तुझी साथ हवी मला... भाग 52

संध्याकाळी आदेश पार्टी ऑफिस मध्ये आला, बरच काम सुरू होत, लगेच लग्न आहे नंतर वेळ मिळणार नाही, त्या मुलांची मीटिंग सुरू होती


तुझी साथ हवी मला... भाग 52

©️®️शिल्पा सुतार
.........

एक दिवस मध्ये गेला, आज रविवार होता, प्रियाच्या घरचे इकडे येणार होते लग्न ठरवायला, आदेश त्याच्या त्याच्या कामात बिझी होता, नाराज वाटत होता, काव्या कधीची बघत होती की तो शांत आहे, पण किती विचारणार, जाऊ दे काही झालं असेल, त्याला काही प्रायव्हसी आहे की नाही.

घरात खूप काम सुरू होत सकाळ पासून, साफसफाई स्वयंपाक सगळं सुरू होत, अभिजित काव्याच्या आजुबाजूला होता, तिने काही काम सांगितल की लगेच करत होता,

काव्या हसत होती,.. "मुद्दामून सुरू आहे ना हे अभिजीत" ,

"नाही मी आज्ञाधारक आहे",.. अभिजीत.

"बाकीचे काय म्हणतील",.. काव्या.

"म्हणू दे काहीही, तू आटोप चल रूम मध्ये थोडा आराम कर, परत पाहुणे आले की धावपळ होईल ",.. अभिजीत.

काव्याला आता आठवल आपण प्रेग्नेंसी टेस्ट केली नाही, सगळे खूप काळजी घेत आहेत माझी,
........

प्रियाच्या घरी ती तयारी करत होती, छान पिंक अनारकली ड्रेस तिने घातला होता, तिची बहीण तयारी करायला मदत करत होती,.." झाली माझी तयारी तू आवर",

" ठीक आहे ताई ",.. ती गेली.

प्रिया काळजीत होती , मी जास्त केल का, मला वेगळीच भीती वाटते तो आदेश जवळ आला की, काय करू, आता आदेश विशेष बोलत नाही माझ्याशी, मला करमत नाहिये, माफी मागू का त्याची, की होकार देवू त्याला, लग्ना आधी आमच भांडण सुरू झाल, लग्न झाल्यावर काय होईल, तिने फोन उचलला काल पासुन एकही मेसेज नाही की फोन नाही आदेशचा, त्याने नकार दिला तर लग्नाला, बाबांना किती धक्का बसेल, त्यांना काही झाल तर,

सॉरी आदेश.. तिने मेसेज केला. सारखी फोन बघत होती ती, आदेशने अजून फोन बघितला नव्हता, काय करू,

आई बाबा आवाज देत होते,.. "झाल का प्रिया, चल आता, खूप खुश होते ते",

"हो झाल निघू या आपण",.. प्रिया.

जावून तर बघु आदेश अस करणार नाही खूप चांगला आहे तो, तिला विश्वास होता.
........

इतर वेळी उत्साहित असलेला आदेश आज शांत आणि त्याच्या त्याच्या कामात होता, लॅपटॉप वर काम सुरू होत, त्यामुळे सगळे त्याच्या कडे बघून आश्चर्य चकित होत होते,

आजी विचार करत होत्या किती मागे लागला होता हा लग्नासाठी, आता का शांत आहे, काय झालं याला?,.. "अभिजीत काही ऑफिसचा ताण आहे का",

"नाही मीटिंग वगैरे काही नाही, काही वेळेस त्याच लग्न आहे म्हणून सिरियस झाला असेल, जबाबदारीची जाणीव झाली असेल" ,... अभिजीत.

"देव पावला" ,.. आजींनी अस म्हणताच बाकीचे हसत होते.

"झाल का काम आदेश, तयार हो कुर्ता घाल मस्त, काय झाल आहे एकदम शांत, इम्प्रेशन पडायच का सासरच्या मंडळींवर",..काव्या.

" अस काही नाही वहिनी ",.. आदेश.

" मग काय झाल, आटोप उत्साह दाखव ",.. काव्या.

आदेश काही बोलला नाही, मी तयार होतो, तो रूम मध्ये निघून गेला.

