तुझी साथ हवी मला... भाग 38

चला... आशा ताई आल्या, काव्याला घेवून अभिजीत जवळ आल्या, तिच्या पदराची गाठ परत त्याच्या उपरण्याला बांधली, आता मागे वळून बघू नकोस काव्या,


तुझी साथ हवी मला... भाग 38

©️®️शिल्पा सुतार
.........

हळदीचा कार्यक्रम झाला, पार्लर वाल्या ताई आल्या, काव्याची तयारी सुरू होती, भरजरी लाल शालू खूप छान दिसत होता तिला, त्यात दागिने शोभत होते, वेगळच तेज आल होत चेहर्‍यावर. केसात गजरे, हातात चूडा शोभत होता.

बाकीचे सगळे तयार होते, श्रद्धाने ही आत्ता साडी नेसली होती, महिला आधार केंद्रातन काकू आणि चार-पाच मैत्रिणी आल्या होत्या, त्या येऊन काव्याला भेटल्या, खूपच खुश झाली होती काव्या.

मांडवात बरेच लोक बसले होते.

अभिजीत तयार होऊन आला, शेरवानी घातली होती त्यांने, सगळे त्याच्या कडे बघत होते एवढा छान रुबाबदार दिसत होता तो,

प्रिया आदेश तयार होते त्यांनी मॅचिंग ड्रेस घातले होते, प्रियाच्या साडी ला मॅचिंग आदेशचा कुर्ता होता, भारी दिसत होते ते सोबत, हे कधी घेतले सेम कपडे सगळे विचारत होते, ते त्यांनी आधीच घेतले होते आता घालायचा चान्स मिळाला होता.

तिथल्या तिथे छोटी मिरवणूक काढण्यात आली, सगळेच मिरवणुकीत गेले होते, अभिजित सोहमच्या मदतीने घोड्यावर बसला, आदेश प्रिया श्रद्धा रघु सोहम सुरभी सगळेच नाचत होते, प्रतापराव आशाताई पण सोबत होते, आजी मांडवात होत्या.

काव्या मावशींसोबत होती, प्रमिलाताई सोबत होत्या त्या पण खूप कामात होत्या,

आज सकाळपासूनच काव्याला आईची आठवण येत होती, पण ती गप्प होती, दोन तीन दा डोळ्यातून पाणी पण आल होत तिच्या.

"काव्या काय झालं",.. मावशी.

"आईचा फोटो घरी राहिला",.. काव्या.

"मी आणला आहे",.. मावशी.

"दे ना मावशी",.. काव्या.

"पण एक गोष्ट प्रॉमिस कर रडणार नाहीस तू",.. मावशी.

"हो मावशी",.. काव्या.

मावशींनी त्यांच्या बॅगेतुन काव्याच्या आईचा फोटो दिला, काव्याने तो फोटो जवळ घेतला, त्याच्यावर ओठ टेकवले आणि तिच्या बॅगेत ठेवून घेतला, आई माझ्या सोबत रहा, .. "मावशी थँक्स ",

मावशींच्या डोळ्यात पाणी होत.

मांडवात अभिजीत आणि बाकीचे घरचे आले, प्रमिला ताई सुरभीने त्याला ओवाळण, बाकीचे आत येवून बसले, तरुण मंडळी स्टेज वर अभिजीत सोबत गेली, खूप मस्करी सुरू होती त्यांची, अभिजित सारख बघत होता काव्या केव्हा येते ते, बाकीचे मुद्दाम चिडवत होते आली वहिनी, अभिजित लगेच बघत होता, बाकीचे हसत होते.

श्रद्धा काव्याला घ्यायला आत आली,.." चल काव्या", तिने काव्याचा हात धरला, हात खूपच थंड झाला होता,
"काय झालं ग, घाबरली का, चल पटकन सगळे वाट बघत आहे, अभिजित सर आले स्टेज वर ",.. श्रद्धा.

"खूप पाहुणे आहेत का बाहेर",.. काव्या.

"हो, चल तुझी वाट बघत आहेत, तुला माहिती आहे का किती मजा आली मिरवणुकीत, खूप नाचलो आम्ही",.. श्रद्धा.

" रघु सोबत का",.. काव्या.

"हो, एवढ्या गडबडीत ही माझ नाव घ्यायच काही कमी करत नाही तू ",.. श्रद्धा.

