तुझी साथ हवी मला... भाग 56

विकास त्याच्या ऑफिस मध्ये बसला होता, तो काव्याचा विचार करत होता, खूप टेंशन घेतल आज तिने, घरी गेल्यावर माझ्या बद्दल सांगितल तर अभिजीतला


तुझी साथ हवी मला... भाग 56

©️®️शिल्पा सुतार
.........

अभिजीत काव्या डॉक्टरांकडे गेले, रस्तात काव्या गप्प होती, घाबरलेली होती, अभिजीत काळजीत होता, ही म्हणते त्या गोष्टीची चौकशी करायला पाहिजे. विकास काही एवढा साधा मुलगा नाही, नक्की तो काव्याला त्रास देतो आहे.

बरीच गर्दी होती दवाखान्यात , यांची अपॉइंटमेंट होती त्या मुळे लगेच आत बोलवलं, डॉक्टर छान होती, तिने काव्याला तपासल, इतर माहिती विचारली,

"डॉक्टर हिला आज चक्कर आली, वीकनेस आहे का",.. अभिजीत.

"होत अस या दिवसात काळजी करू नका, धावपळ कमी करा जरा काव्या, जेवण भरपूर करा, पाणी प्या खूप, वॉक ला जात जा" ,.. बरच डॉक्टर बोलत होती, थोड्या दिवसांनी सोनोग्राफी करून घेवू आपण.

गोळ्या लिहून दिल्या, डायट चार्ट दिला, आवडीचे पदार्थ खा, तेलकट खारट खायच नाही.

दोघ घरी आले, काव्या रूम मध्ये निघून गेली, मावशी होत्या सोबत, अभिजित आशा ताईंना काव्याला चक्कर आली ते सांगत होता,

त्या काळजीत होत्या,.. "ठीक आहे ना आता ती? लागल नाही ना काही" ,

"नाही त्रास होतो आहे थोडा",.. अभिजीत.

अभिजित ऑफिस मधे आला, रोजच्या कामाला सुरुवात झाली, थोड्या वेळाने आदेश ऑफिस मधे आला, अभिजितने त्याला केबिन मधे बोलवलं,.. "विकास काही बोलला का आज काव्याला? ती खूप घाबरली होती आज, किती टेंशन घेतल चक्कर आली तिला " ,

"नाही बहुतेक पूर्ण वेळ विकास कामात होता शॉप मधे" ,.. आदेश.

" हो मी पण बघितल, काय कराव आता, तरी विकासकडे लक्ष देवू आपण",.. अभिजीत.

" हो.. कशी आहे आता वहिनी, डॉक्टर काय म्हटले",..आदेश.

" धावपळ कमी करायला सांगितली",.. अभिजीत.

"काही म्हटली का वहिनी विकास बद्दल ",.. आदेश.

"हो ती धोका आहे आपल्याला अस बोलत होती, तो विकास लॅपटॉप घ्यायला आला तेव्हा तर बोलला नसेल ना काव्याला, तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे आहे का ",.. अभिजीत.

"नाही नवीन शॉप आहे, सध्या काही नाही तिथे ",.. आदेश

" मला असं वाटतं आहे की विकास तिला काहीतरी बोलला आहे, धमकी दिली आहे, आपल्यासमोर विकास खूप साळसूद असल्यासारखं वागतो नक्की काहीतरी गडबड आहे, आज विचारतो मी काव्याला नीट, पण तिने टेंशन नको घ्यायला ",.. अभिजीत.

" बापरे यापुढे वहिनी कडे लक्ष दे दादा , आपण दोघ सोबत असतांना हिम्मत कशी होते त्या विकासची, आपली दुष्मनी अशी काढतो आहे का तो, वहिनीला कुठे जाऊ द्यायचं नाही एकट, पण कोंडल्या सारख ही नको वाटायला तिला , त्याचं बर्डन होईल असं ही वागायचं नाही, लक्ष द्यायला हवं वहिनीकडे आणि प्रिया कडे ही ",.. आदेश.

" बरोबर बोलतो आहेस तू, दोघींना धोका आहे, तिच्यासमोर नको हा विषय, पण आपण अलर्ट राहू ",.. अभिजीत.

