तुझी साथ हवी मला... भाग 33 बोनस पार्ट

चला छान झाल, मला काव्याची खूप चिंता होती मला वाटत होतं तेच झालं, मी आज दुपारीच अभिजीतला विचारलं होतं की माझ्या बहिणीशी लग्न करशील का


तुझी साथ हवी मला... भाग 33 बोनस पार्ट

©️®️शिल्पा सुतार
.........

"काव्या रघु काही बोलायच आहे का तुम्हाला",.. सोहम.

"हो दादा" ,... काव्या.

रघु हसत होता,

"काय प्रोब्लेम आहे रघु", .. सोहम.

"सॉरी साहेब",.. रघु.

"काव्या बोल पटकन",. सोहम.

"दादा ते मला काय बोलू समजत नाही, मला अभिजीत सोबत रहायच आहे",.. काव्या.

"म्हणजे? अभिजीत पाटील का , त्याच लग्न जमल आहे काव्या, तो नाही म्हटला ",.. सोहम.

काय बोलाव आता रघु काव्या एकमेकांकडे बघत होते.

काव्या, रघु, सोहम बोलत होते, तर बाहेर गडबड गोंधळ झाला, शशी आणि त्याचे लोक आलेले होते, ते आज दुपारपासूनच रघुच्या मागे होते, रघु आणि काव्या फार्म हाऊस वर आल्यापासून ते तिथेच होते, थोड्यावेळाने शशी आल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी फार्म हाऊस मध्ये एन्ट्री घेतली,

सोहम सोबत थोडेच लोक होते, अजून इथले पोलीस आलेले नव्हते,

शशीच्या लोकांनी सोहमच्या लोकांना धरून ठेवलं होतं, शशी आत आला, काव्या सोहम सोफ्यावर बसलेले होते तो येऊन त्यांच्यासमोर बसला, त्याला बघून सगळेच घाबरले, हा कसा काय आला इथे, काय कटकट आहे.

रघु काव्याच्या बाजूला उभा होता, तो पुढे आला, शशीने त्याला इशाऱ्याने थांब सांगितल,.. "मी मारेन या दोघांना खूप, मधे पडु नको रघु" ,

रघुला माहिती होत शशी बोलतो ते करतो, तो बाजूला जावून उभा राहिला, मागच्या वेळी काव्या मॅडमला मारल होत याने, तो बराच अलर्ट होता, काय होईल काय माहिती, मी सोडणार नाही पण या शशीला.

"शशी काय प्रकार आहे हा का त्रास देतो आम्हाला जा इथून",.. सोहम.

" जिजाजी मला काव्या हवी आहे, तिला माझ्याकडे द्या, मला तुमच्या लोकांशी भांडण करण्यात काही इंटरेस्ट नाही, माझं लग्न जमलं आहे तिच्यासोबत, आमचा साखरपुडा झाला आहे, तुम्हाला नाही ठेवायचं ना काही संबंध माझ्याशी आणि सुरभी ताईशी काही हरकत नाही, ती किती रडली तरी तुम्ही तिला माफ केल नाही, तिला घराबाहेर काढल, काही हरकत नाही, आम्ही परत तुमच्या आयुष्यात येणार नाही, मी सांभाळेल माझ्या बहिणीला, काव्याला द्या इकडे मी जातो इथून, या पुढे काव्याला परत तुमच्या कडे मी पाठवणार नाही ",.. शशी.

" हे बघ शशी ते लग्न मोडल आहे ",.. सोहम.

" माझ्या बाजूने हे लग्न मोडलेलं नाही, मला काव्या हवी आहे आणि यावेळी मी कोणाचं ऐकणार नाही",.. तो रघु कडे बघून बोलत होता,

तेवढ्यात बाहेरून शशीचे दोन-तीन मित्र आले, एकाकडे बंदूक होती त्याने ती बंदूक काव्यावर धरली,

"बापरे काय आहे हे शशी, थांबव हे",.. सोहम.

" रघु इकडे ये",.. त्यांनी रघुला खुर्चीला बांधून ठेवलं,

शशी जागेवरनं उठला , काव्या एकदम सोहम जवळ जाऊन उभी राहिली, सोहमने तिला जवळ घेतलं, शशीने पुढे येऊन काव्याचा हात धरला, चल काव्या ..

"दादा, अभिजित कुठे आहे, मी जाणार नाही",.. काव्या.

