तुझी साथ हवी मला... भाग 54

श्रद्धा उद्या लवकर येते मी पूजे साठी, तो पर्यंत बाकीचे आहेच सोबत, तुला अस वाटत असेल ना का रहाता सगळे इथे


तुझी साथ हवी मला... भाग 54

©️®️शिल्पा सुतार
.........

पार्लर मधुन निघाल्यावर श्रद्धा कडे रघु केव्हाचा बघत होता, ती स्कार्फ बांधत होती,

"संध्याकाळी का हवा स्कार्फ",.. रघु हसत होता.

"अरे मी फेशीयल केल ना, तर ग्लो जाईल ना" ,..श्रद्धा.

" काही गरज नाही या सगळ्याची, उगीच पैसे वेस्ट होतात, नेक्स्ट टाईम लक्ष्यात ठेव, तू अशीच छान आहे" ,.. रघु.

"बरोबर बोलते काव्या" ,.. श्रद्धा.

"काय म्हटल्या मॅडम",.. रघु.

"काही नाही चल निघू या, उद्यापासून आपले लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील",..श्रद्धा.

" हो ना दोन-तीनच दिवस राहिले माझ्या स्वातंत्र्याचे",..रघु.

" स्वातंत्र्य हव आहे का तुला रघु ",..श्रद्धा.

"नाही आत्तापासून किती घाबरून राहावं लागत आहे मला",..रघु.

" तू घाबरतो का कोणाला कराटे चॅम्पियन ",..श्रद्धा.

"हो एका मुलीला घाबरावे लागतं",.. दोघे छान बोलत आश्रमात पोहोचले.

"चल मी येतो ,उद्या ऑफिसला येणार आहेस ना",..रघु.

" हो उद्या माझा हाफ डे आहे, त्या नंतर एक आठवडा सुट्टी ",.. श्रद्धा.

" का एवढी एक आठवडा सुट्टी पण, काय करणार आहोत आपण ",.. रघु हसून श्रद्धा कडे बघत होता, मुद्दाम चिडवत आहे. ती लाजली,.. रघु प्लीज.

"झाल आहे आपल बूकिंग, पूजा झाली की फिरून येवू, चल थोड जवळ ये , निघतो मी, लग्नात भेटू ",.. रघु.

अभिजीत काव्या रेस्टॉरंट मध्ये गेले, अभिजीतने त्याच्यासाठी कॉफी आणि काव्यासाठी ज्यूस सांगितलं,.." काव्या तुला जमतय ना हे ऑफिस वगैरे, नाही तर तू आराम कर घरी, तब्येती कडे दुर्लक्ष नको",

" नाही काही प्रॉब्लेम नाही, मला जमल नाही तर मीच सांगेन",.. काव्या.

ते दोघ आरामात बसले होते, नंतर ते मेडिकल शॉप मध्ये गेले, तिथून घरी निघून गेले.

विकासच्या लोकांनी त्याला मेसेज केला, काव्या आहे इकडे.

" कोणासोबत आहे",.. विकास.

" अभिजीत सोबत आहे",..

"नको यायला मग तिकडे जाऊ दे, काय करत आहे ते",.. विकास.

"माहिती नाही मेडिकल शॉप मध्ये गेले होते",..

"बरं नाही की काय काव्याला? काय माहिती",.. विकासला आता काळजी वाटत होती.

रात्री जेवताना आदेश.. प्रतापराव आणि अभिजीतला तिकडे काय काय मीटिंगमध्ये झालं ते सांगत होता,

" चांगल आहे आदेश, बर झाल लगेच काम करायला जागा मिळाली, छान काम करा तुम्ही सगळ्यांनी",.. प्रतापराव.