दोघीजणी बाहेर आल्या, मामांसोबत काव्या मांडवात आली, गुरुजींनी आधीच अंतर पाट धरलेला होता त्यामुळे अभिजीतला या साईडचे दिसत नव्हतं, त्याला उत्सुकता लागली होती काव्या कशी दिसत असेल, तो बरच या बाजूला बघण्याचा प्रयत्न करत होता.

तोपर्यंत गुरुजींनी मंगलाष्टक सुरू केले होते, काव्याला काहीच सुचत नव्हत, तिच्या हातात हार दिला, मंगलाष्टक संपले, अंतरपाट दूर झाला, अभिजीत काव्या एकमेकांकडे बघत होते खूपच आनंद होता त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर.

काव्याचं रूप आज खूप खुलल होतं, अभिजीतही कमालीचा हँडसम दिसत होता, जोडी खूपच छान होती ती, गुरुजींनी हार घालायला सांगितले, काव्या पुढे झाली, अभिजीत हळूच खाली वाकला, तिने हार घातला, नंतर अभिजीतने काव्याला हार घातला, गुरुजींनी काव्याचा हात अभिजीतच्या हातात दिला, त्या एकमेकांच्या स्पर्शाने काव्या मोहरली, अभिजित खुश होता, आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता त्यांना, एकमेकां शिवाय त्यांना काही दिसत नव्हत, देवाचे खूप आभार, काव्या प्रार्थना करत होती,

थोड्या वेळातच पुढच्या पूजा सुरू होणार होत्या, दोघांना खुर्चीवर बसायला सांगितलं, अभिजीत कंटिन्यू काव्याकडे बघत होता, बाकीची तरुण मंडळी आजूबाजूला होती, सगळे अभिनंदन करत होते, उत्साहाचं वातावरण होतं, घरची ज्येष्ठ मंडळी समोर खुर्चीवर बसलेली होती, त्यांच काम झालं होतं आता .

पुढच्या पूजेची तयारी सुरू झाली, अभिजीत काव्या जवळजवळ बसलेले होते, गुरुजी पूजा सांगत होते, काही लागलं तर मदतीला सगळेच होते,

आदेश प्रियाच्या मागे मागे होता, ती जिथे बसेल तिच्या बाजूला जावून बसत होता तो , तिच्याशी बोलत होता, जेवढे गुलाबाचे फुल त्याला दिसतील तो ते प्रियाला देत होता, प्रिया कडे पुष्प गुच्छ तयार झाला होता, आजींनी त्या दोघांना बघून डोक्याला हात लावला होता.

श्रद्धा ही साडी नेसल्यामुळे रघु तिच्याकडेच बघत होता, ते दोघं सोबत होते,

सोहम आणि सुरभी त्यांच्या त्यांच्या दुनियेत खुश होते, दोघ सोबत समोर बसुन पूजा बघत होते.

अभिजीतला तर काही सुचत नव्हतं, शेजारी आपली बायको बसलेली आहे जी खूपच सुंदर आहे, खूपच छान वाटत होतं त्याला, वाटत होतं उठून तिला मिठीत घ्यावं.

अगदीच पंधरा दिवसात सगळं घडून आलं होतं, याआधी त्याला वाटलं ही नव्हतं की माझ्या आयुष्यात काव्यासारखी छान मुलगी येईल लगेच लग्न होईल.

पूजा सुरू होती दोघं मन लावून पूजा करत होते, अभिजित जवळ गुरुजी बसले होते, अभिजित पूजा करत होता, काव्या हात जोडून बसली होती, हाताला हात लावा गुरुजींनी काव्याला सांगितलं, अतिशय सुंदर नाजूक बांगड्या भरलेला मेहंदीचा हात पुढे आला, तिने हळूच अभिजीतच्या हाताला हात लावला, अभिजीत छान हसत होता, मधून मधून तो काव्याकडे बघत होता, पूजा झाली, सात फेरे झाले, मंगळसूत्र जोडवे बांगड्या इतर दागिने आशाताई घेऊन आल्या, त्यांनी दागिने सुरभी कडे दिले, अभिजितने काव्याला मंगळसूत्र घातल, जोडवे घालायला सुरभी मदत करत होती, काव्या खूप छान दिसत होती कुंकू लावून, पूजा झाली,

अजूनही अभिजीत काव्या शेजारी शेजारीच बसले होते अभिजीत हळूच काव्याशी बोलत होता ,.. "तुला माहिती आहे का काव्या तू हे मंगळसूत्र घालून खूप सुंदर दिसते आहे, एकदा ये ना माझ्याजवळ",

"काहीही अभिजीत किती पाहुणे आहेत इथे",.. काव्या.

