तुझी साथ हवी मला... भाग 60 अंतिम

अभिजीत आत काव्याला भेटायला गेला, त्याने पुढे होऊन तिला जवळ घेतलं, कपाळावर ओठ टेकवले, खूप थकले होती काव्या,


तुझी साथ हवी मला... भाग 60 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

श्रद्धा ऑफिसहून घरी गेली, रघु घरी होता, ती त्याला खूप रागवत होती,.. "काय करताय तुम्ही लोक ड्यूटी, काव्याला काही झालं असतं म्हणजे काय करणार होतो आपण",

"काय झालं काही प्रॉब्लेम झाला का, नीट सांग श्रद्धा",..रघु.

"तुला काही माहिती नाही का काल काय झाल ते",.. श्रद्धा.

नाही.

ती रघुला काय काय झालं ते सांगत होती, विकास कसा मागे लागला होता, अभिजित सर किती घाबरले होते, किती शोधत होते तिला,

आता रघुला खूपच टेन्शन आलं होतं,.." मला तर काही सांगितलं नाही मॅडमने, अभिजीत सर काही बोलले नाहीत, माझ चुकलं मला वाटल साक्षी असेल सोबत ",

" नाही सांगितलं त्यांनी कोणाला , मलाच सांगितलं काव्याने आणि तू पण कोणाला सांगू नको, पण कुठे होतास तू एवढं झालं तर" ,.. श्रद्धा.

" दुपारनंतर साक्षीची ड्युटी असते मी संध्याकाळी असतो, साक्षीला काढून टाकतो, मी लक्ष देईन मॅडम कडे ",.. रघु.

"हो असच कर, तिच्या मागे का एवढे लोक लागतात काही समजत नाही",.. श्रद्धा.

"हो ना खूपच त्रास आहे",.. रघु.

" ती श्रीमंत आहे आणि सुंदरही आहे, साधी आहे ",..श्रद्धा.

रघु विचार करत होता, आता कामा कडे नीट लक्ष द्याव लागेल,

" आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम ठीक झाला आहे, तरी तुम्ही लोकांनी गाफील राहू नका, आता उलट काव्याला जास्त काळजीची गरज आहे",.. श्रद्धा.

"काय झालं",.. रघु.

"तुला माहितीच नाही का, काव्या प्रेग्नेंट आहे",.. श्रद्धा.

" अरे बापरे अभिजीत सर टेन्शनमध्ये असतील, मला माहिती नव्हत त्यात त्रास देणारे लोक काही ऐकत नाही ",.. रघु.

" पण काव्या म्हणते झाल ते बर झाल, आता विकासचा त्रासही बऱ्यापैकी संपला आहे, आता फक्त तो दिसला आणि त्याच्याशी व्यवस्थित बोललं की झालं, शशीला काव्याने मदत केली तो आता शांत झाला आहे ",.. श्रद्धा.

हो ना.
......

दुसर्‍या दिवशी काव्या ऑफिसला आली, तिला विशेष काम नव्हत,.." काय झाल पवार सर, मला काही काम नाही का",

" आदेश सर बोलले तुम्हाला कमी काम द्या ",.. पवार.

ती आदेशच्या केबिन मध्ये गेली,.." आदेश मला कमी काम द्यायला सांगितल का, काय झालं काही चुकलं का माझ ",

" अस नाही वहिनी तुला होईल तेवढ कर",.. आदेश.

" मी रेग्युलर नाही म्हणून देत नाही का काम, मी काय करणार आहे ऑफिस मध्ये नुसत बसुन, सांगितलेल काम करेन ना मी पूर्ण, सॉरी ",.. काव्या.

" नाही वहिनी अस नाही, तुझी तब्येत महत्वाची आहे, तू जून रेकॉर्ड नीट करते का, म्हणजे तू अॅबसेंट असली तरी काही फरक पडणार नाही ",.. आदेश.

ठीक आहे.

" तू जावून बस जागेवर मी सांगतो पवार सरांना" ,.. आदेश.

लंच ब्रेक मध्ये काव्या अभिजीतला भेटायला गेली,.. "काय झाल चेहरा का उतरला आहे आज, काही हव का, ठीक वाटत ना तुला ",

" मला विशेष काम देत नाही ऑफिस मध्ये कोणी, मी का येते इकडे ते समजत नाही",.. काव्या.

