तुझी साथ हवी मला... भाग 53

पार्लरच काम झाल, काव्याने अभिजीतला फोन केला, तो दहा मिनिटात आला, त्याच्या सोबत रघु होता, रघु श्रद्धा सोबत जाणार होते


तुझी साथ हवी मला... भाग 53

©️®️शिल्पा सुतार
.........

अभिजित आदेश मीटिंग हून निघाले,.. "हे काम फार बोर आहे आदेश" ,

" हो ना दादा मला ही वेळ वाया गेल्या सारख वाटत आहे",.. आदेश.

"पण यातून आपल्या कंपनीची माहिती होते लोकांना, ठीक आहे करू काम विशेष लोड नाही, आपल्या कडून एक मॅनेजर अपाॅट करू एक टीम तयार कर, आपल्या कडून नीट काम करू, बाकी राग लोभ कडे लक्ष द्यायच नाही ",.. अभिजीत.

" ठीक आहे दादा",.. आदेश.

साडे पाच झाले होते, ते दोघ ऑफिस मध्ये आले, ऑफिस सुटल, काव्या अभिजीतला भेटायला आली, आदेश त्याच्या सोबत होता,

" झाल का काम",.. काव्या.

"हो झाल उद्या पासून मीटिंग सुरू होतील",.. अभिजीत.

" अरे वाह अभिनंदन, तुम्ही दोघ येतं आहात का घरी",.. काव्या.

"नाही खूप काम आहे आज, उशीर होईल ",.. अभिजीत.

"मी निघते मग, लवकर या घरी" ,.. दोघ आत निघून गेले, तिने रघुला फोन केला, तो नव्हता आज, काव्याला जरा टेंशन आल होत. अस घाबरून चालणार नाही, मला काही घेण नाही बाकीच्या लोकांशी, आपल आपल जायच यायच.

श्रद्धा भेटली पार्किंग मधे ,.." आज सरां सोबत नाही का जात काव्या" ,

" नाही आता आला अभिजीत आज मीटिंग होती मोठी",.. काव्या.

"सावध रहा मग ",.. श्रद्धा.

" हो ना मला भीती वाटते श्रद्धा ",.. काव्या.

" तू सांगितल का त्या विकास बद्दल अभिजीत सरांना",.. श्रद्धा.

"नाही अजून",.. काव्या.

"पागल का नाही सांगितल",.. श्रद्धा.

"त्या नंतर काही त्रास नाही झाला त्या विकासचा, उगीच घरच वातावरण खराब होत ",.. काव्या.

" काय महत्वाच आहे तू की वातावरण ",.. श्रद्धा.

"हो सांगेन, श्रद्धा अजून एक सांगायच मला तुला ",.. काव्या.

" काय? सांग ना लाजतेस काय ",.. श्रद्धा.

" बहुतेक तू मावशी होणार आहे",.. काव्या.

"काय.. वॉव",.. श्रद्धा.

" अजून सुरुवात आहे ",.. काव्या.

"डॉक्टर काय म्हटले ",.. श्रद्धा.

" अजून गेलो नाही ",.. काव्या.

" जायच का आपण डॉक्टर कडे",.. श्रद्धा.

"नको मी जाईल अभिजीत सोबत ",.. काव्या.

" काही वाटत का त्रास होतो का ",.. श्रद्धा.

" नाही अजून काही नाही वाटत ",.. काव्या.

"मस्त यार काळजी घे, प्रमोशन झाल तुझ, आधी मॅरीड आता आई होणार तू, काळजी घे , विकासच सांग घरी, अभिजीत सर काही बोलणार नाही आता तुला, खुश असतिल",.. श्रद्धा.

" हो खूपच, टच वूड" ,.. काव्या.

" मी खुश आहे तुझ्या साठी, एक मिनिट ये इकडे",.. तिने काव्याला मिठी मारली.

" कोणाला सांगू नको आश्रमात रेडिओ ",.. काव्या.

"कोण रेडिओ मी का",.. श्रद्धा.

