तुझी साथ हवी मला... भाग 32

मॅडम बरोबर बोलत आहेत साहेब, रस्त्यात काही पण होऊ शकत, धोका आहे, पूर्ण वाटेत लोक असतिल शशीचे


तुझी साथ हवी मला... भाग 32

©️®️शिल्पा सुतार
.........

सोहम ऑफिस मध्ये आला, त्याने शरदला फोन लावला,.. "शरद एक मदत हवी होती, माझ्या मागे आहेत का शशीची माणसं",.

"हो साहेब शशीची माणसं लक्ष देऊन आहेत तुमच्यावर, तुम्ही आता ऑफिसमध्ये आले आहात, माहिती आहे सगळ्यांना",.. शरद

" अरे बापरे आता काय करावे, ठीक आहे बघतो मी",.. सोहम.

दहा वाजत आले होते आता निघावच लागेल, अकरापर्यंत जायचं आहे अभिजीत कडे,

अभिजीतही कामात बिझी होता, आज काहीही करून काव्याला भेटायचं, काल ती काहीतरी सांगत होती संध्याकाळी, ऑफिस सुटल की लगेच भेटू, नाहीतर मग तिला केंद्रात जायला उशीर होतो, त्या काकू रागवतात, काल काव्या जरा घाबरलीस होती काकूंना, काव्याला टेन्शन येईल असं काहीच नको करायला.

सोहम एका साध्याच गाडीत बसून निघाला, त्याची कार फॅक्टरीमध्येच होती, बाकीचे लोक कार कडे लक्ष देऊन होते त्यामुळे बर होतं, थोडं पुढे आल्यानंतर त्याने सुरेश रावांना फोन केला, त्यांनी पोलीस प्रोटेक्शन अरेंज केला,

शशीच्या लोकांनी शशीला फोन केला,.. "बहुतेक सोहम साहेब दुसऱ्या गाडीत बसून निघून गेले, ऑफिस मधे कोणी नाही कारण" ,

" कुठे गेले ते पिछा करा",.. शशी.

"हो दोन जण गेले आहेत मागे",..

"ठीक आहे ते कुठे पोहोचले ते सांगा मी लगेच निघतो",..शशी.

"हो शशी तू काळजी घे सकाळ पासून इंस्पेक्टर तुला शोधत आहेत ",..

"हो ना या लोकांना मला अरेस्ट करायच असेल ",.. शशी.
........

सोहम अभिजीतच्या फॅक्टरीत आला, आत मध्ये भेटायला येऊ का म्हणून विचारलं,

अभिजीत स्वतः पटकन बाहेर आला,.." ये सोहम असं येऊ का म्हणून का विचारतो, आज तुझी गाडी कुठे आहे, ही कोणती गाडी घेऊन फिरतो आहेस तू ",

"काही विचारू नको बाबा, फार प्रॉब्लेम आहे मला, लपत छपत फिरतो आहे मी",.. सोहम.

"काय झालं?",.. अभिजीत.

"त्या विषयावर बोलण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे तुझ्या मदतीची गरज आहे",.. सोहम बघत होता बरीच मोठी फॅक्टरी आहे खूप शॉप होते, कुठे असेल काव्या, कधी भेटू तिला असं झालं होतं,

त्याला रघुचा फोन आला,.." मी इथे आलो आहे अभिजीत साहेबांच्या फॅक्टरी जवळ",

"भेटतो तुला अर्धा तास दे जरा, नाहीतर तू येतो का आत मध्ये ",.. सोहम.

रघु नाही म्हटला त्याला माहिती होतं अभिजीत त्याला ओळखतो, उगाच गडबड होईल,

शशीच्या टीमने शशीला फोन केला,.. "सोहम साहेब अभिजीत साहेबांच्या फॅक्टरीत आलेले आहेत",

" तो रघु आहे का सोबत",.. शशी.

" असेल बहुतेक, पण तो सकाळपासून पुढच्या दाराने बाहेर निघाला नाही, मागून बाहेर पडला असेल ",.. मनोज.

