©️®️शिल्पा सुतार
.........
.........
श्रद्धा रूम मधे आली,.. "केव्हा आलीस काव्या तू? काय बोलणं झालं अभिजीत सरांसोबत, बोलला का त्यांना आय लव यु , काय म्हटले सर, बर सोडल तुला एवढ्या लवकर, माझ्या रूम मध्ये का नाही आलीस",
काव्या विचार करून करून अर्धी झाली होती. त्यात ही श्रद्धा म्हणजे ना, तिने कानावर हात ठेवले... "काहीही काय ग श्रद्धा, गप्प बस जरा वेळ ",
" काय झालं वैतागते काय, सांग ना बोलले का सर ",..श्रद्धा.
काय?
आय लव यु,
" नीघ तू आधी इथून, मला बसू दे जरा शांत ",.. काव्या.
"आता काय टेंशन आहे, एवढ छान होत आहे तुझ ",..श्रद्धा.
"आम्ही इकडे वापस आलो तर काकूंनी आत बोलवलं होतं, ते त्या विचारत होत्या अभिजीतला तुम्ही दोघं रोज सोबत कसे काय फिरतात, अभिजीतने सांगितलं की आम्ही लग्न करणार आहोत",.. काव्या.
" मग पुढे काय झालं",.. श्रद्धा.
"काही नाही काकू मला विचारत होत्या, खर आहे का हे? मी पण सांगितले की हो मला लग्न करायचं आहे",.. काव्या.
"फायनली बोललीस तू, लग्न जमलं म्हणजे मग तुझं अभिनंदन",.. श्रद्धा.
"इथे मला काही सुचत नाही आहे श्रद्धा, जरा शांत रहा",...काव्या.
"त्यात काय सारखं न सुचण्यासारखं ही तर आनंदाची बातमी आहे, पार्टी करायला पाहिजे आपण, तुला नकार द्यायचा होता का त्यांना",.. श्रद्धा.
" नाही ग तुला नाही माहिती माझा प्रॉब्लेम काय आहे ",..काव्या.
" मग सांग मला, नाही तरी मी तुझ्यापेक्षा हुशार आहे, मी सोडवते तुझा प्रॉब्लेम",.. श्रद्धा.
" श्रद्धा जा ना नको त्रास देऊ ",.. काव्या.
" जाणार नाही, खाली चल पोळ्या करायला जेवणाची वेळ झाली आहे, आपला टर्न आहे ड्युटी टाळायची नाही",.. श्रद्धा.
" हो बरोबर आहे आलीच मी कपडे बदलून",.. काव्या खाली गेली, आता बऱ्यापैकी पोळ्या जमत होत्या तिला, ती सगळ्यांबरोबर पोळ्या करत होती, पण विचार मात्र घरच्यांचे सुरू होते, आई बाबा दादा मावशी मिस यू, आज माझ्या साठी आनंदाचा दिवस आहे तुम्हाला कोणाला काही माहिती नाही, होईल नीट जावू दे, आता मागे फिरायचा नाही, ती तीची तिची हसत होती,
श्रद्धा बघत होती तिच्या कडे,.. "काय आठवल मॅडम, आम्हाला ही सांग, सांगण्यासारख आहे ना" ,
काव्या तिच्या मागे पळाली,.. "आज गेली तू, केव्हाचा त्रास देते आहेस तू",
बाकीच्या मुली हसत होत्या.
"अरे मग तुला त्रास द्यायचा ठेका फक्त अभिजीत सरांनी घेतला आहे का",.. श्रद्धा.
काकू काकू काव्या हाक मारत होती, काकू आत मध्ये आल्या त्यांनी येऊन काव्याला जवळ घेतलं,.. "मी तू खुश आहे तुझ्यासाठी काव्या, खूप खुश रहा, छान होत आहे माझ्या मुलीच" ,
काव्याला एकदम मावशी आई आठवल्या, ती शांत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं, बाकीच्या मुली पण रडत होत्या.
