तुझी साथ हवी मला... भाग 44

अभिजीत सोबतचे दोन-तीन दिवस खूप जास्तच मजेत गेले काव्याचे, खूप प्रेम आणि आधार वाटत होता त्याचा, चांगला स्वभाव आहे अभिजीतचा,


तुझी साथ हवी मला... भाग 44

©️®️शिल्पा सुतार
.........

दुसऱ्या दिवशी अभिजीत काव्या दोघांना कुठेही जायचं नव्हता त्यामुळे आरामात उठले ते, अभिजित काव्या कडे बघत होता, माझ्या आयुष्यातील सगळ्यांत सुंदर व्यक्ति आहे ही, त्याने तिला हळूच मिठी मारली,

"उठ आता अभिजीत",.. काव्या.

"हो पाच मिनिट थांब",.. अभिजीत.

काव्या किचनमध्ये कॉफीचं बघत होती, काका आले,.. "राहू द्या मॅडम मी करतो, नाश्त्याला काय करायचं ते सांगा",

"उपमा करा थोडा",.. काव्या.

जरा वेळ अभिजीत ऑफिस काम करत होता, वर्क फ्रॉम होम, काव्या त्याच्याजवळ येवून बसली ,.. "काव्या आज साडी नेस ना छान",

"का कुठे जायच आहे",.. काव्या.

"कुठे नाही माझ्या साठी ",. अभिजीत.

काव्या रेडी झाली होती, ती समोर येवुन बसली, खूप सुंदर दिसत होती ती, अभिजित तिच्या कडे बघत होता, काही म्हटला नाही तो,

"आपण घरी केव्हा जायच ",.. काव्या.

"उद्या.. . का ग कंटाळा आला का? ",.. अभिजीत.

नाही.

"बापरे किती अवघड काम आहे हे ऑफिसचं, कसं काय जमत एकावेळी इतके हिशोब लक्षात ठेवायचे, इतक्या ऑर्डर लक्षात ठेवायच्या, सगळ्याच स्टेटस माहिती असत तुला, खूपच हुशार आहे तू अभिजीत, मला तर माझं साधंसं काम सुद्धा जमत नाही",.. काव्या.

" तू परफेक्ट आहे तुझ्या कामात, चांगल करते की काम, आताच ग्रॅज्युएट झाली तू, जमेल नंतर, पुढच अ‍ॅडमिशन घ्यायच लगेच ",. अभिजीत.

" इतक कस होईल माझ्या कडून, ऑफिस ही एम कॉम ही ",.. काव्या.

" त्यात काय एक्साम आधी करायचा अभ्यास, तेवढी हुशार तू आहेच ",.. अभिजीत.

" ठीक आहे",.. अभ्यास करायच्या विचाराने काव्याला टेंशन आल होत,.." माझ्या गावाला घ्यायच का अ‍ॅडमिशन? ",

" नाही इथे, आपण करू चौकशी ",.. अभिजीत.

" प्लीज तिकडे घ्यायच अ‍ॅडमिशन माझ्या कॉलेजला ",.. काव्या.

" नाही इथे ",.. अभिजीत.

" मला इथल काही माहिती नाही ",.. काव्या.

" मी आहे ना, कुठे रेग्युलर जायच आहे, मी येईल तुझ्या सोबत परीक्षेला ",.. अभिजीत.

"काय अस, ठीक आहे, मी काही एवढी हुशार नाही, नॉर्मल स्टुडंट आहे, काय होईल पुढच्या शिक्षणाच काय माहिती, तुला माझ सारखं कौतुकच वाटतं अभिजीत",.. काव्या.

"कालपासून खूपच प्रेम ओतू जात आहे ना माझं तुझ्यावर, तू आहेच तेवढी गोड ",.. अभिजीत हसत होता .

काव्या लाजली होती आणि हसतही होती खूप,

" तू असं माझ्यासमोर सुंदर बनून बसू नको, थोडं काम बाकी आहे माझ",.. अभिजीत.