"सगळे तिथेच आहे रघु तिथे सोहम जिजाजी तिथे म्हणजे नक्कीच ते सगळे काव्याला भेटणार असतील, मी येतो तिकडे",... शशीने दोन-तीन फोन फिरवले आपल्याला घाई करावी लागेल, चला लगेच.
.........

सोहम अभिजीत आत येऊन बसले, अभिजीतने दोघांसाठी चहा सांगितला, बोल काय झालं आहे.

अभिजीत त्याला सगळं सांगत होता शशी बद्दल,.." माझ्या बहिणीला खूप त्रास दिला त्या शशीने, कशीतरी ती त्याच्या ताब्यातन सुटली",

"का करतो पण तो अस",.. अभिजीत.

"पैशासाठी माझ्या बहिणीच्या नावावर जी इस्टेट आहे ती त्याला हवी आहे, या भाऊ बहिणींनी खूप त्रास दिला आहे आम्हाला" ,.. सोहम.

"तुझं लग्न?",.. अभिजीत.

"सद्या घटस्फोटाची नोटीस दिली आहे मी सुरभीला ,बघु काय म्हणते ती, ती थोडी बरी आहे शशी पेक्षा",.. सोहम.

"किती त्रास झाला हा, भयानक आहे हे सगळं, एवढी पळापळ झाली तू मला सांगायला पाहिजे होतं सोहम, मी काहीतरी मदत केली असती, कुठे आहे आता तुझी बहीण",.. अभिजीत.

"इथेच आहे, तिला आता परत धोका आहे, मी तिला घ्यायला आलो आहे, माझी अजून एक रिक्वेस्ट होती म्हणजे बघ मी नुसतं बोलतो आहे तुला जर पटलं तर हो म्हण, जरी तू नाही म्हटलं तरी आपल्या मैत्रीत फरक पडणार नाही ",.. सोहम.

" अरे काय पण सांग तरी",.. अभिजीत.

" माझी अशी इच्छा आहे की तुझ काही ठरलं नसेल तर तू माझ्या बहिणीशी लग्न करतोस का? ",.. सोहमने असं म्हटल्यानंतर अभिजीत गप्प बसला, आधी जर सोहमने असं म्हटलं असत तर एका सेकंदात अभिजीतने होकार दिला असता, एवढी श्रीमंत मुलगी, सोहमची बहीण, कोण नाही म्हणेल, पण आता ते शक्य नाही, काव्या साठी मी काहीही करू शकतो, मला काव्यासोबतच राहायचं आहे, काय सांगू आता याला, माझं ठरलं आहे आधीच असं सांगू का, काय यार.

सोहमला समजल याचा नकार आहे,.. "अभिजीत तू काही काळजी करू नकोस माझी काही जबरदस्ती नाही, मी माझ्या बहिणीला घेऊन जातो आहे इथून, जर मला काही तुझ्या मदतीची गरज लागली तर प्लीज मी फोन केल्यावर लगेच ये",

" अरे म्हणजे काय? मारामारी करायची आहे का? आदेश ला सांगावं लागेल, त्याच्याकडे खूप मुलांची टीम आहे, त्याचे कार्यकर्ते आणि इथल्या पोलीस स्टेशनला ही सांगावे लागेल",.. अभिजीत.

" हो मदत कर प्लीज ",.. सोहम.

"तुला राग नाही आला ना सोहम ",.. अभिजीत.

" नाही अभिजीत, तुझं जमलं आहे का लग्न ",.. सोहम.

" हो माझं लग्न जमलं आहे आत्ता एवढ्यातच काल ",.. अभिजीत.

" ठीक आहे तुझं खूप अभिनंदन, चांगली अॅप्रचुनीटी गेली माझी, तुझ्या बघण्यात एखादा चांगला मुलगा असेल तर सांग माझ्या बहिणी साठी",... सोहम.

नक्की.

अभिजीतला कसतरी वाटत होत, कधी नव्हे ते सोहम मदत मागतो आहे, खूप त्रासात आहे तो, जावू दे, त्याने इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला, मदत हवी होती थोडी प्रोटेक्शन हव होत.

