तुझी साथ हवी मला... भाग 25

आय एम सिरीयस काव्या, असे चांगले चान्स सोडायचे नसतात, चल मी निघते रात्री सांग काय म्हटले सर ते आणि मी जे सांगितल त्यावर विचार कर


तुझी साथ हवी मला... भाग 25

©️®️शिल्पा सुतार
.........

सोमवारी लवकर आवरून अभिजीत रेडी होता, आज भेटले का काव्या? जावू दे आपण प्रॅक्टिकल अॅप्रोच ठेवू, नाश्ता झाला, तो ऑफिसला निघाला, आदेश होता सोबत पूर्णवेळ रस्त्यात अभिजीत आदेशला प्रोजेक्ट बद्दल विचारत होता, किती काम झाला आहे आज त्याचा रिपोर्ट दे सगळा मला , हिशोब काय आहे ते दाखव, नंतर बाबांना फाईल देवून टाक.

"ठीक आहे दादा",.. आदेश.

श्रद्धा आणि काव्या पण रेडी होत्या, दोघींनी डबा घेतला चहा नाश्ता केला, आज काव्याने नवीन ड्रेस घातला होता, खूपच छान दिसत होती ती, दोघीजणी निघाल्या, बाहेर आल्यावर काव्या बघत होती रघु दिसतो का ते, तो दिसला नाही, कुठे गेला हा? ,

बरोबर वेळेवर ऑफिसला आल्या त्या , काम सुरू झाल.

अभिजीत केबिन मध्ये आला, तो आदेशचा विचार करत होता, त्याने एक फोन केला, आदेश बद्दल सगळी माहिती हवी आहे मला, काय करतो तो कोणाला भेटतो, आज संध्याकाळ पर्यंत आणि अजून एक नाव काव्या देशमुख या मुली बद्दल माहिती काढा, कोण आहे ही, आदेशच्या डिपार्टमेंट मधे नवीन जॉईन झाली आहे, कुठून आली आहे ती काही समजलं तर बघा,

ठीक आहे साहेब.

आता मला घाई करावी लागेल, काव्या बाबतीत निर्णय घ्यावा लागेल, नक्की काय आहे ती अनाथ आहे का की काही प्रोब्लेम आहे हे पण समजेल,

मला बघायचं आहे आदेश कोणाशी बोलतो रोज एवढा हसून, आता अभिजीतला ही हसू आलं , त्याची गर्ल फ्रेंड कोण आहे, काय करते ती मुलगी जरा बघतो आदेश कडे.

सोहम ऑफिसमध्ये आला, काय करू फोन करून बघू का अभिजीतला सहज, त्यांने अभिजीतला फोन लावला,

"काय चाललं आहे सोहम बरेच दिवसांनी आठवण आली माझी",.. अभिजीत.

"मी तरी फोन केला तू फोन करतो का मला अभिजीत",.. सोहम.

"अरे असंच बिझी होतो ऑफिस कामात, तुझं काय चाललं आहे सोहम",.. अभिजीत.

"ठीक आहे, कस काय सुरू आहे ऑफिस प्रोजेक्ट वगैरे, काही विशेष? ",..सोहम.

"व्यवस्थित सुरू आहे रोजचे काम " ,.. अभिजीत.

"लग्न कधी करतोय अभिजीत",. सोहम अंदाज घेत होता याच जमल का काही ते ,

" अरे तू पण का त्रास देतोस घरी रोज तेच सुरू आहे ",.. अभिजीत.

चला म्हणजे लग्न झालं नाही याच, सोहमला आनंद झाला,

" ये मग कधी इकडे आला तर ऑफिसमध्ये सोहम",.. अभिजीत.

"हो नक्की मला तुझ्या कडे थोड काम आहे ",.. सोहम.

"बोल ना",.. अभिजीत.

"प्रत्यक्षात भेटून बोलेल ",.. सोहम.

" चालेल काही प्रोब्लेम नाही ना ",.. अभिजीत.

" तस काही नाही ",.. सोहम.

