तुझी साथ हवी मला... भाग 49

आई आजी बाबा मी आज संध्याकाळी केंद्रात जाणार आहे, तिकडे थांबेल आज, उद्या तिथून ऑफिसला जाईल उद्या संध्याकाळी येईल


तुझी साथ हवी मला... भाग 49

©️®️शिल्पा सुतार
.........

अभिजीतने रघुला फोन केला,.. "कुठे आहेस तू इकडे ये ऑफिस मध्ये ",

रघु आला,

" हे बघ मला माहिती आहे तुझी लग्नाची गडबड सुरू आहे, कोणी अजून दुसरा बॉडी गार्ड असेल तर काव्या साठी दे थोडे दिवस",.. अभिजीत.

" काय झाल साहेब? ",.. रघु.

अभिजीत विकास बद्दल सांगत होता,

"माफ करा साहेब मी लक्ष द्यायला हव होत मॅडम कडे, मी फोन केला होता काल संध्याकाळी, मॅडम आदेश साहेबांसोबत होत्या, लगेच घरी जाणार होत्या, मग मी नाही गेलो त्यांच्या सोबत, या पुढे अस होणार नाही",... रघु.

"ठीक आहे रघु तू घेवू शकतो सुट्टी, कोणी तरी पाठव तुझ्या ऐवजी, पुढच्या आठवड्यात कार्यक्रम असतिल, एक आठवडा फिरून या कुठे तरी",... अभिजीत.

" बघतो मी सांगतो ",... रघु.

अभिजीत काव्याचा विचार करत होता, तिला सकाळ पासून मेसेज केला आहे, अजून बघितला नाही तिने, नाही तर पाच मिनिटात रिप्लाय देते ती, खूपच बोललो का मी तिला, माझा आवाज मोठा आहे, आई आजी बोलत होत्या अस नको करत जावू, काय करू आता, लंच ब्रेक मध्ये पण आली नाही ती भेटायला, जेवली असेल का ती?

त्याने आदेशला फोन लावला,.. "काव्या काय करते आहे",

"काम करते आहे वहिनी" ,.. आदेश.

"जेवली का ती",.. अभिजीत.

"मला काय माहिती दादा, तू बोल ना तिच्याशी डायरेक्ट",.. आदेश.

"ते तू प्रायव्हेट कॉल नव्हते करायला सांगितले ना, तिला परत ओरडा बसेल म्हणून नव्हत करत मी फोन ",.. अभिजीत.

" मी ओरडत नाही कधी कोणाला, ठीक आहे दादा कर फोन वहिनीला ",.. आदेश.

त्याने काव्याला फोन लावला,.." झाल का जेवण",

हो.

" आज आली नाहीस तू मला भेटायला लंच टाइम मधे ",.. अभिजीत.

" आली होती मी, आत मीटिंग सुरू होती ",.. काव्या.

" ओह",..

" तू जेवलास का",.. काव्या.

" हो.. ठीक आहे साडेपाचला जावू सोबत ",.. अभिजीतने फोन ठेवला .

श्रद्धा आत आली,

" काय झालं श्रद्धा काही काम आहे का" ,.. अभिजीत.

" हो सर ते उद्या केंद्रात पार्टी आहे तर मी काव्याला घेवून जावू का, रात्री राहील ती तिकडे माझ्या सोबत",.. श्रद्धा.

" काव्याला विचार हे तू ",.. अभिजीत.

"ती नाही म्हटली बोलली, म्हटली तुम्ही ओरडाल, म्हणजे सॉरी म्हणजे ती काही नाही म्हटली",.. श्रद्धा.

" ठीक आहे घेवून जा तिला, तू आणि रघू असाल ना तिथे",. अभिजित.

" रघु नाही, तो कशाला येईल केंद्रात",.. श्रद्धा.

" अग रस्त्याने सोबत असेल ना तो" ,.. अभिजीत.

हो.

" तेच विचारतो आहे मी, काव्या आणि तू रघु सोबत असतांना ऑफिस मध्ये यायच दुसर्‍या दिवशी, तिथून कुठेही गुपचूप जायच नाही, गडबड नको, नाहीतर मीच येतो तिला सोडायला ",.. अभिजित.

" ठीक आहे सर मी सांगू का काव्याला ",.. श्रद्धा.