" आता आम्ही बिझी आहोत संध्याकाळच्या सुमारास मदत होऊ शकते ",.. इंस्पेक्टर.

ठीक आहे

" सोहम इथले पोलीस संध्याकाळी मदत करतील आता नाही तरी ऑफिस सुरू आहे तू एक काम कर माझ्या सोबत चल, फार्म हाऊसवर बस जरा वेळ, तुझी बहीण आली की त्या नंतर रात्री तुला घरी सोडतो आम्ही घरी फूल प्रोटेक्शन मधे ",.. अभिजीत.

ठीक आहे,

" एक मिनिटात आलो मी",.. अभिजीत बाहेर निघुन गेला.

सोहमने रघुला फोन लावला,.. "काव्या ऑफिस मधून आली की निघू, ते पोलिस संध्याकाळी मदत करणार आहेत ",

" ठीक आहे साहेब ",.. रघु.

" मी अभिजीत सोबत फार्म हाऊस वर जातो, तू येतोस का",.. सोहम.

"नाही मी इथेच थांबतो काव्या मॅडम आहेत इथे लागेल गरज",.. रघु.

ठीक आहे
......

अभिजीतने बाहेर येवून आदेशाला फोन केला,

" दादा झाल नाही काम अजून करतो आहे मी, अर्धा तास दे",.. आदेश.

"ते राहू दे ऐक जरा, माझा मित्र आला आहे त्याला आपली हेल्प हवी आहे, तुझ्याकडे आहेत ना फायटिंग करणारे मुलं, ते लागतील ",.. अभिजीत.

बापरे या साध्या दादाला चक्क फाईटींग करायची आहे,.. "काय झालं आहे दादा काही सिरियस ",

" अरे त्या सोहमच्या मागे कोणी गुंड लागला आहे, त्या पासुन संरक्षण हवं आहे, सोहम आणि त्याच्या बहिणीला घरी वापस जायचं आहे",.. अभिजीत.

"इथे आहे का त्याची बहीण",.. आदेश.

" हो म्हणतो आहे तो तसं",.. अभिजीत.

" ठीक आहे मी सांगतो मुलांना रेडी रहायला",.. आदेश.

"तसं काही होणार नाही पण उगीचच धाक दाखवायला थोडे मुले लागतील",.. अभिजीत.

" कुठे या म्हणून सांगू संध्याकाळी त्या मुलांना ",.. आदेश.

" फार्म हाऊस वर आपल्या",.. अभिजीत.

"ठीक आहे ",.. आदेश.

" मी माझ्या मित्रासोबत आहे तर ऑफिसमध्ये काही लागलं तर बघ",.. अभिजीत.

" ठीक आहे माझं लक्ष आहे सगळीकडे",.. आदेशला हसू आलं.

अभिजीतही हसत होता,.." बरोबर आहे लक्ष ठेव काव्याकडे ",. त्याने फोन ठेवला.
.......

ऑफिसमध्ये काम व्यवस्थित सुरू होतं काव्याला माहितीच नव्हतं की सोहम दादा बाहेर आलेला आहे, ऑफिस सुटल,
तिला समोर रघु दिसला पार्किंग मधे , हा काय करतो आहे इथे, श्रद्धा आलेली नव्हती,.. "रघु काय करतोस तू इथे",

" सोहम साहेब आले आहेत तुम्हाला घ्यायला, चला मॅडम माझ्या सोबत, डोक्यावरून ओढणी घ्या, शशीचे लोक मागे आहेत आपल्या ",.. रघु.

" इथून कुठे जायचं? ",.. काव्या.

"घरी जायच",.. रघु.

"रघु अभिजीतला काही सांगितल नाही मी, मला नाही जायच कुठे, इथे रहायच आहे, तिकडे घरी मला भीती वाटते, शशी येईल तिकडे, दादा कुठे आहे",.. काव्या.

" मॅडम सोहम साहेब वाट बघत आहेत, आटपा आता इथून चला लवकर",.. रघु.