अस आहे का, मी पण ऐकणार नाही, काव्याने मुद्दाम अभिजीतला त्रास द्यायला सुरुवात केली, त्याच सामान घेत होती ती, त्याचा मोबाईल लपवत होती, इकडून तिकडे जात होती,

अभिजीतने तिचा हात आधी धरून ठेवला,.. "काय चाललय हे काव्या ",

" मला बोर होत म्हणुन त्रास देते ",.. काव्या.

" आता मला ही बोर होत, मी पण तुला त्रास देईल" ,.. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला,

सॉरी काव्या बोलत होती,

"आता उपयोग नाही, आधी समजत नाही का, आता तू गेलीस",.. तो तिला उचलून आत मध्ये घेऊन गेला,

दुपारी जेवताना काव्या खूप लाजली होती, ती जेवत नव्हती नीट,

" काय झालं आहे काव्या एवढी का लाजली आहेस तू ",.. अभिजीत.

"काही नाही",.. काव्या.

"हे बघ एवढ घाबरून चालणार नाही, लाजू नकोस, जेवण कर भरपूर, आपलं प्रेम नातं पवित्र आहे ना, असंच राहायचं आपण, अजून प्रेम फुलवायचं, तू खूपच छान आहेस आणि सुंदरही खूप आहेस, आरामात रहा माझ्या सोबत ",.. अभिजीत.

"पुरे आता अभिजीत, काका आहेत समोर ",.. काव्या.

" असू दे मी असाच रहाणार",.. अभिजीत.

दोघेजण एकमेकांच्या खूप प्रेमात होते, छान रमले होते सोबत.
.......

संध्याकाळी श्रद्धा आली ती जरा घाबरतच होती, अभिजीत सर ओरडले तर, पण अभिजीत एकदमच खुश होता, श्रद्धा आल्यानंतर त्याने काकांना खायचं बनवायला सांगितलं, रघुला ही आत मध्ये बोलवून घेतलं, त्या दोघांसमोर त्यांनी डायरेक्ट विचारलं,.. "कधी करता आहात तुम्ही लग्न? ",

काव्या त्याच्याकडे आश्चर्याने बघत होती, श्रद्धा रघु हसत होते, आता श्रद्धा काव्याकडे बघत होती,

"मी नाही सांगितलं, अगं खरंच, अभिजीत तू तरी सांग",..काव्या.

"नाही काव्याने काही सांगितलं नाही, मला सांगायच नव्हत का? ",.. अभिजीत.

" नाही सर तस नाही",.. श्रद्धा.

" मीच बघितले तुम्हाला दोघांना एक दोनदा सोबत, काय ठरलं मग",.. अभिजीत.

" अजून काहीच ठरलं नाही",.. श्रद्धा.

"मला असं वाटतं ठरवून घ्या, आम्ही दोघ आत जाऊ का तुम्ही बोलत बसा ",.. अभिजीत.

" नाही",.. दोघे एकदम म्हटले,

" ठीक आहे बस जरा वेळ श्रद्धा, नंतर रघु तिला सोडून ये गाडी घेऊन जा ",.. अभिजीत.

अभिजीत आत चालला गेला, रघु पण बाहेर गेला,

" काव्या सगळ्यांना समजलं आहे माझ्या आणि रघु बद्दल",.. श्रद्धा.

" चांगल आहे ना मग लग्न करून घे लवकर, आणि काय ग रोज भेटता का तुम्ही, छान ",.. काव्या.

"नाही अस नाही... श्रद्धा हसत होती... "तुमचं काय सुरू आहे, मस्त ह इथे वीक एंड साठी आले ते ",

" फिरायला जाता येत नाही म्हणून इथे आलो आम्ही, काही नाही, घरी उद्या घरी जावू, सोमवारी ऑफिस ला येते मी", ...काव्या.

श्रद्धाचा फोन आला होता, ती बाजूला उभ राहून फोन वर बोलत होती.