"अरे अस चीडायच नाही, जावू दे ना, तू कधी येते कधी नाही म्हणून देत नसतील ते काम, तू रेग्युलर येत नाही तर तुझ काम कोण करेल, दुसर्‍याला डबल काम पडत ना",.. अभिजीत.

हो.

" आता ही सुट्टी होईल तुझी, जायच ना आपल्याला मामा कडे, नंतर आपण दोघ जावू फिरायला ",.. अभिजीत.

काव्या अति खुश होती,.." काय?.. कुठे जायच",

" जावू छान दोघ आरामात एखाद्या रिसॉर्ट वर, येणार ना",.. अभिजीत.

हो.

" आधी मामा कडे जावू, नंतर थोडा आराम झाला की पुढच्या आठवड्यात रिसॉर्ट वर जावू ",.. अभिजीत.

" चालेल, आदेशच्या इलेक्शन नंतर जावू कमी दिवस राहिलेत",.. काव्या.

हो चालेल.

" आनंदी रहात जा काव्या, अजिबात टेंशन घ्यायच नाही, जे काम दिल ते खूप छान करायच, सगळे काम महत्वाचे असतात, जून रेकॉर्ड तू नीट करणार आहेस तर ते किती महत्वाच काम आहे आपल्या कंपनी साठी, तुझा हात लागतोय",.. अभिजीत.

हो अभिजीत.

ऑफिस झाल्यावर संध्याकाळी काव्या आदेश प्रिया सोबत पार्टी ऑफिस मधे गेली, बर्‍याच दिवसांनी ती तिकडे आल्या मुळे सगळे मुल खुश होते, सगळे येऊन भेटत होते,

"इतके दिवस का नाही आली वहिनी, काय झालं, आमच काही चुकलं का",.. सगळे विचारत होते.

"नाही अस काही नाही", ... काव्या रमली होती तिथे , ती प्रिया सोबत बर्‍याच बायकांशी बोलत बसली होती, त्या नंतर सगळ्यांची छोटीशी मीटिंग झाली, प्रत्येकाला काम वाटून दिले,

"मला काय काम आहे",.. काव्या विचारत होती.

वहिनीला जास्त त्रास द्यायचा नाही, थोडस काम द्यायच आणि खूप खुश ठेवायच, अस ठरल,

"वहिनी तू लीडर आहेस, तू सगळ्यांना विचारायच झाल का काम आणि खूप रागवायच" ,.. संतोष.

"वहिनीला नाही जमणार अस वागण, खूप गोड आहे ती",..प्रिया तिची काळजी घेत होती,

"वहिनी तुला काय हव, भूक लागली का" ,.. आदेश.

"मला समोरच्या दुकानातून तिखट भेळ हवी" ,.. काव्या.

"नाही त्रास होईल, मी दादाला सांगेन " ,.. आदेश.

"नाही होणार मला हवी आहे भेळ प्लीज",.. काव्या.

" मी आणून देतो संतोष उठत होता, मी आणतो बरोबर साधी एकदम, तिखट नाही सांगणार",.. तो प्रियाला हळूच सांगत होता.

"मी पण येईन सोबत संतोष, आता काही प्रॉब्लेम नाही ना आदेश, मी जाऊ ना",.. काव्या.

" दादाला माहिती आहे ना तू इकडे तिकडे फिरते ते, तो आणेन वहिनी इकडे ये तू हे काम बघ झालेल ",..आदेश .

" नाही मी जाणार, काही प्रॉब्लेम नाही",.. काव्या.

" ठीक आहे, लक्ष दे फक्त चक्कर वगैरे येत असली तर सांग ",.. आदेश.

" हो मी ठीक आहे",.. काव्या.

संतोष सोबत काव्या भेळच्या दुकानात गेली, तिला हवी तशी भेळ बनवून घेतली, संतोष साधी बनवायला सांगत होता, काव्याने ऐकल नाही,

ती तिथे उभी होती, समोरून विकास आला,.. "आज इकडे कशी काय तू, ठीक आहे का आता ",. तो तिच्याशी छान हसला,

" आदेशला हेल्प करायला आली आहे मी इलेक्शन आहे ना तुमच्या लोकांचं",.. काव्या.

