तुझी साथ हवी मला... भाग 29

पण आता अभिजीतला खरच खूप हसू येत होतं, बरोबर आहे हेच कारण आहे, काव्या इथे या डिपार्टमेंट मध्ये आली तर मी काय करणार आहे, काहीच सुचणार नाही,


तुझी साथ हवी मला... भाग 29

©️®️शिल्पा सुतार
.........

प्रमिला ताई विचार करत होत्या काय करू बोलू का सोहम सोबत उगीच बाहेरून समजल किंवा सुरभीने एक च्या दोन सांगितल तर अडचण येईल,.. "सोहम मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे",

सुरेश रावही येऊन बसले, मावशी होत्या बाजूला,

" माझं चुकलं आहे काव्याशी वागतांना, मला असं वाटलं होतं काव्या इथे जवळ राहील, माहिती नव्हतं शशीचा वागणं असं आहे, उगीच सपोर्ट केला मी शशी आणि सुरभीला, माझ्या मनात तसं काही नव्हतं, तरी जर तुला मला काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतो, मला माफ कर ",.. प्रमिला ताई.

सोहम सोहम उठून प्रमिला ताईं जवळ गेला,.." आई मला माहिती होतं तू सुरभी आणि शशीला सपोर्ट करते ते, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं, यापुढे अस करू नको, तू माझी आई आहेस, माफी का मागतेस, मी आणि काव्याने नेहमी तुला आईचा दर्जा दिला आहे, कधीच कुठली गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली नाही, तू म्हणशील ते आणि दोघांनी केलं, अगदी सुरभीशी लग्न सुध्दा केल, आमच्या विश्वासाला यापुढे तडा जाऊ देऊ नको",..

प्रमिलाताई बघत होत्या सुरेश राव काय म्हणतात ते,.." प्रमिला यापुढे सुरभी आणि शशी काही संबंध ठेवू नको, ते लोक चांगले नाहीत ",

"अहो माझी चुकी झाली, या पुढे अस होणार नाही ",.. प्रमिला ताई.

" ठीक आहे काही हरकत नाही, विसरून जा जे झाल ते प्रमिला ",.. सुरेश राव.

"सोहम अरे कुठे आहे काव्या? ",.. सुरेश राव.

"बाबा अजुन काहीच समजल नाही",.. सोहम कोणावर विश्वास ठेवू शकत नव्हता. त्यामुळे तो माहिती देत नव्हता.

सुरेश रावांनी पोलिस इन्स्पेक्टरांना फोन लावला,.." कुठे पर्यंत आल काम? , काव्या बाबतीत काहीच का समजत नाही",

" समजल आहे साहेब, उद्या येतो तुम्हाला भेटायला ",.. इंस्पेक्टर.

"ठीक आहे",.. सुरेश रावांनी कोणाला सांगितल नाही पोलिस इन्स्पेक्टर काय म्हटले ते.
.......

दुसर्‍या दिवशी सकाळी सुरभी सविताताई इकडे घरी आल्या, सुरभी येवून प्रमिला ताईंना भेटली, कालच्या प्रकाराने प्रमिला ताई आधीच घाबरलेल्या होत्या, नको पडायला या बहिण भावंडां मध्ये, उगीच या वयात घरा बाहेर काढल तर कुठे जाणार आहे मी, त्या पेक्षा शांत राहू, त्या सुरभी पासून लांबच होत्या,

सविता ताई त्यांच्याशी बोलत होत्या ,... "प्रमिला ताई काय अस? आपल्यात कधी घटस्फोट होतात का? तुम्ही समजून सांगा ना सोहम रावांना, चुकल सुरभीच माफी मागतो आम्ही",

"तुमचा मुलगा मुलगी कशी वागली काव्या सोबत हे अस आम्हाला चालणार नाही, तुम्ही मला या बाबतीत काहीही सांगू नका सविता ताई, माझा या दोघांशी काही संबंध नाही",.. प्रमिला ताई.

