजे तूझ्या पसंतीला मला पण मुलगी पसंत आहे.’’ त्यावर त्या अविनाशरावाना म्हणाल्या

’’अहो मी काय म्हणते आपण उद्याच जाउन प्रकाश भाउजी आणि प्रियल वहीनींशी बोलून घेउ मला यात आता कोणताच वेळ घालवायचा नाही आहे आणि जर तसच असेल तर फक्त बोलणी करून ठेवू लग्न नंतर करता येईल.’’

त्यांच बोलण ऐकून अविनाशरावांना ते काही प्रमाणात पटल देखील व ते त्यांना साथ देतच पूढे म्हणाले

’’आशू आई म्हणतेय ते अगदि बरोबर आहे आपण बोलणी करून घेउ तसही लग्नाची तयारी आणि बाकी सर्व आवरण्यातच जास्त वेळ जातो. पण एक आम्ही आमच मत तूझ्यावर लादत नाही आहोत तु सांग तुला मान्य असेल तरच उद्या आपण बोलून घेउ.’’

’’ठीक आहे आई पप्पा तस असेल तर आपण बोलणी करून घेउ पउ लगेच उद्याच नको दोन दिवस जाउदेत मध्ये मी गायू बरोबर बोलून घेतो मग बोलू आपण, चालेल ना आई?’’

आशिष अविशाना विचारत म्हणाला

’’चालेल काय पळेल पण त्याआधी मला माझ्या सूनेला भेटायच आहे तस आम्ही खुप वेळा भेटलो आहोत पण तेव्हा मी तीच्या मैत्रीणीची आई आणि ती रिशूची मैत्रिण याच नात्याने भेटलो आहोत आता तू स्वतः तीची माझी सून म्हणून ओळख करून देणार आहेस. ठीक आहे ना?’’

त्यावर आशिष त्याना होकार दर्षवतच म्हणाला

’’ओके आई मी बोलतो तीच्याशी’’

पण त्याच वाक्य पूर्ण व्हायच्या आतच रिशू त्याला तोडतच म्हणाली

’’दादा तू थांब मीच बोलवते तीला एकतर तूम्ही माझ्यापासून एवढी महत्त्वाची गोष्ट लपवलता काय तर म्हणे प्रेम करतात अरे पण तूम्ही दोघे माझ्या खूप जवळ आहात एक माझा भाउ आणि एक माझी बेस्ट फ्रेंड जाउूदे ती येउदे इथे दोघांना एकत्रच बघते तीला पण आणि तूला पण मात्र एक तू तीला याबद्दल काहीच बोलणार नाही आहेस इज दॅट क्लीयर?’’

ती त्याला अॅटीट्यूड दाखवतच म्हणाली

त्यावर आशिष तीच्यापूढे हात जोडत नाटकी स्वरातच म्हणाला

’’ओके, रिशादेवी आपली आज्ञा आम्हाला मान्य आहे.’’

त्याच्या अश्या प्रतिक्रीयेवर सर्व हसू लागले आणि त्यांची नौटंकी बघून अविशा म्हणाल्या

’’चालूदे तूमच आम्ही पूढच कस ठरवायच ते बघतो रिशू तू ही लक्षात ठेव माझ्या सूनेला जास्त त्रास नाही द्यायचा समजल ना.’’

त्या रिशूला दम देतच म्हणाल्या

’’यस मातोश्री, पण एक तूमची सून व्हायच्या आधि ती माझी बेस्टी आहे सो तीचा कान तर मी धरणारच मला सांगत नाही बघतेच तीला आणि सोबत ह्या दाद्यालाही’’

अस म्हणतच तीने मोबाइल घेउनच गायत्रीला काॅल केला व तीन ते चार रिंग मध्येच गायू ने तीचा काॅल रिसिव्ह ही केला तस तीला काही बोलू न देता रिशू तीला थोड्या हळव्या आवाजात आणि इमोशनल होउन म्हणाली

’’गायू अग गायू’’

तीचा आवाज ऐकून गायू तीला विचारतच बोलली

’’हा रिशू बोलना काय झाल? आणि तूझा आवाज असा का ऐकू येतोय? काही झालय का?’’