जरा वेळाने पाहुणे आले, प्रिया सगळ्यांना भेटत होती, आदेश तिच्या घरच्यांना भेटत होता, तो हॉल मध्ये बसुन होता, प्रियाचे बाबा प्रताप रावां सोबत गप्पा मारत होते, आदेश अभिजीत बाजूला बसुन होते, त्यांनी मधेच अभिजीतला सांगितल,.. "गुरुजींना फोन लाव केव्हा येत आहेत ते",

अभिजीत फोन वर बोलत होता,. "येत आहेत दहा मिनिटात",

गुरुजी आले लगेच पुढच्या दहा दिवसाचा मुहूर्त निघाला, नाहीतर नंतर तीन महिन्यांनी मुहूर्त आहे, सगळे आदेश प्रियाला विचारात होते, काय करू या? ,

"जवळचा मुहूर्त घेतला तरी हरकत नाही , आम्ही केल अभिजीत काव्याच लग्न एका दिवसात, होते तयारी",... आशा ताई.

" ठीक आहे",.. दोघ चालेल म्हटले, प्रिया आदेश कडे बघत होती, तो मोबाईल मधे बघत होता. त्याने तिचा मेसेज वाचला होता, रिप्लाय दिला नव्हता.

सगळे खुश होते, प्रिया काव्या सोबत होती, आदेश अभिजीत पुढे बसलेले होते, अशा ताई किचन मधे लक्ष देत होत्या, स्वयंपाक झाला दोघींनी ताट केले सगळे जेवायला बसले, प्रिया आदेश एकमेकांशी बोलत नाही हे आत्तापर्यंत काव्याला समजलं होतं, प्रिया तिच्या आईच्या बाजूला बसली होती, आदेश अभिजीत जवळ बसला होता, अभिजितच लक्ष काव्या कडे होत ती जेवते की नाही, दोन तीन दा त्याने तिला पोळी घे भात घे विचारल, आशा ताई आजी कौतुकाने दोघां कडे बघत होत्या, त्या तिघांना माहिती होती ही बातमी, जेवण झाल,

काव्याने आदेशला आत बोलवलं,.. "जा प्रिया आहे मागे गार्डन मधे, बोल तिच्याशी" ,

वहिनी.

"जा, एवढा काय भाव खातोस",.. काव्या आली त्याच्या सोबत, गार्डन पर्यंत सोडून दिल तिने आदेशला, प्रिया बेंच वर बसलेली होती, आदेश येवून बसला बाजूला, तो आल्यावर ती नीट सावरून बसली, दोघ गप्प होते,

"आदेश सॉरी, माझ चुकलं ",.. प्रिया.

" कशा साठी? ",.. आदेश.

"मी चांगल वागत नाही तुझ्याशी" ,.. प्रिया.

" ठीक आहे, झाल ना तुझ्या मनाप्रमाणे, खुश ना, लग्न करणार ना, की नंतर चुपचाप नकार देणार",.. आदेश.

"का अस बोलतोस",. प्रिया.

"काय बोलू मग मी, एवढ काय केल मी तुला, किती परक्या सारखी वागतेस",. आदेश.

"काल पासुन तू का बोलत नाही माझ्याशी" ,.. प्रिया.

"तुला वेळ हवा ना ",.. आदेश.

" ठीक आहे",.. तिचा उतरलेला चेहरा त्याच्याकडून पाहिला जात नव्हता.

"काही प्रॉब्लेम नाही प्रिया, उगाच काळजी करू नकोस, सॉरी ",.. आदेश.

" आदेश मला नको वेळ, मी तुझ्या सोबत रहाते लग्ना नंतर, तू चिडू नकोस",.. प्रिया.

" प्रिया आपण नंतर बोलू यावर ठीक आहे, आणि मला राग आला नाही तुझा, माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे, काळजी करू नकोस, माझ्यासाठी तू कंफर्टेबल असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे",.. आदेश.

जरा वेळाने दोघ आत येवून बसले, दोघी घरचे ठरवत होते काय कार्यक्रम असतिल ते, खरेदी वगैरे करून घेवू,
.....

" पुढच्या आठवड्यात श्रद्धाच लग्न लगेच आदेशच लग्न, खूप कार्यक्रम आहेत अभिजीत",.. काव्या.

" हो आणि आपल्याला डॉक्टर कडे ही जायच आहे, दगदग करायची नाही, माझ्या सोबत रहायच",.. अभिजीत.
....