आता विकासही हसत होता,.. "आमचं कामही सोबत आहे आणि इलेक्शनला ही सोबत, चल ना चलते का आमच्या ऑफिसमध्ये, तुला ऑफिस दाखवतो, भेळ का घेते तिखट असते ती त्रास होईल",

"नाही होणार, येते पाच मिनिट भेळ खाऊन, तुम्हाला हवी आहे का भेळ ",.. काव्या.

" काव्या तू मला विकास म्हणत जा",.. विकास.

" ठीक आहे मी आमच्या पार्टी ऑफिस मध्ये आहे, येते थोड्यावेळाने",.. काव्या वापस आली, भेळ खाऊन झाली,

" आदेश मी विकासच्या ऑफिसमध्ये जाते आहे समोर आहे ",.. काव्या.

तो बघतच राहिला,

"हो आता मी त्याच्याशी व्यवस्थित बोलणार आहे, अभिजीतने सांगितलंच असेल काय झालं ते",.. काव्या.

"हो दादा बोलला मला काल काय झालं ते, ठीक आहे जाऊन ये, काही प्रॉब्लेम नाही, प्रियाला नेते का सोबत",.. आदेश.

"नको तिला इथेच राहू दे, मी संतोषला घेऊन जाते, प्रियाला नको या गोष्टीत घ्यायला",.. काव्या.

"बरोबर आहे कोण लोक आहेत तिथे माहिती नाही, उगाच अजून काही प्रॉब्लेम यायला नको, तू पण काळजी घे वहिनी",.. आदेश.

हो... काव्या विकासच्या ऑफिसमध्ये आली, खूपच छान होतं त्याचं ऑफिस, बाहेर बसायला जागा होती, आत मध्ये केबिन होती,

मुलं विकासला सांगायला गेले, तो बाहेर उठून आला,.." ये काव्या",

" छान आहे हे पार्टी ऑफिस",.. काव्या.

ते लोक पण काय काय काम करायचं ते ठरवत होते, काव्या आल्यावर त्या लोकांनी सगळं उचलून ठेवलं,

"चहा घ्यायचा का",.. विकास.

"नाही आत्ताच भेळ खाल्ली",.. काव्या.

"मग ज्यूस प्यायचा का",.. विकास.

नाही.

विकास तिला काय काय काम झालं ते दाखवत होता, बाकीच्या मुलांना आश्चर्य वाटत होतं,. "ती अपोजीट पार्टीची आहे ना भाऊ , सगळ सांगून देईल तिकडे",

काव्या हसत होती,.." आता मला तुम्हा लोकांचे सगळे प्लॅन समजले",

"समजल तर समजू दे, काही धोका नाही हिच्या पासून, झाला तर फायदा होईल, लकी आहे तू मला" ,.. तो काव्या कडे बघत होता.

काव्याला कसतरी वाटल.." मी जाते विकास ऑल द बेस्ट ",

" परत नाही भेटणार का?",.. विकास.

"इकडे आली तर येईल मी ",.. काव्या.

" ठीक आहे काळजी घे",.. विकास.

काव्या वापस आली, बाकीचे मुल विचारात होते त्यांच्या काय प्लॅन आहे?

" माहिती नाही मला" ,.. काव्याने काही सांगितल नाही.

ते घरी आले, अभिजित आलेला होता, काव्या आत आली, ती काय काय झाल ते सांगत होती,.." विकास भेटला तिथे,मी त्याच्या पार्टी ऑफिस मधे गेली होती",

"काही हरकत नाही, असेलच आता तो तिकडे, इलेक्शन जवळ आल ना",.. अभिजीत.
.......

दुसर्‍या दिवशी सकाळी मामा कडे जायला निघायच होत, काव्याने तयारी केली, मावशी मामांना फोन केला होता, आजी सोबत येणार होत्या, त्यांच मावशींच खूप जमत होत, आशा ताई बघत होत्या सगळ घेतल का ते,

रघुचा फोन आला, तो सोबत येणार होता, अभिजीत सांगत होता काही गरज नाही, पण तो आता ऐकत नव्हता,

"रघु अरे दोन दिवस श्रद्धा काय करेल एकटी, तिला पण घेऊन ये सोबत, नाही तरी आजी पण येत आहेत आणि मावशीकडे जायचं आहे",.. काव्या.