त्यावर तीला होकार देत रिशा म्हणाली

’’हो हो गायू काही नाही बरच काही झालय ग. अग आइ लग्नाच बोलतेय.’’

रिशू तीला अर्धवट सांगतच म्हणाली

’’एवढच ना, त्यात काय एवढ काकू तूझ्या लग्नाच बघतायत मग चांगलच आहे.’’

गायूसूध्दा तीचीच मैत्रिण सो तिच्याच सारखी दूसर्याची मज्जा घेण्यात ती ही पटाइत होतीच तीच बोलण एकून रिशू तीला गप्प करतच म्हणाली

’’अग बाई माझ लग्न नाही माझ्या दादाच लग्न ठरवतेय ती पण दादा मला थोडा टेन्स वाटला’’

रिशा जे काही बोलली ते एकून गायू ला धक्काच बसला तव जवळ जवळ ओरडतच म्हणाली

’’काय म्हणालीस रिशु ? काकू आशिष च्या लग्नाच बघतायत?’’

रिशाला तीचा बदललेला आवाज आणि तीची अस्वस्थता चांगलीच जाणवत होती तरीही ती त्याकडे लक्ष न देताच पूढे म्हणाली

’’हो ना, गायू मला त्याची जरा काळजीच वाटतेय सारख अस वाटतय त्याला आम्हाला काही तरी सांगायचय पण त्याला ते सांगायला जमतच नाही आहे. मलाही काय कराव अस वाटतय पण कस ते समजत नाही आहे. म्हणून मला तूझी थोडी मदत हवी होती तू आता कुठे आहेस आता तू माझ्या घरी येउ शकतेस का?’’

स्वतःला सावरत रिशूला उत्तर देत गायू म्हणाली

’’हा हा रिशू आता मी बुटीक (गायूच स्वतःच कपड्यांच बुटीक आहे) मध्येच आहे येते पंधरा एक मीनिटात तीथे मी आल्यावर आपण बोलु’’

अस म्हणतच तीने काॅल कट केला आणि ती गडबडीतच असिस्टंटला काही इंस्ट्रक्शन्स देउन बूटीकमधून बाहेर पडली

ती गाडीत बसली आणि ड्राइव्हिंग करतच तीन आशिषला काॅल केला इतक्या रिंग होउनही आशिष काॅल रिसिव्ह करत नाही बघून तीला अजूनच टेन्शन आल

तर इकडे रिशाने गायूचा काॅल कट होताच आपला मोबाइल पाॅकेट मध्ये ठेवला तोच काही मिनिटात आशिष चा मोबाइलची रिंग झाली तीने ओढतच त्याचा मोबाइल घेउन त्याला शांत रहायला सांगितल

बिचारा आशिष बारिक तोंड करून गप्प राहिला आज त्याची ही लहान बहीण एका मोठया बहिणीसारख त्याला धमकावत होती

क्रमशः

वाचकहो क्षमा असावी मी एवढ्या दिवसांनी अपडेट देत आहे यासाठी खर तर हा अपडेट मी शूक्रवारीच देणार होते पण त्यावेळी माझा तो भाग लिहून झाला आणि माझा काॅम्प्यूटरच बंद पडला अजून तो दूरूस्त झाला नाही आहे हा भाग मी पून्हा लिहीला आहे.

भाग वाचून नक्की सांगा कसा वाटला ते मी तूमच्या कमेंट्सची आतूरतेने वाट बघत असते.

तूमच्या आजपर्यंतच्या साथीसाठी तूमचे शतषः आभार

धन्यवाद......

तुमचीच निकी………

       

🎭 Series Post

View all