तुझी साथ हवी मला... भाग 36

सोहम आला, आत मध्ये सुरभी होती, मावशी बाहेर चालल्या गेल्या, सुरभी पटकन येऊन सोहमला भेटली


तुझी साथ हवी मला... भाग 36

©️®️शिल्पा सुतार
.........

आतून आदेश अभिजीत आले,.. "या तुमच स्वागत आहे, चला आत मध्ये", अभिजित येऊन काव्या श्रद्धाला भेटला.

"अभिजीत सर काव्यामुळे मी इथे आली आहे, नाहीतर मी तिला म्हणत होती मी जाते ऑफिसला",.. श्रद्धा.

"बरं झालं श्रद्धा तू आलीस, छान वाटल ",.. अभिजीत.

"फक्त उद्या ऑफिस मध्ये दुप्पट काम कराव लागेल",.. आदेश.

"आदेश तू जरा गप्प बसणार का",.. श्रद्धा आणि आदेश हसत होते,

प्रिया आतून बाहेर आली,

" वहिनी इकडे ये, ही प्रिया, माझी होणारी बायको ",.. आदेश.

काव्या आश्चर्याने बघत होती,.." म्हणजे तुमचं लग्न ठरलं आहे आदेश",.

" हो माझ्या आधी जमलं आहे त्याचं लग्न, किती घाई आहे या दोघांना",.. अभिजीत.

" खूप छान जोडी आहे तुमची, लव्ह मॅरेज आहे का",.. काव्या.

"हो आम्ही दोघं पहिली ते दहावी एका वर्गात होतो",.. आदेश.

"किती छान ",.. काव्या.

" आणि तरीसुद्धा प्रियाने आदेशला लग्नासाठी होकार दिला, किती मोठी गोष्ट आहे",.. अभिजीत.

" पुरे ना दादा",.. आदेश.

" हो ना आदेश चांगले आहेत",.. काव्या.

" बघितले दादा, वहिनी चांगली आहे ती माझी बाजू घेते, वहिनी तुझा आधार आहे मला ",..आदेश.

प्रिया बघत होती किती छान आहे ही काव्या वहिनी, किती शांत प्रेमाने बोलते, काव्याने तिची श्रद्धाशी ओळख करून दिली, बाकीचे बोलत होते,

अभिजीत काव्या कडे बघत होता, खूप छान दिसत होती ती, काव्याला ते समजल ती मुद्दाम दुसरीकडे बघत होती, ओके अॅटिट्युड... ठीक आहे, एक दोन दिवसात ही माझी बायको होईल, मग काय करेल, तो हसत होता.

अभिजीत सोहम कडे गेला, .. "बाकीचे घरचे कुठे आहेत, निघाले की नाही काका काकू मावशी",

"ते येत आहे, अर्ध्या तासात येतील",.. सोहम.

सगळे आत मध्ये गेले, प्रतापराव आशाताई आजी समोर उभे होते, प्रतापरावांनी पुढे येऊन सोहमच स्वागत केलं, सगळे काव्याकडे बघत होते, खूपच छान आहे ही, पण ड्रेस खूप साधा होता, तरी तिला शोभत होता, तिने इथे केंद्रात राहताना तोच ड्रेस घेतला होता, नवीन खरेदी केली नव्हती, बाहेर निघण्यात रिस्क होती,

सोहम पुढे आला तो काव्याला घेऊन प्रतापरावां जवळ गेला,आशा ताई आजी बाबा सगळ्यांशी ओळख झाली, काव्याने तिघांच्या पाया पडल्या, समोरच्या सोफ्यावरती तिघी बसल्या होत्या.

प्रतापराव आशा ताई या आधी भेटले होते काव्याला, ते समाधानी होते,

"अभिजीत छान आहे तुझी बायको ",.. आजींनी पसंती दर्शवली ,

प्रिया भेटली असेल अभिजीतच्या आई बाबांना आधी, तिला विचारू का कसे आहेत हे लोक, नको समजेल जावू दे... काव्या अजूनही टेंशन मधे होती.

समोरच सोहम अभिजीत बसलेले होते, ते दोघ प्रतापराव आदेश आई आजी यांच्या सोबत बोलत होते, मध्येच सोहमने फोन करून बघितला, येतच होते सुरेशराव प्रमिला ताई आणि मावशी.