" मग काय",.. काव्या.

"आता सांगतेच",.. श्रद्धा.

सॉरी.

"तुझी कधी पासून सुट्टी आहे श्रद्धा" ,.. काव्या.

"दोन दिवसानंतर, मेहेंदी आहे आश्रमात, दुसर्‍या दिवशी फार्म हाऊसवर प्रोग्राम आहेत",.. श्रद्धा.

" कपडे रेडी आहेत ना",.. काव्या.

हो.

"पार्लरला कधी जाणार तेव्हा मला सांग ",.. काव्या.

"उद्या जायचा का ऑफिस नंतर",.. श्रद्धा.

हो

दोघी ठरवत होत्या,

" लग्नानंतर फिरायला जाणार का",.. काव्या.

" हो जाणार आहोत आम्ही",.. श्रद्धा.

"ओये होय मस्त ग, कपडे घेतले का वेगवेगळे ",.. काव्या.

"थोडे घेतले",.. श्रद्धा.

ड्रायवर आला,.." चल निघते मी उद्या पार्लरच फिक्स मग घरी सांगेन मी",

हो बाय,

काव्या निघाली, ती मोबाईल मधे बघत होती, कोणी मागे येवू किवा न येवो कार मधून उतरायचे नाही, कोणा कडे लक्ष द्यायच नाही अस तिने ठरवल, रघु नव्हता म्हणून थोड धड धड वाटत होत, नशीब आज विकास आला नाही मागे, तिला बर वाटत होत, मेडिकल मधे जायच आहे, काय करू जावू का दोन मिनिट, नको अभिजीतला सांगू.

अभिजीत आदेश मीटिंग मधुन निघाल्या नंतर सचिन सोडत नव्हता विकासला, खूप कामा बद्दल माहिती विचारून हैराण करून सोडल होत त्याने ,

"आपण उद्या बोलू मला खूप काम आहे सचिन ",.. किती तरी वेळ विकास सांगत होता, साडे पाच होवुन गेले होते, काव्या गेली असेल घरी काय हे, किती बोर होतय सचिन सोबत.

ती घरी आली, आई आजीं सोबत तिने चहा घेतला श्रद्धाच्या लग्नाची तयारी केली, कोणत्या साड्या घालायच्या त्या ठरवल, उद्या पासून ती बिझी होती,.." उद्या आम्ही पार्लरला जाणार आहोत आई" ,

"ठीक आहे, तब्येत सांभाळुन फिरायचं सगळीकडे",.. आशा ताई.

हो ,

स्वयंपाक रेडी होता, अभिजीत आदेश आले, ते बाबां सोबत बोलत होते, काय काय झाल मीटिंग मधे हेच सुरू होत , अश्या वेळी प्रतापराव वेगळेच उत्साही असत.

जेवण झाल्यावर दोघ रूम मध्ये आले,

"मी उद्या पासून बिझी आहे ",.. काव्या.

" अरे बापरे काय प्रोग्राम आहे, माझ काय आणि ",.. अभिजीत.

"उद्या पार्लरला जाणार श्रद्धा सोबत, परवा मेहेंदी नंतर श्रद्धाच लग्न आणि दादा मावशी आई बाबा येतील, मी तिकडे राहीन दादा कडे",.. काव्या.

"अस चालणार नाही, माझ्या सोबत केव्हा राहणार, नंतर तू आदेशच्या लग्नात बिझी असशील, पण या धावपळीत तब्येतीची काळजी घ्यायची, वेळेवर जेवायच, आणि रोज रात्री घरी यायच",.. अभिजीत तिच्या जवळ सरकून बसला, त्याने तिच्या पोटावर हात ठेवला, खूप प्रेम होत त्याच्या डोळ्यात.

"अभिजीत मी दादा कडे राहणार ना दोन दिवस",.. काव्या.

" ठीक आहे पण मेहेंदी नंतर केंद्रातून घरी यायच",.. अभिजीत.

हो.

"आपण केव्हा जायच डॉक्टर कडे" ,.. अभिजीत.