" शांततेत घे शशी काय प्रकार आहे हा",.. सोहम.

"काव्या ऐकु आल ना, चल लवकर, मी तुम्हा कोणाला काही त्रास देणार नाही, काव्या विश्वास ठेव तुलाही काही त्रास देणार नाही फक्त लग्न कर माझ्याशी, त्या दिवशी चुकी झाली माझ्याकडून, तुला उगीच मारलं मी, यापुढे असं करणार नाही, मला फक्त तू हवी आहे, ये इकडे आपण निघू",.. शशी.

काव्या नाही म्हटली, ती सोहम रघुकडे बघत होती.

"चांगलं सांगून समजत नसेल तर मग मारामारी झाली तर माझा काही दोष नाही काव्या, उगीच लागून जाईल तुला",.. शशी.
.......

अभिजीत आदेश फार्म हाऊस वर आले, आदेशचे लोक सुद्धा दुसऱ्या गाडीतुन येत होते,.. "अरे काय गडबड आहे ही? इथे एवढ्या गाड्या का आहेत? कोण आहेत हे लोक",

सिक्युरिटी गार्ड पळत आला,.." माहिती नाही साहेब कुणीतरी बदमाश मुल आत शिरले आणि बाकीच्या लोकांना धरून ठेवल, मला पण थोड मारल",

"अरे बापरे तो गुंड आला वाटतं आदेश, कुठे आहेत आपले मुलं",.. अभिजीत.

" आलेच ते पाच मिनिटात येतील ",.. आदेश.

" ते आल्यावर आपण आत मध्ये जाऊ उगीच आपल्याला कोणी मारलं तर",.. अभिजीत.

" घाबरतो काय दादा, मी करू शकतो फाइटिंग ",.. आदेश.

" नको आपल्या दोघांच आत्ताच लग्न ठरल आहे",.. त्याला काव्याची आठवण आली, त्याने श्रद्धाला फोन लावला,.." आली का काव्या केंद्रात",

" नाही सर",.. अभिजीतला टेन्शन आलं होतं, कुठे गेली ही पोरगी काय माहिती, इथला हा गोंधळ लवकर मिटायला पाहिजे,

" दादा तू पोलिसांना फोन कर ना",.. आदेश.

" हो बरोबर आहे ",.. अभिजीतने फोन लावला, पोलीस सुद्धा पाच मिनिटात येत होते,

पाच मिनिटात आदेशच्या पक्षातले कार्यकर्ते आले, पोलीसही रस्त्यात होते, लोक खूप जास्त तयार झाले होते, सगळे आत गेले, जोरात मारामारी सुरू झाली, आदेश बाहेर उभा होता,

अभिजीत तोपर्यंत आत मध्ये गेला, आत मध्ये सुद्धा भांडण सुरू होतं तो उंच मुलगा आत मध्ये होता जो रोज मागे येत होता , त्याला खुर्चीला बांधलेल होता , तो एका मुला सोबत भांडत होता, त्याला बघून अभिजीतला आश्चर्य वाटलं,

सोहम सोफ्याजवळ उभा होता त्याच्या एकदम जवळ काव्या उभी होती, सोहमचा एक हात काव्याच्या खांद्यावर होता, काव्या त्याला चिटकून उभी होती, घाबरलेली होती ती, काव्याचा हात एका मुलाने धरून ठेवलेला होता आणि तो मुलगा सोहम सोबत भांडत होता,

" काव्या तू इथे काय करते आहेस , सांगून येता येत नाही का तुला, मी श्रद्धाला विचारल तुझ्या बद्दल, मला तुझी किती काळजी वाटली माहिती आहे का, काय चाललं आहे इथे? ",.. अभिजीत.

सोहम अभिजीत कडे बघत होता,.. "काव्या माझी बहीण आहे",..

"हा कोण आहे?",.. अभिजीत रघुकडे बघत होता,

" तो काव्याचा बॉडीगार्ड आहे रघु ",.. सोहम.

" आणि याचा काय प्रॉब्लेम आहे",.. अभिजीत.

" तो शशी आहे",.. सोहम.