आशाताई या तिघीं जवळ सरकल्या, त्या आता काव्याशी बोलत होत्या, बोलण्यावरून तर त्या एकदमच शांत आणि छान वाटत होत्या, अर्ध टेंशन कमी झाल, काव्या खुश होती,.. "मला बोलायच होत थोड काकू" ,

"काकू नाही आई म्हण मला काव्या, पसंत आहे ना अभिजीत",.. आशा ताई.

हो आई.

"बोल काय सांगते",.. आशा ताई.

"मला... मला अजिबात स्वयंपाक येत नाही, म्हणजे थोडा येतो पोळ्या वगैरे, भाजी येते ती आमच्या पद्धतीने" ,.. काव्या.

"काही काळजी करू नकोस, मी आहे, आता कॉलेज झाल का ",.. आशा ताई.

" हो आई अजून रिजल्ट यायचा आहे शेवटच्या वर्षाचा",.. काव्या.

हिच्यात अभिजीत मध्ये पाच वर्षाच अंतर आहे, लहान आहे ही.

चहा घेऊन एक बाई आल्या, आशाताई चहा देत होत्या एकदम काव्या उठली तिने सगळ्यांना चहा दिला, प्रिया होती मदतीला.

"आई आता तुला दोन दोन सुना आल्या आहेत, तुझे आरामाचे दिवस आले आहेत",.. आदेश मध्येच बोलला.

" आदेश इथे असताना आराम मिळेल का मला",.. त्या त्याच्यावर ओरडत होत्या.

"वहिनी आणि प्रिया समोर फारच अपमान होत आहे माझा, वहिनी जरा बघ वाचव मला",.. आदेश.

"हो ती त्यासाठीच येणार आहे लग्न करून इकडे",.. आशा ताई.

लेडीज ग्रुप मध्ये मजा येत होती, त्यांच्याच आजूबाजूला आदेश होता.

काव्या आता प्रियाशी छान बोलत होती,.. "तू पहिल्यांदा आली होती इकडे तेव्हा तुला काय प्रश्न विचारले ",

" काहीच नाही",.. प्रिया.

" स्वयंपाक येतो का वगैरे विचारलं होतं का ? ",..काव्या.

" नाही वहिनी, का ग काय झालं",.. प्रिया.

"काही नाही, असच विचारल" ,.. काव्या.

अभिजित जास्त करतात, मला म्हणे रेसीपी सांगावी लागेल.

" तुला येतो का प्रिया स्वयंपाक ",.. काव्या.

" हो बऱ्यापैकी येतो मला",.. प्रिया.

" नंतर शिकवशील ना मला ",.. काव्या.

"हो पण तुझं लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आमचं लग्न आहे, मी इथे आज तू येणार म्हणून आली आहे ",.. प्रिया.

आशाताई काव्या श्रद्धा आणि प्रियाला घेऊन आत मध्ये गेल्या, त्या घर दाखवत होत्या, खाली दोन बेडरूम होत्या, वरती चार बेडरूम होत्या, वरती सोहम आणि अभिजीतची बेडरूम होती, खाली आजी आणि आशाताई प्रतापराव यांची बेडरूम होती, वरती दोन गेस्ट रूम होत्या.

अभिजीत सोहम प्रतापराव यांच्या सिरीयल गप्पा सुरू होत्या, नेहमीचाच बिझनेसचा विषय होता, अजून लग्नाचा विषय सुरू केला नव्हता, ते सुरेशराव यायची वाट बघत होते,

बाहेर कार आली, सोहम अभिजीत बाहेर गेले, सुरेश राव प्रमिला ताई मावशी आल्या होत्या, ते तिघं आत आले, प्रताप राव स्वागताला पुढे आले, काव्या आतुन पळत आली, ती एकदम सुरेश रावांना भेटली, दोघांच्या डोळ्यात पाणी होत,.. "कशी आहेस बेटा तू",

"ठीक आहे मी बाबा" ,..काव्या.

"मी नीट लक्ष नाही दिल तुझ्या कडे",.. ते हळूच म्हटले.

" नाही बाबा काहीही काय, मी पण तुम्हाला न सांगता घरातून गेली, माझी पण चूक झाली" ,.. काव्या.