काव्या विचार करत होती,.." चांगलाच रोमँटिक आहे अभिजीत, वाटलं नव्हतं , इतर जगासाठी तो वेगळा होता, माझ्या साठी एकदम प्रेमळ हळवा, खूप खूप छान, लहान पणा पासुन हेच प्रेम आधार मिळाला नव्हता मला , आता अभिजीत सोबत मी खूप खुश राहणार , मी खूप जपणार आहे अभिजीत ला, लव यु",

मी निघते काव्या.

"रघु सोबत बोलून घे आज लग्नाच",.. काव्या सांगत होती,

" हो.. जर काही ठरलं तर तू नंतर आश्रमातल्या काकूंना सांगशील का माझ्या वतीने",.. श्रद्धा.

"हो बोलेल मी फोन वर, प्रत्यक्षात जमणार नाही बहुतेक, अभिजित नाही म्हणतात अजून कुठे जावू देत नाही एकट",.. काव्या.

"तो शशी सापडला का ",.. श्रद्धा.

नाही,

आता ग?

"काही प्रोब्लेम नाही लग्न झालं माझ, मी करेन बरोबर त्याला ",.. काव्या.

" तरी पण काळजी घे लांब थांब त्या लोकां पासून ",.. श्रद्धा.
......

रघु श्रद्धाला सोडायला निघाला, दोघ खूप खुश होते दोघांनी एकमेकाला पसंत केलं होतं, फक्त फॉरमॅलिटी बाकी होती,

"मग श्रद्धा ठरवायचं का लग्न, अभिजीत साहेब काय म्हणत होते ,.. रघु.

श्रद्धा गप्प होती, मुद्दाम इकडे तिकडे बघत होती.

" तुझ्याशी बोलतो आहे मी श्रद्धा, एक तर आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही, त्यात तू अस करतेस, इथून किती जवळ आहे आश्रम, लगेच पोहोचू, बोल ना पटपट, उत्तर दिल नाही तर आश्रमात जावू देणार नाही मी तुला, माझ्या कडे घेवून जाईल ",.. रघु.

श्रद्धा हसत होती, हे छान आहे, आधी असा अनुभव नव्हता मला, कोणी इतक हक्काने बोलणार नव्हत,... " हो चालेल करून घेवू लग्न",.. एकदम हळू बोलत होती ती.

रघु हसत होता, नौटंकी..

" कसं करायचं पण",.. रघु.

" मला साध्या पद्धतीने लग्न हव आहे",.. श्रद्धा.

" चालेल खरेदी करून घेऊ, तुला साड्या दागिने काय घ्यायचं असेल ते घे ",.. रघु.

" घर कुठे आहे रहायचं",.. श्रद्धा.

" माझी एक रूम आहे, ती सोडू दुसर घर मी बघतो आहे सध्या भाड्याने घर घेऊ",.. रघु.

" चालेल, मी बोलते आश्रमातल्या काकूं सोबत",.. श्रद्धा.

" मला पण याव लागेल का बोलायला",.. रघु.

"हो त्या चौकशी करतात आधी मग परमिशन देतात, अभिजित सर पण गेले होते भेटायला त्यांना लग्ना आधी ",.. श्रद्धा.

" ठीक आहे मग सांग मला कधी यायच तिकडे ",.. रघु.

" हो काव्याला घेवून ये तू रघू, ती म्हणते आहे फोन वर बोलेन, तू असला तर अभिजीत सर पाठवतील तिला, ती पण लागेल आपल लग्न जमवायला ",.. श्रद्धा.

" ठीक आहे उद्या भेट मग",.. रघु.

हो.

श्रद्धा आश्रमात आली, काकूंना ती जावून भेटली,

" कुठे गेली होती बेटा ",. काकू.

" रघुला भेटायला" ,.. श्रद्धा.

" काव्या नंतर तू ही जाणार का इथून, काय विचार आहे ",.. काकू.