श्रद्धा आली तेवढ्यात, रघु तिच्या कडे बघत होता ,कोण आहे हा मुलगा, एवढ्यात दोन तीनदा दिसला, हा माझ्या कडे का नेहमी बघत असतो ,.. "काव्या चल निघू या आपण ",

" मी जाते आहे श्रद्धा रघु सोबत ",.. काव्या.

" कुठे पण? ",... श्रद्धा.

"सांगते नंतर श्रद्धा ",.. काव्या बघत होती रघु अजूनही श्रद्धा कडे बघत होता, चांगल होईल श्रद्धाच रघु सोबत, यांची जोडी जमली तर बर होईल, सॅलरी वगैरे भरपूर आहे याला, हा पण एकटा आहे, काव्या हसत होती श्रद्धा हा रघु आहे रघु माझी मैत्रीण श्रद्धा.

रघुने हात पुढे केला,..हाय,

काय हे.. श्रद्धाने हात मिळवला, काव्या बघत होती श्रद्धा थोडी घाबरली का?, रघु खूप इंटरेस्ट घेतो आहे हिच्यात,

काव्या येवून पटकन श्रद्धा ला भेटली,.. "निघते मी श्रद्धा फोन करेन तुला नंतर, सांगेन मी तुला सगळं, फक्त माझ्यावर विश्वास ठेव, तू काकूंना सांग की मी त्यांना करीन फोन, तुझा फोन नंबर दे ना पटकन",..

" काय आहे हे काव्या, काही प्रॉब्लेम आहे का",.. श्रद्धा.

" श्रद्धा मी आता काही सांगू शकत नाही मला उशीर होतोय तुझा पटकन फोन नंबर दे मी फोन करेन काकूंना आणि तुला",.. काव्या.

श्रद्धा ने तिचा फोन नंबर लिहून दिला, रघुने पटकन सेव केला तिचा नंबर, काव्या डोक्यावरनं ओढणी घेऊन रघु सोबत निघून गेली, बाहेर कार होती त्यामध्ये ते दोघं बसले,

"कुठे आहे दादा, काही प्रॉब्लेम झाला आहे का",..काव्या.

" हो म्हणजे इतकी चिंता सारखी गोष्ट नाही पण तुम्ही कुठे आहात हे शशीला समजलं आहे ",..रघु.

" बापरे काही खरं नाही ",..काव्या.

"यावेळी काळजी करू नका तुम्ही मॅडम तुम्हाला काही होऊ देणार नाही मी",..रघु.

" कुठे जातो आहोत आपण ",..काव्या.

"अभिजीत साहेबांच्या फार्म हाऊस वर",.. रघु काव्याकडे बघत होता, दोघं हसत होते.

" दादा आणि अभिजीत ओळखतात का एकमेकांना",.. काव्या.

" हो ते मित्र आहेत आपल्या घरी आले होते अभिजीत सर तेव्हा नाही भेटल्या का तुम्ही त्यांना",.. रघु.

कधी,

" मोठ्या सरांचा एनिवर्सरीला" ,.. रघु.

"नाही झाली भेट", ..चला बर आहे दादा ओळखतो अभिजीतला,

" मॅडम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्ही तुमच्याबद्दल आणि अभिजीत सरांबद्दल साहेबांना सांगून द्या",.. रघु.

"ठीक आहे",.. काव्या.

"तुम्हाला राहायचं आहे ना त्यांच्यासोबत",.. रघु.

"हो रघु",.. काव्या.

"चांगले आहेत ते साहेब",.. रघु.

"हो बहुतेक आज रात्री येतील अभिजीत तिकडे मग मी बोलून घेईल दादाशी",.. काव्या.

दादाला कधी भेटू असं झालं आहे
.........

श्रद्धा पार्किंग मधुन तिची स्कूटर काढत होती, अभिजीत आला.." काव्या कुठे आहे श्रद्धा? ",

" काव्या गेली बाहेर कुठे तरी, घाईत होती ती",.. श्रद्धा.

" कुठे गेली ती ",.. अभिजीत.

" एक मुलगा आला होता त्याच्यासोबत, रघु नाव होत त्याच ",.. श्रद्धा.