" इथे नाही आत जावू, बऱ्याच रूम आहेत फार्म हाऊस मध्ये, पाच मिनिट चल ना ",.. अभिजीत मुद्दाम तिला चिडवत होता.

" नाही ",.. काव्या हसत होती.

" काय झालं, घाबरली का, पण खरंच तू खूप छान दिसते आहे, वाटल तर माझ्या डोळ्यात बघ, तुला मिठीत घ्यायच आहे, आपल दोघांच अभिनंदन",.. अभिजीत.

" वहिनी काय म्हणतो आहे दादा",.. आदेश.

" तुला काय करायचं आहे आदेश",.. अभिजीत.

" आम्हाला पण समजलं पाहिजे तुम्ही काय बोलता आहात ते",.. आदेश.

"हो ना आम्ही पण आलो आहोत लग्नाला इथे काय होतं ते समजलंच पाहिजे आम्हाला",.. प्रिया श्रद्धा

काव्या लाजली होती.

" काय झालं वहिनी दादा काही वेगळ बोलला का ",.. आदेश.

नाही.. काव्या हळूच बोलली.

" अस काही नाही मग सांग ना वहिनी, काय म्हटला दादा ",.. आदेश

आता मी दादाला त्रास देणार माझ्या सोबत सिरियस मीटिंग घेतो का ऑफिस मधे, वहिनी माझ्या कडे आहे आता ,

प्रिया श्रद्धा आदेश सोबत होत्या, श्रद्धा तिला चिडवायचा एकही चान्स सोडत नव्हती,

"थोडे दिवस श्रद्धा, तुझं आणि रघुच लग्न मला जमवायचं आहे, तेव्हा काय करणार",.. काव्या.

दोघ जेवायला आले, छान पंगत बसली होती, सगळे जोडीने बसले होते, अभिजीत आणि काव्याचा एकमेकांना घास भरवायचा कार्यक्रम झाला,.. "काय आवडतं तुला गोड कि तिखट",

"मला तिखट आवडतं ",.. काव्या.

" चला ही आपली आवड जुळली",.. अभिजीत.

आदेश प्रिया ही अगदीच प्रेमाने जवळ बसले होते, आदेश तिला काय हव नको ते बघत होता, एकमेकांना घास भरवत होते ते,

" तुमच काय चाललय दोघांच? नवरदेव नवरी साठी आहे हा कार्यक्रम, आदेश प्रिया तुम्हाला काही वाटत नाही का" ,.. आजी मुद्दामच ओरडली.

" आजी प्रियाच म्हटली मला, हे घे माझ्या हाताने खा, खरच मी काही नाही केल ",.. आदेश.

"नाही आजी आदेश मला सारख गुलाबजाम खाऊ घालतो आहे",.. प्रिया.

" हो बघते आहे मी, आदेश तुझ्या मागे आहे ते, काही खर नाही तुमच्या दोघांच ",.. आजी.

" म्हणून म्हणतो आमच लग्न करून टाक आजी ",.. आदेश.

" एका वर्षाने",..आजी.

काव्या हसत होती,.." आदेश प्रिया छान आहे जोडी",

" आपल्या बद्दल काय मत आहे तुझ काव्या" ,.. अभिजीत.

" आपणही छान आहोत",... काव्या.

"खरच अस रहायला हव आपण छान प्रेमाने ",.. अभिजीत.

" ते दोघ लहानपणापासून ओळखता एकमेकांना, आपण आता पंधरा दिवस झाले भेटलो , थोडा वेळ लागेल ना आपल्याला ",.. काव्या.

" एक मिनिट काव्या तुला माझ्या सोबत कंफर्टेबल व्हायला वेळ हवा आहे अस म्हणायच आहे का" ,.. अभिजीत.

"हो अभिजीत",.. काव्या.

" अजिबात जमणार नाही" ,... अभिजीत.

प्लीज,

" नाही, माझ्या सोबत रहायच, होईल सवय हळू हळू एकमेकांची" ,.. अभिजीत.

काव्या लाजली होती,

जेवण झाल सगळे कार्यक्रम झाले होते, आता पाठवणीचा कार्यक्रम बाकी होता, त्याबाबत बोलायला कोणी तयार नव्हत, सगळ्यांना माहिती होतं काव्या खूप हळवी आहे, कसं काय सांगणार काव्याला तयार हो आपल्याला निघायचं आहे,

सगळे बोलत बसले होते, एक दोनदा आशाताईंनी प्रमिला ताई आणि मावशी यांच्याकडे बघितलं , खूण केली, मावशी उठून काव्याजवळ गेल्या, चल काव्या जरा फ्रेश होऊन येवु. काव्या त्यांच्यासोबत आत आली.