"ठीक आहे मी विचारतो तिला, ती येत असली तर आम्ही उद्या सकाळी येतो तिकडे ",.. रघु.

"हो दोन दिवसाचे कपडे घेऊन या",.. काव्या.

जेवताना काव्या आजी तयारी बद्दल बोलत होते.

" तुला सुट्टी मिळाली का वहिनी",.. आदेश.

" आदेश सर मी जावू का गावाला ",.. काव्या हसुन विचारात होती... प्लीज.

" एवढी तयारी झाली आता कोण नाही म्हणणार, आता काय तू बिग बॉस आहेस वहिनी, जा पण आल्यावर मदत करायची आम्हाला, तू हवी आहे इलेक्शनच्या वेळी",.. आदेश.

हो.

सकाळी श्रद्धा आली होती, ती अभिजीतला घाबरत होती

" अभिजीत हिला सुट्टी देणार का",.. काव्या.

"हो आता आली ना ती, काही हरकत नाही आजचा प्रश्न आहे आज हाफ डे आहे",.. अभिजीत.

"पण नंतर आल्यावर जास्त काम करायच",.. आदेश परत हसत होता,

ते निघाले, खूप मजा येत होती, आजी खूप गप्पा मारत होत्या श्रद्धा काव्या सोबत , प्रवास थोडा हळू होता, मधे ते चहा साठी थांबले,

" काय हव आहे काव्या",.. अभिजीत.

" नको मला काही, चहाने अॅसिडीटी झाली तर" ,.. काव्या.

बाकीच्यांनी चहा घेतला.

तीन तासांनी ते मामा कडे पोहोचले, अतिशय सुंदर शेत त्यातल घर, मोकळ वातावरण आजी श्रद्धाला खूप आवडल होत तिकडे, काव्या श्रद्धा लगेच मामीच्या मदतीला गेल्या, काव्याचे लाड सुरू होते, काय खायच अस सुरू होत मामींच , अभिजीत रघु आजी श्रद्धा काव्या मावशी मामा मामी जेवायला बसले , मोकळ्या वातावरणात खूप छान जेवण झाल,

दुपारी आराम केल्यावर ते शेतात फिरायला गेले, अभिजित मामांना खूप माहिती विचारात होता,.. "मला मदत लागली तर कराल का? तुमच शेत खूप छान आहे, मला अस करायच, आपल्या कडे खूप शेती आहे",

"करू ना मी येतो तिकडे बघून घेवू काय करता येईल ते" ,.. मामा.

दुसर्‍या दिवशी सकाळी देव दर्शन होत, काव्या श्रद्धा साड्या नेसल्या होत्या, ते देवळात आले, काव्या खुश होती, तिने अभिजीत सोबत स्पेशल पूजा केली, खूप चांगला अभिजित माझ्या आयुष्यात आला ,देवाचे खूप आभार .

ते घरी आले, जेवण झाल,

" आजच्या दिवस थांबून घ्या जावई बापू",.. मामा.

"नाही उद्या ऑफिस आहे" ,.. अभिजीत.

"तू चालतेस का मावशी घरी ",.. काव्या.

"नाही मी पुढच्या आठवड्यात जाईल घरी",. मावशी.

संध्याकाळी ते घरी पोहोचले, रघु श्रद्धा घरी गेले, काव्या आराम करत होती, ठीक होती ती.
.....

इलेक्शन अगदी एका आठवड्यावर आल होत, आता प्रिया आदेश दिवस भर त्याच कामात होते, काव्या अभिजीत संध्याकाळी मदतीला जात होते, विकासच्या ऑफिस मध्ये खूप काम सुरू होत, तो अधून मधून इकडे येत होता, हे दोघ त्याला भेटायला जात होते, गव्हर्न्मेंट कॉन्ट्रॅक्टच काम जोरात सुरू होत, आता त्यांची दुष्मनी संपली होती,

आज इलेक्शन होत, सकाळ पासून गडबड सुरू होती, बर्‍या पैकी व्होटिंग झाल, लगेच दोन तीन दिवसात रिजल्ट होता,

"झाल आता काम आता आपल्या बिझनेस कडे लक्ष दे आदेश",.. प्रतापराव बोलत होते.