प्रमिला ताईंना काव्या भेटली, त्यांनी तिला एकदम जवळ घेतल,

मावशी बाजूला उभ्या होत्या, काव्या त्यांच्या जवळ गेली, दोघी भेटल्या काय बोलाव सुचत नव्हत, मावशी तिच्या गालाला हात लावून बघत होत्या,.." ठीक आहे ना तू बाळा, खूप आठवण आली तुझी, काळजी वाटली",

" मी ठीक आहे मावशी, तू कशी आहेस" ,. काव्या.

"मी पण ठीक आहे" ,.. मावशी.

"तुला माहिती ना अभिजीत सोबत लग्न ठरतय ते" ,.. काव्या.

"आवडला ना मुलगा" ,.. मावशी.

"हो मावशी माझ्या मना प्रमाणे होत आहे लग्न, ये ना मी तुझी ओळख करून देते",.. काव्या.

अभिजित पुढे आला, सुरेश राव प्रमिला ताईंना भेटला, दोघांनी आशीर्वाद दिला, आता तो काव्या आणि मावशी जवळ आला, दोघी त्याच्या कडे बघत होत्या, तो लाजला थोडा, पटकन बाजूला उभा राहिला.

" मावशी कसे वाटले हे",. काव्या.

" आता हे का? अहो म्हणते का, छान आहेत जावई बापू",. मावशी.

काव्या लाजली होती,

मावशी आत जावून बसल्या,

अभिजित मुद्दाम आत जात होता, अभिजित... काव्याने नाजूक हाक मारली, अभिजित जागेवर उभा राहिला, किती गोड आवाज तो, कायम असा राहील का, काय माहिती,

" बोला राणी सरकार" ,.. अभिजीत.

काव्या खूप हसत होती,

" काहीही काय, काव्या म्हणा मला" ,..

"नाही बाबा तू स्पेशल आहे, देशमुख घराण्याची राजकुमारी, तुला बॉडी गार्ड आहे, आता आम्हाला घाबरून रहाव लागेल" ,.. अभिजीत.

"पुरे.. ऐका ना एक रीक्वेस्ट होती, माझी मावशी आपल्या कडे राहील माझ्या सोबत थोडे दिवस ",.. काव्या.

अभिजित मुद्दाम नाही म्हटला,.. "किती लोक आहेत तुझ्या सोबत, आधी तो रघु राहील इथे",

" प्लीज, मावशी माझी आई आहे, थोडे दिवस",.. काव्या.

" का तुला भीती वाटते का इथे एकटीला माझ्या सोबत ",.. अभिजीत.

" नाही अस नाही, तरी पण मावशी हवी सोबत, नंतर जाईल ती घरी, प्लीज हो म्हणा ना ",.. काव्या.

" अस सहज गोष्टी होत नाही इकडे, एक तर तू आल्या आल्या माझ्या कडे दुर्लक्ष केल",.. अभिजीत.

" नाही ना, बर सॉरी मी अस करणार नाही, मावशी माझ्या सोबत राहतील प्लीज",... काव्या.

"ठीक आहे, त्या बदल्यात मला काय मिळेल" ,.. अभिजित तिच्या कडे बघत होता, काव्या गडबडली, ती आत येत होती अभिजीतने तिचा हात धरला, बाजूला स्टोअर रूम होती तिथे नेल,

" अभिजित काय हे, मला जायच आहे",.काव्या.

" मावशी हव्या ना इथे",.. अभिजीत.

हो,

त्याने काव्याला जवळ घेतल, दोघ छान मिठीत होते,

" अभिजीत मी जाते, सोडा ना " ,.. काव्या.

"जाता येणार नाही, थांब ना, काव्या नीट सांग काय देशील मला ",.. अभिजीत.

काव्या त्याच्या कडे बघत होती. किती छान सेफ वाटत याच्या जवळ, ती काही बोलली नाही.

" ठीक आहे एक गोष्ट मी मला हवी ती घेईन नंतर चालेल का ",. अभिजीत.

ठीक आहे, मावशी इथे असेल म्हणून काव्या खुश होती.

" या पुढे माझ्या कडे दुर्लक्ष करायच नाही ",.. अभिजीत.