आदेशच्या लग्नासाठी हॉटेल बूक केल होत, काहीही काम घरी नव्हत, सगळे सामान ते लोक अॅरेंज करणार होते कपडे दागिने खरेदी तेवढी होती, सकाळी हळद दुपारी लग्न संध्याकाळी रिसेप्शन होतं,

काव्या प्रिया सोबत ठरवत होती कोणती साडी नेसणार की घागरा घालणार, प्रिया नुसत हो हो करत होती.

"काय झालं प्रिया?का शांत आहात तुम्ही दोघ?",.. काव्या.

"वहिनी आमच भांडण झाल आहे, ते माझ्यामुळेच झालं, आदेश चिडला आहे " ,... प्रिया.

"काय अस करता तुम्ही, अजून लग्न झाल नाही, काय तू पण" ,... काव्या.

"काय करू मी वहिनी मला समजत नाही" ,.. प्रिया.

"तुमच कशावरून भांडण झाल ते मला माहीत नाही, पण एवढ सांगते आदेश काही आता तुझ्या वर्गातला मुलगा नाही, तुझा होणारा नवरा आहे, आधी सारख वागून चालणार नाही तुला आता, थोड त्याच तू ऐक, थोड तो ऐकेल, समजुतीने घे ग, आदेश म्हणून गप्प आहे का, काही बोलत नाही, जेवत नाही नीट, वेळप्रसंगी पटकन माघार घ्यायची, समोरच्याचा राग गेला की समजून सांगता येत नंतर, तेव्हाच्या तेव्हा बोलल तर शब्दाने शब्द वाढतात",... काव्या.

" वहिनी तू खूप समजूतदार आहे, मी लक्ष्यात ठेवेन, अभिजीत दादा किती काळजी घेतात तुझी लकी",. प्रिया.

" आवाज ऐकला नाही तू अजून अभिजीतचा, आमच पण भांडण झाल दोन दिवसा पुर्वी चांगला ओरडला अभिजीत मला",.. काव्या.

" का? बापरे खर का ",.. प्रिया.

" हो आहेत काही वाईट लोक नाव घेणारे त्यांच्या मुळे झाल, मी तर एवढे डेंजर लोक बघीतले आयुष्यात, विचारू नको ",.. काव्या.

" तो गुंड येतो ना तुझ्या मागे शशी ",.. प्रिया.

" अजुन भर पडली त्यात लोकांची तुझ्या मागे येणारे लोक माझ्या मागे येतात रोज",.. काव्या.

"हो का विकासची माणस का",.. प्रिया.

हो.

" बॉडी गार्ड आहे ना",.. प्रिया.

हो.

" काळजी घे वहिनी",.. प्रिया.

पाहुणे गेले सगळे खुश होते.
.......

शशी त्याच्या ऑफिसमध्ये गेला, त्यांने त्याचं काम सुरू केलं, आता जो बिझनेस आहे तोच व्यवस्थित सांभाळायचा, आई-बाबांना त्रास द्यायचा नाही, त्याने थोड्या वेळाने सुरभीला फोन केला,

" कुठे आहेस तू शशी",.. सुरभी.

"मी घरी आलो आहे ताई ",.. शशी.

"पोलिसांचं काय झालं",.. सुरभी.

"माहिती नाही आता जे होईल ते होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही, माझा एक मित्र आहे त्याने सगळी सेटलमेंट केली आहे, पकडलं तर एक दोन दिवसात घरी येईल",..शशी.

सुरभी चिडली होती त्याच्यावर,.." यातुन तू काही शिकला की नाही",

" हो शिकलो आहे, ताई मी यापुढे असं करणार नाही, आता आई बाबा मी आणि तू या लोकांकडेच लक्ष देईल मी, जो बिझनेस आहे तो नीट सांभाळेल ",... शशी.

" प्रॉमिस कर, मला तुझी खुप काळजी वाटते शशी ",.. सुरभी.

" प्रॉमिस ताई",.. शशी.

अभिजीतला मेसेज आला की शशी त्याच्या गावी पोहोचला आहे, त्याने पोलीस इन्स्पेक्टरला फोन केला,

" माहिती आहे आम्हाला शशी तिकडे गेला आहे, पण त्याच्याविरुद्ध काही पुरावा नाही की तो तुमच्या फार्म हाऊसवर आला होता, आणि तुम्हाला त्रास दिला ",.. इंस्पेक्टर.

" असा कसा पुरावा नाही, आमच्या फार्म हाऊस सीसीटीव्ही फुटेज वर दिसेल तो, गन आहे त्याच्या कडे, डेंजर आहे तो ",.. अभिजीत.