" ये मग वेळ झाला की",.. अभिजीत.

हो.. सोहमने फोन ठेवला

थोडा वेळ काम झाल्यानंतर अभिजीतने श्रद्धाला आत मध्ये बोलवलं,

श्रद्धाला समजत नव्हत काय काम आहे ते, अस कधी बोलवत नाही हे सर मला, नक्की काव्या बाबतीत काही तरी विचारायच असेल, ती आत गेली,

" श्रद्धा तुझा फोन नंबर देते का मला? ",.. श्रद्धा आश्चर्याने बघत होती.

बापरे हिचा गैरसमज नको व्हायला,

" नाही म्हणजे जर काही लागलं तर बोलता येईल काव्याशी, तस नाही म्हणजे जर मला तुझ्याशी काव्याशी बोलायचं असेल तर बोलता येईल, तिच्याकडे नाही ना फोन" ,.. एवढा स्ट्रीक्ट बॉस एकदम गोंधळला होता,

माझा अंदाज बरोबर होता काव्या साठी सुरू आहे हे, श्रद्धा हसत होती, तिने अभिजीत सरांना फोन नंबर दिला, विचारू का सरांना की त्यांना काव्या आवडते का? , मी करते मदत, नको पण आगाऊपणा करायला, पण माझ्या मैत्रिणीच चांगल होत असेल तर काय हरकत आहे,.. "सर तुम्ही करा मला केव्हा ही फोन, मी देईन काव्याला, ती आसपास नसली तर निरोप देईन ",

थॅंक्स.. आता अभिजीत हसत होता.

"ठीक आहे ना आता काव्या तिकडे केंद्रात काही प्रॉब्लेम नाही ना" ,.. अभिजीत.

"हो सर ठीक आहे",.. श्रद्धा.

"तुम्हा दोघींना काही लागलं तर मला सांगा",.. अभिजीत.

"हो सर",.. श्रद्धा बाहेर गेली तिच्या कामाला लागली.

काव्या तिच्या जागेवर बसून काम करत होती, एक दोन इंट्री कशा घ्यायच्या ते सीमा तिला सांगत होते, दोघीजणी बोलत होत्या, आदेश समोर उभा होता... "ऑफिसमध्ये गप्पा मारायच्या नाही काय सीमा आणि काव्या वहिनी",.. त्याने पटकन तोंड दाबलं, बर झालं कोणी ऐकले नाही, बोलण्यावर जरा कंट्रोल ठेवायला पाहिजे.

"आम्ही दोघी कामाच्या बाबतीत डिस्कस करत होतो सर",.. सीमा.

"सीमा या प्रोजेक्टचा किती हिशोब झाला आहे ते मला लवकरच सांगा, मला मोठ्या साहेबांना हिशोब द्यायचा आहे, अक्षय बघ जरा सीमा सोबत हिशोब कर",.. आदेश.

हो सर..

सीमा कामाला लागली , काव्या वहिनीला काहीतरी काम द्यायला पाहिजे, तिची आणि दादाची भेट व्हायला पाहिजे, म्हणजे या दोघांचं काहीतरी ठरेल, मग मला आणि प्रियालाही लग्न करता येईल,.. "काव्या तू या फाईल घेऊन अभिजीत सरांच्या डिपार्टमेंट मध्ये जा, त्यांना हिशोब दाखव करेक्ट आहे का, अजून काही बदल आहे का ते विचार",

हो सर.

अक्षय उठला.

"कुठे चालला आहेस तू अक्षय? ",.. आदेश.

"काव्या सोबत, ती नवीन आहे तिला काही माहिती नाही",... अक्षय

"काय गरज आहे ",.. आदेश चिडला होता, अरे हा अक्षय काय लव स्टोरीत व्हिलन बनत आहे, दादासमोर काव्या वहिनी एकटी गेली पाहिजे, तरच ते बोलतील ना, नाहीतरी आज वहिनी खूप छान दिसते आहे.