"नाही करणार",.. काव्या

"मी म्हणेल ते करायच",.. अभिजीत.

अभिजीत.... काय हे

"जावू दे मग मावशी नाही राहू शकत इथे ",.. अभिजीत.

बर हो

" चल मग जवळ ये परत ",.. अभिजीत.

" नको अस आपण जावू बाहेर",.. काव्या लाजली होती.

दोघ आत आले,

प्रताप राव सुरेश राव एका बाजूला बसुन बोलत होते, त्यांनी प्रमिला ताई आशा ताईंना बोलवलं, ते चौघ बोलत होते, ठीक आहे चालेल,

तरुण मंडळी छान रमली होती, तीन जोड्या होत्या तिथे, सोहम सुरभीला मिस करत होता, त्यांच्यात आजी मावशी बोलत बसल्या होत्या, त्या दोघी सीनियर आहे अस वाटत नव्हत आधी पासून,

प्रताप रावांनी सगळ्यांना हाक मारली, सगळे शांत ऐकत होते,.. "आता अस ठरत आहे की अभिजीत काव्याच उद्या फार्म हाऊस वर लग्न होईल लगेच, चालेल का" ,

"आज सगळी तयारी करायची, उद्या सकाळी आधी हळद लगेच दुपारी लग्न" ,.. आशा ताई.

चालेल.. सगळे टाळ्या वाजवत होते, वेळ खूप कमी आहे अगदी चोवीस तास सुध्दा नाही, तर लागा कामाला,

"जस होईल तस आपल्याला हा कार्यक्रम छान करायचा आहे, ही बातमी इथून बाहेर जाता कामा नये, कोणीही काही बोलू नका",.. आशा ताई.

अभिजीत काव्या खुश होते, तो बघत होता काव्या कडे, ठीक आहे ना,

हो,

"ठीक आहे आम्ही निघतो मग फार्म हाऊस वर जातो",.. सोहम.

"जेवून जा स्वयंपाक झाला आहे",.. अभिजीत.

" तुम्ही खूप करताय आमच्या साठी",..सोहम.

" आम्ही येवू तुमच्या कडे भरपाई करायला",.. अभिजीत .

थोड्या वेळाने साडी वाला आला,

"मावशी अग आता साड्या घेतल्या तर ब्लाऊजच कस होणार",.. काव्या.

"करतील ते काहीतरी",.. मावशी.

थोड्या वेळाने टेलर ही आला, आता अर्जंट तीन चार ब्लाऊज शिवा बाकीचे दोन तीन दिवसात द्या,

दागिने सुधा घरपोच आले, आशा ताई खूप छान अॅरेंज करत होत्या, सगळे कामात होते, आदेश अभिजीत अजूनही फोन वर बोलून सगळ ठरवत होते, दुपारच जेवण झाल, ते फार्म हाऊस वर यायला निघाले,

अभिजित काव्या सोबत होता,.. "काळजी घे, कुठे जावू नकोस, काहीही लागल तर मला सांग",

"हो.. उद्या या लवकर",.. काव्या.

फार्म हाऊस वर आल्यावर काव्या सुरेश राव प्रमिला ताई सोबत होती, खूप छान वाटत होत, आई बाबा तुम्हाला मिस केल मी खूप, श्रद्धा इकडे ये आई बाबा ही माझी बेस्ट फ्रेंड, तिने मला खूप सपोर्ट केला, श्रद्धा त्या दोघांशी बोलत होती,

"श्रद्धा तू इथे थांब आता" ,.. काव्या.

" काकूंना सांगाव लागेल" ,.. श्रद्धा.

"हो करू आपण फोन" ,... काव्या.

" आई बाबा एक बोलायच होत, तुम्ही बोला ना दादाशी, वहिनीला बोलवुन घ्या ना इकडे, त्या दोघांना दूर राहून त्रास होतो आहे, माझा काही राग नाही वहिनी वर, दादाच नीट व्हायला हव",..काव्या.

"हो बरोबर आहे",.. सुरेश राव प्रमिला ताईं कडे बघत होते.

सोहम आला तेवढ्यात,.." काय बोलायचं आहे बाबा ",

" दादा वहिनीला बोलवुन घेता येईल का इकडे",.. काव्या.