आदेशचे दोन-तीन मित्र एकदम आत शिरले, त्यांनी तिथल्या गुंडांना धरून ठेवलं, त्यांच्या कडची गन काढून घेतली ,

"तू काव्याचा हात सोड आधी शशी, तिला हात लावला तर बघ",.. अभिजीत जोरात ओरडला, तो पुढे गेला त्याने शशीला ठकलंल, तरी शशीने काव्याचा हात सोडला नाही, शशी सोबत काव्या पडणार होती, अभिजीतने तिला मागच्या मागे धरलं,

आता अभिजीत जवळ होती काव्या, त्याने शशीच्या हातावर जोरात फटका मारला, शशीने काव्याचा हात सोडला, अभिजीत काव्याला घेवून पटकन एका बाजूला सरकला, शशीने उठून परत चाल केली, अभिजीत आडवा झाला, त्याच्या पाठीवर थोडा फटका बसला, आता काव्या अभिजीतच्या मिठीत होती, तो तिला छान सांभाळत होता, काव्या थोडी लाजली, आजुबाजूला बरेच मुल होते, त्या परिस्थितीत अभिजीत खुश होता, तो काव्या कडे बघत होता, घाबरू नकोस काव्या मी आलो आहे आता, काहीही होणार नाही तुला. आपण या मुलाला पळवून लावु, काव्या खुश होती, सोहम सगळं बघत होता, अभिजित काव्या सोबत आहेत का? दोघ छान दिसतात सोबत,

मुलांनी रघुला सोडलं रघु पळत आला, त्याने शशीला धरून ठेवलं,

" जा पटकन पोलीस इन्स्पेक्टरला आले का बघा मुलांनो",.. अभिजीत.

एक मुलगा बाहेर गेला,

"काव्या हा शशी तोच मुलगा आहे का तो ज्याने तुला मारलं होतं",.. अभिजीत.

"हो अभिजीत",.. काव्या.

अभिजीत पुढे झाला त्याने साटकन शशीला थोबाडीत मारलं,.. "लाज वाटते का तुला अश्या साध्या मुलीवर हात उचलायला, किती लागल होत हिला त्या दिवशी , काही करता काही झाल असत तर काय केल असत, तुला माहिती का सोहम त्या दिवशी काव्या आत्महत्या करणार होती, नदीच्या पुलावर चढली होती ती, कसतरी मी तिला माझ्या सोबत नेल" ,

सोहम काव्या जवळ आला, तिला जवळ घेतल,

अभिजीतने अजून एक फटका शशीला मारला, खूप सटकन आवाज आला,..." तुझ्या अंगात धमक आहे तर माझ्याबरोबर मारामारी कर, त्याने दोन-तीन फटके शशीला मारले, काव्याचा ओठ फुटला होता, तीन-चार दिवस गाल सुजलेला होता, काय दोष होता तिचा, तुला एवढी मर्दानगी गाजवायची आहे ना, मला अडवून दाखव" ,

त्याने शशीला कॉलर वर धरून पकडलं, काव्या इकडे याच्या एक थोबाडीत मार

"नको अभिजीत",.. काव्या.

"आटप लवकर काव्या",.. अभिजीत.

काव्या सोहम कडे बघत होती सोहमने तिला जा असा इशारा केला, काव्यापुढे आली तिने शशीला एक थोबाडीत लावली.

आता शशी चिडला होता,.. "काव्या माझ्या सोबत चल, या लोकांचा ऐकू नको, तुझ्या दादाला मी सोडणार नाही" ,

शशीने गन बाहेर काढली, त्यांने ती सोहम वर धरली, पटकन काव्याला इकडे द्या, रघु अभिजीत काव्या बघतच बसले,

"मी काहीही करू शकतो यावेळी मी मागेपुढे बघणार नाही, काव्या इकडे ये",.. शशी.

अभिजीत तिला सोडत नव्हता.

" अभिजीत प्लीज मला जाऊ द्या, दादाला काही व्हायला नको" ,.. काव्या रघु कडे बघत होती, जशी काव्या अभिजीत कडनं निघाली, शशी शांत झाला, ती त्याच्याजवळ आली होती, रघुने खुर्ची शशीच्या पायाजवळ फेकली, खुर्ची लागून तो थोडा पडला, पटकन रघुने पळत जाऊन गन धरली.

" एवढ्या थराला गेला आहे शशी तू, आता तू बंदूक घेऊन फिरतो का, पण मी तुला सांगतो काहीही उपयोग होणार नाही, काव्या तुला मिळणार नाही तुला पोलिसात देतो मी",.. सोहम.

"काव्या आत मध्ये जा, दार लावून घे, अभिजीत प्लीज हिला आत घेवून जा, लवकर",.. सोहम.