" श्रद्धाच्या लग्नानंतर" ,.. काव्या.

ठीक आहे,

" आज धावपळ झाली तुझी अभिजीत ",.. काव्या.

"हो अस असत आमच, नवीन ऑर्डर असली की होते धावपळ नंतर काही टेंशन नसत" ,.. काय काम असेल आता, अभिजित तिला सांगत होता,

" कोणत्या डिपार्टमेंटला असेल हे काम",.. काव्या.

"आपल्या इथे नसेल, एक जागा रेंट ने घेवून तिथे होईल काम" ,... अभिजीत.

"कोण आहे सोबत? कोणता ग्रुप मिळाला? ",.. काव्या.

"सचिन आणि विकास, आणि आपण ",.. अभिजीत.

विकासच नाव ऐकुन काव्या गप्प बसली, बापरे हा का आहे अभिजीत आदेश सोबत, सांगू का तो आला होता केंद्रात मागे, पण तो जर त्याचा त्याचा तिथून जात असेल तर, नको गैरसमज करायला, अभिजीत परत मला ओरडला तर आणि आता श्रद्धाच लग्न आहे, दादा ही येईल, उद्या हि जायच पार्लरला, पाठवणार नाही कुठे मला, काय करू पण सेफ्टी महत्वाची, मी सांगेन विकासला माझ लग्न झाल आहे, माहिती असेल त्याला, की नाही, आणि आता या लोकांच काम सोबत आहे, आता पासुन दुष्मनी नको.
........

आदेश अभिजीत सचिन विकास यांचा रात्रीतून सोशल मीडिया वर ग्रुप तयार झाला होता, लगेच कामाला सुरुवात झाली, आदेशला जास्त काम दिल होत अभिजीतने, उद्या लगेच मीटिंग होती, सुरुवातीला रोज भेटणार होते ते, ऑफिस मध्ये जातांना रस्त्याने अभिजीत आदेश तेच बोलत होते मीटिंग बद्दल, काव्या ऐकत होती,

ऑफिस आल, आदेश आत गेला,

"अभिजीत मी आज जाईल मग श्रद्धा सोबत संध्याकाळी",.. काव्या.

"ठीक आहे मी आहे इथे ऑफिस मधे, मी नाही जात कुठे, दोघांच काही काम नाही प्रत्येक ठिकाणी, आदेश करेल हे काम आणि काय म्हटलीस कुठे जाणार आहे तू",.. अभिजीत.

"पार्लर मधे ",.. काव्या.

"एक मिनिट तुला गरज नाही पार्लर मधे जायची, घरी चल संध्याकाळी",.. अभिजीत.

" अभिजित मी जाणार",..काव्या.

"काय करणार तु तिकडे",.. अभिजीत.

" मला थोडा मेक ओव्हर हवा आहे ",.. काव्या.

" अजिबात केस कापायचे नाहीत",.. अभिजीत.

" ठीक आहे शेप देईल",.काव्या.

" अशी नॅचरल छान दिसते तू, उगीच जास्तीची तयारी मला आवडत नाही",... अभिजीत.

" आणि मला काय आवडत त्याच काय ",.. काव्या.

" ते महत्वाच नाही आता तू माझी आहेस, मला तू साधी आवडते",.. अभिजीत तिच्या कडे बघत होता. तो तिला सुंदर म्हणतोय ते तिला समजल नाही.

"ठीक आहे, मी जाते ",.. काव्या.

" दुपारी ये जेवायला",.. अभिजीत.

" आज कॅन्टीन मधे जाणार आम्ही मुली श्रद्धाची ट्रीट आहे",.. काव्या.

" दुपारी सोबत नाही संध्याकाळी नाही, बघ ह रात्री जवळ याव लागेल माझ्या, एक तर तू पार्लरला जावून येणार आहे आज ",.. अभिजीत.

काव्या हसत होती,.. "तू म्हणजे अति करतोस, एवढी काही अप्सरा बनुन येणार नाही मी तिकडून, तू बोलला ना काही करायच नाही, नेहमी सारख दिसणार मी, श्रद्धाला सोबत म्हणून जाणार आहे मी",..