"तुमच्याकडे जर असेल काही पुरावा तर तो घेऊन या आमच्याकडे आम्ही लगेच अटक करू शशीला",.. इंस्पेक्टर.

" ठीक आहे त्याच्यापासून आमच्या फॅमिलीला धोका आहे आणि तुम्ही किती कॅज्युअल एप्रोच घेत आहात इन्स्पेक्टर",.. अभिजीत.

" पण तुम्ही जी तारीख सांगता आहे त्या तारखेला शशी या गावात नव्हताच तुम्ही मागे कंप्लेंट केली होती तेव्हा त्याने पुरावा दिला आहे ",.. इंस्पेक्टर.

" अच्छा असं आहे का तुम्ही मॅनेज झालेले दिसता आहात ठीक आहे मी पण सोडणार नाही हे प्रकरण",.. अभिजीत.

" काहीही बोलता तुम्ही साहेब मॅनेज वगैरे ",.. इंस्पेक्टर.

अभिजीतने रागाने फोन ठेवून दिला, त्याला आता काव्याची खूपच काळजी वाटत होती, शशीने मागे काहीही पुरावा ठेवला नाही म्हणजे किती डेंजर आहे तो, अभिजीतला काहीच माहिती नव्हतं की यामागे विकासचा हात आहे.
.......

संध्याकाळी आदेश पार्टी ऑफिस मध्ये आला, बरच काम सुरू होत, लगेच लग्न आहे नंतर वेळ मिळणार नाही, त्या मुलांची मीटिंग सुरू होती,

अचानक विकास त्याला भेटायला आला, येवून समोर खुर्चीत बसला, आदेश आश्चर्य चकित झाला, व्यवस्थित बोलत होता तो गावांबद्दल, बिझनेस बद्दल, इतर कोणताच विषय त्याने घेतला नाही, शांत पणे बोलत होता, जरा वेळाने तो गेला,

बाकीचे मुल आश्चर्य व्यक्त करत होते जावू दे तो चांगल बोलला तर आपण ही बोलायच,

"त्या दिवशी ही विकास चांगल बोलल होता वहिनी सोबत",.. संतोष सांगत होता.

आदेशला कसतरी वाटत होत, किती ओरडला होता दादा वहिनीला, जावू दे तरी विकास सोबत नको काही संबंध,
....

मोहन विकास त्याच्या ऑफिस मधे बसलेले होते,

"आज का गेला होता तू आदेश कडे",.. मोहन.

"सहज गेलो होतो, थोड बोलल पाहिजे त्या लोकांशी, थोडी मैत्री करायला पाहिजे, म्हणजे तो मला बोलवेल त्याच्या कडे लग्नाला कार्यक्रमाला",.. विकास.

"म्हणून शशीला पाठवून दिल का घरी ",. मोहन.

"हो त्या लोकांना नको समजायला शशी आपल्या फार्म हाऊस वर होता" ,.. विकास.

" पण काव्याने सांगितल तुझ्या बद्दल तर",.. मोहन.

" माझ वागण इतक चांगल आहे या लोकांसोबत की कोणाला काव्या वर विश्वास बसणार नाही, आहे कुठे पण ही काव्या दोन दिवस झाले दिसली नाही, बोर होत, उद्या भेटाव लागेल जरा, ती मला विसरता कामा नये ",.. विकास.
........

अभिजीत काव्या बागेतून फिरून आले, प्रतापराव आशा ताई समोर बसलेले होते,

" उद्या मोठी मीटिंग आहे ना अभिजीत, गव्हर्नमेंट टेंडर निघणार आहे ",.. प्रतापराव.

" हो बाबा",.. अभिजीत.

" झाली का तयारी, प्रेझेंटेशन तयार आहे का, फाईल रेडी आहे का ",.. प्रतापराव.

"हो बाबा काल केल काम ",.. त्याने रूम मधून फाइल आणली, प्रतापराव फाईल बघत होते, खूप छान काम झाल आहे हे.

" तुम्ही येणार का मीटिंग साठी बाबा ",.. अभिजीत.

" नाही तू आणि आदेश जा",... प्रतापराव.

" बाबा ग्रुप प्रोजेक्ट आहे हा, खरच करायचा का? ",.. अभिजीत.

" हो अस असत सरकारी काम",.. प्रतापराव.

" मग घ्यायचा ना भाग आपण",.. अभिजीत.