"अरे काय रडा रड चालली आहे, पार्टी करायची आज, हसा चला, शिरा करू आपण मस्त, आजच सासरी चालल्यासारखं काय सुरू आहे तुझ काव्या, मनात लाडू फुटत असतिल खर तर",.. श्रद्धा.
"जेव्हा तुझं लग्न होईल ना श्रद्धा तेव्हा तुला कळेल",.. काव्या.
" हो ना कधी होईल माझं लग्न? कुठे आहे तो राजकुमार काय माहिती",.. सगळ्या हसत होत्या श्रद्धा मुद्दामून वातावरण लाईट करत होती.
...........
...........
शशी शरद आणि इतर मित्रांसोबत एका जागी बसलेला होता, त्याचा फोन कंटिन्यू सुरू होता, काहीतरी खूप ठरवत होता,
" शशी काय झालं आज खूपच बिझी आहेस तू ",.. शरद.
" आज रघु दिसला मनोजला बाजूच्या गावात",.. शशी.
"मग आता काय",.. शरद.
"काही नाही त्याच्यावर लक्ष देऊन आहेत मुल, बहुतेक काव्या सापडेल असं वाटत आहे, तो तिचा बॉडीगार्ड आहे ना, तिच्या आसपास असेल, तिथेच कुठेतरी लपली असेल काव्या ",... शशी.
"तू काय ठरवलं आहेस मग ",.. शरद.
"काही नाही हा चान्स घेणार आहे मी जास्त करता आहेत सोहम जिजाजी, मी बोलणार नाही आता त्यांच्याशी, मला जे करायचं ते करेल, मला काव्या हवी ",.. शशी.
"पण तू हे जे काव्यासोबत वागतो आहे ते चांगलं नाही जर तू प्रेमाने तिच्याशी राहणार असेल तरच लग्न कर",.. शरद.
" शरद तू माझ्या बाजूने आहेस का काव्याच्या बाजूने? मला सपोर्ट करायचं सोडून तू मलाच बोलतो आहेस",.. शशी.
" चांगली आहे ती मुलगी साधी भोळी म्हणून म्हटलं ",.. शरद.
" ते सुरभी ताई सोबत वागता आहेत ते चांगल आहे का? तुला माहिती आहे का किती प्रेम करते ताई त्यांच्यावर, किती रडते आहे रोज, जेवत नाही, किती वेळा माफी मागितली तिने, तिला घरा बाहेर काढल त्यांनी, आता त्यांना माझ्या समोर झुकवायच असेल तर हाच एक उपाय आहे ",.. शशी.
शरद टेंशन मधे होता, हे बरोबर होत नाही, शशी चांगला नाही, सुरभी ताई घरी आली हा सगळा राग शशी काव्या वर काढेल, या वेळी सुरभी ताई काही म्हणणार नाही, खूप छळ होईल काव्याचा, शशी ऐकत नाही अजिबात, मागच्या वेळी किती जोरात मारल होत तिला, काव्याच लाइफ खराब होईल, सांगाव लागेल सोहम साहेबांना,
जरा वेळाने सगळी मुलं घरी गेले, शशी अजून तिथेच बसून बाकीच्या मुलांबरोबर काहीतरी प्लॅन करत होता, त्यांने यावेळी शरदला काही सांगितलं नाही, बहुतेक शशीला संशय आला की काय.
शरद निघाला तो भिंती आड उभा राहून चुपचाप ऐकत होता, दोन-तीन दिवस ते मुलं बघणार होते रघु कुठे जातो काय करतो त्याच्यासोबत कोण आहे, मग ते ठरवणार होते पुढचं, काव्याला इथे उचलून आणणार होते ते,
शरद निघाला थोडं पुढे आल्यानंतर त्याने सोहमला फोन केला, सोहमने नंबर बघितला कोण आहे काय माहिती, त्याने फोन उचलला.
"मी शशीचा मित्र शरद बोलतो आहे मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे",.. शरद.
"बोल शरद",.. सोहम.