काव्या ऐकत होती, बहुतेक या मीटिंगसाठी विकास आणि तो एक मुलगा आपल्या ऑफिसमध्ये आले होते, जाऊदे गैरसमज करून घ्यायचा नाही,

जेवणानंतर अभिजीत आणि काव्या फिरून आले,.." मी अस ऐकल अभिजीत की शशी घरी गेला, त्याच्यापासून धोका आहे का आपल्याला? ",

" माहिती नाही काव्या, तो आपल्या फार्म हाऊस वर आला होता असा पुरावा त्याने नष्ट केला ",.. अभिजीत.

"बापरे, पण बर्‍याच लोकांनी बघितल ना त्याला तिथे",.. काव्या.

"हो पण काही फायदा नाही, पुरावा हवा ",.. अभिजीत.

" मला घरी जायचं आहे ",.. काव्या.

"आता तुझ्या घरचे येणार आहे ना श्रद्धाच्या लग्नाला, त्यानंतर लगेच दहा दिवसांनी आदेशच लग्न आहे आता वेळ आहे का तुला घरी जायला",.. अभिजीत.

"मग आदेशच्या लग्नानंतर जायचं का आपण सोहम दादा कडे ",.. काव्या.

"मी पक्क सांगत नाही ठरवू आपण",.. अभिजीत.

" सगळे फिरायला जात आहे आपणच दोघं नाही",.. काव्या नाराज होती.

"कुठे जायच तुला, अस करता का? आता तर आपण दोघ नाही तिघ आहोत काळजी घ्यायला हवी",.. अभिजीत.

"मला माहिती नाही ते, जायच मला कुठे तरी ",... काव्या.

" ठीक आहे, चिडू नकोस, टेस्ट केली का ",.. अभिजीत.

" हो ",.. काव्या थोडी लाजली होती.

" काय आला रिजल्ट, आधी का नाही सांगितलं ",.. अभिजीत.

" आपल्याला हवा तोच आला, श्रद्धाच्या लग्नानंतर डॉक्टर कडे जाऊन येऊ" ,.. दोघं खूप खुश होते, अभिजितने तिला जवळ घेतल तिच्या कपाळावर ओठ टेकवले. बऱ्याच वेळ ते दोघे बोलत बसले होते.

नाश्त्याच्या वेळी आशा ताई काव्या कडे बघत होत्या,.." केली का टेस्ट?",

" हो केली आई काल रात्री " ,.. काव्या.

" केव्हा सांगणार मग काव्या, अभिनंदन तुमच दोघांच",.. आशा ताई.

प्रतापराव, आदेश आजी पण आले नाश्ता साठी,

"कश्या साठी अभिनंदन आम्हाला ही सांगा",.. प्रतापराव.

"अभिजीत आणि काव्याकडे आनंदाची बातमी आहे, ते आई बाबा होणार आहेत",.. सगळे त्या दोघांकडे बघत होते, काव्या अभिजीत दोघ लाजले होते या वेळी.

" एवढी भारी बातमी इतक्या हळू का सांगतेस वहिनी , मी खूप खुश आहे दादा, पार्टी द्या आता, वहिनी डायरेक्ट प्रमोशन ",.. आदेश.

सगळे हसत होते,

तिघ ऑफिसमध्ये गेले, आज श्रद्धा आणि काव्याचा हाफ डे होता, दोघींना केंद्रात जायचं होतं, श्रद्धाची मेहंदी होती, श्रद्धाने मुद्दामच आज सुट्टी घेतली नव्हती, कारण पुढचे आठ दिवस सुट्टी होणारच होती, घरी बसून तरी काय करणार,

काव्याने बदलायला ड्रेस घेतला होता, ति उशिरा घरी येणार होती हे माहिती होत सगळ्यांना, अभिजीत जाणार होता तिला घ्यायला, लंच ब्रेक पर्यंत काम केल, आता अभिजीत सोबत आदेश तिच्यावर लक्ष देवून होता,.. "वहिनी होईल तेवढ काम कर, धावपळ नको" ,

जेवण झाल्यावर काव्या आणि श्रद्धा निघाल्या त्यांच्यासोबत रघु होता, आज श्रद्धाने स्कूटर आणली नव्हती, ती काव्यासोबतच कार मध्ये होती, दोघींना केंद्रात सोडल्यानंतर रघु वापस गेला,

खूप छान तयारी करत होत्या मुली, श्रद्धाने हिरवा ड्रेस घातला होता त्याला लाल काठ होते, आश्रम ही बर्‍या पैकी फुल पताकांनी सजवला होता, गाणे सुरू होते, काही मुली डान्स करणार होत्या त्या स्टेप्स ठरवत होत्या.