"हो खूप महत्त्वाची डिल आहे ही, यात ज्या कंपनी असतात त्यांची लिस्ट सगळीकडे दिसते, इतर काम मिळायला मदत होते, मी अशी वाढवली ही कंपनी",.. प्रतापराव.

" ठीक आहे बाबा आदेश आला की एक मीटिंग घेवू आपण तिघांची रात्री",.. अभिजीत.

ठीक आहे.

रात्री आदेश आल्यानंतर जेवण झाल्यावर ते तिघं बोलत बसले होते, काव्या बाकीचे आवरत होती... " काय चाललं आहे आई, उद्या मोठी मिटींग आहे का ",..

" हो बेटा काहीतरी गव्हर्मेंट ऑर्डर बद्दल सुरू आहे ",..आशा ताई.

" बाबा खूप हुशार आहेत आई ",.. काव्या.

हो.

" खूप छान गाईड करतात ते सगळ्यांना",.. काव्या.

" दिवसातून थोडा वेळच ऑफिसला जातात पण त्यांचं लक्ष असतं सगळीकडे ",.. आशा ताई.

" हो ना आमच्या घरी पण असेच काम चालतात, तुम्ही एकदाही आले नाही ना तिकडे आमच्याकडे",.. काव्या.

"जाऊ आपण, तुझं मन होत असेल ना तिकडे जायचं",.. आशा ताई.

"हो खूप मन होता आहे, पण मी जेव्हा हा विषय काढते तेव्हा मला अभिजीत खूप रागवतात, मला कंटाळा आला आहे त्या धोक्याचा, कधी नीट होणार आहे काय माहिती",.. काव्या.

" तुझी सुरक्षितता पण महत्त्वाची आहे ना",.. आशा ताई.

हो

" आता तर जास्त काळजी घ्यायला हवी",.. आशा ताई.

" आई पण लग्न झाल ना माझ, आता आई होणार आहे ना मी, मग माझ्या मागे का येत असतिल लोक, त्यांचा काय स्वार्थ त्यात ",.. काव्या.

" बेटा मुलींना वयाच्या सगळ्या टप्प्यात धोका असतोच, आपण काळजी घ्यायची गाफील राहायच नाही, समोरच्याला चान्स द्यायचा नाही",.. आशा ताई.

रात्री बराच वेळ झाला होता, अभिजीत रूम मध्ये आला नाही, तो खालीच काहीतरी काम करत होता आदेश सोबत,

"उद्याच काम खूप महत्त्वाच आहे, अभिजीत आदेश काहीही करून यात नंबर लावायचा",.. प्रतापराव बऱ्याच सूचना देत होते, अभिजीत आणि आदेशला खूप शिकायला मिळत होतं.

सकाळी डायनिंग टेबलवर सगळे हजर होते,

"काव्या आज तू जा ऑफिसला, आम्हाला दुसरीकडे जायचं आहे",.. अभिजीत.

"ठीक आहे",.. रघु आला जरा वेळाने, त्याच्याबरोबर काव्या ऑफिसला निघून गेली, आदेश नव्हता त्यामुळे पवार साहेब सगळ्यांना काम देत होते.

अभिजीत आदेश मीटिंगसाठी गेले,..

"दादा आपण हे असं दोन-चार लोकांसोबत काम करायचं म्हणजे बोर होईल ना, खूप स्लो असतात हे प्रोजेक्ट",.. आदेश.

" जास्त काम नसतात महिन्यातून दोन-चार मीटिंग असतात, आरामात एक दोन वर्षात प्रोजेक्ट पूर्ण होईल" ,.. अभिजीत.

" कोण कोण लोक असतील आपल्या सोबत ",.. आदेश.

" मला असं वाटतं की दोन ऑर्डर आहेत त्यासाठी तीन तीन चे दोन ग्रुप असतील बहुतेक, जास्त लोकांनी अप्लाय केली नाही तसेही आपलं काम चांगलं आहे नाव मोठ आहे आपल्याला काम मिळणारच आहे, बाबा म्हणतात की याने खूप फायदा होतो बघू आपणही करून एक दोन वर्ष ",..अभिजीत.

बरेच लोक आलेले होते तिथे, सुरुवातीला फॉर्म भरून प्रेसेंटेशन सबमिट केलं, ते लोक माहिती देत होते, जे सिलेक्ट होतील त्यांचं ड्रॉ पद्धतीने निकाल लागणार होता, दुपारी तीन नंतर निकाल होता,

" काय करायचं इतक्या वेळात असे अकरा वाजले आहेत ऑफिसमध्ये जाऊन येऊ",.. ते दोघ निघाले, त्यांच्या बाजूलाच विकासची गाडी होती,

"याने पण अप्लाय केला आहे का?",.. आदेश.