"रघुला शशीच्या मित्राने बाजूच्या गावात बघितलं आहे. आता ते तिथे रघुवर लक्ष देत आहे परत एकदा काव्या धोक्यात आहे, तुम्हाला जर तिच्याबद्दल काही माहिती असेल तर व्यवस्थित पावलं उचला, तिला सेफ ठिकाणी ठेवा ",.. शरद.
" काय प्लॅन आहे त्याचा",.. सोहम.
" माहिती नाही, मला नाही घेत आहे तो त्यांच्यात, बहुतेक शशीला माझा संशय आलेला आहे, पण त्यांच्या प्लॅन प्रमाणे अजून दोन-तीन दिवस काही धोका नाही, तरीसुद्धा तुम्ही अलर्ट राहा ",.. शरद.
" ठीक आहे ",.. शरदचा फोन झाल्यानंतर सोहमने रघुला फोन लावला,
" रघु धोका आहे तिकडे काव्या कुठे आहे",.. सोहम.
" मॅडम त्यांच्या महिला आधार केंद्रात आहे काय झालं आहे साहेब",.. रघु.
" शशीच्या मित्रांनी आज तुला बघितलं",.. सोहम.
केव्हा?
" आत्ता रात्री ते लोक आता तुझ्यावर पाळत ठेवण्याचे काम करणार आहे, तू राहतो तिथून काव्या लांब राहते ना",.. सोहम.
" हो बरच लांब राहतात मॅडम आता काय करायचं साहेब",.. रघु.
" ते लोक तुझ्या आजूबाजूलाच आहे तू सावध राहा काव्याला भेटू नको, अभिजीतची इंडस्ट्री तिथून लांब आहे का, ती काव्या तिथे येईल ना उद्या ",.. सोहम.
" हो मॅडम त्या एरियातच फिरत असतात तिथे खूप दुकान आहेत ना त्यात काहीतरी सामान लागतं ",.. रघु.
" तुला जमेल काव्याला निरोप द्यायला की असे इकडे तिकडे फिरू नको",.. सोहम.
" फोन नाही मॅडम कडे ",.. रघु.
" चूक झाली ती मागत होती फोन मीच नको म्हंटल",.. सोहम.
" मॅडम ऑफिसला तर येतीलच ना काय करायचं मग",..रघु.
" मी येतो तिकडे काव्याला कुठेतरी सुरक्षित स्थळी हलवु मला आता अजिबात रिस्क नको आहे",.. सोहम.
" केव्हा येता आहात तुम्ही साहेब ",.. रघु.
"उद्याच येतो तिकडे अभिजीतला भेटतो त्याची काही मदत मिळाली तर बघू",.. सोहम.
अभिजीतच नाव काढल्यानंतर रघु गप्प होता, मॅडम अभिजीत सरांबरोबरच फिरत असतात हे त्याने अजूनही सोहमला सांगितलं नव्हतं,
" ठीक आहे मग तुम्ही याल तर नीट या, कारण आता तुमच्यावर पण लक्ष असेल शशीच्या लोकांच",.. रघु.
" बापरे आता काय करूया ठीक आहे मी तुला करतो रात्री फोन, तेव्हा ठरवू ",.. सोहम घरी आला, सुरेशराव त्याचीच वाट बघत होते ते आज पोलीस इन्स्पेक्टर यांना भेटून आले होते त्यामुळे त्यांना समजलं होतं काव्या कुठे आहे,
जेवण झालं सुरेशराव स्टडी रूम मध्ये बसले होते, त्यांनी सोहमला आत बोलवलं, सोहम मला समजलं आहे काव्या कुठे आहे, बाजूच्या गावात आहे ती,
"हो बाबा मला पण समजलं आहे की तिला धोका आहे परत शशीपासून, शशीच्या लोकांनी रघुला बघितला आहे त्या गावात, काय करूया आता, काव्याची व्यवस्था कुठे करूया?",.. सोहम.
" तू तिला घरी घेऊन ये उद्या, मी पोलिसांची टीम तुझ्यासोबत देतो, अजून तुझे बाकीचे बॉडीगार्ड सुद्धा सोबत घे, मला आता कुठल्याही प्रकारची रिस्क नको",.. सुरेश राव.