काव्या जाऊन आजींना भेटली आणि न्यूज कन्फर्म असल्याचा सांगितलं, आजींना खूप आनंद झाला,.. "गडबड करायची नाही बेटा आता कामाची, आनंदी रहायच",

"आजी माझी थोडी चीड चीड होते आहे सध्या",.. काव्या.

"होत अस पण काळजी घ्यायची, छान पुस्तक वाच, संगीत ऐक, जेवण करत जा भरपूर ",.. आजी.

"आजी तुम्ही माझ्या सोबत चला ना रहायला मला तुमच्या सोबत खूप आवडत",.. काव्या.

" येईल नंतर",.. आजी.

मेहंदी वाल्या आर्टिस्ट आल्या, लगेच श्रद्धाच्या हातावर मेंदी काढायचा कार्यक्रम सुरू झाला, तिच्या आजूबाजूला बऱ्याच मुली गाणं म्हणत होत्या, काव्या पण तिथेच बसलेली होती, ती सगळ्या प्रोग्रामची व्हिडिओ शूटिंग घेत होती, श्रद्धाचे खूप फोटो काढले तिने.

काव्याला बऱ्याच मुली नाचायचा आग्रह करत होत्या, काव्या तिथेच बसून होती, काकू डोळ्यानेच विचारत होत्या काय ग, तिने हो सांगितलं, त्या खूप आनंदी होत्या, त्या येऊन भेटल्या.
.........

नवीन शॉप मध्ये साफसफाई सुरू झाली होती, आदेश विकास आणि सचिन तिथे हजर होते, आज तिथे बऱ्याच लोकांचे इंटरव्यू सुद्धा झाले, एक छान टीम सिलेक्ट झाली, मॅनेजरही छान होता, त्याला बऱ्याच कामाचा अनुभव होता, त्याने लगेच कामाला सुरुवात केली.

गव्हर्मेंट ऑफिस मध्ये मीटिंग होती, तिथे कुठपर्यंत तयारी झाली हे सांगायचं होतं, विकासला वाटत होत त्याप्रमाणे त्यांना सुरुवातीला अगदी छोटं प्रोजेक्ट करायला दिलं होतं, पुढच्या आठवड्यात त्या कामाचा रिपोर्ट द्यायचा होता, तिघ वापस फॅक्टरीत आले,

"आपल्याला हे काम लवकर सुरू करावे लागेल, महत्वाच आहे काम",.. सचिन.

"कस काय सुरू करणार काम, इथे काहीतरी पूजा वगैरे व्हायला पाहिजे, चांगल्या कामाला सुरुवात करतो आहोत आपण ",.. विकास.

"बरोबर आहे ",.. सचिन.

"ठीक आहे ना मग ठेवु आपण पूजा",.. आदेश.

"आपल्या तिघांचं लग्न झालं नाही, आदेश तुझ्या भावाचं लग्न झालं आहे ना, त्याला बसू दे पूजेला",.. सचिन.

विकासला तेच हवं होतं, तो खुश होता.

" मी विचारून बघतो अभिजीत दादाला, काय म्हणतो तो, बहुतेक ते दोघे बिझी आहेत",..आदेश.

" पूजेला काही जास्त वेळ लागणार नाही, अर्ध्या एक तासाच काम आहे आणि त्या दोघांना आवडेलच पूजा करायला",.. सचिन.

" हो मी बोलून बघतो, आज रात्री ग्रुप वर सांग मग काय म्हणताहेत ते",.. आदेश.