"एक दोन दिवसात काव्या रघु येणार आहेत तुम्हाला भेटायला ",.. श्रद्धा.

" चालेल छान पण मला आनंद झाला तुझ लग्न जमत ते ऐकुन",..काकू.
..........

विकास आणि त्याचा मित्र इन्स्पेक्टर.. शशीला भेटायला आले, काय केस आहे ते पूर्ण जाणून घेत होते ते,.." शशी साहेब तुम्ही त्या मॅडमला पळून न्यायचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे तुमच्यावर, त्यासोबत गन वापरली, धमकी दिली असा गुन्हा आहे, जर त्या लोकांशी बोलून त्यांनी गुन्हा मागे घेतला तर हे काम होऊ शकतं",

"मी नाही जाणार त्यांच्याशी बोलायला, मला नाही वाटत ते लोक माझ्यावरचा हा गुन्हा मागे घेतील, त्यांना काहीही करून मला शिक्षा व्हायला हवी आहे" ,.. शशी.

" जर तुम्ही जर त्यांना विश्वास दाखवला की तुम्ही यापुढे त्यांना त्रास होईल अस काहीही करणार नाही , त्यांच्या मध्ये मध्ये करणार नाही, तुमच्या पासून काही धोका नाही त्यांना, तर ते ऐकतील ना तुमच",.. इंस्पेक्टर.

" माहिती नाही ऐकतील का ते लोक ",.. शशी.

" तुमची बहीण तिला सांगा जिजाजींना सांगायला ",.. इंस्पेक्टर.

" नको ती एक तर आता सासरी गेली आहे माझ्या मुळे प्रॉब्लेम नको ",..शशी.

" बघितल कसे वागतात ते लोक शशीच्या बहिणी सोबत, तरी शशी तू एक्शन घेत नाही म्हणजे काय, कसली वाट बघतो आहेस तू अजूनही ",..विकास

"त्रास देतात का ते लोक ताईला ",..इंस्पेक्टर.

"हो मग ताईला माहेरी पाठवून दिल होत त्यांनी, किती रडत होती ती, काव्याच लग्न दुसरीकडे लावल आणि तुम्ही काय सांगताय इन्स्पेक्टर साहेब माफी मागायला, त्याला राहायचं आहे ना काव्यासोबत, तो का असं सांगेल की मी काही करणार नाही ",.. विकास मध्येच म्हटला.

"हे खरं आहे का शशी साहेब, त्रासदायक दिसता आहेत ते लोक, काव्या मॅडम तुम्ही प्रेमात होता का ",.. इंस्पेक्टर.

विकासच मध्ये बोलत होता ,." हो त्याला राहायचं आहे काव्यासोबत, का सोडेल तो तिला, लहानपणापासून प्रेम आहे त्याच तिच्यावर, अभिजीत मधे आला, तो नेहमी अस करतो ",.

शशी यावेळी काही म्हटला नाही, उगीच आता काही बोलायला नको, विकासला त्याच्या मनाप्रमाणे सगळ व्हायला हव होत, नाही तर त्याने शशी वर एवढा खर्च का केला असता ,

इन्स्पेक्टर समजून गेले होते की शशीचा असं काही म्हणणं नाही, पण विकास जबरदस्ती करतो आहे,.." मी बघतो काय करता येईल ते",..

धन्यवाद.. इंस्पेक्टर गेले.

विकासला काहीही करून अभिजीतचं नुकसान व्हायला हवं होतं, त्यांची पर्सनल दुष्मनी त्याने मधे आणली होती, मागच्या महिन्यात मोठी ऑर्डर त्याच्या हातातून गेली होती. काय करू काय नको अस झाल होत त्याला.

शशीला माहिती होतं दोन दिवस झाले सुरभी घरी आली होती, त्याने दुपारच्या वेळी लँडलाईन वर फोन केला, नेमका फोन सुरभीने उचलला, त्याला खूप आनंद झाला होता तिच्याशी बोलताना

"कशी आहेस ताई तू?",.. शशी.