" ठीक आहे काम आहेत मला इथे बोलत बोलत दुपार होईल, बाय",.. अभिजीत.

दुपारी कॅन्टीन मध्ये खूप मजा आली, ऑफिसमधल्या खूप मैत्रिणी होत्या सोबत, श्रद्धा आधीपासून इथे काम करत होती, सगळ्या काव्याकडे बघत होत्या, तिची विशेष ओळख नव्हती बाकीच्या मुलींशी, श्रद्धा ओळख करून देत होती ही,.." माझी बेस्ट फ्रेंड काव्या आणि ही अभिजीत सरांची बायको आहे",

"हो आम्ही बघतो या मॅडमला नेहमी सरांसोबत",..

"काव्या म्हणा मला",..

ठीक आहे

"कस काय राहतेस तू त्यांच्या सोबत घरी , म्हणजे सॉरी कडक स्वभाव आहे ना, दडपण नाही येत का ",..

"नाही अजिबात नाही, चांगले आहेत सगळे ",.. काव्या.

बाकीच्या मुलीना खूप उत्सुकता होती अभिजीत आदेश बद्दल,

काय काय घ्यायचं सगळ्या मुली ठरवत होत्या, गप्पांना खूप ऊत आला होता,

" आटपा लवकर लंच ब्रेक संपायचा नाहीतर ",.. श्रद्धा.

" काव्या मॅडम सोबत असल्यावर आता काळजी कसली",..

" नाही ग बाई मला तर बाकीच्यांसारखेच नियम आहे, रुल्स ब्रेक करू नका",.. काव्या.

बाकीच्यांनी मिसळपाव घेतला, काव्याने वडापाव घेतला, त्यानंतर सगळ्यांनी ज्यूस पिल.

सगळ्या फ्रेंड्सने मिळून श्रद्धाला गिफ्ट दिलं, काव्या नव्हती त्यात, तिला माहिती नव्हतं.

" श्रद्धा माझ्याकडून काही नव्हतं यात ,.. काव्या.

"मला माहिती आहे मला तुझ्याकडुन स्पेशल गिफ्ट हव आहे",.. श्रद्धा.

" देईल नाहीतरी आमच्या रघुच लग्न आहे ",.. काव्या.

" नको ग, मी असच म्हटल, किती केल तुम्ही आमच्या साठी आधीच",.. श्रद्धा.

" तुम्ही दोघांनी माझ्या साठी किती केल त्याच काय, ठीक आहे, नको का गिफ्ट, आणल आहे घरी, जावू दे मीच वापरेन ",.. काव्या.

" काय आहे",.. श्रद्धा.

" सांगू शकत नाही",.. काव्या.

" माझ्या साठी की रघु साठी आहे",.श्रद्धा.

"दोघां साठी आहे आमच्या दोघांकडून, देईन नंतर ",.. काव्या.

" चल उशीर होतो आहे, काय म्हणते तब्येत ठीक आहे का? कधी जाते डॉक्टर कडे",.. श्रद्धा.

"जाईल वेळच नाहीये आता तुझ्या लग्नाची गडबड सुरू होईल आणि अजून काहीच त्रास नाही",.. काव्या.

आदेश नव्हता ऑफिसमध्ये, तो मिटींगला गेलेला होता, दुपारी दोन वाजता ठरली होती त्यांची मीटिंग, हे सगळ्यांना माहिती होतं, तरी मुद्दाम तो ऑफिसून निघून गेल्यानंतर विकास सचिन सोबत त्यांच्या ऑफिसमध्ये आला, अभिजीतला भेटायचं आहे असं त्याने सांगितलं, आत मध्ये आल्यानंतर त्याचा विचार होता आदेशचा डिपार्टमेंटला यायचा, पण आत मध्ये फिरायला मनाई असल्यामुळे त्याला रिसेप्शन मध्ये जाव लागलं, विकास आणि सचिन तिथे उभे होते, जावू पाच मिनिटानी वापस, इथे यायला आता कारण मिळाल आहे,