ठीक आहे, तिने बाहेर येवून फोन केला,.." काव्या अभिजीत सर हो बोलले",

कशा साठी?

"उद्याच्या पार्टी साठी ",.. श्रद्धा.

" तुला कोणी त्यांना विचारायला सांगितल होत पागल",.. काव्या.

" विचारल मी आता यायच तू ",.. श्रद्धा.

" ठीक आहे ",.. काव्या.

आता अभिजीतला वाटेल मीच सांगितल होत विचारायला, परत ओरडले तर, श्रद्धा जास्त करते उद्या ओरडते मी तिला, पण खरच जायच का केंद्रात, काव्या खुश होती, मला आवडत तिकडे.
.......

विकास त्याच्या ऑफिस मध्ये बसुन विचार करत होता, केव्हा दिसू शकते काव्या? सकाळी ऑफिसला जातांना की संध्याकाळी येतांना आणि पार्टी ऑफिस मधे येवू शकते ती, साडे पाच झाले जायला पाहिजे त्या बाजूला, पण हिच्या मागे फिरून काही उपयोग नाही, तरी त्याच मन ऐकत नव्हत तो निघाला पटकन,

संध्याकाळी ऑफिस सुटलं आदेश अजून ऑफिसमध्येच होता, काव्या अभिजीतच्या केबिनमध्ये आली,

"दहा मिनिट थांब काव्या थोडं काम आहे",.. अभिजीत.

ती तिथेच बसून मोबाईल मध्ये बघत होती, दोघं निघाले, पार्किंग मधे आले , परत कॉल आला,.. "आलो मी पाच मिनिटात", अभिजित आत निघून गेला,

काव्या पार्किंग मधे उभी होती, पार्किंग जरा बाहेरच्या बाजूला होत, समोर गेट होत, बाहेर एक मोठी कार उभी होती, त्यातून कोणी तरी आत बघत होत, कोण आहे ते? ओळखीच वाटत का? काव्या नीट बघत होती,

तेवढ्यात त्याने कारची काच खाली घेतली, बापरे हा विकास आहे, का बघतो आहे आत माझ्याकडे अस, तो छान हसत होता तिच्याशी, ती पटकन बाजूला झाली, बापरे म्हणजे हा काल खरच माझ्या मागे आला तर, का पण आता, या आधी कधीच पाहिल नव्हत मी याला, अभिजित आता आला तर परत भांडण होईल, मला उद्या केंद्रात जावू देणार नाही, काय करू मी या लोकांच, ती पटकन आत निघून गेली,

बाहेरून विकास निघाला, चला बर झाल काव्या दिसली, लकी आहे ती मला, एकदा पार्टी ऑफिस मधे यायला पाहिजे माझ्या आणि फॅक्टरी मधे ही, भरभराट होईल माझी.
....

अभिजीत बाहेर आला,.. "चल निघू या का",

हो दोघ निघाले, कार बाहेर आली, काव्या बघत होती कुठे आहे विकास, गेला वाटत तो, अभिजित थोडा बिझी होता, फोन सुरू होता, काव्या गप्प बसली होती, अभिजितने फोन ठेवला,.. "काव्या तुला राग आला का माझा? ",

"नाही काय झाल",.. काव्या.

"मग एवढी शांत का, बोल काही तरी",.. अभिजीत.

" नाही मी ठीक आहे, मला खूप धोका आहे का अभिजीत, का येतात सगळे माझ्या मागे? मला तुझ्या सोबत रहायच आहे " ,... काव्या.

" काव्या काय झाल , काळजी करू नकोस, काहीही होणार नाही, मी आहे ना तुझ्या साठी, नको बोलायला आपण या विषयावर , घाबरू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत राहीन, मी नाही चिडणार तुझ्यावर सॉरी" ,... अभिजीत.

" ठीक आहे",.. पण यात काव्याला तिच्या प्रश्नच उत्तर मिळाल नाही,

का आला आजही विकास ऑफिस जवळ, कसा बघत होता माझ्याकडे, हसला का तो माझ्याशी, त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे का? की फक्त अभिजीतला त्रास द्यायला तो अस करतोय, काय कारण असेल, त्याने मला काही केल तर, तो शशी सोबत असेल का, कंटाळा आला आहे इकडे, दादाची खूप आठवण येते, मला माझ्या घरी जायच आहे, मावशी सोबत रहायच आहे.