"ठीक आहे",..विकास.

आदेशला काळजी होती, अभिजीत नक्की नाही म्हणेल, काय सांगणार आता या सचिनला विकास मुळेच दादा हो म्हणेल की नाही माहिती नाही, आदेश घरी आला, आज काय काय काम झालं ते तो अभिजीत सोबत बोलत होता,.. "दादा ते म्हणत आहे की तुझ्या आणि वहिनीच्या हातून तिथे पूजा होईल",

"काव्या कशाला हवी पूजेला",.. अभिजीत.

"मला पण तेच वाटत, आता काय करूया, नाही कस म्हणणार ",.. आदेश.

"कसे आहेत ते दोघं वागायला",.. अभिजीत.

"नॉर्मलच वाटत आहेत, कामाशी काम ठेवतात ",.. आदेश.

"पण त्यादिवशी विकास थोडसं बोलला काव्याशी त्या वरुन किती ओरडलो मी काव्याला आणि आता तेच होत आहे, तिलाच घेऊन परत पूजेला यायच ",.. अभिजीत.

" तू ठरव माझी बळजबरी नाही ",.. आदेश.

" किती वेळ असेल पूजा",.. अभिजीत.

"थोड्याच वेळ असेल ",.. आदेश.

" उद्या श्रद्धाचं लग्न आहे ",.. अभिजीत.

" मग श्रद्धाच्या लग्नाला तुम्ही दोघं तयार झाले की इकडे येऊन जा, एखाद्या तासाची पूजा असेल ते करून चालले जा",.. आदेश.

" काव्या नाही ऐकणार तिला श्रद्धा सोबत राहायचं असेल",.. अभिजीत.

"मग लग्न लागल्यानंतर त्यांचे इतर विधी असतील तेव्हा या",.. आदेश.

" ठीक आहे मी काव्याशी बोलून बघतो",.. अभिजीत.

" कुठे आहे वहिनी? ",.. आदेश.

" ती मेहंदीच्या प्रोग्रामला गेली आहे केंद्रात, मला जायचं आहे जरा वेळाने तिला घ्यायला ",.. अभिजीत.

तेवढ्यात ग्रुप वर सचिनचा मेसेज आला,.." पूजेचं काय ठरतं आहे",

अभिजीतनेच रिप्लाय दिला,.. "मी सांगतो तुम्हाला रात्रीपर्यंत ",

विकास मेसेज बघून हसत होता, सचिन ने हे काम फार छान केल.

"तसं सामान आणि पुजारी मिळाले आहेत, तुमचं काय ठरतं ते सांगा",.. सचिन .
......

काव्याच्या हातावर पण छान मेहंदी काढली होती, तिथे जेवण होतं, जेवण झाल्यावर काव्याने सोहम दादाला फोन केला,.." उद्या किती वाजता येता आहात तुम्ही? ",

" आम्ही दहा वाजेपर्यंत येतो",.. सोहम.

" लवकर या अगदी वेळेवर येऊ नका, मावशीला घेऊन ये दादा",.. काव्या.

"हो मावशी आणि सुरभी आणि मी आम्ही तिघंच येतो आहोत, आई-बाबा येत नाहीत, त्यांना नाही होत दग दग",.. सोहम.

"माझी भेट झाली असती ना पण त्यांच्याशी, शशी घरी आला ना दादा",.. काव्या.

"हो समजलं मला आणि त्याच्याविरुद्ध काही पुरावा नाही",.. सोहम.

" वहिनीचं काही बोलणं झालं का त्याच्याशी ",.. काव्या.

" माहिती नाही पण माझ्यासमोर तरी नाही झालं बोलणं आणि आम्ही घरात त्याचा विषय काढत नाही",.. सोहम.

" ठीक आहे या मग उद्या वाट बघते आहे",.. काव्या.

त्यानंतर तिने अभिजीतला फोन केला,.." मेहंदीचा कार्यक्रम झाला आहे घ्यायला येतोस का ",

" हो राणी सरकार आलोच, खूप सेवा करून घेताय माझ्या कडून ",.. अभिजीत.