आशा ताई प्रमिला ताईंना सांगत होत्या आटायला हव आता, आम्ही निघतो अर्धा तासात,

काव्या श्रद्धा सोबत होत्या , मावशी आवरत होत्या, काव्या तिची साडी नीट करत होती,.. "मावशी बदलू का ही साडी",

"नाही तुझ्या घरी जाईपर्यंत राहू दे शालू",.. मावशी.

"खूप जड आहे",.. काव्या.

"हो आता अजून एक दोन तास, तुझी बॅग भरली का काव्या",.. मावशी.

" हो मावशी",.. काव्या.

" तिकडे छान रहायच काव्या, मोठ्यांच ऐकायच, चांगले आहेत तुझ्या घरचे , नाही समजल काही तर विचारायचं, स्वयंपाक शिकून घे, ऑफिसला जाशील तरी आल्यावर आवरत जा घर, थोड काम केल तर काही फरक पडत नाही ",.. मावशी.

काव्या शांत झाली होती,

बघु काय काय घेतल, त्या मदत करत होत्या,.." तुझ सामान नीट ठेवत जा, पसारा करत जावू नको तिकडे ",

" मावशी तू येते ना माझ्या सोबत",.. काव्या.

" हो येईन नंतर, आता आज नाही येत ",.. मावशी.

" आता चल ना मावशी",... काव्या.

" अस करता का, खर तर मला तुझ्या कडे यायची गरज नाही, चांगले लोक आहेत, नंतर येईल मी एखाद्या वेळी",.. मावशी.

"ठीक आहे" ,.. काव्या नाराज होती, ती एकदम गप्प झाली होती,

मावशी काही तरी आणायला बाहेर गेल्या,

"काय झालं काव्या",.. श्रद्धा.

" बघ ना मावशी येत नाही माझ्या सोबत",.. काव्या.

"बरोबर आहे त्यांच, त्यांना अवघडल्या सारख होईल तिकडे, आणि तुला काय प्रॉब्लेम आहे एकटी जा सासरी, अस करायच नाही" ,.. श्रद्धा.

" ठीक आहे, तू चल सोबत, नाहीतरी रघु माझ्या सोबत असतो ",.. काव्या.

" काहीही.. तुला का हव कोणी सोबत, ओह मी विसरलेच होते, आता अभिजीत सरांच्या ताब्यात तू एकटी सापडशील म्हणून का, आता पासून घाबरली आहेस तू ",.. श्रद्धा.

" श्रद्धा मला नाही जायच तिकडे, मला माझ्या घरी जायच आहे, माहिती नाही कशी ऍडजेस्ट होणार आहे मी तिकडे सुचत नाही काही",... काव्या रडत होती, श्रद्धा समजवत होती तिला , किती छान सासर मिळाल आहे तुला, काय टेंशन घेते, हस बघु, आपण भेटू ऑफिस मधे, आता दोघी रडत होत्या,

प्रमिला ताई आत आल्या आवरल का काव्या? चल बाहेर, काव्या उठून त्यांना भेटली, त्या पण रडत होत्या,

सुरभी आली,.. "वहिनी जाते ग मी आई बाबा मावशी दादा कडे लक्ष दे",.., काळजी करू नकोस काव्या.

काव्या श्रद्धा बाहेर आल्या, ती येवून सुरेश रावांजवळ बसली,

" झाली तयारी बेटा, चल इकडे ये, चांगले लोक आहेत, नीट रहा तिकडे, काही लागल तर सांग" ,..सुरेश राव.

हो बाबा.. काव्या रडत होती, त्यांनी तिला जवळ घेतल, सोहम येवून बसला,.. "अरे किती चांगल होत आहे तुझ, आम्हाला हव ते स्थळ मिळाल, लग्न झाल, छान रहा, आता काही टेंशन नाही",.. काव्या सोहम जवळ जावून बसली, काळजी घे दादा, तू आणि वहिनी पण नीट रहा, बोलू नको तिला काही,

हो,.. त्याला ही आसू आवरण कठीण जात होत, त्या दोघां जवळ अभिजीत जावून बसला,.." पुरे आता सोहम, काव्या अजून रडेल, त्रास होईल अस करु नका",

मावशी आजीं जवळ बसलेल्या होत्या,.. "लक्ष द्या काव्या कडे, विशेष काम येत नाही तिला, पण शिकवलं तर करते, इतके दिवस छोटी आहे छोटी आहे म्हणून काही सांगितल नाही, आज अचानक लग्न झालं तीच, आई नाही तिला म्हणून मी पण लाडावून ठेवल होत ",

" अजिबात काळजी करू नका, आमच्या कडे ही विशेष काम नाही काही, तुम्ही येता आहात ना सोबत ",.. आजी.