"हो मग तू बघितलं नाही का त्याला, तिथे त्याच्या मॅनेजर सोबत होता ना विकास",.. अभिजीत.

" काल पण माझ्याशी बोलायला आला होता तो",.. आदेश.

"काय म्हटला",.. अभिजीत.

"काही विशेष नाही चांगलं शांत बोलत होता",.. आदेश.

" शांत झाला की काय हा",.. अभिजीत.

" माहिती नाही सिरीयस आहे तो कामाबाबत, कॉलेज सारख्या मारामाऱ्या करत नाही",.. आदेश.

दोघं ऑफिस मध्ये आले, थोड्यावेळ काम झालं, लंच ब्रेक मध्ये अभिजीतने काव्याला बोलवून घेतलं,.." माझ्यासोबत जेवायला ये ",

" अभिजीत मला ज्यूस हवा",.. काव्या.

" करतो ऑर्डर अजून काही हव का ",.. अभिजीत.

नाही.

" झाली का मीटिंग",.. काव्या.

"हो झाली मीटिंग, तीन वाजता रिझल्ट आहे आता जेवण झालं की लगेच निघतो आहे आम्ही, आदेश कुठे आहे",.. अभिजीत.

" पवार साहेबांसोबत काहीतरी काम सुरू होतं ",.. काव्या.

त्याने आदेशला फोन केला,.." चल पटकन जेवायला",

आदेश आला, जेवण झालं,.." आम्ही जाऊन येतो दोघं" .

" काय रिझल्ट लागतो ते मला सांगा",.. काव्या.

" हो तू काळजी घे",.. अभिजीत.

हो.

तीन कंपनीचा एक ग्रुप होता, त्यांना एक प्रोजेक्ट करायचा होता, असे दोन ग्रुप होते, आदेश अभिजीत खुर्चीत बसून त्यांच्या नंबरची वाट बघत होते, विकास समोरून आला तो आदेश सोबत हसला आणि समोर जावून बसला, पाटील ग्रुपच नाव घेतल, आदेश अभिजीत पाटील, विकास इनामदार, सचिन कदम या लोकांचा एक ग्रुप झाला, विकासला बघून अभिजीतच्या कपाळावर आठ्या होत्या, काय करणार पण प्रताप राव ओरडतील भाग घेतला नाही तर आणि किती दिवस नाही हो करणार एक दिवस तर प्रतिस्पर्धी सोबत काम कराव लागत, विकास खूप खुश होता काव्याकडे जायला एक पाउल पुढे टाकल होत त्याने.

त्या सगळ्यांना एका ठिकाणी बसवल होत, सगळे ओळख करून घेत होते, सचिन नवीन होता त्यात, अभिजीत आदेश विकास एकमेकांना ओळखत होते,

"पुढच्या आठवड्या पासून प्रोजेक्टच्या मीटिंग सुरू होतील या कामात आपापसातील वाद हेवेदावे चालणार नाही, दिलेल्या तारखेपर्यंत व्यवस्थित काम झाल नाही तर दंड मिळेल, कामाच्या ठिकाणी काही एक्सीडेंट चोर्‍या झाल्या तर त्याला आम्ही जबाबदार नाही, टार्गेट पूर्ण झाल पाहिजे, हा नव्हता तो आलाच नाही मी एकट का करू काहीही सबब चालणार नाही",.. बरेच नियम होते, त्यांना तसे माहितीचे पत्रक वाटण्यात आले.

" पुढच्या आठवडय़ा पर्यंत तुम्ही ग्रुप आपसी सामंजस्याने प्रोजेक्ट कुठे करायच, कोण काय काम करेल ते ठरवा, पुढच्या भेटीत इथे रीपोर्ट द्यावा लागेल",...

ठीक आहे,

चौघे बाहेर आले तिथे कॅन्टीन मध्ये चहा घेत होते, छान बोलत होते ते, उद्या आपण मीटिंग घेवू पूर्ण ठरवू, काय करायच ते चालेल, पहिली मीटिंग तरी नीट झाली सगळे शांततेत बोलत होते, विकास गप्प होता जे अभिजीत बोलेल ते हो बोलत होता,

🎭 Series Post

View all