" कोण रघु? तुला माहिती आहे का",.. अभिजीत.

"नाही कधी दिसला नाही तो मुलगा काव्या सोबत बोलतांना",.. श्रद्धा.

"उंच होता का",.. अभिजीत.

हो

" स्ट्रॉंग बॉडी",.. अभिजीत.

हो

हिरो सारखा

हो

"ओह माय गॉड हा तोच मुलगा आहे जो आमच्या मागे येत होता, काय करू आता मी काव्या संकटात आहे ",.. अभिजीत विचार करत होता.

" काहीच बोलली नाही का ती ",.. अभिजीत.

" माझा फोन नंबर घेतला बोलली की नंतर मी फोन करते तुला आणि काकूंना",.. श्रद्धा.

" माझं काय? माझ्या बाबतीत काय म्हटली काव्या?",.. अभिजीत.

" काहीच नाही सर",.. श्रद्धा.

काय प्रॉब्लेम आहे या काव्याचा काही समजत नाही, आता भेटली ना तर जाऊ देणार नाही मी तिला,

" एक काम कर श्रद्धा.. काव्या महिला आधार केंद्रात आली तर मला लगेच फोन कर, पाच मिनिट सुद्धा इकडे तिकडे बघू नको, मी येतो लगेच तिकडे",... अभिजीत.

हो सर.

काय चाललं आहे हीच काय माहिती, आज मी तिला सगळं विचारणार आहे, घरी घेऊन जाणार आहे तिला, रहा म्हणा आमच्या घरी, जेव्हा करायचं तेव्हा कर लग्न, पण हे आता असं टेन्शन नको.

आदेश आला,.." दादा मुलं रेडी आहेत",

" ठीक आहे त्यांना फार्म हाऊस वर यायला सांग",.. अभिजीत.

" काही टेन्शन आहे का दादा",.. आदेश.

नाही

"नीट सांग दादा ",.. आदेश.

" काव्या नाही आहे इथे",.. अभिजीत.

म्हणजे?

"ती कोणातरी सोबत घरी निघून गेली",.. अभिजीत.

"कुठे गेली वहिनी कोण होत ते ",.. आदेश.

" एक मुलगा मागे येतो आहे आमच्या तीन चार दिवस झाले आता श्रद्धा म्हणते काव्या त्याच्या सोबत आहे",... अभिजीत.

" आता? चल आपण शोधू वहिनीला, फोन नाही का तिच्या कडे",.. आदेश.

"नाही , कसं काय कॉन्टॅक्ट करणार , श्रद्धा सांगणार आहे काव्या आली की केंद्रात ",.. अभिजीत.

" दादा तू जा फार्म हाऊसवर, मी शोधतो वहिनीला ",.. आदेश.

"नको, सोबत राहू आपण, आधी सोहमच काम करू मग काव्याला शोधू",.. अभिजीत टेंशन मधे होता.

" ठीक आहे, थोड लक्ष का दिल नाही आधी त्या मुला कडे तू दादा ",.. आदेश.

" हो ना बंदोबस्त करायला हवा होता त्याचा",.. अभिजीत.

" धोका आहे का काही ",.. आदेश.

" नाही स्वतःहून गेली काव्या त्याच्या सोबत",.. अभिजीत.

"तू लवकर लग्न करून घे वहिनी सोबत ",.. आदेश.

" हो तेच करणार आहे मी, आता काव्याला जाऊच देणार नाही कुठे, चल आपण जावु फार्म हाऊस वर, आधी त्या सोहमला व्यवस्थित घरी पाठवून देऊ, मग ठरवु माझं काय करायचं ते, वाटलं तर महिला आधार केंद्रात जाता येईल काव्याला भेटायला",... अभिजीत.

" ठीक आहे ",.. आदेश फोनवर बोलत होता बरीचशी मुलं आता फार्म हाऊस वर येत होते,

" त्या पोलीस इन्स्पेक्टर त्यांना फोन लाव एक गाडी पाठवा म्हणून प्रोटेक्शन साठी",.. अभिजीत.