"अभिजीत मला थोडे दिवस दादा कडे जायच",.. काव्या.

"अजून नाही काव्या, शशी सापडला नाही" ,.. अभिजीत.

"कधी सापडेल तो, मला कंटाळा आला आहे" ,.. काव्या.

"आपण जायच का फार्म हाऊस वर दोघ ",.. अभिजीत.

"नको तिथे अजुन एकट वाटत",.. काव्या.

दोघ घरी आले, आशा ताई प्रतापराव आजी बाहेर जाणार होते, लग्नाच्या रिसेप्शन साठी, ते रात्री येणार होते, आदेश घरी आला,.." कुठे निघाले तुम्ही?",

"सकाळी सांगितल होत ना रीसेप्शन आहे तिकडे निघालो, थोडा उशीर होईल यायला" ,... ते गेले,

अभिजित काव्या चहा घेत होते,.." पार्टी करू या का आपण, प्रियाला घेवून ये आदेश", अभिजित काव्या साठी अस करत होता.

" चालेल ना दादा ",.. आदेश.

" आपण बाहेरून जेवण मागवु मजा करू, काव्या ठीक आहे ना ",.. अभिजीत.

हो.

" पण आई बाबांना समजल तर प्रिया आली ते",.. आदेश.

"काही प्रॉब्लेम नाही, मी आहे ना ",.. अभिजीत.

आदेश खुश होता,.. "मी आलोच लगेच",

काव्या आता हसत होती, छान बोलत होती, अभिजितला बर वाटल.

प्रिया घरी होती, आदेशनी तिला मेसेज केला,.. "मी येतो आहे घ्यायला ",

" घरचे नाही म्हणतील, इतक्या रात्री मी नाही येणार ",.. प्रिया.

"मला माहिती नाही रेडी रहा",.. आदेश.

प्रियाने घरी विचारलं घरचे हो बोलले,

"रात्री सोडून देईन मी वापस प्रियाला, तुम्ही काळजी करू नका",.. आदेश.

दोघ निघाले खूप खुश होते ते,

इकडे अभिजीत पण खुश होता, तो नुसता काव्याच्या मागे मागे करत होता तो, काव्याचा रुसवा काढायला एक छान चान्स मिळाला होता,

पण काव्या विकासचा विचार करत होती, हे एक एक नवीन प्रकरण का आहे माझ्या मागे , ही गोष्ट मी अजूनही अभिजीतला सांगितली नाही , काय करू आपल्या घरातही आणि फॅक्टरीतही मी सुरक्षित नाही.

"काव्या इकडे ये काय विचार चालला आहे तुझा",.. काव्या येत नाही बघून अभिजीत तिच्याजवळ आला, काव्याच लक्ष नव्हतं, त्याने तिला मागून मिठी मारली, ती दचकली,

"काय चाललं आहे, मी केव्हाच बोलवतो आहे तुला, काय खायचं तुला ऑर्डर करून टाक जेवण",.. अभिजीत.

"आदेश प्रिया आल्यावर त्यांना ठरवू देऊ",.. काव्या.

" चालेल चल आपण खाली जाऊन बसू",.. अभिजीत.

दोघं खाली आले, आता उगाच विचार करत बसायचं नाही दुसऱ्या लोकांचा, अभिजीत सोबत चांगलं राहू आपण, चल आपण गार्डनमध्ये फिरू, ते दोघे छान गप्पा मारत होते, प्रिया पळत आली, आल्या आल्या काव्याला भेटली,

" घरच्यांनी बरं सोडलं तुला",.. काव्या.

" जायचं आहे लगेच एक दोन तासात",.. प्रिया.

आदेशाला आला मागून, काव्याला खुश बघून अभिजीत आदेश दोघांना बरं वाटत होतं, सगळे आत येऊन बसले,

"जेवायला काय ऑर्डर करायचं ते बघून घ्या प्रिया आणि आदेश",.. काव्या.

त्या दोघांनी मिळून दोन चार पदार्थ सिलेक्ट केले,.." हे बघ वहिनी नूडल्स आपले फेवरेट, दादाला पोळी भाजी आवडते, आणि बिर्याणी, नंतर आईस्क्रीम",...

"छान आहे मेनू",.. काव्या.

" आता काय करूया",.. आदेश.