" दादा मी दुपारून घरी जाणार आहे, मला आणि प्रियाला शॉपिंगला जायचं आहे, आई आजीही येणार आहे तिकडे, प्रियाचे घरचे येणार आहे",.. आदेश.

" हो जाऊन ये काव्यासोबत मावशी आहेत मी संध्याकाळी येईल घरी",.. अभिजीत.

दुपारी आदेश जेवायला घरी आला, लगेच आई आजी आदेश शॉपिंगला गेले, काव्या आराम करत होती मावशींच्या रूममध्ये, ती झोपलेली होती,

" बरं नाही वाटत आहे का ग",.. मावशी.

" ठीक आहे मी मावशी, मला काही सुचत नाही ",.. काव्या.

" आता कसलं टेन्शन आहे सगळं तर नीट आहे ना",.. मावशी.

"आहे थोडं टेन्शन कामाचं",.. काव्या.

"गरज नसेल तर एवढी धावपळ करू नको",.. मावशी.

जरा वेळाने श्रद्धाचा फोन आला, ती आणि रघु दोघं निघाले होते फिरायला, काव्या तिला चिडवत होती,.." मजा आहे तुझी श्रद्धा, जा फिरून या, आम्हाला तर कुठे जायला मिळत नाही",

"तू येते का सोबत, नाहीतरी रघु आहे, काही धोका नाही तुला ",.. श्रद्धा.

काव्या हसत होती,.. "कश्याला कबाब मे हड्डी, तुम्हाला डिस्टर्ब होईल, जावून या छान फिरून या, मी सांगितल त्या वर विचार कर जरा, माझ्या बाळा सोबत खेळायला कोणी तरी हव ",

" एक दिवस झाला आमच्या लग्नाला काव्या, उगीच काहीही विचार करू नकोस, आराम कर तब्येत सांभाळ",.. श्रद्धा.

तिच्याशी बोलून काव्या खुश होती.

आदेश प्रियाला घ्यायला त्यांच्या घरी गेला, ते खरेदीसाठी मार्केटमध्ये आले, आधी प्रियाची खरेदी झाली, छान शालू घेतला होता तिने लग्नासाठी, रिसेप्शन साठी घागरा घेतला होता, बर्‍याच साड्या आशा ताई पसंत करत होत्या, तिच्या ड्रेसला मॅचिंग आदेशचे कपडे होते, अभिजीत काव्यासाठी पण छान साडी ड्रेस घेतले होते,

त्यानंतर दागिने खरेदी झाली,

"एवढे दागिने नको मला आई",.. प्रिया.

"असू दे ग तू जास्त विचार करू नकोस" ,.. आशा ताई, आजी अजूनही नवीन नवीन डिझाईन बघत होत्या, हे दागिने छान दिसतील प्रियाला, त्यांनी काव्या साठी ही एक सेट घेतला.

सगळेजण चहा घ्यायला हॉटेलमध्ये आले, आदेश आणि प्रिया जवळ जवळ बसले होते, बाकीचे बाजूला बसले होते, प्रिया आता बऱ्यापैकी छान आधी सारखी छान बोलत होती,..

"आवडली ना खरेदी तुला प्रिया? आत्ताच परत एकदा बघून घे, साड्या वगैरे बदलून आणायच्या असं काही असेल तर मी येणार नाही येणार नाही आधीच सांगून देतो",.. आदेश.

" म्हणजे काय यावच लागेल तुला आदेश, बायको च्या मागण्या मान्य कराव्या लागतील",.. प्रिया.

"बापरे आतापासूनच खूपच दमदाटी होते आहे मला, तुझ्या साड्या बदलून आणल्या तर त्याला मॅचिंग माझे कपडे घेतले आहेत हे लक्षात ठेव, नाही तर लग्नात मी वेगळाच दिसेल ",.. आदेश.

हो.. प्रिया खूप हसत होती, आदेश तिच्या अगदी मागे मागे होता, ती आधी सारखी छान वागत होती त्यामुळे आदेशला बरं वाटत होतं,.. "प्रिया तू चिडणार नसशील तर एक विचारायच होत" , आदेश तिच्या कडे बघत होता.