"मी मजेत आहे, कुठे आहे तू?",.. सुरभी.

"मी एका मित्रासोबत आहे त्याच्या घरी ",.. शशी.

"काय चाललं आहे हे? पोलिसांना सरेंडर होऊन जा, त्यांना सांग की माझा आता काहीही संबंध नाही काव्याशी, उगाच नको इकडे तिकडे फिरत बसू, आई-बाबा काळजीत आहेत",.. सुरभी.

"कसं केलं तुला ताई त्या लोकांनी मुद्दामून काव्याच्या लग्नात काम करायला लावलं, किती अपमान झाला, तुला कस वाटल असेल ",..शशी.

"नाही शशी त्या लोकांनी मला कुठली बळजबरी केली नाही, उलट मला जायचं होतं सोहमकडे, मी माझ्या घरीच ठीक आहे, मी एवढं केलं तरी मला घरच्यांनी माफ केलं, काव्याने माफ केलं, खूप व्यवस्थित वागली ती माझ्याशी, काहीच बोलली नाही तुझ्याबद्दलही काहीच बोलली नाही ",.. सुरभी.

" सोहम जिजाजी व्यवस्थित वागतात ना तुझ्याशी अगदी आधी सारखे",.. शशी.

" काहीच प्रॉब्लेम नाही, जाऊ दे आता जे झालं ते झालं शशी, नको आता परत नाव घेऊ या लोकांचं, ठीक आहे का ",.. सुरभी.

"हो ताई ",.. शशी.

" घरी येऊन जा ना ",.. सुरभी.

"हो येईल मी",.. शशी.

" तुला बिजनेस मध्ये काही मदत करायची असली तर मी करीन तू फक्त घरी ये आणि माझ्या घरच्यांनी तुझ्याशी बोलायला नाही सांगितलं आहे, मला इतर वेळी तू फोन केला आणि कोणी असलं तर मी फोन उचलणार नाही, प्लीज गैरसमज करून घेऊ नको, थोडा वेळ लागेल सगळ्या गोष्टी नीट व्हायला ",.. सुरभी.

"काही हरकत नाही, ताई तू खुश आहेस ना यापेक्षा जास्त मला काही नको",.. त्याने फोन ठेवला.

आता शशीला वाटत होतं की विकासच ऐकावं की सुरभी ताईच ऐकावं, बघू आता लगेच जाता येणार नाही घरी, पोलीस पकडतील,

विकास काहीतरी करतो आहे, इन्स्पेक्टर चांगला आहे, तो मदत करेल, जरा दम धरला पाहिजे, ताई म्हणते तसं नको नाव घ्यायला आता काव्याचं, पण बघू लगेच सांगायचं नाही विकासला, नाहीतर तो मला सपोर्ट करणार नाही, कुठे जाणार आहे मी, उगाच पोलीस स्टेशनमध्ये खीतपत पडेल,
.......

अभिजीत सोबतचे दोन-तीन दिवस खूप जास्तच मजेत गेले काव्याचे, खूप प्रेम आणि आधार वाटत होता त्याचा, चांगला स्वभाव आहे अभिजीतचा, अगदी काय हवं नको ते स्वतः बघतो, खूप काळजी घेतो माझी,

रविवारी संध्याकाळी ते दोघं वापस घरी आले, ते दोघ आल्यामुळे घरात एक वेगळाच उत्साह होता, सगळेच खुश होते,

काव्याने घरी फोन केला होता, ती सोहम दादाशी बोलत होती,.. "कसं चाललं आहे दादा आता तुझं?",

"व्यवस्थित सुरू आहे",.. सोहम.

"वहिनी कशी आहे",.. काव्या.

"चांगली आहे",.. सोहम.

" आता काही प्रॉब्लेम नाही ना",.. काव्या.