"काही नाही आपण छान बोलत बसून चौघे, नंतर जेवण करू आणि मग आदेश तुला घरी सोडून देईल",.. काव्या असं म्हणताच आदेश प्रिया एकमेकाकडे बघत होते,

" मला माहिती आहे तुम्हाला दोघांना भेटायला वेळ मिळत नाही, तु जा आदेश सोबत, एक तासाने जेवायच्या वेळी भेटू",.. काव्याने असं म्हणतात आदेश, त्या दोघांकडे बघत होता,

" जाऊ प्रियाला घेऊन",.. आदेश.

" नक्की",... काव्या.

"ठीक आहे आम्ही टेरेसवर आहोत, काही लागलं तर आवाज दे किंवा फोन कर वहिनी",.. आदेश.

हो ते दोघेजण कधीतरी मोकळीक मिळाल्यासारखी पळत वरती गेले.

" आपण काय करूया आता काव्या? आपलही लग्न आत्ताच झाला आहे, आजी म्हणतात तसं तू छानही दिसते आहेस",.. अभिजीत तिच्या मागे येत होता,

" नाही अभिजीत ",.. काव्या हसत होती, ती बाजूला पळाली, ते काही का असेना आपण इथेच खाली थांबून गप्पा मारत बसणार आहोत,

" काय असं? एकदम बोर ",.. अभिजीत.

" अरे प्रिया आली आहे इथे, आपण दोघं कसं आत मध्ये जाऊन बसणार, आपण घरचे मोठे आहोत",.. काव्या.

"ठीक आहे तू म्हणशील तसं करू, बोलत बसु छान",.. अभिजीत तिच्या जवळ येवून बसला.

" तिकडे सरक अभिजीत",.. काव्या.

" काय अस बसु दे ना, प्रेमाने बोल माझ्याशी, नाही तर चल आपल्या रूम मध्ये, तिथे कंफर्टेबल आहोत आपण " ,.अभिजीत.

"ऑर्डर येईल ती घ्यावी लागेल",.काव्या.

"ठीक आहे ऑर्डर आली की जावू ",..अभिजीत.

कुठे?

"आपल्या रूम मध्ये ",.. अभिजीत.

अभिजीत... काव्या खुप खुश होती. बर वाटत होत की अभिजीत परत तिच्या मागे मागे करत होता.

आदेश प्रिया टेरेसवर उभे होते,.. "छान वाटत आहे ना सोबत, थोड्या दिवसांनी आपल लग्न होईल, तू माझ्यासोबत कायमची इकडे राहायला येशील, तू ठीक आहेस ना इथे, आमचं एकत्र कुटुंब आहे घरात सगळे असतात",..

"काही प्रॉब्लेम नाही छान वाटतं पण तुमच्याकडे, वहिनी दादा इतर लोक छान आहेत ",.. प्रिया.

"आणि मी", .. आदेश.

"हमम तू पण ओके ओके",.. प्रिया.

" अस आहे का बघू का जरा प्रिया, आधी माझी तारीफ कर नाहीतर आज घरी जावू देणार नाही मी तुला ",.. आदेश.

" बर तू पण छान आहेस माझी काळजी घेतोस, आणि मला तुझ्या सोबत रहायच आहे ",.. प्रिया.

" \"लग्न करायच ना लगेच",.. आदेश.

हो.

"असं आहे का इकडे यायची घाई झालेली दिसते ",.. आदेश.

प्रिया खूप हसत होती,.." तू म्हणजे ना काहीही बोलतोस आदेश",

" माझ्याजवळ ये ना इतक्या लांबून का गप्पा मारते आहेस",.. आदेश.

" सध्या तरी असंच ठीक आहे आपण ",.. प्रिया.

आदेशाने पुढे होऊन प्रियाला जवळ घेतलं, प्रिया घाबरली होती,.." नको आदेश सोड मला ",

"मी नुसता तुझ्याजवळ उभा राहून बोलत आहे, काही केल का तुला, घाबरू नकोस आणि आता लवकरच आपल लग्न आहे, मी काय म्हटलं होतं ते लक्षात आहे ना",.. आदेश.

काय?

" क्रिकेटची टीम हवी मला, अस वागलं तर कसं काय होणार आपलं स्वप्न पूर्ण",.. आदेश.