"बोल ना ",.. प्रिया लाजली होती.

"फिरायला जायच ना आपण लग्ना नंतर की तुला वेळ हवा आहे",.. आदेश ने डायरेक्ट विचारल.

प्रियाला आता काय बोलाव ते सुचत नव्हत होती,.. "आदेश आपण जावू फिरायला", ती हळूच म्हटली.

"अर्थ माहिती आहे ना तुला याचा, तुझा होकार आहे ना, नाहीतर तिकडे भांडायची तू माझ्याशी ",.. आदेश.

" काही प्रॉब्लेम नाही आपण राहू सोबत",.. प्रिया.

आदेश खुश होता आता.

संध्याकाळी घरी आल्यानंतर आशाताई काव्याला सगळी खरेदी दाखवत होत्या, लग्नाला अगदी आता आठ दिवस बाकी होते, अजून काय काय तयारी बाकी आहे आजी आणि आशाताई ठरवत होत्या,

" आम्हाला पण काम सांगा ",.. मावशी बोलत होत्या.

" हो सांगू तुम्हाला ही, तुमच्या पद्धतीने फराळ करून घेवू, तुम्ही फक्त सांगा त्या ताई करतील, आणि आता सध्या एक खूप मोठं काम आहे तुम्हाला काव्याची काळजी घ्यायची, आणि तिच्या आवडीचे पदार्थ बनवायचे",.. आशा ताई.

"हो काव्या म्हणेल ते करू आपण",.. मावशी.

"काव्या तू पण हळूहळू लग्नाची तयारी करायला घे तुझी आणि अभिजीतची तयारी झाली तरी पुष्कळ आहे",.. आशा ताई.

घरात बरेच लोक होते कामाला, त्यामुळे काळजी नव्हती, पटापट काम होत होते.

प्रियाचा फोन येत होता, काव्याला ती सारखा विचारत होती काय करायचं काय नाही, काव्या जे सांगितले ते ऐकत होती, तिची लग्नाची तयारी पूर्ण झाली होती.

प्रतापरावांनी सुरेश रावांना फोन करून लग्नाच आमंत्रण दिलं,.. "सगळ्यांनी यायचं आहे लग्नाला, आदल्या दिवशीपासून कोणतेही कारण चालणार नाही" .

"हो नक्की येवू आम्ही",.. सुरेश राव.

अभिजीत संध्याकाळी ऑफिस हून आला, काव्या ठीक आहे बघून तो रीलॅक्स झाला.

आदेश पार्टी ऑफिस मध्ये गेला होता, त्याचं पण इलेक्शन जवळ आलं होतं, ते पण काम करणं गरजेचं होतं, आता बऱ्यापैकी त्याच्या पार्टी ऑफिस मध्ये विकास येऊन बसत होता, नेहमी बिझनेस बाबत इतर गोष्टीवर मोकळेपणाने बोलत होता, कधीच प्रायव्हेट लाईफ बद्दल प्रश्न त्याने विचारले नाही, प्रिया बाबतीतही काहीच विचारलं नाही,

मग हा वहिनीला का काही बोलल असेल, समजत नाही, असा तर हा बोलायला वागायला किती चांगला आहे, पण मग वहिनी का घाबरली होती सकाळी इतकी, मागच्यावेळी दादा तिला ओरडला म्हणून ती त्या विकासला बघून घाबरली असेल का, काही समजत नाही , दादा शोधणार आहे नक्की काय झाल ते.

पण वहिनी तर बोल्ड आहे, एवढी घाबरत नाही कशाला, जाऊदे आपण हा विकास सोबत असताना वहिनीला एकट सोडायचं नाही.

अभिजीत काव्याची काळजी घेत होता, आता काव्या ठीक होती, आज तिचा आवडीचा स्वयंपाक होता, मावशींसोबत ती किचन मध्ये मदत करत होती, जेवण झाल्यावरती अभिजीत सोबत फिरुन आली. मावशी आजी बोलत बसल्या होत्या.

" बरं वाटतं आहे का आता काव्या",.. अभिजीत.

हो.

"गोळ्या औषध घेतले का",.. अभिजीत.