जरा वेळाने अभिजीत आला, तो थोडा गप्प होता, काव्या खूप बोलत होती तिकडे काय काय झाल ते सांगत होती,.. "अभिजित तू अजून माझी मेहंदी बघितली नाही, आवडली नाही का मेहंदी? काय विचार सुरू आहे ",. काव्या तिचे दोघी हात अभिजीतला दाखवत होती.

" अरे वाह आता तू हेल्प लेस आहेस, तुला काही हव तर माझी गरज लागेल",.. अभिजीत तिच्या कडे बघत बोलला.

"त्यात आनंद होण्यासारखं काय आहे ",.. काव्या हसत होती.

"समजेल तुला नंतर, काव्या एक सांगायचं होतं, उद्या तुला एक तास वेळ मिळेल का?",.. अभिजीत.

"काय काम आहे" ,.. काव्या.

"ते नवीन प्रोजेक्टच काम सुरू करायच आहे त्या आधी पूजा आहे" ,.. अभिजीत.

" उद्या करण गरजेच आहे का? , परवा करता येईल का पूजा सकाळी सकाळी, कोणाच्या हातून आहे पूजा? ",.. काव्या.

" आपल्या दोघांच्या",... अभिजीतने अस म्हटल्यावर काव्याला टेंशन आल होत.

"मी विचारून बघतो, पण तस ही लग्न लागल्या नंतर श्रद्धा रघुच्या पूजा सुरू असतांना आपण जावून येवू",.. अभिजीत.

"नको तिला माझ्या सपोर्टची गरज आहे, तिचे इतर कोणी नातेवाईक नाही, प्लीज अभिजीत ",.. काव्या.

ठीक आहे.

" श्रद्धा रघुच घर सेट झाल असेल ना ",.. काव्या.

" आपण ज्यांना अरेंजमेंट करायला सांगितली होती त्यांना विचारू",.. अभिजीत.

" त्यांच्या घरी कोणी नाही या साठी तिला आधीच वाईट वाटत होत, मी जाईल तिच्या सोबत तिच्या घरी , तिथे थांबेल",... काव्या.

" हो चालेल, अजुन कोण आहे" ,... अभिजीत.

" आश्रमातल्या आजी काकू पण येणार आहेत, दुसर्‍या दिवशी पूजा झाली की जातील त्या वापस",.. काव्या.

" चालेल खूप छान करते आहेस तू ",.. अभिजीत.

काव्याला पूजेच टेंशन आल होत, कोण कोण असेल तिथे, विकास असेल, जावू दे दुर्लक्ष करू,

दोघ घरी आले आशा ताई काव्या उद्याची तयारी करत होत्या, थोड थकल्या सारख झाल होत आज तिला, उद्या दादा येईल खुश होती ती,

"उद्या किती वाजता जायच",.. आशा ताई.

" सकाळी हळद आहे, सोबत जावू",.. काव्या.

बॅग भरत होती ती, काय आहे प्रोग्राम, लग्नासाठी साडी, नंतर बदलायची साडी, सगळ घेतल तिने.

"रात्री घरी यायच काव्या",.. अभिजीत.

"मावशी कडे रहाते ना",.. काव्या.

"मावशी सोहम आपल्या कडे येणार आहेत संध्याकाळी",.. अभिजीत.

आता काव्या खूप खुश होती,

आज सकाळपासून आवरायची खूप गडबड होत होती, सकाळी काव्या फार्म हाऊस वर पोहोचली, तिने लगेच श्रद्धाची तयारी करायला घेतली, हळद झाली लगेच लग्नाची विधी होणार होते.

आदेशनी विकास आणि सचिनला फोन करून सांगितल,.." पूजा उद्या होईल आज वेळ नाही",

" हो चालेल काही हरकत नाही, हो म्हटले का अभिजीत साहेब",.. सचिन.