" नाही.. आहात तुम्ही सगळे, नंतर येईल मी",.. मावशी.

अभिजीत सोहम जवळ बसलेला होता,.." अभिजीत थोडे दिवस कुठे जावू नकोस काव्याला घेऊन, फिरायला नाही की देव दर्शन नाही, मी सांगतो तस ऐका दोघांनी, प्लीज, काव्याला कुठेही एकट सोडू नकोस, ऑफिस हून जाता येतांनाही नाही, ती हट्ट करते, ऐकु नकोस, पाठवू नको कुठे तिला" ,

"हो काळजी करू नकोस सोहम, मी लक्ष देईल काव्या कडे",.. अभिजीत.

आदेश प्रिया श्रद्धा रघु ही काव्या सोबत होते,

मावशींना भेटायला गेली काव्या,.." तू कधी येशील",

" येईल मी लवकर",.. दोघी इमोशनल झाल्या होत्या,
....

"कोण राहील आता वहिनी रडायचं, पुरे ना, काय सुरू आहे, किती त्रास करून घेणार ",.. प्रिया.

"आपण राहिलो ",.. आदेश पुढे आला, वहिनी.. तो मुद्दामून मिठी मारत होता, काव्या हसत होती, आदेश काय हे?

" आता अस रहा, रडली तर बघ वहिनी, तो दादा बघ किती शांत बसुन आहे, त्याला वाटत कशी राहील माझी बायको सासरी, किती रडते आहे",.. आदेश.

चला... आशा ताई आल्या, काव्याला घेवून अभिजीत जवळ आल्या, तिच्या पदराची गाठ परत त्याच्या उपरण्याला बांधली, आता मागे वळून बघू नकोस काव्या, आपल्या बाजूला जावू, त्यांच्या त्या बाजूला रूम होत्या, तिथे ते सगळे गेले, आई बाबा मावशी दादा वहिनी मागे राहिले, नवीन आयुष्यात काव्याचा अभिजीत सोबत प्रवेश झाला,

बर झालं पण तिकडे गेले ते, इथे बसुन काव्या खूप रडत होती, चला आपण आत बसु, ते सगळे आत गेले,

इकडे अभिजीत काव्या एका सोफ्यावर बसले होते,.. "ठीक आहेस ना तू",

काव्या हो म्हणाली,

"मावशी कुठे आहे" ,.. अभिजीत.

परत काव्या रडवेली झाली होती,.. "ती नाही म्हणाली यायला" ,

"मी बोलू का" ,.. अभिजीत.

"नको मला तिच्या शिवाय रहायची सवय करावी लागेल" ,.काव्या.

"मी आहे काळजी करू नकोस, पण आता त्या एका गोष्टीच काय होईल जी मी तुझ्या कडून घेणार होतो" ,..अभिजीत.

" हो आता मावशी नाही येत त्यामुळे ते कॅन्सल" ,.. काव्या छान हसत होती,

" अस चालणार नाही, आता तू एकटी माझ्या जवळ, तुमच्या कडून कोणी नाही ",.. अभिजीत.

" मावशी आली असती तरी ती थोडी आपल्यात राहिली असती, तिची ती सेपरेट राहिली असती",.. काव्या.

"अरे हो, माझ्या जवळ तर फक्त तू असणार आहे रोज, बाकी कोणी नाही, आता.. काय होईल ",.. अभिजीत.

काव्या त्याला मारत होती, अभिजित अस नाही.

" मग कस करू या तू सांग, आता तु म्हणशील ते होईल आपल्यात ",.. अभिजीत.

" नुसत म्हणायला",.. काव्या.

" नाही खरच ",.. अभिजीत.

"हळू बोला कोणी ऐकेल",.. काव्या.

" ऐकु दे मी माझ्या बायकोशी बोलतो आहे ",.. अभिजीत.

काव्या लाजली. ती खुश आहे हे बघुन अभिजीतला बर वाटत होत.

🎭 Series Post

View all