हो.

ती आशा ताईं सोबत इतर प्रोग्राम बाबत ठरवत होती,.. "चल काव्या आता जा रूम मधे आराम कर",

"हो आई आदेश आला नाही अजून फोन करते" ,.. आदेश आला, जेवून घे आदेश.

"हो वहिनी तू ठीक आहेस ना ",.. आदेश.

हो.

तो आजीं सोबत बोलत होता, अभिजित काव्या रूम मध्ये आले.

" लग्नाच्या धावपळीत आराम पण कर जरा काव्या ",.. विचारून बघू का हीला विकास बद्दल, ती खुश आहे मावशी सोबत, बोलून बघतो, मीच लक्ष देईलच आता हिच्याकडे.

"काव्या इकडे ये, मी विचार केला आज तू काय सांगितल त्यावर, विकास काय म्हटला तुला नीट सांग",.. अभिजीत.

" तुला राग तर येणार नाही ना माझा ",.. काव्या.

" नाही तुझा का राग येईल, मला माहिती आहे या जगात बरेच खराब लोक आहेत, जर कोणी तुझ्या मागे येत असेल तर त्यात तुझा काय दोष, तो बघणाऱ्याच्या नजरेत आहे",.. अभिजीत.

" आज मी केबिन मधे बसली होती तर तो विकास तिथे आला, मला म्हणत होता की माझ्याशी मैत्री कर, मला भेटायला ये, नाहीतर इथे एक्सीडेंट होऊ शकतो, आदेशही इलेक्शनला उभा आहे अशी धमकी तो देत होता आणि तो मुद्दामून सगळ्यां समोर वेगळा वागतो माझ्याशी वेगळा वागतो, मी काही केल नाही, मला नाही आवडत तो, मी आता तिकडे येणार नाही, सगळे लोक मला का त्रास देतात ",.. काव्या.

" काळजी करू नकोस, मी बघतो काय करायच ते, तू अलर्ट रहा कारण एवढे आम्ही दोघ सोबत असतांना तो त्रास देतो म्हणजे किती डेंजर आहे तो ",.. अभिजीत.

" त्याने मला काही केल तर? अभिजीत तू माझ्या वर विश्वास ठेव, बहुतेक त्या विकासचा आपल्याला वेगळ करायचा प्लॅन आहे ",.. काव्या.

" काव्या मला लक्ष्यात आल ते, आता विकास सोबत काम ही आहे, त्याला जास्त बोलता येणार नाही, हा प्रॉब्लेम नीट सोडवायला हवा, करतो मी काही तरी, तू आराम कर",.. अभिजीत.

काव्या झोपली, बर झाल अभिजीतला लक्ष्यात आल, आता तो ठीक करेन, एकदम रिलॅक्स वाटत होत.

अभिजित विचार करत होता काय कराव या विकासच, त्याला भेटाव लागेल,

विकास त्याच्या ऑफिस मध्ये बसला होता, तो काव्याचा विचार करत होता, खूप टेंशन घेतल आज तिने, घरी गेल्यावर माझ्या बद्दल सांगितल तर अभिजीतला, मी खूप बोललो का काव्याला, ती दिसली की कंट्रोल जातो माझा, आज एक तर ती साडीत छान दिसत होती, अभिजित काही बोलला तर, आपल्या सोबत काम करायला नकार दिला तर, असा मूर्ख पणा तो करणार नाही, एकत्र काम करावंच लागेल, गव्हर्न्मेंट प्रोजेक्ट आहे, मला नेहमीच संधी मिळेल काव्याला भेटायची, अभिजीत काव्याच खूप पटत असं वाटतं आहे, एक तर तो तीच खूप ऐकतो, तिने आता त्याला काही जास्त सांगायला नको, काव्या तशी आहेच छान, कोणीही ऐकेल तीच, मला नाही वाटत अभिजीत येईल मला विचारायला,

मध्ये एक दोन दिवस गेले, श्रद्धा फिरायला गेली होती, रघु सोबत छान रमली होती ती, रघु होताच चांगला, तो श्रद्धाची खूप काळजी घेत होता, इतक प्रेमळ पाहिल्यांदा कोणी तरी श्रद्धाच्या आयुष्यात आल होत, ती खूप खुश होती.