अभिजीत काव्या आत गेले, काव्या अभिजीत कडे बघत होती , अभिजितने पुढे होवुन तिला मिठीत घेतल, काव्याला खूप बर वाटत होत, थँक्यू अभिजीत तुम्ही आले वेळेवर ,.." काव्या घाबरू नकोस, मी आहे ",

" मला नाही जायच शशी सोबत मला तुमच्या सोबत रहायचा आहे अभिजीत ",... काव्या.

"परत बोल काव्या, मला फायनली होकार दिला तू, करणार ना लगेच लग्न, कन्फ्युजन दूर झाल का ",.. अभिजीत.

काव्या लाजली,

"बोल ना, करायच का लग्न एक दोन दिवसात, तो शशी नको मला आपल्या मधे यायला ",.. अभिजीत.

हो...

" मी तुला काही होवू देणार नाही काव्या , आणि इथून जावू देणार नाही आता ",... अभिजीत.

काव्या आता रिलॅक्स होती.

" मी बाहेर जातो बघतो काय होतय ते बाहेर, पोलिस आले की नाही ते बघतो ",.. अभिजीत.

"नका जावू अभिजीत तो शशी आहे बाहेर ",.. काव्या.

" काळजी करू नकोस काव्या , सोड मला पाच मिनिट दे, सोहम एकटा आहे ",.. अभिजीत.

" सॉरी",.. काव्या बाजूला झाली, अभिजित बाहेर आला, सोहम होता उभा बाहेर,

" कुठे गेले बाकीचे काय झालं, आले का पोलिस ",.. अभिजीत.

शशी पळून गेला, रघु त्याच्या मागे गेला, बाहेर गाडीचा आवाज येत होता, शशीचे लोक सुद्धा निघून गेले, आदेश पोलीस इन्स्पेक्टर सोबत आत येत होता, कुठे गेला तो बदमाश शशी,

"पळून गेला",.. रघु आत मध्ये आला.

" गेले का ते लोक ",.. अभिजीत.

" हो काहीना पोलिसानी पकडल काही पळाले",.. आदेश.

"शशी कसा पळाला पण" ,.. अभिजीत.

"रघुला ढकलून पळाला तो, सापडेल कुठे जातो तो",.. सोहम.

"आपल्याला धोका आहे ना पण गन आहे त्याच्या कडे",.. अभिजीत.

हो ना

" धमकी देऊन गेली आहे ते सोडणार नाहीत आपल्याला",..रघु.

सोहम डोक्याला हात लावून बसला होता,.. "कठीण गोष्ट झाली आहे इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला प्रोटेक्शन हव आहे इथे",..

"तुम्ही म्हणाल तेवढे लोक पाठवतो",.. इंस्पेक्टर.

" आम्हाला जावं लागेल इथून घरी, बाबा वाट बघत आहेत काव्याची ",.. सोहम बोलला.

" नाही साहेब इथून बाहेर पडलं तर धोका आहे, या रस्त्यावरून आपल्या गावाला जातांना प्रत्येक ठिकाणी शशीचे माणसं असतील, आपण निघालो तर त्याला रिपोर्ट मिळेल, तो रस्त्यात अडवेल आपल्याला, आता बघितलं ना त्याच्याकडे बंदूक आहे म्हणजे यावेळी तो काहीही करू शकतो",.. रघु.

"मग आता काय करणार किती दिवस इथे राहणार",.. सोहम.

" काय प्रॉब्लेम आहे सोहम, शशीला अटक झाल्या शिवाय मी तुला इथून जावु देणार नाही ",.. अभिजीत.

सोहम आत गेला, काव्या आत बसली होती,.." काय झालं दादा पोलिसानी पकडले का शशीला",

" नाही तो पळून गेला",.. सोहम.

" असा कसा पळून गेला ",.. काव्या.

" त्याने रघुला ढकललं आणि पळून गेला, आपल्याला धोका आहे, तू बाहेर येऊन बसते का आमच्यात ",.. सोहम.

हो... दोघ बाहेर आले

आदेश अभिजीत रघु बाहेर उभे होते, इन्स्पेक्टर साहेब फोनवर सूचना देत होते

" सोहमची बहिण आहे काव्या आदेश, तिच्याशी त्या शशी ला लग्न करायच होत त्याच्या मुळे काव्या या गावात पळून आली",.. अभिजीत.