" नाही काळजी करू नकोस इकडची",.. सोहम.

नंतर ती मावशी आणि प्रमिलाताईंशी बोलली, छान वाटत होत तिला.

आदेश ही दोघ आल्यामुळे खुश होता, तो दोन दिवस कंटाळला होता, त्यांने दोन-तीनदा प्रियाला फोन करून भेटायला बोलावलं, पण ती येत नव्हती, लग्न जमव लवकर असा हट्ट धरला होता, सारखं तरी किती सांगणार घरच्यांना, त्यामुळे आदेश नाराज होता.

नेहमीप्रमाणे प्रतापराव आणि अभिजीत बिजनेस बद्दल बोलत होते, आजी आदेश सोबत होती, काव्या आणि आशाताई किचनमध्ये होत्या, आज छान पावभाजीचा बेत केला होता,

"फार छान वास येतो आहे वहिनी",.. आदेश.

"इकडे ये ना आदेश थोड खाऊन बघ",.. काव्या.

आदेश आणि आजी किचनमध्ये आले, चव घेऊन बघितली पावभाजीची,.. "अतिशय छान झाली आहे वहिनी भाजी, चला आपण जेवायला घेऊ", आजी आशा ताई पुढे जावून बसल्या.

"हो जेवू पण काय झाल तुला, एकदम शांत आज ",.. काव्या.

" काही नाही",.. आदेश.

" नाराज आहे का ",.. काव्या.

"नाही बोर झाल बस इतकच",.. आदेश.

"छान फिरायला जायच ना प्रिया सोबत ",.. काव्या.

" तोच प्रॉब्लेम आहे वहिनी, ती नाही येत भेटायला",... आदेश.

"ठीक आहे आपण बोलू घरी तुमच्या बद्दल ",.. काव्या.

"नको लगेच नको बोलू, इलेक्शन झाल्यावर करेन लग्न मी",.. आदेश.

ठीक आहे.

छान जेवण झालं, काव्या अभिजीत रूम मध्ये आले,

"छान वाटतं आहे ना घरात",.. काव्या.

" हो पण तू माझ्याशी बोलतच नाहीये, सारखी कामातच आहे",.. अभिजीत.

"स्वयंपाक वगैरे करायचं नाही का",.. काव्या.

"आहे ना त्या मावशी",.. अभिजीत.

" पण आज आम्हाला पावभाजी करायची होती ना ",.. काव्या.

" चल आता इकडे ये उद्या परत ऑफिसमध्ये बिझी राहू आपण",.. अभिजीत.

" अभिजीत मी मला एक विचारायचं होतं मला आदेश सोबत त्याच्या पार्टी ऑफिसमध्ये जायचं आहे ",.. काव्या.

"काय झालं तुला पण पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे का?",.. अभिजीत.

"हो आहे इंटरेस्ट आणि तसंही प्रचारासाठी जावंच लागणार आहे",.. काव्या.

" ते का आणि आता ",.. अभिजीत.

" सपोर्ट करावाच लागेल ना",.. काव्या.

" पण या पॉलिटिक्स मध्ये खूप धोका असतो",..

"मी नाही उभे राहणार इलेक्शनला, आणि एवढा वेळ राहू दे आदेशला, नंतर आपण हळूहळू समजून सांगू किंवा खूपच चांगलं होत असलं आदेशच त्यात तर काही हरकत नाही",.. काव्या.

" बघू काय करायच ते",.. अभिजीत.

" मग मी जाऊ का आदेश सोबत पार्टी ऑफिस मध्ये",.. काव्या.

" चालेल जा तसंही पुढच्या महिन्यापासून प्रचार सुरू होणार आहे, पण काळजी घ्यायची फक्त आदेश सोबत राहायचं, एकट कुठे जायचं नाही घरी यायचं नाही",.. अभिजीत.

" हो तसं मी सांगेन आदेशला, तू येशील का? ",.. काव्या.

नाही.

🎭 Series Post

View all