काव्या रोज ऑफिसमध्ये जात होती, व्यवस्थित काम सुरू होत.

प्रियाची लग्नाची तयारी सुरू होती, आदेश रोज फोन करत होता तिला, खुश होते ते दोघ, प्रिया आज पार्लरला जाणार होती, तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी आणि बहीण होती, ती काव्याला बोलवत होती पण घरच्यांनी काव्याला पाठवलं नाही

"नको तिची तब्येत ठीक नाही परत दोन-तीन दिवस धावपळ होईल, आता हिला आराम करू दे",.. आशा ताई.

दुसऱ्या दिवसापासून लग्नाचे प्रोग्राम सुरू होणार होते, आज मेहंदी होती, प्रियाकडे मोठा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला काव्या आणि मावशी थोड्या वेळ गेल्या होत्या, काव्याचे खूप लाड होत होते, प्रियाच घर काव्याला स्वतःच घर वाटत होत, एकदम आरामात होती ती, थोड्या वेळाने ते घरी वापस आले,या ही घरी मेहेंदीचा प्रोग्राम होता काव्या आदेशाला पकडून घेवून आली, तो नाही बोलत होता,

"थोडीशी मेहेंदी लाव आदेश, नाही तर तुला प्रियाचे फोटो दाखवणार नाही, आज ती खूप सुंदर दिसते आहे",.. काव्या.

आदेशने मेहेंदीचा एक ठिपका लावला, बाकीच्या सगळ्या मेहेंदी काढत होत्या, घरात उत्साहाचा वातावरण होत, अभिजित काव्या कडे लक्ष देवून होता,

आदेश खूप खुश होता, त्याच्या सोबत काव्या ही खुश होती, प्रिया घरी येईल तर तिला ही सोबत होणार होती, खूप छान वाटत होत,

दुसऱ्या दिवशी सगळे लवकर हॉटेलवर जाणार होते, तिथे सगळे आदेश आणि प्रियाचे लग्नाचे कार्यक्रम होणार होते, सकाळी हळद होती त्यासाठी सगळे तयार होते, काव्या ही पिवळी साडी नेसून खूप छान तयार होती,

अभिजीतने तिला जवळ घेतलं,.. "खूपच छान दिसते आहेस तू, पिवळा रंग छान दिसतो तुझ्यावर",

"आधी तर तू म्हटला होता की लाल कलर छान दिसतो मला ",.. काव्या.

"सगळेच रंग छान दिसतात तुझ्यावर बस का",.. अभिजीत.

काव्या खूप हसत होती, दोघ तयार होऊन खाली आले, सामानाची गडबड सुरू होती, काय काय घ्यायचं आजी बघत होत्या, आशाताईंनी अभिजीत काव्याला जवळ बोलवलं.." हे बघा लग्नकार्य जरी असले तरी खूप धावपळ करायची नाही, अभिजीत काव्या कडे लक्ष दे, व्यवस्थित जेवली का गोळ्या घेतल्या का, पहिले तीन महिने महत्त्वाचे आहेत ",

हो.

आदेश वरून खाली आला.

"आदेश तुझी बॅग घेतली का? दाखव काय काय सामान घेतलं, काल आपण बॅग भरल्या नंतर काही कपडे काढून ठेवले नाही ना, नाही तर आपण लग्नाच्या हॉलवर आणि तुझे कपडे घरी राहायचे ",.. काव्या सगळं चेक करत होती, काय काय घेतलं काय काय नाही ते, तिच्या हाताने सगळं सामान व्यवस्थित गाडीत भरायला मदत करत होती ती.

सगळे हॉलवर आले सुरेश राव प्रमिला ताई सोहम सुरभी आलेले होते त्यांना भेटून काव्या खुश होती सगळ्यांसोबत ती नाश्त्याला गेली,

" तुझा रिजल्ट आहे काव्या या आठवडय़ात, पुढच शिक्षण घेणार ना",.. सोहम.

"हो मी घेणार आहे अ‍ॅडमिशन",.. काव्या.