"काय? पण वहिनी अनाथ होती ना",.. आदेश.

"नाही, शशीपासून धोका होता म्हणून ती काही सांगत नव्हती",.. अभिजीत.

"हा कोण",.. आदेश.

"काव्याचा बॉडी गार्ड रघु",.. अभिजीत.

" बापरे भारी काम आहे वहिनीच, हाच का तो तुला वाटल होत विलन ",.. आदेश.

हो... ते तिघं हसत होते

" तू जेव्हा बाहेर मारामाऱ्या करत होता तेव्हा आत मध्ये खूप ड्रामा झाला, त्या शशी ला मारल मी ",.. अभिजीत.

" वाह दादा फूल ऑन, कुठे आहे वहिनी",.. सोहम.

" आत मध्ये ",.. अभिजीत.

सोहम काव्या बाहेर येवून बसले , अभिजीत आदेश काव्या कडे बघत होते, आदेश काव्या जवळ जावून बसला,.." वहिनी भारी काम आहे तुझ, आपण दोघ एका डिपार्टमेंट मधे आहोत लक्ष्यात ठेव, मला मदत करणार का? थोडे पैसे लागले तर देणार ना, बॉडी गार्ड आहे तुला वाह वाह ",

काव्या खूप हसत होती,

इन्स्पेक्टर साहेब आत मध्ये आले,.." हे बघा फार्म हाऊसला सगळ्या बाजूने पोलिसांनी घेरल आहे, आता काही धोका नाही इथे, शशी बाबत तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, आम्ही बघतो त्याच्याकडे",

"इतके दिवस उगीच सोडलं त्याला, आता मला रिस्क घ्यायची नाही",.. सोहम.

"थोडे दिवस थांबव लागेल तुम्हाला इथे",.. अभिजीत काव्या कडे बघत होता.

"आम्ही असं किती दिवस राहणार आहोत अभिजीत इथे",.. सोहम.

आदेश अभिजीत काव्या कडे बघत होता.

अभिजीत उठून सोहम जवळ गेला,.." इथून जायचं नाही आता तुम्ही लोकांनी, काव्याला धोका आहे आणि मला कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही, मी आणि काव्या आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे, हे लग्न होवू दे आता सोहम, काव्याला मी कुठे जावू देणार नाही, माझ्या घरी रहा हव तर" ,

सोहम काव्याकडे बघत होता, तिने मानेने हो सांगितलं,

" हो दादा मला रहायच आहे अभिजीत सोबत, यांच्यामुळेच मला जॉब आणि राहायला जागा मिळाली, खूप सपोर्ट केला त्यांनी ",.. काव्या.

" पण तू तर म्हणतो आहे ना तुझं लग्न जमलं आहे, मग आता",.. सोहम.

" हो ते काव्यासोबतच जमलं होतं",.. अभिजीत.

आता सगळे हसत होते,

"चला छान झाल, मला काव्याची खूप चिंता होती मला वाटत होतं तेच झालं, मी आज दुपारीच अभिजीतला विचारलं होतं की माझ्या बहिणीशी लग्न करशील का",.. सोहम.

आता काव्या लाजली होती.

श्रद्धाचा फोन आला अभिजीतच्या फोनवर,.. "सर अजून काव्या आली नाही, काकू सुद्धा काळजीत आहेत, तुम्ही येता का इकडे, आपल्याला पोलिसात जावं लागेल",

"श्रद्धा एक मिनिट काव्या आहे इकडे माझ्यासोबत, काही काळजी करू नका, तू काकूंना फोन दे" ,.. श्रद्धाने काकूंना फोन दिला,.. "काव्या सुखरूप आहे इथे माझ्यासोबत आहे",

" हा काय प्रकार आहे पण अभिजीत साहेब, तुम्हाला दोघांना सोबत राहायचं तर तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं आधी, इथे आम्ही काळजी करत बसलो, असे केंद्राचे नियम मोडता येणार नाही ",.. काकू.

"काकू इथे अडचण आलेली आहे खूप, मी सांगतो तुम्हाला तिकडे येऊन उद्या, काव्यात ठीक आहे आता",.. अभिजीत.

" काव्याला इथे यायचं की नाही केंद्रात आज ",.. काकू.

" सध्या तरी मी काही सांगू शकत नाही, तुम्ही काळजी करू नका, काव्याशी बोला",.. अभिजीत.