" पण शशीकडे खूप मोठी टीम आहे गुंडांची ते लोक जबरदस्त मारामारी करतात अजिबात मागे पुढे बघत नाही",.. सोहम.
" पोलीस सोबत असल्यानंतर बाकीचे लोक आधीच घाबरून जातात तू काळजी करू नको आपल्याकडे पण मोठी टीम आहे ",.. सुरेश राव.
" ठीक आहे पण हे आता कोणालाच बोलू नका अगदी आईला पण सांगू नका नाही मी उद्या सकाळी जातो काव्याला घ्यायला",.. सोहम.
" बाबा तुम्ही शशीला एक दिवसा साठी अटक करायला सांगा पोलिसांना, तेवढ्या वेळात मी पटकन काव्याला घेवून येतो",.. सोहम.
"चालेल हे बर होईल, मी सांगतो",.. सुरेश राव.
ते इंस्पेक्टर सोबत बोलत होते,
" ठीक आहे मी बघतो उद्या सकाळी कुठे आहे शशी त्याला पकडून ठेवतो ",.. इंस्पेक्टर.
.........
.........
अभिजीत आनंदाने घरी आला, कधी बोलू मी घरच्यांसोबत अस झाल होत त्याला, तो आवरून जेवायला येऊन बसला, कोणीच नव्हतं का टेबलवर, कुठे गेले सगळे?
आजी आणि आदेश आले,
"आई बाबा कुठे गेले? ",.. अभिजीत.
" ते एका कार्यक्रमाला गेले आहेत ",.. आजी.
आदेश बघत होता आज दादा खुश आहे, संध्याकाळी नव्हता तो ऑफिसमध्ये, म्हणजे नक्कीच तो काव्या वहिनीला भेटायला गेला असेल, ठरलं का काय याचं काही,.. "दादा काय विशेष? खूप खुश आहेस तू आज ",.
अभिजीतने खुणावल गप्प बस,
आजी पण बघत होती,.." काय झालं अभिजीत, मला नाही सांगणार का, आपण लहान पणी पासूनचे फ्रेंड्स आहोत ना, प्लीज सांग ना",
आजी खूप गोड दिसत होती,.. "इमोशनल ब्लॅक मेल नको आहे आजी, ऐक माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे आजी तुला आवडते ती बातमी ",
" सांग ना मग",.. आजी.
"नाही असं नाही, आई बाबा पण हवे सोबत, उद्या सांगतो",.. अभिजीत.
आदेश हसत होता बरं झालं याचं काही ठरलं, याच आधी लग्न होऊन जाईल तर बर होईल, मग माझं लग्न, चला प्रियाला फोन करावा लागेल, आता टेन्शन नाही त्यामुळे छान वाटतं आहे.
........
........
रात्री सोहम त्याचं काम करत होता त्याने अभिजीतला फोन लावला,.." अभिजीत मला तुझ्याशी थोडं काम आहे उद्या मी येतो तुला भेटायला",
"ठीक आहे ये किती वाजता येशील",.. अभिजीत.
"अकरा वाजता येतो आहे तिकडे तुझ्या ओळखी आहेत ना त्या गावात",.. सोहम.
"हो आहे ओळखीचे काय झालं",.. अभिजीत.
"काही नाही सांगतो उद्या भेटून ",.. सोहम.
ठीक आहे. अभिजीत परत त्याच्या दुनियेत रमला, काव्या काय करत असेल? , फोन नेमका माझ्या कडे राहिला, नाहीतर आता छान गप्पा मारल्या असत्या, पण ती खूप लाजते माझ्या समोर, बोलत नाही जास्त, असु दे नंतर करेल मी तिला कंफर्टेबल,
श्रद्धाच्या फोन वर करू का फोन, त्याने बघितल अकरा वाजत आले आहेत, नको आता ती झोपली असेल, कशी दिसत असेल काव्या झोपलेली, निरागस आहे ती खूप, जे मनात असेल ते तिच्या चेहर्यावर लगेच दिसत, आपण तिला छान छान ड्रेस घेवू, साडीत एकदाही बघितल नाही मी तिला ,
उद्या आई बाबांशी बोलायला पाहिजे,लवकर लग्न करून घेवू, तो एक मुलगा का तिच्या मागे फिरतो, उद्या जर तो मुलगा दिसला तर अस मारेन ना मी त्याला, पण तो बॉडी बिल्डर वाटतो आहे, त्याने मला मारल तर, नको मारामारी त्या पेक्षा काव्याशी पटकन लग्न करून घेवू.