" नाही शक्य नाही ते तुला माहिती आहे ना किती रिस्क आहे, ती पाच मिनिटात शशीला सांगून देईल, अजूनही झालं ते कमी झालं आहे का तुला काव्या ",.. सोहम.

"मला नाही वाटत वहिनी काही सांगेल शशीला, शशी पळून गेलेला आहे ना, काही वेळेस वहिनी आपल्याबरोबर सुखी आहे हे बघून शशी शांत होऊ शकतो, तू गाडी पाठवून बोलून घे ना तिला, फोन नको वापरू देऊ वाटलं तर वाहिनीला , तुला राहायचं आहे ना तिच्या सोबत ",.. काव्या.

" हो मला राहायचं आहे पण मी विचार करत होतो थोडे दिवसांनी तिला घरी बोलवणार होतो ",.. सोहम.

" आता आपल्या घरचा एवढा महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि वहिनी नाही, बघ म्हणजे तू, मला असं वाटत होतं यानिमित्ताने तुमचं चांगलं झालं असतं ",.. काव्या.

सोहम आई-बाबांकडे बघत होता,

" एका दिवसाचा तर प्रश्न आहे, उद्या लग्न आहे काव्याचं, बघ तुला बोलवायचं तर बोलून घे तिला",.. सुरेश राव.

" ठीक आहे ",.. सोहम खुश वाटत होता, त्याने सुरभीला फोन केला, सुरभीला खूप आश्चर्य वाटलं, तिने पटकन फोन उचलला, दोघांना काय बोलावं ते समजत नव्हतं,

" कसे आहात तुम्ही सोहम, मला यायच तिकडे घरी तुमच्या कडे ",.. सुरभी.

" बघ विचार कर यापुढे मी म्हणेल ते करावे लागेल, माहेरी जाता येणार नाही, घरातल्या लोकांना त्रास देण, माझ्यामागे काहीतरी प्लॅनिंग करण, त्रास देण असे प्रकार करता येणार नाही",.. सोहम.

"मी यापुढे असं काहीही करणार नाही, तुम्ही म्हणाल तेच करीन मी, माझी चुकी झाली",.. सुरभी.

"ठीक आहे मी गाडी पाठवतो आहे, तुझी बॅग भर, तुझा फोन घरीच ठेव, यापुढे फोन वापरायचं नाही, शशी शी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही, आई-बाबांशी माझ्या फोनवरून बोलल तर चालेल, तुझ्यामुळे यापुढे जर काव्याला काही झालं तर माझ्याहुन कोणी वाईट नाही",..सोहम.

"नाही मी असं काही करणार नाही, कुणाला काही सांगणार नाही",.. नियम जरा कठीण होते, पण तिला आता तिचा संसार वाचवायचा होता, सोहम तिला बोलवत होता, थोडे दिवसांनी होईल ठीक म्हणून सुरभीने होकार दिला, ती पटकन बाहेर आली, आई-बाबांना सांगितलं सोहमचा फोन आला होता, मी जाते आहे घरी,

आई बाबा पण खुश होते,

" आई जर शशीचा फोन आला तर त्याला सांग मी घरी सासरी आहे, मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नको, परत सोहमला राग आला तर काही खर नाही, मला आता अशी कुठलीच गोष्ट नको आहे ज्याने घरचे रागवतील",.. सुरभी.

ठीक आहे तु नीट रहा, जरा वेळाने गाडी आली, त्यात बसून सुरभी निघाली,.." कुठे चाललो आहोत आपण काका",

सोहम साहेब आणि फॅमिली दुसऱ्या गावाला आहे तिकडे जायचं आहे,

जरा वेळाने सोहमने ड्रायव्हर काकांना फोन केला, काकांनी सांगितल सुरभी मॅडम आहेत सोबत ,

"गाडीचा चुपचाप कोणी पिच्छा वगैरे करत नाही ना काका",.. सोहम.

नाही साहेब.

तसंही कोणी मागे आलं तरी आता काही फरक पडणार नाही, पोलिस प्रोटेक्शन खूप आहे, कोणी येवू शकत नाही फार्म हाऊसवर.