"आई प्लीज एकदा सपोर्ट करा ना, मी खरच सांगते मी या पुढे अस करणार नाही",.. सुरभी.

" सुरभी जा इथून सोहम चिडलेला आहे",... प्रमिला ताई.

सोहम ऑफिसला जात होता, सुरभीला बघून तो थांबला, प्रमिलाताईंकडे बघत होता तो,.." हे लोक काय करता आहेत इथे आई" ,

सुरभी पटकन पुढे आली, त्याला येऊन भेटली, सोहम पुढे निघून गेला, त्याच्यामागे सुरभी गेली, हॉलमध्ये जाऊन सोहम थांबला, सुरभी जाऊन त्याच्या गळ्यात पडली, सोडत नव्हती त्याला,.. "मला माफ कर सोहम, मी खर सांगते मी काहीही केल नाही, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, काय झालं आहे आपल्यात येवढ, असं का निर्णय घेतो आहेस तू, जरा माझा विचार कर ",

"काहीच झालं नाही का सुरभी, माझ्या बहिणीला नाका तोंडातून रक्त येई पर्यंत मारल शशीने तिचा काय दोष होता यात, त्या मानाने मी तुम्हा बहीण भाऊ काहीच शिक्षा देत नाही, माझ्या बहिणीचा जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, ती सापडत नाही हे केवळ तुम्ही दोघां मुळे झालं आहे मला या गोष्टीत पडायचं नाही आता, शशीला सोडणार नाही मी, पण आधी तुझा नंबर",.. सोहम.

"मी काही केलं नाही सोहम काव्याला केव्हाही विचार, मी तिच्या बाजूने बोलत होती नेहमी, तिला वाचवत होती मी" ,.... सुरभी.

"तिला वाचवायची गरजच का पडली तुला? समजत ना तुझा भाऊ कसा वागत होता, तरी त्याच्याशी लग्न करायला तुम्ही लोकांनी दबाव आणला काव्या वर, आता मला काही सांगू नकोस ",.. सोहम.

" मग तु पण तसच वागतो आहेत ना माझ्याशी, मला किती त्रास होतो आहे माहिती आहे का ",.. सुरभी.

" मी मागेच सांगितल होत शशीला जशी माझी बहीण तुझ्याकडे आहे तशी तुझी बहीण पण माझ्याकडे आहे जरा नीट वाग, त्याला नाही समजलं, मला आता तुमच्या लोकांशी काहीही संबंध नको आहे, मला या विषयावर काही बोलायच नाही, सुरभी सोड मला आणि जा इथून नाही तर मी शशीला पोलिसांच्या ताब्यात देईल, त्याच्या बिझनेस एका रात्रीत बंद करेल, पुढच्या पाच मिनिटात तू मला इथे दिसली तर बघ आणि डिवोर्स पेपर वर सही करायची, पेपर पाठवून दे यापुढे या घरात आणि माझ्याशी बोलायला यायचं नाही, किती दिवस सांभाळून घेतल मी तुला, वाटलं जाऊदे आता समजेल नंतर समजेल पण तुम्ही लोकांना काव्याला त्रास देण्यापलीकडे काही सुचतच नाही, एवढं घरदार स्टेटस असून माझी बहीण कुठे फिरते आहे काय माहिती",.. सोहम.

ठीक आहे, मी जाते सोहम, परत येणार नाही कधी, सुरभी आत आली, आई चल इथून ,

सविता ताई थांबवत होत्या तिला,.." अग बोलू तर दे मला सोहम रावांशी ",

" नाही आई जावू आपण इथून, शशीला पोलिसात देतील ते नाही तर, माझा संसार तर उध्वस्त झाला आहे, शशीला काही नको व्हायला ",.. सुरभी.
.........