"सोहम तिकडून काव्याचा रिजल्ट ट्रान्सफर सर्टिफिकेट सगळं डॉक्युमेंट पाठवून दे",.. अभिजीत.

" मला नाही जाता येणार का घ्यायला",.. काव्या.

"नाही तब्येत सांभाळ, डॉक्युमेंट आले की इकडे ऍडमिशन घेऊन टाकू" ,.. अभिजीत.

चहा नाश्ता झाला, लगेच हळदीची तयारी झाली, अभिजीत काव्याने आदेशला हळद लावली, नंतर थोड्यावेळाने प्रियाची हळद होती, आता तिकडे काव्या गेली तिने त्या बाजूच्या कार्यक्रमात सुद्धा मदत केली.

जरा वेळाने वरातीची तयारी झाली, सगळे छान आवरून तयार होते, आदेशची तयारी मस्त झाली होती, अभिजित त्याच्या आजूबाजूला होता ,

लग्ना साठी काव्याने पण शालू घातलेला होता, त्यात ती खूप छान दिसत होती, अभिजीतची तयारी झाली, दोघेजण खाली आले, खाली बरीच पाहुणे आले होते, प्रतापरावांनी अभिजीत काव्याला सगळ्यांच्या स्वागतासाठी उभ केलं,

इंडस्ट्रियालिस्ट मित्र येत होते, अभिजीत स्वागत करत होता, काव्या त्यांना अत्तरफुल देत होती, तिच्या मदतीला दोन-तीन मुली होत्या.

मध्येच तीने दोन तीनदा अभिजीत वर अत्तर उडवल.

"काय चाललं आहे काव्या, केव्हाच बघतो आहे मी, नको त्रास देवू",.. अभिजीत.

" मी कुठे काय केलं पाहुण्यांवर अत्तर उडवता उडवता तुझ्यावर उडलं असेल ",.. काव्या.

"अस का बघतो जरा, तो तिच्या अंगावर फुल टाकत होता",. अभिजीत.

"अभिजीत नको ना, कोण काय म्हणेल, लहान आहेस का",.. काव्या चिडली,

" आता का स्वतःला त्रास झाला तर ओरडते, तुला नंतर बघतो मी",.. अभिजीत.

सचिन आणि विकास लग्नासाठी आले, अभिजीतने त्यांच स्वागत केल, ." तुम्ही दोघे एकटे का आले? तुमची फॅमिली कुठे आहे?",

"आमच लग्न झालेले नाही अजुन ",.. सचिन.

" अरे आई बाबा कुठे आहेत मग, आणि आता लग्न करून घ्या ",.. आता तिघे हसत होते,

त्या दोघांचा स्वागत करून ते आत आले, काव्या मुलीसोबत बोलत होती, विकास बघत होता लाल भरजरी शालू नेसला होता तिने , सुंदर दागिने घातले होते , गजरे लावले होते, मुळातच सुंदर होती ती, आज वेगळीच दिसत होती, दोघं काव्याकडे बघत होते.

सचिन येऊन काव्या सोबत बोलला,.. "कश्या आहात तुम्ही वहिनी? ठीक आहे का आता तब्येत?",..

"हो या ना आत बसा",.. काव्या.

विकास फक्त लांबून बघत होता तिच्या कडे, अभिजीत लक्ष देऊन होता, त्याने आधीच काव्याला सांगितलं होतं की लग्नात विकास येईल किंवा इतर लोक त्रास देतील तर लक्ष देऊ नको. आपण घाबरल मी जास्त करतात लोक बिनधास्त रहा, नेहमी अश्या कंडिशन मध्ये हिम्मत हरायची नाही

काव्या बिनधास्त विकास कडे बघत होती तिने त्या दोघांना फुल दिले अत्तर लावल,

"थँक्स वहिनी",.. सचिन.

"आत जावून बसा",.. काव्या.

"तुम्ही कामात आहात, आम्ही मदत करू का",.. सचिन.

" नको आमच्या घरचे काम आम्ही करणार ",.. काव्या.

विकास सचिन आत येवून बसले, काव्याने दिलेल फुल विकासने नीट जपून ठेवल.




🎭 Series Post

View all