"हो येणार आहे दादा वहिनी पूजेसाठी",.. आदेश.

विकास मेसेज वाचत होता.. "काव्या हो म्हटली पूजेसाठी, तिला माहिती आहे मी असेल तिथे, म्हणजे तिला ही इंट्रेस्ट आहे का मला माझ्यात, बहुतेक असेल, बघू आता उद्या बोलते की नाही माझ्याशी, छान वाटेल पण काव्याला साडीत बघुन, काय करू मी, खूप छान वाटतय ",

लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, श्रद्धा खूप छान दिसत होती, आश्रमातील मैत्रिणी काव्या सगळ्या आजूबाजूला होत्या,

सोहम सुरभी मावशी आले काव्या खूपच खुश होती, पळत भेटायला गेली ती त्यांना,

" काव्या हळु ",.. अभिजीत घाबरला, पटकन तिला थांबवल,

सोहम मावशी सगळे बघत होते, मावशीला बघून ती इमोशनल झाली होती , किती बोलू किती नाही अस झाल होत, मावशी खुश होत्या, त्यांना माहिती होत काव्याची गुड न्यूज, काव्या रोज बोलत होती त्यांच्याशी.

"काय झाल काव्या बर नाही का ",.. सोहम.

"नाही दादा तस नाही",.. काव्या.

" तू ठीक आहे ना ",.. सोहम.

हो,

मावशीने काव्याच्या आवडीचा खूप खाऊ आणला होता,.. "ही बॅग तुझी काव्या, अजून काय काय हव ते सांगत जा",

खूप लाड सुरू होते काव्याचे, दोघी आत गेल्या त्यांच्या सोबत सुरभी होती,

सोहम काव्या कडे बघून काळजीत होता,.. "अभिजीत काय झाल काव्याला? , ठीक आहे ना",

"सोहम तू मामा होणार आहे" ,.. अभिजीत.

सोहम खूप खुश होता,.. "खूप अभिनंदन दोघांच, ठीक आहे ना काव्याची तब्येत ",

हो

अभिजित आदेश सोहम सगळे रघुच्या आसपास होते, रघु फारच रुबाबदार दिसत होता, मिरवणूक झाली, श्रद्धा नटून थटून आली, लगेच दोघांचं लग्न लागल, सगळे खूप खुश होते, खूप मजा करत होते, जेवण झालं,

पाठवणीच्या वेळी सगळेजण एकाच घरी जाणार होते त्यामुळे जरा गंमतच वाटत होती, सगळे फार्म हाऊस मधून निघून अभिजीतच्या बंगल्यापर्यंत गेले,

आश्रमातल्या काकूंनी ओवाळून श्रद्धा आणि रघुला मधे घेतलं, खूपच चिडवा चिडवी सुरू होती, काव्या पुढे होती यात.

खूपच सुंदर बंगला होता, काव्याने पण तो बंगला पहिल्यांदाच बघितला होता, सगळेच फिरून घर बघत होते, तोपर्यंत आश्रमातल्या काकूंनी पुढच्या कार्यक्रमाची तयारी केली, त्या उद्या पूजा होई पर्यंत त्या तिथे राहणार होत्या, जरा वेळाने मावशी, सोहम, सुरभी, काव्या अभिजीत निघाले,

"श्रद्धा उद्या लवकर येते मी पूजे साठी, तो पर्यंत बाकीचे आहेच सोबत, तुला अस वाटत असेल ना का रहाता सगळे इथे",.. काव्या.

श्रध्दा हसत होती.. "काहीही बोलते का तू काव्या, खर तर तू इथे माझ्या सोबत रहायला हव, पण नाही तुला अभिजीत सरांसोबत रहायच असेल, ठीक आहे दादा आला जा तू ",

" येते उद्या लवकर, नंतर आम्हाला एक ठिकाणी पूजेसाठी जायच आहे",.. काव्या.

वाट बघते,

ते घरी आले.





🎭 Series Post

View all