सकाळी काव्या उठली, खूप छान वाटत होत तिला, अभिजितचा विचार ती करत होती, आज भेटतील का अभिजीत, काय बोलणार मी त्यांच्याशी , आय लव यु म्हणू का?... ओह माय गॉड, नको अस, मला अजुन वेळ हवा आहे,.... मग मला तुम्ही आवडतात, नको,... काहीच नको बोलायला,.... काय करू मला नाही जायच ऑफिसला, धड धड होते आहे, ड्रेस कोणता घालू, माझ्या कडे काहीच सामान नाही, लिपस्टिक हवी होती, काय करू जवळ पास दुकान ही नाहीत, आज घेते जाता जाता थोड सामान,

ती चहा नाश्ता साठी खाली आली, श्रद्धा आली थोड्या वेळाने,.. "काय झाल श्रद्धा आला का रिप्लाय अभिजीतचा",

"काय झाल खूप वाट बघते आहे वाटत तू सरांच्या रिप्लायची, चेहरा का असं करून घेतला आहेस , हस जरा, टेंशन आल का",. श्रद्धा हसत होती.

"हो फोनवर बोलणं ठीक आणि प्रत्यक्षात भेटणं कठीणच आहे",.. काव्या.

"नाही अजून मेसेज बघितल नाही सरांनी, जायच का ऑफिसला",.. श्रद्धा.

"हो.. माझी हिम्मत होत नाही",.. काव्या.

दोघी निघाल्या, अभिजित ऑफिस मधे बोलतील का माझ्याशी? , मला कसतरी होत आहे, कस वाटत अस,.." श्रद्धा तो मेसेज डिलीट करु या का आपण, नको बोलायला अभिजित सोबत जावू दे, मला नाही द्यायचा होकार",

" घाबरते कश्याला काव्या, बघतील सर मेसेज, बोलतील तुझ्याशी फक्त, ऑफिस मध्ये बाकी काही करू शकत नाही ते तुला" ,.. श्रद्धा हसत होती.

चालू गाडीवर काव्या तिला मारत होती,

" पडू आपण दोघी, शांत हो",.. श्रद्धा.

" श्रद्धा थांब मला या दुकानातून थोड सामान घ्यायच आहे",... काव्या.

" लगेच ये पाच मिनिटात वेळ होतो आहे ",.. श्रद्धा.

हो.. काव्या ने पटकन टिकल्या लिपस्टिक क्रीम घेतलं ती पटकन बाहेर आली,

"बघू कशी घेतली लिपस्टिक",.. छान लाईट कलरची ब्रँडेड लिपस्टिक होती, लाव थोडी आता,

काव्याने लिपस्टिक लावली.

बापरे.

" काय झालं जास्त वाटते आहे का?",.. काव्या.

" नाही ग तू अजूनच खूप सुंदर दिसते आहे, अभिजित सर फूल पागल होतील ",.. श्रद्धा.

"काहीही, मी सांगते ना तो मेसेज डिलीट कर ना, प्लीज श्रद्धा, फोन दे तुझा ",.. काव्या श्रद्धाची बॅग ओढत होती, कुठे आहे फोन,

"नाही तू कर लग्न सरां सोबत ",.. श्रद्धा.

"आमच्या पेक्षा तुला घाई झाली का ",.. काव्या.

हो.

हसत काव्याने सगळं सामान बॅग मध्ये ठेवलं, ती स्कूटर वर बसली, चल आता ,.. "तू जरा जास्तच करते आहे श्रद्धा",

दोघी ऑफिस मधे आल्या ऑफिसच काम सुरू झाल, आदेश सर अजून आलेले नव्हते, पवार सर काम देत होते सगळ्यांना, आदेश सर आले नाही म्हणजे अभिजीत आले नसतील अजून, काय झालं आहे काय माहिती.
.........