जरा वेळाने सुरभी फार्म हाऊसला आली, रस्त्यात बघितलं तिने खूप प्रोटेक्शन होतं, बरेच पोलीस होते गेट पासून, काव्या जाऊन तिला भेटली,.. "कशी आहेस वहिनी",

"मला माफ कर काव्या",.. सुरभी.

"जाऊ दे वहिनी आता नको बोलू त्याबद्दल, फक्त तू आणि दादा नीट रहा",.. काव्या.

हो

आई बाबा मावशी बाहेर बसलेले होते, सुरभी त्यांना भेटली,.. "उद्या काव्याचं लग्न आहे, तयारीला लाग सुरभी" ,

हो आई, ती चौकशी करत होती.

सोहम दिसत नव्हता, कधी एकदा त्याला भेटते असं झालं होतं सुरभीला, पण तो बोलेल की नाही माझ्याशी इथून शंका होती, सोहम कामानिमित्त बाहेर गेलेला होता .

जरा वेळाने मेहंदी काढणाऱ्या ताई आल्या, काव्याच्या हातावर छान मेहंदी काढत होत्या, श्रद्धा फोटो घेत होती, वेळ कमी होता बरेच कार्यक्रम होते.

श्रद्धाने महिला आधार केंद्रात फोन केला,.. "काकू उद्या काव्याच लग्न आहे, मी इथे आहे तिच्या सोबत, कोणाला सांगू नका काकू, काव्याशी बोला",..

"काकू तुम्ही आणि बाकीच्यांनी उद्या इकडे या फार्म हाऊसवर",.. काव्या.

"ठीक आहे बेटा तुझ खूप अभिनंदन नक्की येऊ आम्ही उद्या सकाळी",.. काकू.

"आज श्रद्धा इथे माझ्यासोबतच राहील",.. काव्या.

" चालेल काही हरकत नाही",.. काकू.

बांगड्या हव्या होत्या, अजून बरच सामान हव होत, प्रमिला ताईंनी श्रद्धाला रीक्वेस्ट केली,.. "तुला माहिती आहे ना श्रद्धा दुकान, प्लीज हे काम कर ना ",

हो,

काव्याने अजून काय काय हव त्याची लिस्ट दिली, ड्रेस हवे होते, मेक अपच सामान, चप्पल,

" ठीक आहे सगळ आणते" ,.. श्रद्धा.

"रघु प्लीज श्रद्धा सोबत मार्केट मधे जा ना",.. काव्या.

"नको मी जाईन माझी माझी स्कूटर वर",.. श्रद्धा.

" नाही रघु सोबत जाव लागेल, प्रोटेक्शन गरजेच आहे",.. काव्या.

ठीक आहे,

काव्या हसत होती, प्रमिला ताई समोर श्रद्धा चिडू शकत नव्हती, ती रघु सोबत निघाली , कार रघु चालवत होता श्रद्धा त्याच्या बाजूला बसली होती, खूप खुश होता तो, श्रद्धा मुद्दामून बाहेर बघत होती, बापरे काय धड धड होत, काव्या जास्त करते,

" कोणत्या दुकानात जायच ",.. रघुने विचारल.

"मार्केट मधे चला" ,... एवढ कसबसं बोलली ती.

जरा वेळाने सोहम आला त्याने बघितलं सुरभी आलेली होती, खूप कामात होती ती, काव्या तिच्याशी छान बोलत होती, आई बाबा पण कामात होते,

मावशी आत मध्ये होत्या, त्यांनी सोहमला बोलवलं, सोहम आला, आत मध्ये सुरभी होती, मावशी बाहेर चालल्या गेल्या, सुरभी पटकन येऊन सोहमला भेटली, दोघं शांत होते , सुरभी रडत होती, सोहम गप्प होता, त्याने तिला एकदम जवळ घेतल,.. "अजिबात काळजी करायची नाही आता सुरभी" ,

"मला माफ करा सोहम",.. सुरभी.

"पुरे आता हा विषय, या पुढे सारखी माफी मागायची नाही, आपण दोघांनी नीट राहायच",.. सोहम.

"हो आता कोणी नको आपल्यात",.. सुरभी.

शशीला निरोप गेला की सुरभी ताई सासरी वापस गेली, सोहम जिजाजींनी तिला बोलवून घेतल, त्याला समाधान वाटत होत.


🎭 Series Post

View all