काव्या काव्या काही सुचत नाही मला. तिचा फोटो ही नाही एखादा माझ्या कडे.
.......
.......
सकाळी काव्या रेडी होती, श्रद्धा नाश्ता करत होती, आज बोलायच आपण अभिजीत सोबत, सांगून देवू शशी बद्दल दादा बद्दल, नंतर संध्याकाळी काकूंना पण सांगून देऊ.
सोहम सुरेश रावांना भेटला,.. "आज जातो आहे मी काव्याला घेऊन येतो",
" मी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितल आहे शशी बद्दल",.. सुरेश राव.
"विचारा ना केली का शशीला अटक",. सोहम.
सुरेश रावांनी फोन लावला,.. "झाली का शशीला अटक",
"मी शोधतो आहे शशी ला",.. इंस्पेक्टर.
म्हणजे?
"तो घरी नाही त्याच्या ऑफिस मध्ये नाही" ,.. इंस्पेक्टर.
"प्रयत्न करा, धोकादायक आहे तो, मी मागे पण बोललो होतो त्याला अटक करा " ,.. सुरेश राव.
" केली होती त्याला अटक, पण पुराव्या अभावी सुटला तो", .. इंस्पेक्टर.
ठीक आहे,
"काय झालं बाबा ",.. सोहम.
" करणार आहे अटक पण अजून शशी सापडला नाही",.. सुरेश राव.
" ठीक आहे मी निघतो ",.. सोहम.
" काळजी घ्या आणि यावेळी",.. सुरेश राव.
" हो काव्या माझ्यासोबत असली की लगेच फोन करतो तुम्हाला",.. सोहम.
रघु आज सकाळपासून बाहेर निघालाच नव्हता, शशीची टीम त्याची बाहेर वाट बघत होती, दोनच्या ऐवजी आता चार-पाच मुलं होते तिथे, तो बाहेर आला तर त्याला धरायचं असा विचार होता, काय करू? आतून रघु बघत होता मागच्या दाराने निघून जाऊ का गुपचूप, त्याची मोटरसायकल पुढेच होती, पाई जाव लागेल,
सोहमचा फोन आला,.. "मी येतो आहे अकरा वाजेपर्यंत, तू तिथे अभिजीतच्या ऑफिस जवळ ये",
"ठीक आहे साहेब मला जरा घरातुन निघायला प्रॉब्लेम आहे, मी येतो मागच्या दाराने गुपचूप",.. रघु.
"बापरे या लोकांचा त्रास आहेस आपल्या मागे,.. सोहम.
......
......
श्रद्धा काव्या ऑफिसमध्ये आल्या, त्यांना रस्त्यात काही त्रास झाला नाही, श्रद्धा रस्त्याने खूप बडबड करत होती, काव्या नुसत ऐकत होती, तिला अभिजीत सोबत काय बोलू काय नाही याचं टेन्शन आलं होतं, ती विचार करत होती कसं सांगावं हे सगळं , तो काय म्हणेल,
.......
.......
अभिजीत घरात रेडी होता, आदेश तयार होऊन आला, दोघांनी नाश्ता केला, प्रतापराव उशिरा येणार होते ऑफिसला, ते आशाताईंसोबत बोलत बसले होते, अभिजीत आदेश निघाले, आदेश कार मध्ये अभिजीत कडे बघत होता,.. "दादा सांग ना काल काय झालं, तू खुश होतास काल",
" हो मी काव्याशी बोललो तिचा होकार आहे लग्नाला",.. अभिजीत.