"ऑफीस काम छान सुरु झाल",..

" हेच बर आहे शांततेत काम, नको ते गावातल पॉलीटीक्स, ज्याना जिंकायच ते जिंकू दे, आता मी प्रिया सोबत शांत राहणार आहे ",.. आदेश.

"त्या पार्टी ऑफिस मधल्या मुलांच कामाच काय जे तुझ्या साठी काम करत होते आदेश",.. अभिजीत.

"मी एक बिझनेस सुरू करतो आहे, त्यात ते सगळे काम करतील, बघ किती पुढे जाईल आमची कंपनी ",.. आदेश प्रताप राव अभिजीतला त्याचा प्लॅन सांगत होता.
....

शशीचा मधुन मधुन फोन येत होता, नवीन फॅक्टरीच काम जोरात सुरू होत, पुढच्या एका महिन्यात उद्घाटन होत,

इलेक्शनचा रिजल्ट आला, आदेश विकास दोघ हरले होते, दुसरा कोणी जिंकला होता, सगळे त्या दोघांच सांत्वन करत होते,

"ठीक आहे आमच्या कडे करायला खूप काम आहे आम्ही दुःखी नाही" ,.. आदेश विकास दोघ एकदम बोलले.

"आता परत इलेक्शनला उभ रहायच नाही, उगीच पैसे वाया जातात ",.. आजी रागवत होती.

हो आजी.

पूजा झाली लगेच फॅक्टरी सुरु झाली होती शशीची, अधून मधून काव्या फोन करत होती, एक दोन दा अभिजीत जावून आला होता, सोहम होता सोबतीला.
.....

" बरेच दिवस झाले आपण फिरायला जायच ठरवत आहोत, काही ना काही काम असत, काव्या या आठवडय़ात आपण जातोय",.. अभिजीत.

"बूकिंग झाल का",.. काव्या.

हो

" आदेश प्रियाला घेवू ना सोबत, ते ही कधीचे कुठे गेले नाहीत",.. काव्या.

"ठीक आहे",.. चौघे निघाले, खूप मजा येत होती, आता काव्याची तब्येत बर्‍या पैकी ठीक होती, जवळ रिसॉर्ट होत, स्पेशल रूम बूक केल्या होत्या, छान आहे रिसॉर्ट अभिजीत. ते दोघ आरामात येत होते, आदेश प्रियाने पुढे जावून रूम ताब्यात घेतल्या.

" रात्री भेटू डिनर साठी तो पर्यंत आम्हाला डिस्टर्ब करू नका",.. अभिजीत बिनधास्त पणे सांगत होता, आदेश प्रिया हसत होते, ते त्यांच्या रूम मध्ये निघून गेले,

काव्या आणि तो आत आले,.. "काहीही काय बोलतोस तू अभिजीत आदेश प्रिया समोर",

"अरे मी माझ्या बायको सोबत आहे, त्यात काय, मला रहायच तिच्या सोबत आरामात, आता आपण इतर काही बोलणार नाही, फक्त आपण दोघ मस्त आराम करायचा, इकडे ये" ,... काव्या अभिजीत सोबत रमली होती.

संध्याकाळी मस्त डिनर झाल, चौघ खूप बोलत बसले होते,

" उद्या आम्ही इथे साइट सीईंगला जातो आहोत, तुम्ही येणार का",.. आदेश.

" नाही काव्या कडून होणार नाही इतक, तुम्ही जा",
.. अभिजीत.

आदेश प्रिया सकाळी फिरायला निघून गेले, अभिजित काव्या सोबत बागेत बसलेला होता,.. "छान वाटत ना अस रिलॅक्स",

"हो. मला अस आवडत",..काव्या.

"आता लवकर आपल बाळ येईल, त्या नंतर आपण दोघ परत मस्त फिरायला येवू",.. अभिजीत.

" अभिजीत काय हे ",.. काव्या हसत होती.

"अरे मग आपली हौस राहिली आहे ना, ऑफिस मधे जाण बंद कर आता तू",.. अभिजीत.