आदेश अभिजीत आई बाबा आजी सगळे सकाळी रेडी होते, नाश्ता रेडी होता, आता केव्हाही प्रियाच्या घरचे आणि प्रिया येतील आदेश खुश होता, आज ऑफिसला जायला थोडा उशीर होईल मॅनेजर कदम यांना फोन करून सांगून देवू म्हणून अभिजीतने फोन हातात घेतला, फोन करून झाला,

बरेच मेसेज आलेले होते, त्याने बघितल श्रद्धाच्या फोन वरून काल मेसेज आला होता, काव्याचा होता का मेसेज, ओह माय गॉड, किती मूर्ख आहे मी, का फोन बघितला नाही काल, काव्याला काय बोलायच असेल माझ्याशी, होकार द्यायचा असेल का? की अजून काही? काय करू? आता करून बघू का फोन? त्याने फोन लावला, श्रद्धाने फोन उचलला,

गुड मॉर्निंग सर.

"गुड मॉर्निंग, कुठे आहेस श्रद्धा",.. अभिजीत.

"सर मी ऑफिस मध्ये आहे",.. श्रद्धा.

"काल काव्याने मेसेज केला होता मला",.. अभिजीत.

हो सर.

"कुठे आहे ती",.. अभिजीत.

"ऑफिस मध्ये सर, तिच्या डिपार्टमेंट मधे",.. श्रद्धा.

"मूड तर ठीक होता ना काल तिचा",.. अभिजीत बघत होता नक्की काय बोलायच असेल काव्याला,

" हो सर, ठीक होती काव्या",.. श्रद्धा हसत होती, अभिजित लाजला,

"ठीक आहे येतो थोड्या वेळाने ऑफिस मधे",.. अभिजीत.

ओके सर.

खूप खुश होता तो, पण नक्की काय बोलायच आहे काव्या ते अजून स्पष्ट नव्हत म्हणून तो गप्प होता, काही सुचत नव्हतं अभिजीतला, असं वाटत होतं की आता इथून उठावं सरळ ऑफिसमध्ये जावं आदेशच्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन काव्याला विचारावं काय म्हणणं आहे तिच, होकार असेल तर किती छान होईल, तो सारखा सारखा मेसेज बघत होता, मेसेजचा स्क्रीनशॉटही घेऊन ठेवला,

मला बोलायच आहे आपल्या बद्दल अस लिहिल होत, आपल्या बद्दल म्हणजे काय? ती आणि मी का? कधी भेटणार काव्या, जावू का ऑफिस मध्ये, निघू इथून, नाही तरी आता सगळ ठरलं आहे आदेशच, लकी आहे तो, आता आपल्याला आपल बघायला हव, ठीक आहे थोड्या वेळ थांबू इथे मग जावू ऑफिस मधे,

काव्याच कामात लक्ष नव्हत, अभिजीत ऑफिस मध्ये आले तर इकडे येतील का? उगीच पाठवला तो कालचा मेसेज, काय होईल? मी नाही बोलू शकत अभिजीतशी, दादाशी कधी बोलणार मी आमच्याबद्दल, सांगायला हव त्याला , रघुच्या फोन वरून फोन करायचा आहे मला, कधी भेटेल मी त्या रघुला, येता जाता श्रद्धा असते सोबत, ठीक आहे बाहेरच्या फोन वरून करू का फोन, कधी होईल दादाची भेट, आता अभिजीत काय म्हणतात काय माहिती, त्यांनी लगेच लग्नाचा आग्रह धरला तर, नको अस, श्रद्धा ही ऐकत नाही माझ , जावून बोलू का तिच्याशी, श्रद्धाचा फोन हातात मिळाला तर मी लगेच तो मेसेज डिलीट करेन, पण जाणार कस त्या डिपार्टमेंट मधे, नेमक मी गेली अभिजीत आले तर, नको, वाचला की नाही मेसेज त्यांनी , कुठे आहे हे दोघ भाऊ, बरोबर करते का मी काही समजत नाही.
....

प्रिया आणि प्रियाच्या घरचे आले, प्रियाला बघून घरचे खूप खुश होते खूप छान आहे मुलगी, आल्या आल्या ति सगळ्यांना भेटली, आदेश खुश होता, सगळे पुढे बसलेले होते, पोहे आले, आशा ताई पोहे देत होत्या, प्रिया पोहे दे, प्रियाच्या आईने सांगितलं, प्रिया मदत करत होती, आदेशही होता सोबत, त्या दोघांमध्ये एक खूप छान बॉण्डिंग होत, सगळ्यांना दिसत होत ते, छान आहे ही जोडी.