"माहिती आहे काव्याला अभिजीत सरांच डिपार्टमेंट , ती जाईल व्यवस्थित, तुला जे काम दिला आहे ते कर अक्षय, उगाच इकडे तिकडे फिरायचं नाही",.. आदेश.

अभिजीतच्या डिपार्टमेंट मध्ये जायचं म्हणजे काव्याला जरा चिंताच वाटत होती, कालच एकतर अभिजीत चिडलेला होता माझ्यावर, आज उगीच एटीट्यूड दाखवेल तो, अभिजीतला असं नको वाटायला की मी मुद्दाम त्याला भेटायला आली आहे, काय करणार पण ऑफिस काम आहे, तिने फाईल घेतल्या ती अभिजीतच्या डिपार्टमेंट मध्ये आली, बरेच लोक होते त्या डिपार्टमेंट मधे ,

श्रद्धा होती समोर, तिने हात दिला,.. "इथे काय करते आहेस तू? ",..

"या फाईल अभिजीत सरांना दाखवायच्या आहेत, करेक्ट आहे की नाही ते",.. काव्या.

श्रद्धा हसत होती,.. "छान काम मिळाल तुला, जा आत, सर तुझी वाट बघत आहेत",

"जास्त नाही का होत हे श्रद्धा, काम कर जरा" ,.. काव्या.

"पण तु या फाईल घेवून आत गेली तर अभिजीत सरांना यात काही चुका दिसणार नाही, मग कस होईल ",.. श्रद्धा.

" तू जरा गप्प बसणार का श्रद्धा, माझी ही विजीट फक्त प्रोफेशनल आहे मला आदेश सरांनी काम दिल आहे",.. काव्या.

" ठीक आहे जावुन ये आत मध्ये ",.. श्रद्धा

काव्या अभिजीतच्या केबिनमध्ये गेली, तो फोनवर बोलत होता, काव्याला बघून आश्चर्यचकित झाला, नक्की आली का काव्या इथे की हा भास आहे, काय सुंदर दिसतो गुलाबी रंग हिला, सकाळी सकाळी एकदम फ्रेश दिसत होती ती, तो भारावून गेला होता तिच्या सौंदर्याने, त्याने फोन ठेवला,.." येस काव्या, तु इथे? काही काम होत का?, आज कशी काय आमची आठवण झाली",

"गुड मॉर्निंग सर",.. काव्या मुद्दाम त्याला सर म्हणत होती.

"गुड मॉर्निंग",.. तो एकदम प्रॅक्टिकल टोन मध्ये म्हटला, तसं तर त्याला मनातन खूप आनंद झाला होता, तो सकाळपासूनच विचार करत होता की कसं काय भेटायचं काव्याला? नेमकी काव्या इकडे आली, खूपच छान दिसते आहे आज काव्या , पण चेहऱ्यावर जास्त आनंद दाखवायला नको,.. "बोल काव्या? ",

"आदेश सरांनी या फाईल तुम्हाला दाखवायला सांगितल्या आहेत, करेक्ट आहे का हिशोब? त्यांना त्या फाईल पुढे द्यायच्या आहेत मोठ्या सरांना",.. काव्या.

हो बरोबर मी हे काम दिल होत आदेशला,

"फाईल इथे दे मी बघतो नंतर",. अभिजीत.

"नंतर नाही आता ",..काव्या.

अभिजीत काव्या कडे बघत होता,

"सॉरी म्हणजे आदेश सरांनी तस सांगितल आहे प्लीज ",.. काव्या.

" ऑफिसमध्ये शिपाई काका नाही का तुला का फाईल घेऊन पाठवलं ",.. अभिजीत.

" माहिती नाही ",.. काव्या.

हे काम मात्र आदेशने खूप छान केलं, अभिजित खुश होता.

"आदेश सर बोलले की हिशोबाच्या फाईल लगेच वापस घेऊन ये आणि तुम्ही जर काही बदल सांगितला तर तो मला लगेच करायचा आहे",...काव्या.