"अरे वा दादा मग घरी कधी सांगणार",.. आदेश.
"सांगतो आता या वीकेंडला",.. अभिजीत.
" मी तुझ्यासाठी खूप खुश आहे दादा, बर झालं काल तू बोललास वहिनी सोबत ",.. आदेश.
अभिजीत आदेश खुश होते, दोघे ऑफिसमध्ये आले,.." चलतोस का माझ्या डिपार्टमेंट मधे दादा , वहिनीला भेटून घे ",
" नाही आदेश प्रायव्हेट लाइफ ऑफिस लाइफ सेपरेट हवी, ऑफिस मध्ये नाही भेटणार मी काव्याला, तू पण उगीच टाइम पास करू नको पुढच्या आठवड्यात मोठी ऑर्डर जाणार आहे त्याची तयारी कर, किती काम झाल याचा रीपोर्ट दुपार पर्यंत माझ्या टेबल वर हवा, तु घेवून ये रीपोर्ट, काव्याला पाठवू नको, काव्याला बघून मी काम विसरून जाईल अस तुला वाटत असेल तर तर ही तुझी खूप मोठी चुक आहे, समजल ना, बी सिरीयस ",.. अभिजीत.
" हो दादा, मी जातो, हा दादा काही सुधारणार नाही, वहिनीला तिकडे पाठवायची आयडिया फेल गेली, आता काय करू या, मला कोण वाचवेल , काम कराव लागेल ऑर्डरच, पवार साहेबांना सांगू सगळ काम ",.. आदेश डिपार्टमेंट मध्ये आला,
काव्या बसली होती तिथे तो येवून उभा राहिला, वहिनी आजपण सुंदर दिसते आहे, दादाने छान हिला त्याच्या डिपार्टमेंट मध्ये घ्यायच, हिच्या सोबत आनंदी रहायच तर किती बोर काम करत बसतो तो, प्रिया या ऑफिस मध्ये असती तर माझ्या सोबत घेतल असत मी तिला.
काव्या त्याला बघून उठून उभी राहिली.. "गुड मॉर्निंग सर",
"गुड मॉर्निंग वहिनी",.. आदेश.
काव्या हसत होती, आदेश पण हसत होता,
"छान छान चाललं आहे तुमचं, मी तुझ्यासाठी आणि अभिजीत दादासाठी खुश आहे वहिनी",.. आदेश असं सारखं वहिनी वहिनी म्हणत होता, काव्या लाजली होती, काव्या वहिनी लहान आहे प्रिया आणि माझ्या पेक्षा, पण मस्त वहिनी भेटली, वहिनी आता हे लाजण कमी कर आणि माझ ऐक.
काय सर,
आदेश म्हण,
नको
प्लीज
बर
" मला मदत कर दादा पासून वाचव ",.. आदेश.
काय झालं?
"खूप स्ट्रिक्ट वातावरण करून ठेवतो तो ऑफिसच, नुसत रागावतो, माझे हात पाय थरथर कापतात मीटिंग असेल तर",.. आदेश.
"मी काय करू मदत आदेश",.. काव्या.
" तू माझ्या सोबत रहा या पुढे, तुझ्या कडे बघून दादा थोडा तरी शांत होतो प्लीज हेल्प",.. आदेश.
काव्या हसत होती,.. "चांगले आहेत अभिजीत ",.
" तुझ्या साठी ते वहिनी, आमच्या कडे बघ, किती हाल आहेत आमचे, किती ओरडतो तो आम्हाला, काय सांगणार आता, मी जातो खूप काम आहे नाहीतर दुपारी मीटिंग मधे दादा माझा जीव घेईल, पवार साहेब पटकन या माझ्या केबिन मधे आणीबाणी जाहीर झाली आहे, दुपारी मीटिंग आहे ",... आदेश केबिन मधे गेला,
काव्या हसत होती. काहीही सांगतो हा आदेश, अभिजित किती छान आहेत, प्रेमळ आहेत, किती काळजी घेतात माझी , नीट वागतात, ती अभिजीतच्या विचाराने लाजली होती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा