तुझी साथ हवी मला... भाग 59

मी कॉलेज समोरून जात होतो तर तिथे तिला बघितल काव्याला चक्कर आली होती, मी मदत केली, ती बेशुद्ध होती, समजल नाही काय कराव म्हणून इकडे घेवून आलो


तुझी साथ हवी मला... भाग 59

©️®️शिल्पा सुतार
.........

ड्रायवर कॉलेजच्या बाहेर उभा होता, तो काव्याला बराच वेळ झाला फोन करत होता , ती उचलत नव्हती, काय करू त्याने अभिजीतला फोन केला, तो मीटिंग मधे बिझी होता त्याने फोन उचलला नाही, ड्रायवरने परत फोन केला, अभिजित फोन घेवून बाहेर आला,. "काय झालं काका" ,

"मी मॅडमच्या कॉलेज बाहेर आहे, त्या नाहीत इथे, म्हणजे त्यांच्या फोन आला होता एक तासा पूर्वी, मी रस्त्यात अडकलो होतो , त्या घरी आल्या का",.. काका.

" बघतो मी विचारून, पाच मिनिट",.. अभिजीतने काव्याला फोन केला, फोन बंद होता, काय कराव, घरी फोन केला ती आलेली नव्हती, ऑफिस मधे नव्हती, काय झालं नक्की कुठे आहे ही.

त्याने ड्रायवर काकांना फोन केला,.." येतो मी तिकडे, तुम्ही थांबा, कोणाला सांगू नका",..

अभिजीत कॉलेज जवळ आला, काका उभे होते, त्याने आसपास चौकशी केली, तिचा फोटो दाखवला,

"हो उभी होती ती मुलगी इथे, तिला तिला बर नव्हत, एका मुला सोबत ती घरी गेली ",..

"ठीक आहे थँक्स",.. अभिजीत.

"काका ठीक आहे काव्या तुम्ही जा, कोणाला काही बोलू नका ",.. अभिजीत.

नाही साहेब... ते गेले.

अभिजीत तिथे उभा होता, काय कराव नेमक काय झाल काव्याला, त्याला विकास वर संशय येत होता, कारण काव्या घरी नव्हती, काय झालं असेल इथे , त्याने त्या दुकानदाराला विकासचा फोटो दाखवला.

" हो हेच होते ",..

अभिजीत तिथून निघाला,

आदेशचा फोन आला,.. "कुठे आहे दादा, वहिनी पण आली नाही ऑफिस मधे",

"माझ्या सोबत आहे ती",.. अभिजीत.

"ठीक आहे" ,.. आदेश.

नक्की विकासने केल आहे हे काम, तो आधी पासून काव्याच्या मागे होता, नीट पद्धतीने सोडवायला पाहिजे हे प्रकरण नाही, खरच काव्याला चक्कर आली असेल त्याने मदत केली असेल तर, गैरसमज नको करायला, जो पर्यंत काव्या सोबत बोलणार नाही तो पर्यंत काही समजणार नाही, विकासला फोन करायला त्याने फोन हातात घेतला.
.....

काव्या आत बसली होती, विकास पाणी घेवून आला, तिला कसतरी होत होतं, फॅन लावा ना, एकदम तिला उलटी आली ती पळत बाहेर आली, थोड्या वेळाने ती आत आली,

"काय झालं काव्या, तब्येत ठीक नाही का",.. विकास.

"मला घरी जायचं आहे, बर वाटत नाही" ,.. काव्या.

"हो अर्धा तास, मला बोलायच आहे तुझ्याशी" ,.विकास.

"बोला पटकन, ती पर्स मध्ये बघत होती काही आहे का खायला",.. काव्या.

"काय झालं",.. विकास.

"मला भूक लागली आहे, माझ चॉकलेट कुठे गेल , कसतरी होत आहे" ,.. काव्या.

"काय खाणार, जेवते का तू ",.. विकास.

" मी घरी जावून जेवेन, पटकन सांगा काय सांगायच ते, माझ्या घरचे वाट बघत असतिल ",.. काव्या.

विकासने बाहेर जावुन काहीतरी सांगितल, मावशी आत आल्या, त्यांच्या कडे ताट होत, त्यात भाजी पोळी होती, घे पोरी खावून घे,

" नाही नको मला ",.. काव्या.

" खा खूप वेळ झाला, कसतरी होत ना तुला ",.. मावशी.

हो

काव्या जेवत होती, ती मावशीं कडे बघत होती,.. "काही हव का अजून",

नाही.. ती मानेने बोलली.

"थांब छान लोणच आहे माझ्या कडे आणते" ,.. मावशी.

विकास दोघीं कडे बघत होता

"त्रास होतो का ग पोरी",.. मावशी.

हो.

त्या तिच्या कडे बघत होत्या,.." लग्न झाल ना ",

हो,

त्यांनी लोणच आणून दिल,.. "औषध असेल तर घे, जरा पड",

" हो, मावशी मला घरी जायच तुम्ही सांगा ना यांना माझ्या घरी फोन करायला" ,.. काव्या.

" मावशी तुमच झाल असेल तर जा",. विकास.

त्या चालल्या गेल्या, विकास तिच्या कडे बघत होता, तो जवळ येवून बसला, काव्या मागे सरकली,

" ठीक आहे का आता",.. विकास.

हो,

"डॉक्टरांना बोलवू का",. विकास.

नाही.

"मला बोलायच होत थोड, तू माझ्या बाबतीत काय विचार केला आहे, माझ्या सोबत राहणार का?",.. विकास.

काव्या त्याच्या कडे आश्चर्याने बघत होती, तिने मानेने नाही सांगितल.

"मला तू खूप आवडते, मला तुझ्या सोबत रहायच आहे",.. विकास.

"तुम्हाला का एका लग्न झालेल्या मुली सोबत रहायच आहे, फक्त मी अभिजीतची बायको म्हणून तुम्ही अस करता ना, तुमची दुष्मनी आहे ना, त्याच्या साठी तुम्ही आम्हाला त्रास देत आहात ना ",.. काव्या.

" आधि मला अस वाटल होत त्रास द्यावा तुम्हाला दोघांना, पण आता मना पासून सांगतो मला तू खूप आवडते, मला तुझ्या सोबत रहायच आहे",.. विकास.

" प्लीज शांत बसा, अस बोलू नका, मला नाही आवडत तुम्ही बोलतय ते, मला जायच आहे इथुन, या पुढे माझ्याशी बोलायच नाही, माझा फोन द्या, मला अभिजीतला फोन करायचा आहे ",.. काव्या.

" एकदा शांततेने माझा विचार कर, माझ्या साठी तू खूप महत्त्वाची आहे, तू हो म्हणत असशील तर मी पूर्ण दुनिया सोबत लढेल, फक्त तू हो म्हण, तुला खर वाटत नसेल तर माझ्या डोळ्यात बघ, खर काय समजेल तुला, मी चांगला आहे, तुला नीट सांभाळेल, आजही हे अस मी तुला इथे घेवून येणार नव्हतो, तुला चक्कर आली म्हणून इथे आणल ",... तो तिच्या जवळ येवून बसला,

" माझ लग्न झालं आहे, माझ अभिजीत वर खूप प्रेम आहे , मला तुमच्या सोबत रहायच नाही , मला माझ कुटुंब आहे, प्लीज अस करु नका, मी नुसती अभिजीतची बायको नाही तर ती मी आता आई होणार आहे, मी प्रेग्नंट आहे, मला घरी जावू द्या, अभिजितला नाही आवडणार अस, तुमच्या वागण्या मुळे त्याने मला माहेरी पाठवून दिल तर मी आणि माझ बाळ कुठे जाणार, विचार करा, तीन लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आणि काहीही झाल तरी मी तुम्हाला होकार देणार नाही, प्लीज ऐका आपण सोबत नाही राहू शकत, फक्त मी एवढ प्रॉमीस करु शकते मी बोलेन तुमच्या सोबत फ्रेंड प्रमाणे",.. काव्या.

विकास तिच्या कडे बघत होता, तरीच हिला खूप त्रास होतो आहे, जावू दे नको या दोघांना त्रास द्यायला, पण मी कसा राहू तुझ्या शिवाय काव्या, तीच माझ्या वर प्रेम नाही ती तिच्या संसारात सुखी आहे, सोडून येवू तिला घरी,

" विकास मी काय म्हणते आहे, मला घरी जायच",.. काव्या.

"हो सोडून देतो मी तुला, मी खुश आहे तुझ्या साठी, खूप छान काव्या, ब्लेस यु, अभिजित खूप लकी आहे, छान रहा त्याच्या सोबत, या पुढे मी तुला त्रास देणार नाही पण लक्ष्यात ठेव माझ फक्त तुझ्या वर प्रेम आहे आणि मला नेहमी अस वाटेल तू खुश रहाव, कधीही काहीही लागल तर सांग आणि आपण बोलणार आहोत नेहमी",.. फ्रेंड्स त्याने हात पुढे केला, तिने ही हात पुढे केला, दोघांनी हात मिळवला, एकदा जवळ ये ना माझ्या, त्याने तिला हलकी मिठी मारली, काव्या नंतर बाजूला सरकुन बसली.

" माझा फोन द्या ना प्लीज ",.. काव्या.

त्याने फोन दिला, काव्या फोन आॅन करत होती,

एकदाची इथून सुटका झाली तर बर होईल, नंतर बघू काय करायच ते आता तरी त्याच्या मना विरुद्ध करता येणार नाही, अभिजित कुठे आहेस तू, प्लीज ये ना, मेसेज करू का त्याला. या विकासने परत फोन काढून घेतला तर, हा जात का नाही बाहेर.
.......

तेवढ्यात अभिजीतने विकासला फोन केला, विकासने फोन उचलला,

"काव्या आहे का तिथे, मी शोधतो आहे तिला, कॉलेज जवळ समजल ती तुमच्या सोबत आहे ",.. अभिजीत.

" हो आहे माझ्या सोबत, मी कॉलेज समोरून जात होतो तर तिथे तिला बघितल काव्याला चक्कर आली होती, मी मदत केली, ती बेशुद्ध होती, समजल नाही काय कराव म्हणून इकडे घेवून आलो, जेवण झालं आता तीच, शेतातल्या मावशींनी दिल खायला, ठीक आहे आता ती ",.. विकास.

" खूप धन्यवाद, मी येवू का तिकडे तिला घ्यायला, प्लीज लोकेशन द्या",.. अभिजीत.

विकासने लोकेशन पाठवून दिल, थोड्या वेळाने अभिजीत आला, काव्या आत बसलेली होती, विकास बाहेर होता,.." ये अभिजीत",

" कशी आहे काव्या",.. अभिजीत.

" ठीक आहे, तिकडे आहे ती ",.. विकास.

अभिजित आत आला, काव्या उठून पटकन त्याला भेटली,.." अभिजित मला घरी जायच आहे",

"हो जावू इथून " ,.. तो बघत होता ती घाबरलेली होती,

" काही बोलला का हा" ,.अभिजीतने तिला जवळ घेतल होत.

"विशेष नाही, मदत केली चक्कर आली तर, त्या बाहेरच्या मावशींनी जेवायला दिल" ,.. काव्या.

"हा विकास का आला होता कॉलेजला" ,.. अभिजीत.

"माझ्या मागे आला होता, ड्रायवरला ही याने येवू दिल नाही" ,.. काव्या.

"का अस करतो आहे हा",.. अभिजीत.

"माहिती नाही मला भीती वाटते याची",.. काव्या

"बॉडी गार्ड कुठे आहे",.. अभिजीत.

"ती दुपारनंतर येते ऑफिस मध्ये, कॉलेज मधे चालत नाही, बहुतेक कार मधे असेल ती, त्या आधी विकास भेटला मला ",.. काव्या.

"विकास काही बोलला का ",.. अभिजीत.

" बोलत होता माझ्या सोबत रहाते का , मी सांगितल हे ठीक नाही, लग्न झाल आहे माझ, मी आई होणार आहे आणि अभिजीत चिडला तर मला माहेरी पाठवून देईल, मी आणि माझ्या बाळाच काय होईल जरा विचार कर ",... काव्या.

" बर झाल अस सांगितल",.. अभिजीत.

" हो मुद्दाम सांगितल, माझी काळजी असेल तर मागे येणार नाही तो , बोल म्हणतो माझ्याशी, काय करू या" ,.. काव्या.

" मी बोलतो त्याच्याशी काळजी करू नकोस",... अभिजीत.

" आपण केव्हा घरी जायच अभिजीत, तो काही करणार नाही ना आपल्याला",.. काव्या.

"काही नाही करणार मी आहे ना तू शांत रहा",.. अभिजीत.

विकास आत आला, अभिजीत काव्या समोर येवुन खुर्चीवर बसला, एक मुलगा चहा घेवून आला, तिघांना चहा दिला,

घ्या चहा,

सगळे शांत होते, विकास दोघांकडे बघत होता, अभिजित काव्या इकडे आहे म्हणून चिडायला नको, तिला त्रास नको व्हायला,

" विकास आम्ही निघतो आता, उशीर होतो आहे, काव्याला चक्कर आली होती तर तू मला फोन करायला हवा होता, हिला अस इकडे घेवून नव्हत यायला हव होत, मी किती घाबरलो होतो",.. अभिजीत.

"सॉरी, मला तेव्हा काही सुचल नाही, मला थोड बोलायच होत काव्या सोबत म्हणून इकडे आलो",.. विकास.

"काय बोलायच होत ",.. अभिजीत.

" ते मी विचारात होतो माझ्याशी मैत्री करणार का, म्हणजे तुम्ही दोघ माझ्या सोबत मोकळे पणाने बोलणार का? आपण मित्रां प्रमाणे राहू शकतो का",.. विकास.

"काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम, केव्हाही ये आमच्या कडे, काव्याशी बोलू शकतो तू, जो पर्यंत तिला काही प्रॉब्लेम नाही माझ काही म्हणण नाही, विकास एक रिक्वेस्ट होती, आज काव्या इकडे होती हे कोणाला सांगू नका",.. अभिजीत.

नाही,

तिघ बाहेर आले, मावशी आल्या,.. "बर वाटत का मॅडम",

हो

" हे कोण",..

" ते माझे मिस्टर आहेत",.. काव्या.

" छान काळजी घे इकडे तिकडे फिरू नकोस उन्हात",..

हो,

ते निघाले, कार मधे काव्या गप्प होती,.." तू माझ्या वर चिडला नाहीस ना अभिजीत ",

"नाही त्यात काय चिडण्या सारख आहे, मी मागे पण बोललो होतो तुझ्या मागे कोणी येत असेल तर त्यात तुझा दोष नाही, अजिबात काळजी करू नकोस, पण कोणाला सांगू नकोस हे, कारण आपल काम आहे विकास सोबत, चांगल वागून दूर राहू आपण त्याच्या पासून ",.. अभिजीत.

हो.

"ठीक वाटत ना तुला आता, काही लागल नाही ना, तू पडली का? डॉक्टर कडे जायच का",.. अभिजीत.

" ठीक आहे मी घरी जावू आपण ",.. काव्या.

" जेवून घेवु खूप उशीर झाला आहे, उपाशी राहण चांगल नाही तुझ्या तब्येती साठी" ,.. अभिजीत.

दोघ हॉटेल मधे आले, तिच्या आवडीचे पदार्थ होते, ज्यूस मागवला होता , जेवण झाल,

दोघ घरी आले, आई आजी विचारात होत्या,.. "आज कस काय लवकर आलीस",

" बर वाटत नाही तिला, चल काव्या आराम कर ",.. दोघ रूम मधे गेले,.." हे बघ जास्त विचार करू नकोस, आराम कर मी येतो संध्याकाळी" ,

ठीक आहे,

जरा वेळ झोपली ती, अभिजित तिच्या जवळ बसला होता, खूप त्रास देतात हिला लोक, आज थोडक्यात झाल, काही केल असत तर विकासने, पण तो ही चांगला आहे, त्याला काव्या आवडते वाटत, जावू दे वाटत अस तरुण मुलांना, आहेच काव्या एवढी छान, काव्याची काळजी घ्यायला हवी आपण, पण आता मोकळ बोलल्या मुळे संकट टळल, आता नाही त्रास देणार विकास,

तो बाहेर आला,.. "आजी आई मी जातो ऑफिसला, लक्ष द्या काव्या कडे , काही त्रास होत असेल तर फोन कर आई डॉक्टर कडे घेवून जाईल मी तीला" ,

प्रिया ऑफिस मध्ये आली, आदेश केबिन मध्ये होता ,.. "वहिनी कुठे आहे, याच डिपार्टमेंट मधे आहे ना ती ",

"माहिती नाही आलीच नाही आज ती, बहुतेक दादा सोबत होती ती, चल निघायच का पार्टी ऑफिस मधे जायच आहे, इलेक्शन खूप जवळ आल आहे, खूप काम बाकी आहेत" ,.. आदेश रस्त्यात इलेक्शन बद्दल बोलत होता,

दोघं पार्टी ऑफिस मध्ये आले, इलेक्शनचे खूपच काम सुरू होत, बरीच कार्यकर्ते आलेले होते, पुढे काय काय करायचं महिनाभर हे सगळं ठरत होतं, बऱ्याच जणांच्या घरचे येणार होते, बायकांची पण मीटिंग अरेंज केली होती आदेशनी, ती मीटिंग प्रिया घेणार होती,

जरा वेळ काम केल्यानंतर ते घरी आले, आता काव्याला बरं वाटत होतं, ती खाली येऊन बसलेली होती, जरा वेळाने अभिजीत आला, तो तिच्याजवळ बसून होता, चहा पाणी झालं.

आदेश प्रिया काव्याशी इलेक्शन बद्दल तिच्याशी बोलत होते, त्यामुळे काव्याला खूप उत्साह वाटत होता, ती अभिजीत कडे बघत होती,.. "मी पण जाऊ का यांच्यासोबत कामाला",

" तुला आता खूप चक्कर येते आणि उलट्या होत आहे, तब्येत सांभाळून करायचं तर कर काम, ते ही थोड्या वेळ",.. अभिजीत.

"हो हे दोघ आहेत ना माझी काळजी घ्यायला, मला छान वाटेल तिकडे",.. काव्या.

"ठीक आहे जा मग, नाही तरी आता धोका नाही काही, तुझे दोघे दुश्मन आता बऱ्यापैकी नीट झाले आहेत",.. अभिजीत हळूच बोलला.

काव्या खूप खुश होती, आदेश प्रिया पण खुश होते, ती प्रिया बरोबर ठरवत होती काय करायचं आहे ते,

" आता एकच महिना बाकी आहे आपण सगळ्यांनी खूप छान काम करायचं वहिनी ",.. आदेश.

" हो पण आदेश तू जिंकला तरी ठीक आणि नाही जिंकला तरी ठीक ",.. आजी त्याला समजावत होत्या.

प्रतापराव पण आले, ते पण समजावत होते,.. "मागच्या वेळी किती त्रास करून घेतला होता आदेश तू, जवळ जवळ महिना दीड महिन्याला लागला होता तुला यातून बाहेर पडायला",..

"आता यावेळी मला समजलं आहे, या सगळ्यात खूपच वेळ जातो, मला ऑफिसच्या कामांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे जिंकलो तरी ठीक नाही जिंकलं तरी ठीक मी आता माझ्या ऑफिसच्या कामाकडे लक्ष देईल",.. आदेश.

सगळ्यांना आदेशच्या निर्णयाने समाधान वाटत होतं,

" हे चांगलं आहे आपल्यासाठी, इलेक्शन वगैरे आपलं काम नाही ",.. अभिजीत.

किती दिवस झाले घरचे सांगत होते, पण आता आदेशने स्वतःहून निर्णय घेतल्यामुळे, सगळ्यांना बरं वाटलं, तो बघत होता किती त्रास होतो आहे सगळ्यांना, त्याला प्रिया काव्याची काळजी वाटत होती,

रात्री मावशीचा फोन आला,.." कसं वाटतं आहे ग काव्या",

"आता बर वाटत आहे मावशी मी खूप खुश आहे, मला तिकडे यायचं आहे मामाकडे, मी बोलून बघते अभिजीत सोबत",.. काव्या.