सचिन अजूनही कामा बाबतीत बोलत होता, विकास इकडे तिकडे बघत होता, कुठे आहे काव्या? , आज तरी दिसायला हवी, नवीन काम सुरू करतोय, त्याच नशीब जोरावर होत, समोरून श्रद्धा काव्या चालत येत होत्या, खर आहे का हे? मनात इच्छा झाली काव्याला बघायची ती समोर,

श्रद्धा त्या बाजूने तिच्या डिपार्टमेंट मध्ये निघून गेली काव्याच डिपार्टमेंट या बाजूला होते ती समोरून येत होती ब्लू ड्रेस छान दिसत होता, ओढणी सावरत विचार करत ती चालत होती, खूप खुश होती ती, तिच्या विचारात होती ती, काम संपवू पार्लरला जाण्या आधी लगेच अभिजीतला भेटायच का पाच मिनिट, जाण्या आधी भेटू, आता लंच टाइम संपला आहे, अभिजित बिझी असेल,

हॅलो... आवाजाने काव्याने समोर बघितलं, हा विकास काय करतो आहे इथे आत मध्ये, काव्या त्याच्याकडे बघत होती, छान हसला तो काव्याशी, ती पण हसली, तो काही म्हटला नाही तिच्या कडे बघत होता, काव्या पटकन आत निघून गेली, कंपनीत सगळीकडे सीसीटीव्ही आहे, अभिजीतने आतून बघितलं तर काही खरं नाही, रिसेप्शनिस्टने सांगितला आदेश पहिलेच मिटींगला चालला गेला आहे,

विकास सचिन चालले गेले, ठरलेल्या ठिकाणी आदेश त्या दोघांची वाट बघत होता.

"आम्ही तुझ्या कंपनीत गेलो होतो रिसेप्शन मधे सांगितलं की तू मिटींगला गेला आहे म्हणून लगेच इकडे आलो",.. विकास.

त्यांनी लगेच कामाला सुरुवात झाली,

" काय प्लॅन आहे तुमच्या दोघांचा आदेश तू येणार आहे का आता मिटींगला?",.. विकास.

" हो मी येईल, एखाद्या वेळी काही अडचण असेल तर अभिजीत दादा येईल",.. आदेश.

जो तो आपला आपला विचार सांगत होत,

"मला असं वाटतं आहे आपण एक कॉमन मॅनेजर अपॉइंट करावा, एक जागा भाड्याने घेऊन तिथे काम करायचं",.. विकास.

"तिघांनी एक एक दिवस ठरवून घ्यायचा तिथे लक्ष द्यायला, मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करायचा त्या दिवशी, काय झालं काय नाही ते विचारायचं",... आदेश.

"माझ्या ओळखीच्या लोकांच्या आहे एक सीक युनिट खाली ती आपल्याला नीट करून अॅज शॉप म्हणून वापरता येईल",.. विकास.

चालेल दोघं म्हटले

" चला मग आपण बघायला जाऊ शॉप",... जागा बघितली, खरंच छान होती छान मोकळी जागा होती,

" खर्चाचं कसं करायचं ",.. सचिन.

" त्या प्रोजेक्टसाठी एक ठराविक रक्कम आपल्याला दरवेळी ते देतील ती वापरायची आहे त्या व्यतिरिक्त जो खर्च होईल तो तिघात वाटून घेऊ, नंतर वाद नको, तस काही नाही, पण सांगून ठेवलेलं बरं असतं",.विकास.

विकासने त्याच्या मित्राला फोन केला, तो फोनवर बोलत होता, लगेच जरा वेळाने त्याचा मित्र आला, त्याची जागा होती ती,

आदेशने पण तोपर्यंत अभिजीतला फोन करून तिकडे काय काय झालं ते सगळं सांगितलं, अभिजीतने होकार दिला,.." काही हरकत नाही आदेश, दर वेळी मला विचारायची गरज नाही, तू तिथे सगळ्यांमध्ये डिसिजन घेऊ शकतो",

" दादा पण काही चुकलं तर" ,.. आदेश

" चुकू दे मी आहे नीट करायला, याप्रकारे डिसिजन घेऊनच शिकायला मिळत, डोन्ट वरी",.. अभिजीत.