नाश्ता झाला, रमेश राव प्रताप राव बोलत होते,

"मी काय म्हणतो बाबा आदेश तुम्ही लोक चालू द्या तुमचा कार्यक्रम, मी निघतो ऑफिसला, सगळ्यांनी इथे थांबण्यात काही अर्थ नाही, खूप मिटींग आहेत आज",.. अभिजीत.

"चालेल मी आलोच ",.. प्रतापराव.

" आदेश जाऊ ना मग मी",.. अभिजीत.

" हो दादा मी येतो जरा वेळाने",.. आदेश.

अभिजीत सगळ्यांना भेटला, आई आजी बाय, तो निघाला, त्याला असं झालं होतं कधी ऑफिसला जाऊ आणि काव्याला भेटू, तेवढा एकच मेसेज आला तिच्याकडून बहुतेक ती माझ्या रिप्लायची वाट बघत असेल, त्याने कार टेप ऑन केला,

मेरे दिल में आज क्या है
तू कहे तो मैं बता दूँ

तेरी ज़ुल्फ़ फिर सवारूँ
तेरी मांग फिर सजा दूँ

मेरे दिल में आज क्या है
तू कहे तो मैं बता दूँ

मुझे देवता बनाकर
तेरी चाहतों ने पूजा

मेरा प्यार कह रहा है
मैं तुझे खुदा बना दूँ

आहा काय छान गाणं आहे, आज सगळं चांगलं वाटतं आहे, काव्या साठी माझ्या भावना हे गाण सांगत आहे, खूप छान आहे काव्या, काल किती छान दिसत होती ती नवीन ड्रेस मध्ये, खुश होती माझ्या सोबत, कस वाटेल तिच्या सोबत राहतांना, साडी नसेल का ती लग्नानंतर, कशी दिसेल, काही सुचत नाही आज, अजून एवढा विचार नको करायला आमच्या बाबतीत,

मी चांगला तर दिसतो आहे ना, या पाहुण्यांच्या गडबडीत लक्षच नाही स्वतःकडे, त्याने एकदा परत छोट्याशा मिरर मध्ये बघितलं.

आज लंच साठी घेवून जायच का काव्याला, नको एक तर उशिरा जातो आहोत ऑफिस मधे, अस वागता येणार नाही सगळ्यां समोर, ऑफिस वेळेत नाही बोलायच तिच्याशी, एक तर जिथे मी गेलो तिथे सगळे बघत रहातात माझ्या कडे,

अभिजीत पोहोचला, खूप मीटिंगचे नोटिफिकेशन येत होते, तो आल्या आल्या केबिन मधे निघून गेला,

अभिजीतला आलेल बघून श्रद्धाला हसू येत होतं, काव्याच काही खरं नाही, काव्या गेली आता, ही काव्या बोलेल की नाही पण काही सरांशी, घाबरली आहे ती,

अभिजीतला खूप वाटत होत आदेशच्या डिपार्टमेंट मधे जाव लगेच काव्याशी बोलायला, पण त्याने तस केल नाही, खरंतर त्याला समजत नव्हतं काय करावं, एवढा उतावीळ पणा बरा नाही, त्याला त्याचं हसू आलं.

कदम आत मध्ये आले,

"काय काय मिटींग आहेत आज",.. अभिजीत.

" दोन-तीन लोक भेटायला आले आहेत मोठ्या सरांना",..कदम.

"त्यांना पाठवा आत",.. अभिजीत.

ती मीटिंग संपली.

"आदेशच्या डिपार्टमेंटचं काय काम चाललं आहे? त्याला यायला उशीर होणार आहे",... अभिजीत.

"पवार आहेत तिकडे काही विशेष काम नाही आज तिकडे",.. कदम.

" काही लागलं तर मला सांगा",.. अभिजीत.