हे घे काव्या काकूंचा फोन आहे.

सोहम बघत होता दोघ छान बोलत आहेत एकमेकांशी, काव्या फोन घेऊन बाजूला गेली,..

"जास्त बाहेर जाऊ नको काव्या",.. अभिजीतने सांगितलं.

" नाही जात मी कुठे इथेच आहे",.. काव्या.

" कुठे आहेस तू काव्या? काय आहे हे",.. काकू.

"काकू खूप मोठं संकट आलं होतं, माझा भाऊ आला आहे मला घ्यायला",.. काव्या.

"तुझा भाऊ",.. काकू.

"हो मी अनाथ नाही पण मोठ्या संकटात होती त्यामुळे मी माझं सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं",.. काव्या.

"मग आता तू घरी जाणार आहे का तुझ्या",.. काकू.

" माहिती नाही",.. काव्या.

" जाण्याआधी तुला केंद्रात येऊन फॉर्म भरावा लागेल",.. काकू.

" ठीक आहे काकू जर जमलं तर येईल मी तुम्हाला सांगेन काय काय झाल, आज तरी मी येवू शकत नाही माझ्या घरचे आहेत सोबत, श्रद्धा कुठे आहे",.. काव्या.

त्यांनी श्रद्धा जवळ फोन दिला

" कुठे आहे तू काव्या काय झालं आहे",.. श्रद्धा.

" माझा भाऊ आला आहे घ्यायला श्रद्धा ",.. काव्या.

" तो उंच मुलगा तुझा भाऊ आहे का ",.. श्रद्धा.

" नाही तो माझा बॉडीगार्ड आहे म्हणजे तसा भाऊच आहे, तू खूप चौकशी करते त्याची, काय झालं आहे श्रद्धा ",.. काव्या हसत होती.

श्रद्धा गडबडली,.." नाही म्हणजे तू कुठे आहे या साठी विचारात होती ",

" येवू आम्ही दोघ तुला भेटायला ",.. काव्या.

कोण?

" मी आणि रघु, सोहम दादा माझा भाऊ आहे",.. काव्या.

" काय झालं होतं? तू इतके दिवस ही माहिती का लपवून ठेवली",.. श्रद्धा.

" मी मोठ्या संकटात होती श्रद्धा, आता अजून संकट टळल नाही",.. काव्या.

"तू अभिजीत साहेबांसोबत आहे का, कुठे भेटले ते ",.. श्रद्धा.

" हो माझ्या दादा आणि अभिजीत मित्र आहेत",.. काव्या.

"भारी झालं मग हे तर सांगितलं का मग दादाला",.. श्रद्धा.

"हो, त्याला काही प्रोब्लेम नाही, जमलं तर भेटायला ये श्रद्धा",.. काव्या.

हो

दोघी बराच वेळ बोलत होत्या.

काव्या आत आली, काकांनी सगळ्यांसाठी चहा आणला होता, काव्या जाऊन सोहम जवळ बसली,

" अभिजीत काव्या आता काय प्लॅन आहे",.. दोघं लाजले,

" मला असं वाटतं लवकरात लवकर लग्न करून घे दादा आता परत तुमच्या स्टोरीत विलन नको यायला",.. आदेश.

"बरोबर आहे मलाही हेच वाटत आहे",.. सोहम आदेश कडे बघत होता, दोघं हसत होते.

" मी अजून घरी सांगितलं नाही घरी सांगावं लागेल सगळ्यांना, त्यांना काहीच माहिती नाही काव्या बाबतीत",...अभिजीत.

" हो फार टेन्शनचं काम आहे ते ",..आदेशला आता अनुभव होता त्यामुळे तो सहज बोलला.

"तू म्हणशील तर मी येऊ का तुझ्यासोबत अभिजीत मी बोलतो प्रताप सरांशी ",..सोहम.

"हो मी सांगतो",..अभिजीत.

" काय मग काव्या ठरवायचं ना लग्न अभिजीत सोबत",.. सोहम.

सगळे काव्या कडे बघत होते, ती लाजली, दादा आत मधे थोडा आराम करते मी, ती पटकन आत निघून गेली. अभिजीत गालातल्या गालात हसत होता.
.........

पुढचे भाग लिहून झाले नाही, एक दोन दिवस भाग येणार नाही. घरी प्रोग्राम आहे.

🎭 Series Post

View all