ठीक आहे ..अभिजीत फाईल बघत होता, काव्या त्याच्याकडे बघत होती, भारी दिसतो आहे आज हा, अजिबात कामा व्यतिरिक्त इतर काही बोलत नाही आज हा मुद्दाम ,

ठीक आहे त्याने दोन-तीन बदल सुचवले, ते काव्याने लिहून घेतले,

"मी जावू का ",..अभिजीत.

हो

"अभिजीत सॉरी ",..काव्या.

"काय झालं ?",..अभिजीत.

"ते काल तुम्ही लंचच बोलले होते ना, काकू ओरडतात रूल्स ब्रेक केले तर, बाहेर फिरल तर, मी नवीन आहे इथे, काकूंनी मला आधार आश्रमातुन बाहेर काढल तर मी राहणार कुठे, म्हणुन मी आली नाही",.. काव्या.

अभिजीत तिच्या कडे बघत होता,.. "बापरे किती काळजी करते ही काव्या, खुप चिंता आहे तिला, साहजिक आहे रहायला जागा नाही, पैसे नाही, काय करेल ती, एक आधार आहे केंद्राचा तिथे रहाते ती, बरोबर आहे तीच, नियमा विरूद्ध या पुढे तिला बाहेर बोलवायच नाही" ,

"संध्याकाळी सात पर्यंत चालत ना दुसर्‍याला भेटलेल काव्या",.. अभिजीत.

" हो अभिजीत ",.. काव्या.

" जावू दे पण काही कोणाला वेळ नाही आमच्या साठी, इतर ठिकाणी जायला वेळ आहे जस की मार्केट ",.. अभिजीत.

काव्या छान हसत होती, बापरे आदेश सरांनी सांगितल वाटत आम्ही मार्केट मधे भेटलो होतो ते, अभिजित बघत होता हसताना सुंदर दिसते ही,

" काव्या आज वेळ आहे का संध्याकाळी, ऑफिस सुटल्यानंतर भेटणार का, मला बोलायच आहे तुझ्या शी",... अभिजीत.

काव्याने होकार दिला ठीक आहे , जावू एकदा याच्या सोबत, काय म्हणतो बघु तरी,

अभिजीतला मनातन छान वाटलं होतं पण त्याने मुद्दामच तसे दाखवल नाही, ठीक आहे मग संध्याकाळी भेटू,.." डबा आणला ना आज? ",

हो.

" औषध संपले का ",.. अभिजीत.

" तीन दिवसाचे दिले होते संपले ",.. काव्या.

"बर वाटतय ना",.. अभिजीत.

"हो, मी जावू का ",.. काव्या.

"हो.. संध्याकाळी थांब माझ्या साठी",.. अभिजीत.

ओके

काव्या फाईल घेऊन बाहेर आली.

" झाली का मीटिंग काव्या? मला वाटलं आता एक दोन तास तू काही बाहेर येत नाही",.. श्रद्धा.

"तू म्हणजे अशक्य आहेस श्रद्धा, एकदमच प्रोफेशनल रित्या अभिजीत सर माझ्याशी बोलतात आणि तुझं वेगळच सुरू आहे जरा आमच्या बाबतीत असा विचार करणं थांबव, मी जाते मला काम आहे, अभिजीत सरांनी दोन-तीन बदल सुचवले आहेत",.. काव्या खुश होती.

ठीक आहे

काव्याने तिला सांगितल नाही की ती संध्याकाळी अभिजीतला भेटायला जाणार आहे, काय करू पण वापस तर श्रद्धा सोबत जायच आहे, तिला समजेल, जावू दे समजू दे, पण चिडवेल ती मला, तिला हसू आल.

अभिजीत विचार करत होता आज सांगायच का काव्याला मला तू आवडते अस, अस दोन तीन दा भेटलो आहोत, आम्ही पण काव्या बाबतीत मला एक वेगळीच ओढ आहे, सारखी ती माझ्या जवळ हवी अस वाटत आहे, पाहिल्यांदा बघितल्यावर आवडली मला ती, नाहीतरी घरच्यांना घाई झाली आहे माझ्या लग्नाची आणि आता मला ही, जमल तर बोलू, त्याला धड धड होत होती,

काव्या तिच्या डिपार्टमेंट मध्ये आली, तिने पूर्ण काम केलं फाईल घेऊन ती आदेश कडे आली.. "फाईल रेडी आहे सर",

" दाखवली का अभिजीत सरांना फाइल",. आदेश.