आता प्रिया त्याला खूप मारत होती, प्रिया तिथून जात होती, आदेशने तिला ओढून मिठीत घेतलं,

" आपण खाली जाऊ ना आदेश, वहिनी आणि दादा काय विचार करत असतील",.. प्रिया.

" काही विचार करणार नाही ते, उलट ते खुश असतील की आपण सोबत आहोत, एवढा छान चान्स मिळाला आहे, तू आपली सारखं सोड मला.. आपण इथून जाऊ एवढच बोलते आहे",.. आदेश.

प्रिया छान हसत होती, एकदम इनोसंट दिसत होती, तिची ओढणी आणि केस वाऱ्यावर उडत होते, आदेशच्या एकदम जवळ उभी होती ती, गच्चीवरचा एकांत पण खूप छान होता, आदेशाने तिला मिठीत घेतलं, ती नाही म्हणत होती तरी किस केल, ती एकदम घाबरून गेली होती, आदेश सोडत नव्हता तिला, प्रियाच काहीच चालल नाही त्याच्या पुढे, रीलॅक्स प्रिया थांब माझ्या जवळ, तरी ती एकदम दूर झाली,

"प्रिया एवढ घाबरण्यासारखं काय आहे, शांत हो" ,.. आदेश.

"आदेश तू माझ्या जवळ येवू नकोस, माझ्याशी बोलू नकोस",.. प्रिया.

"काय झाल यार काय अस",.. आदेश.

"मला घरी जायच आहे",.. प्रिया.

"काय झालं प्रिया आपल लग्न जमल ना, एवढ तर चालत",.. आदेश.

"मला काही सांगू नकोस मला जायच इथून ",.. प्रिया.

" बर ठीक मी लांबून बोलतो सॉरी, आपल ठरलं होतं ना की आपण दोघं मिळून ठरवू लग्न कधी करायचं आणि कशा पद्धतीने करायचं, ते बोलूया ना",.. आदेश.

" नंतर बोलू आपण, वहिनी कुठे आहे",.. प्रिया.

" काय अस प्रिया घाबरते काय एवढी",.. आदेश.

खरंतर प्रियाच इकडे आल्यापासून डोकं चालत नव्हत, तिला आदेश बरोबर हवं पण वाटत होतं आणि नको पण वाटत होतं, नवीन नात होत, ती गोंधळली होती,

खाली जेवण आल, काव्या आवाज देत होती, चला जेवायला, ती टेबल अरेंज करत होती, आदेश प्रिया खाली आले, आदेश काव्याला मदत करत होता, प्रियाला काही सुचत नव्हत ती नुसती बसलेली होती, अभिजित येवून बसला,

" मला असं वाटतं आदेश प्रिया तुम्ही लवकर लग्न करून घ्या आणि तू तो जॉब सोडून दे प्रिया, आपल्या कंपनीत अकाउंट डिपार्टमेंट जॉईन कर, तसं मी बोलतो बाबांशी",.. अभिजीत.

"चालेल दादा",.. प्रिया.

"म्हणजे आपण चौघ सोबत रहात जाऊ, ऑफिसला सोबत जावु सोबत येवु" ,.. अभिजीत.

"जेवण सुरू कर प्रिया",.. काव्या.

"हो वहिनी",.. ती विशेष खात नव्हती.

" काय झालं आवडल नाही का जेवण ",.. काव्या.

" नाही तस काही नाही, घरी जायच आईचा फोन येवून गेला",.. प्रिया.

" ठीक आहे आदेश तुला सोडून येईल",.. काव्या.

जेवण झालं आदेश आणि प्रिया निघत होते,

" हिच्या घरच्यांना रविवारी बोलावलं आहे आपल्याकडे",.. आदेश.

" अरे वा तेव्हा लग्नाची तारीख ठरवून घेऊ आपण",... काव्या.

रस्त्याने प्रिया शांत होती, काही खरं नाही माझं, अति साधी भोळी बायको मिळाली आहे,

" प्रिया सोड ना राग आता, काय असं करते, एक महिना सुद्धा राहिला नाही आपल्या लग्नाला, नंतर कस करणार तू ",.. आदेश.

प्रिया काही म्हटली नाही, तिचं घर आल्यानंतर ती आदेश बरोबर न बोलता घरी निघून गेली.

आदेश घरी आला तेव्हा आई बाबा आजी आलेले होते,

"कुठे गेला होता तू",.आजी.