"मग हा शॉपच फिक्स करु",.. आदेश.

"हो चालेल",.. अभिजीत.

" इथे काम करणारे लोक आणि मॅनेजर यांचे लवकरच इंटरव्यू घेऊन टाकू",.. सचिन.

"उद्यापासून साफसफाई होणार होती साफसफाई झाली की लगेच पूजा होईल आणि पुढची मीटिंग झाली की कामाला सुरुवात करून टाकू",.. विकास.

ठीक आहे.

" बहुतेक सुरुवातीला छोटा प्रोजेक्ट देतात ते आपल्याला, जमत आहे का ते बघतात, मगच मेन काम काय आहे ते सांगतात",.. विकास.

" करूया आपण तिघं ",.. ते बराच वेळ बोलत बसले होते.

साडे पाच वाजता काव्या अभिजीतला भेटली,.." मी श्रद्धा सोबत आहे",

" ठीक आहे काम झाल की सांग मी येईन घ्यायला",.. अभिजीत.

दोघी पार्लरला गेल्या बराच वेळ झाला होता, श्रद्धा खूप छान दिसत होती, काव्या नुसती बसली होती.

" तू कर ना काहीतरी",.. श्रद्धा.

"तिने फक्त केस सेट केले",..

का ग?

"घरी आवडत नाही",.. काव्या.

"ओह हो अस आहे का ",.. श्रद्धा.

"तुला समजेल नंतर आता करून घे मजा नंतर आहे रघुची मर्जी",.. काव्या.

"मी नाही ऐकणार त्याच",.. श्रद्धा.

" सगळे आधी अस म्हणतात पण केव्हा आपण त्यांच ऐकायला लागतो आपल्याला समजत नाही ",.. काव्या.

" अनुभवाचे बोल तुझे",.. श्रद्धा.

" हो आमच लग्न तुमच्या पेक्षा दोन महिन्यांनी सीनियर आहे\",.. काव्या.

"हो आणि तुमची पुढची तयारी ही झाली, काय म्हणत तुझ बाळ",.. श्रद्धा फ्लाइंग किस देत होती.

काव्या लाजली,.." काय माहिती शांती आहे" ,

पार्लरच काम झाल, काव्याने अभिजीतला फोन केला, तो दहा मिनिटात आला, त्याच्या सोबत रघु होता, रघु श्रद्धा सोबत जाणार होते

उद्या संध्याकाळी मेहेंदी होती,.." सर हिला पाठवा उद्या",

"ठीक आहे",.. दोघी बोलत होत्या,

"झाल नाही का तुमच बोलून, इतक्या वेळ सोबत होत्या ना तुम्ही, चल आता काव्या" ,.. दोघ निघाले,

"काय केल इतक्या वेळ",.. अभिजीत.

"काहीच नाही तू नाही म्हटला ना, फक्त श्रद्धा सोबत गप्पा मारल्या",.. काव्या.

"अस का केल",.. अभिजीत.

"तुझा किती धाक आहे मला आणि आता विचारतो आहेस तू मला, अभिजित मला ज्यूस हव आहे" ,.. दोघ हॉटेल मधे गेले,

" केस छान दिसतात तुझे",...काव्या लाजली , ज्यूसच काय तुझ, गोड खावस वाटत का?

" माहिती नाही खूप तहान लागते" ,.. काव्या.

" आज आपण प्रेग्नन्सी किट घेवून जावू घरी टेस्ट करून बघू",.. अभिजीत.
.....

गावाला जाते आहे आठ दिवस, प्लीज समजून घ्या, वेळ मिळाला तर करेन पोस्टिंग.

खूप धन्यवाद.

🎭 Series Post

View all