"ठीक आहे, तब्येत हि सांभाळ ",.. मावशी.

रात्री जेवण झाल्यावर काव्या अभिजीत बाहेर फेऱ्या मारत होते,

"मी काय म्हणते आहे अभिजीत मी लग्नाआधी देवाला गेली होती मामाकडे, तिकडे देवाला बोलली होती की माझ्यावरच हे शशीचं संकट टळलं तर मी दर्शनाला येईल, तर इथून मामाचे घर दोन तासावर आहे आपण जाऊन यायचं का",.. काव्या.

" चालेल ना काही हरकत नाही, शनिवार रविवार जाऊ आपण एक दिवस राहू म्हणजे तुझाही आराम होईल",.. अभिजीत.

काव्या खूप खुश होती, तिने नंतर मावशीला फोन केला,.." आम्ही बहुतेक येऊ तिकडे तू तिथेच थांब या शनिवार रविवारी ",

दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबल वर ती सगळ्यांना मामाकडे जायचं ते सांगत होती, बऱ्याच दिवसांनी कुठेतरी जायचं त्यामुळे खूप खुश होती ती, काव्याच जीवन नेहमी टेन्शनमध्येच गेल होत, लग्ना आधी सुद्धा, आता सुद्धा कोणी ना कोणी त्रास देत होत कायम, आताशी थोडीशी मोकळीक मिळते आहे तर खूप खुलली होती काव्या, तिच्या आनंदाकडे बघून अभिजीत खुश होता.

सगळे ऑफिसमध्ये आले, लगेच कामाला सुरुवात झाली, पवार सर आजूबाजूला नाही हे बघून काव्याने परत अक्षय आणि सीमाला ती गावाला जाणार आहे मामाकडे हे सांगायला सुरुवात केली, ते दोघ छान बोलत होते तिच्याशी, पवार लांबून बघत होते त्यांनी कानाडोळा केला, जरा वेळाने परत काव्या कामाला लागली,

लंच ब्रेक मध्ये श्रद्धा भेटली,

"कुठे गेली होती काल, फोन नाही काही नाही, तुझी कोणी काळजी करत असेल काही समजत नाही का काव्या",.. श्रद्धा चिडली होती.

"हो हो हळू... किती बोलणार आहेस मला, चल तुला सांगते काल काय झालं ते",.. काव्या सगळं सांगत होती, कोणाला बोलू नकोस, अभिजितने नाही सांगितल आहे, घरी पण बोलली नाही मी काही.

" नाही सांगणार, रघु कुठे होता, मी ओरडते त्याला ",.. श्रद्धा.

" अग कॉलेज मधे कोणी येवू शकत नाही",.. काव्या.

" म्हणुन मुद्दामून तो विकास तिकडे आला असेल भेटायला",.. श्रद्धा

"हो ना, आता माझा मित्र आहे तो, त्याच्याशी बोलाव लागेल मला ",.. काव्या.

"काय वैताग आहे, जबरदस्ती आहे " ,.. श्रद्धा.

" हो ना एक एक भेटतात",.. काव्या.

" पण अभिजीत सर खूप चांगले आहेत काव्या, खूप मोठ्या मनाचे आहेत, किती शांततेत त्यांनी हे सगळं नीट केल ",.. श्रद्धा.

" हो खरच खूप विश्वास ठेवतात ते माझ्या वर, खूप प्रेम करतात, म्हणून मला कसतरी वाटत",.. काव्या.

" छान वागतात ते ",.. श्रद्धा.

"श्रद्धा तू नको बोलू रघुला काही, जावू दे नीट झाल सगळ उगीच तो विकास मागे येत बसला असता, आता नीट झाल, बर झाल बोलून घेतल त्याच्याशी ",... काव्या.

काव्या जागेवर आली, काम सुरू झाल परत, संध्याकाळी ती अभिजीत सोबत घरी जायला निघाली, अभिजित मला खूप गोष्टी हव्या आहेत खायला ,

काय काय?

काव्याची मोठी लिस्ट तयार होती , अभिजित हसत होता.
....

कथा संपत आली आहे, वाचकांचे खूप आभार.

🎭 Series Post

View all