"प्रियाला घरी सोडायला",... तो तिथे सगळ्यांशी बोलत बसला, त्याने प्रियाला मेसेज केला.. मी घरी पोहचलो.

प्रिया मेसेज बघूनही उत्तर देत नव्हती.

"एवढं काय झालं आहे प्रिया? तू जास्तच करते आहे,
कम ऑन कीसिंग कॉमन आहे कपल मधे, आपण आधी कधी काही केल नाही म्हणून तुला अस वाटतय , पण आता आपल लग्न होणार आहे रिलॅक्स, छान रहा माझ्या सोबत प्लीज ",.. आदेश.

"मला तुझ्याशी लग्न करायच नाही",.. तिचा मेसेज आला.

आदेशने डोक्याला हात लावून घेतला, काय होणार माझ्या क्रिकेटच्या टीमच काय माहिती,

आदेशने त्याच्या रूम मधून तिला फोन केला, तिने फोन उचलला नाही.
...

काव्या अभिजीत रूम मध्ये आले,.." आज श्रद्धा आली होती का केबिनमध्ये ",

हो.

" उद्या पार्टी आहे तिकडे केंद्रात",.. ती अभिजीत कडे बघत होती,

काव्या काय म्हणते अभिजीतला समजलं होतं, बहुतेक विचारत असेल मी जाऊ का.

अभिजीत मुद्दामून त्याचं काम करत होता, काव्या काही म्हटली नाही, जाऊ दे मला माहिती आहे हे पाठवणार नाही, तिने झोपून घेतलं, पाच मिनिटांनी अभिजीत तिच्याजवळ आला, त्यांने लाईट बंद केला

सकाळी काव्या रूम मध्ये आवरत होती, अभिजीत हो म्हटला तर बॅग न्यावी लागेल कपड्यांची, काय करू कस बोलू, अभिजीत बाथरूम मधुन आला,

"आज अजून इथेच तू काव्या, रोज या वेळी किचन मधे असते ना तू",.. अभिजीत.

"हो ते थोड काम होत मला" ,... काव्या.

"इकडे ये काव्या जायच का तुला आज केंद्रात",.. अभिजीत.

"हो जावू का.. प्लीज ",.. काव्या.

"बॅग भर मी येईल सोडायला, उद्या घ्यायला ही येईल, मी आल्या शिवाय कुठे जायच नाही गेट बाहेर ही नाही",.. अभिजीत.

हो.. काव्या खुप खुश होती, तिने येवून अभिजीतला मिठी मारली,

"अरे एवढी खुश माझी बायको, आटोप आता",.. अभिजीत.

काव्याने बॅग भरली,.." मला जीन्स नाही, संध्याकाळी घ्यायची का, कॉलेज मधे नेहमी घालायची मी ",

" ठीक आहे जावू आपण शॉपिंगला अजून काय घ्यायचं",..अभिजीत

"तिथे गेल्यावर बघते",.. काव्या.

"चालेल मजा आहे बाबा एकीची ",..अभिजीत.

नाश्ता झाला.

" आई आजी बाबा मी आज संध्याकाळी केंद्रात जाणार आहे, तिकडे थांबेल आज, उद्या तिथून ऑफिसला जाईल उद्या संध्याकाळी येईल ",.. काव्या.

" ठीक आहे काळजी घे ",.. आशा ताई.

" हो आई",.. काव्या.

ते तिघे ऑफिसला निघाले.

" काव्या वेगळीच दिसते आहे का ग आशा",.. आजी.

" हो छान दिसते ना आता हल्ली",.. आशा ताई.

" हो वेगळ तेज आल ",.. आजी.

" तुम्हाला काय वाटतय ",.. आशा ताई.

" दीड महिना झाला ना लग्नाला हिच्या ",.. आजी.

हो.

दोघी आनंदात होत्या,.. "नको बोलायला काही, समजेल काही असेल तर ",

बरोबर आहे.
......

आज आदेश बर्‍या पैकी शांत होता, प्रिया बोलत नव्हती त्याच्याशी, काय झालं काय सांगणार बाकीच्यांना, किती मेसेज केले फोन केले एकाच उत्तर देत नव्हती ती, प्रत्यक्षात भेटू तिला आज किवा उद्या, रविवारी ती घरी येण्या आधी हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला पाहिजे, काय यार एक एक.

🎭 Series Post

View all