" एवढा मोठा गुंड आहे का सोहम साहेबांच्या मागे ",.. आदेश.

" अरे त्या गुंडाला सोहमच्या बहिणीशी लग्न करायचं आहे त्यामुळे तो काहीही करायला तयार आहे",.. अभिजीत.

"इथे ठीक आहे पण घरी गेल्यावर काय करतील ते ",.. आदेश.

" काय माहिती, आहे श्रीमंत ते लोक, घेतील सिक्युरिटी बॉडीगार्ड एक चांगला मुलगा बघून तिचं लग्न करणार आहेत तीच लवकरात लवकर",.. अभिजीत.
......

काव्या रघु फार्म हाऊस वर पोहोचले, मागच्या बाजूला प्रायव्हेट एरियामध्ये गेले, काकांनी काव्याला ओळखलं, ते हसले तिच्याशी,

तेवढ्यात सोहम आतून बाहेर आला, काव्या कडे बघत होता तो, एकदम काव्या पळत गेली, सोहमला भेटली, दोघ रडत होते, सगळे बघत होते दोघांकडे,

"कसा आहेस दादा तू",.. काव्या.

"मी ठीक आहे तू कशी आहेस, तुझी खुप आठवण येत होती, मला माफ कर तू संकटात होती मी काहीही मदत केली नाही ",.. सोहम.

"दादा काय हे मी ठीक आहे एकदम ",.. काव्या.

दोघं आत मध्ये येऊन बसले.

"आई बाबा कसे आहेत दादा",.. काव्या.

"ठीक आहेत, बाबांना माहिती होत तू कुठे आहे ते",.. सोहम.

"मावशी कुठे आहे",.. काव्या.

"मावशी आपल्या सोबतच आहे घरी",.. सोहम.

"कधी भेटू सगळ्यांना असं झालं आहे",.. काव्या.

"तू ठीक आहे ना काव्या, शशीने काही केलं नाही ना तुला, कठीण होता तो काळ ",.. सोहम.

"नाही दादा फक्त मारलं मला ",.. काव्या.

" डेंजर आहे तो शशी साहेब, खूप जोरात मारतो, काव्या मॅडमला खूप लागल होत ",.. रघु

काव्या रघुकडे बघत होती नको सांगू अस खुणावल, उगीच दादाला त्रास होईल,

सोहम एकदम काळजीने काव्या कडे बघत होता, त्याने सुरेश रावांना मेसेज केला, काव्या माझ्या सोबत आहे.

" दादा आता काय प्लॅन आहे",.. काव्या.

"आपल्याला घरी जायचं आहे",.. सोहम.

"काही प्रॉब्लेम येणार नाही ना, रस्त्यात काही व्हायला नको, मला भीती वाटते आहे मला शशी कडे जायचं नाही ",.. काव्या.

" काही होणार नाही काळजी करू नको, पोलिस आहेत सोबत",.. सोहम.

"मॅडम बरोबर बोलत आहेत साहेब, रस्त्यात काही पण होऊ शकत, धोका आहे, पूर्ण वाटेत लोक असतिल शशीचे, पाच मिनिटात धरतील ते आपल्याला, तुम्हाला माहिती नाही किती मारतात ते, इथे आपल्याला प्रोटेक्शन तरी आहे ",.. रघु.

" पण इथे आपल्याला कायम राहता येणार नाही ना दुसर्‍या कडे, आपल्याला घरी जावंच लागेल ",.. सोहम.

" अभिजीत साहेबांच फार्म हाऊस आहे ना हे ते थोडी नाही म्हणतील रहायला ",.. रघु.

" हो ना दादा ",.. काव्या.

रघु आणि काव्याच्या मनात होतं इथेच अभिजीत सोबत लग्न करून घेऊ, उगाच इथून बाहेर पडलं तर शशी स्ट्रॉंग होईल,

रघु खुणावत होता काव्याला,.." मॅडम सांगा ना साहेबांना तुमची ओळख आहे अभिजीत साहेबां सोबत ते ",

हो थांब रघु... काव्या सोहम कडे बघत होती. बोलू की नको.


🎭 Series Post

View all