हो सर

" बराच वेळ झाला होता अजून आदेश सर आले नाही",.. सीमा काव्याला विचारत होती

" तुला काही काम होतं का त्यांच्याशी",.. काव्या.

" हो त्यांनी सांगितलेलं काम पूर्ण झालं आहे, आता काय करू",.. सीमा.

पवार आले त्यांच्याशी सीमा बोलत होती,

कुठे गेले आहे आदेश सर अभिजीत कुठे आहे काय माहिती, जाऊ दे पण बरं आहे, मला नाही तरी धडधड होते आहे त्यांना भेटायला.

घरी आदेश आणि प्रियाचा साखरपुडा करून घेऊ आणि अभिजीतच लग्न आधी करु मग आदेश आणि प्रियाच लग्न करू असं ठरलं.

दोघी बाजूची मंडळी खुश होती. चला आता आम्हाला निघावं लागेल, ती मंडळी गेली.

आदेश प्रतापराव ऑफिसला निघाले, लंच ब्रेकच्या आधी आदेश ऑफिसमध्ये आला, सगळेजण व्यवस्थित काम करत होते, काव्याला बघून त्याला हसायला आलं, हिला दादाच्या डिपार्टमेंट मध्ये पाठवायचं आहे ना, आत मध्ये येऊन त्याने अभिजीतला फोन लावला.

"केव्हा आलास ऑफिसमध्ये",.. अभिजीत.

"आता आलो दादा ",.. आदेश.

"काय ठरलं मग",.. अभिजीत.

"काही नाही आता साखरपुडा आहे नंतर तुझं लग्न झाल्यावर माझं लग्न आहे",.. आदेश.

"अरे असं कशाला करता तुम्ही तू तुझं ठरवायला हवं होतं" ,.. अभिजीत.

" ठरव ना तुझ पण दादा, मी करतो ना मदत, काव्या वहिनीला पाठवू का तिकडे तुझ्या डिपार्टमेंट मधे ",.. आदेश.

" नको.. इकडे ट्रान्सफर नको तिची, काल मी बोललो होतो भावनेच्या भरात, राहू दे काव्याला तिकडे",.. अभिजीत.

" घाबरतो काय दादा, बिनधास्त विचार वाहिनीला, लग्नाला तयार हो म्हणा",... आदेश.

अभिजीत हसत होता, बापरे आदेश डॅशिंग दिसतोय, आदेश आज खुश होता खुप बडबड करत होता.

" राहू दे वहिनीला माझ्या डिपार्टमेंट मधे, नाहीतर दादा तुला काही काम सुचणार नाही",..

" आदेश पेंडींग काम काय आहे ते बघ जरा, नुसत्या गप्पा मारत बसतो",.. अभिजीत मुद्दाम ओरडला, त्याने फोन ठेवला,

पण आता अभिजीतला खरच खूप हसू येत होतं, बरोबर आहे हेच कारण आहे, काव्या इथे या डिपार्टमेंट मध्ये आली तर मी काय करणार आहे, काहीच सुचणार नाही, नको ती इथे, अभिजीतला खूप वाटत होतं की जावु का तिकडे काव्याला भेटायला, पण ऑफिसमध्ये असं वागून चालणार नाही, बाबा आहेत ऑफिसमध्ये, आदेश उगाच चिडवत राहील, आज अजिबातच मन लागत नाहीये ऑफिसमध्ये.

काव्याचा त्या फोनचा काय मॅटर आहे, तो फोन ती सुरू करत नसेल तर दुसरा फोन तरी घेऊन देऊ तिला, एवढ्या जवळ असून बोलता येत नाही. त्या डिपार्टमेंटचा सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज कुठे आहे, दिसेल का त्यात काव्या,

आदेश बोलवायला आला,.. "चल दादा जेवायला" .

अभिजीत आदेश सोबत गेला... "बाबा कुठे आहेत" ,

"ते घरी गेले" ,.. आदेश.

बर झाल अभिजीत खुश होता.

🎭 Series Post

View all