"घरी काय करू मी इतके दिवस",.. काव्या.

" मी लवकर येईल, घरी आई आजी आहेत" ,.. अभिजीत.

"थोडे दिवस येते ना",.. काव्या.

" नाही जेवायला वेळ होतो तुला तिकडे, आराम करायचा आता घरी" ,.. अभिजीत.

दोन तीन दिवस मजेत गेले, ते वापस आले, काव्याला सातवा महिना सुरू होता, अभिजीतने मावशींना बोलवून घेतल, घरी छान डोहाळे जेवणाचा प्रोग्राम झाला,

थोड्या दिवसांनी काव्या माहेरी जाणार होती, अभिजीत ऐकत नव्हता नाही,.." इकडे रहा तू माझ्या सोबत ",

" अरे जावु दे तिला अभिजीत, तू ही जात जा मधुन तिकडे" ,.. आजी.

काव्या सुरेश राव प्रमिला ताई सोहम सुरभी सोबत खूप खुश होती, रोज घरून फोन येत होता, अभिजीत रोज व्हीडिओ कॉल करत होता,

शशीची फॅक्टरी सुरू झाली होती, तो ही अधून मधून भेटायला येत होता,

काव्याची डेट जवळ आली होती, आजी अभिजीत आधीच इकडे काव्या कडे आले होते, काव्याला एक दिवस आधी अ‍ॅडमिट केल, आदेश प्रिया पण आले होते,

तिला खूपच त्रास होत होता, ते बघून अभिजीत घाबरून गेला होता,

"अस असत अभिजीत, तू बाहेर जावुन बस, तू धीर द्यायच्या ऐवजी तुझी काळजी वाटते आहे" ,.. आजी.

सोहम त्याच्या कडे लक्ष देत होता,

एका तासाने अतिशय गोड सुंदर अस बाळ नर्सने बाहेर आणल, मुलगा झाला अभिनंदन तुमच, सगळे बाळाला बघायला घाई करत होते, प्रतापराव आशा ताई आले होते,

अभिजितला काही सुचत नव्हत,.." काव्या कशी आहे?" ,

" ठीक आहे ती तुम्ही आत जावू शकता" ,.. डॉक्टर.

अभिजीत आत काव्याला भेटायला गेला, त्याने पुढे होऊन तिला जवळ घेतलं, कपाळावर ओठ टेकवले, खूप थकले होती काव्या, अभिजीतला भेटून खूप खुश होती ती,.. "बाळ कुठे आहे",

"आहे बाहेर सगळ्यां जवळ, झोपला आहे तो ",.. अभिजीत.

" कसा दिसतो ",.. काव्या.

" खुप गोड निरागस तुझ्या सारखा, त्रास झाला का खूप",.. अभिजीत.

नाही.

"आता बस, हा एक पुरे आपल्याला, मला बघवल नाही तुझा त्रास, थँक्यू",.. अभिजीत.

"मी ठीक आहे अभिजीत, काळजी करु नकोस",.. काव्या.

बाहेर सगळे हेच बोलत होते की बाळ माझ्या सारख दिसत, सोहम आदेश त्यात पुढे होते, खूप गोंधळ सुरू होता, त्या आवाजाला बाळ घाबरल, तो रडत होता, काय कराव, आजींना त्याला काव्या कडे आणून दिल, झोपव याला, बाहेर देवु नको त्रास देतात ते,
........

" प्रिया इकडे ये, अस बाळ आपल्याला हव, मी ऐकणार नाही",.. आदेश.

"चूप कोणी ऐकेन ना हळु बोल ",.. प्रिया हसत होती,

" क्रिकेट टीमच तू मनावर घेत नाही प्रिया, आता आपण विचार करायचा",.. आदेश.

ठीक आहे.

दोन महिने माहेरी राहिल्यानंतर काव्या आणि बाळ घरी आले, अभिजित ऑफिसला जायच नाव घेत नव्हता, पूर्ण वेळ तो बाळाला सांभाळत होता,

घरी लगेच बारशाचा कार्यक्रम होता, सगळे खूप उत्साही होते, काय नाव ठेवायचं आपल्या परीने सुचवत होते, सगळ्यांना वाटत होतं मी सुचवलेलं नाव ठेवायला पाहिजे

काव्याने अभिजीतला विचारलं,.. "काय नाव ठेवायचं आहे बाळाच तू म्हणशील तेच नाव ठेवू",

"आदित्य नाव कसं वाटतं तुला",.. अभिजीत.

" छान आहे ना हेच नाव ठेवु",.. काव्या.

बारशाचा कार्यक्रम मोठा होता, सगळे येत होते, रघु श्रद्धा पण आले होते, विकास आला होता, काव्याच्या माहेरची सगळे लोक होते, शशी पण आला होता, आदेशच्या पार्टी ऑफिसची पण सगळे मुलं होते, बाळ दोन मिनिटे खाली नव्हतं, सगळेजण घेऊन फिरत होते,

" अरे तुम्ही सगळे त्याची सवय खराब करून टाकाल, नंतर तो राहील का एकटा, मला किती घेऊन बसावं लागेल त्याला , खाली झोपवा आधी बाळाला ",.. आजी ओरडत होत्या.

कोणीही ऐकत नव्हतं, आम्ही येऊ रोज एक एक दिवस बाळाला सांभाळायला,

सगळ्यां कडून बाळाला घेऊन अभिजीतने काव्याकडे दिल, झोपव याला जरा वेळ नाहीतर थकून रडेल तो खूप

सुंदर स्टेज सजलं होतं, अभिजीत बाळाला घेऊन उभा होता, काव्या बाजूला उभी होती, पाळणा सजलेला होता, बाळाला पाळण्यात झोपवल

"काय नाव ठरल",.. सगळे विचारत होते.

काव्या अभिजीत कडे बघत होती,

"आदित्य" त्याने सांगितल, सगळे टाळ्या वाजवत होते.

बायका पाळणा म्हणत होत्या, सगळे येऊन बाळाला भेटत होते, खूप छान गिफ्ट मिळाले होते,

आदेश प्रियाच्या मागे मागे होता,.. "काय ठरल आहे मग प्रिया, सांग, घ्यायचा का चान्स ",

ती हसत होती.

"असं उत्तर टाळून चालणार नाही",.. आदेश.

बाळाला बघून रघुला सुद्धा हेच विचार येत होते, तो ही श्रद्धाशी तेच बोलत होता

शशी विकास पूर्णवेळ अभिजीत आणि काव्या सोबत होता, काव्याला काय हव ते बघत होते, सगळ्यांची आता खूप छान मैत्री झाली होती,

" शशी आणि विकास तुम्ही दोघं लग्न करून घ्या आता, आमचा पिछा सोडा ",.. अभिजीत.

"काव्या आमच्यासाठी मुलगी शोधेल तर करू दोघं लग्न" ,.. ते हसत होते,

"आता मला अजिबात वेळ नाही, बाळा लहान आहे, तुम्ही लोक स्थळ घेऊन या, मी फोटो बघून सांगेन",.. काव्या.

"ठीक आहे काव्या तू म्हणशील तस ",.. विकास.

अभिजीतने डोक्याला हात लावून घेतला.

रात्री तो रूम मध्ये आला,बाळ झोपलेला होता, काव्या इकडे ये, त्याने हाक मारली,

" हळू बाळ उठेल, काय अस, या पुढे या रूम मध्ये हळू बोलायच, तिकडे सरकून झोप, इथे माझ्या जवळ बाळ झोपेल ",.. काव्या.

" अरे अस चालणार नाही काव्या, एवढा काय धाक मला याचा, तू माझी आहेस, मी ऐकणार नाही" ,.. त्याने काव्याला जवळ ओढून घेतल, ती लाजली होती.

"खूप छान वाटतय तुम्ही दोघ घरी आले तर, लव यू, आता कुठे जायच नाही तू, मी जावू देणार नाही ",.. अभिजीत.

काव्या हसत होती,.. "ठीक आहे, मला ही खूप छान वाटत इकडे तुझ्या जवळ अभिजीत, लव यू टु",.

दोघ छान रमले होते सोबत.

समाप्त.

वाचकांचे खूप आभार, खूप सुंदर प्रतिसाद दिला तुम्ही या कथेला, छान कमेंट्स येत होत्या, खूप आभार लव यु .






🎭 Series Post

View all