"हो दाखवली त्यांनी एक-दोन बद्दल सुचवले ते सुद्धा केले",.. काव्या.

" काय म्हटले मग अभिजीत सर",. आदेश.

"काही नाही सर म्हटले की तुला का फाईल घेऊन पाठवलं, ऑफिस मध्ये शिपाई काका नाहीत का",.. अभिजीत.

"ठीक आहे तु जा ",.. आदेश.

काव्या बाहेर आली, तिचं रेग्युलर काम करत होती.

आदेश विचार करत होता असं काही नसेल अभिजीत दादाच्या मनात, नाही तर तो असा म्हटला नसता, दादाच काय कराव? काव्या वहिनी आवडते तर सांगायचा ना बिनधास्त, काय यार, आम्हाला ओरडतांना आवाज मोठा असतो दादाचा, वहिनी समोर काही बोलत का नाही हा , कधी ठरेल दादाच लग्न. मी विचारू का त्याला, नको पण तो मारेल मला.

तो फाईल घेऊन प्रतापरावांच्या केबिनमध्ये गेला, त्याने त्यांना हिशोब समजून सांगितला आणि फाईल सबमिट केली,

"छान काम करतो आहेस तू आदेश, कीप इट अप",.. प्रताप राव.

आदेश वापस आला त्याने प्रियाला फोन लावला ती टेंशन मध्ये होती, काय झालं प्रिया? ,

"एक स्थळ आल आहे माझ्या साठी, मुलगा चांगला शिकलेला आहे, घरचे पुढच ठरवता आहेत",.. प्रिया.

आता?

"तेच ना काय करायच आदेश? मला तुझ्या कडे यायच आहे, बहुतेक ते पाहुणे रविवारी येतील, त्या आधी सांगायच का घरी",.. प्रिया.

आदेश टेंशन मधे होता,.. "आज भेट संध्याकाळी आपण करू काही तरी",

" ठीक आहे"...प्रियाने फोन ठेवला, दादाशी बोलून बघु का, सांगाव लागेल त्याला, आदेश टेंशन मधे होता.
........

संध्याकाळी श्रद्धा गेट वर उभी होती ,काव्या आली,.." चल निघायचा का काव्या ",

" ते अभिजीत सर येत आहेत, ते बोलले काही तरी काम आहे",.. काव्या.

"सकाळी ठरल ना तुमच्या दोघांच हे, खर बोल काव्या",.. श्रद्धा.

"अग नाही",.. काव्या हसत होती.

"काय? आता किती नाटक करते तू, मी जाते मग",.. श्रद्धा.

"थांब ना फोन करून बघते मी अभिजीतला, उगाच तू चालली जाशील सर येणार नाही" ,... काव्या.

श्रद्धाच्या फोनवर अभिजीतचा फोन आला,.." मी येतोच आहे पाच मिनिटात काव्याला थांबवायला सांग ",

" ठीक आहे सर ",.. श्रद्धा.

" तुझा निरोप आला आहे थांब तू इथे, मी जाते",.. काव्या.

" श्रद्धा तुला राग आला का? ",.. काव्या.

" मला कशाला राग येईल उलट आनंद झाला आहे मला, छान हो बोल अभिजीत सरांना",.. श्रद्धा.

"श्रद्धा काहीही आम्ही असच भेटतो आहोत लगेच काय हो बोल, ते सर काही मला प्रपोज नाही करत आहेत लग्ना साठी ",.. काव्या.

" करतील ते, तू शुद्धीत रहा लगेच होकार दे त्यांना लवकर लग्न करून घे",.. श्रद्धा.

काव्या हसत होती,

" आय एम सिरीयस काव्या, असे चांगले चान्स सोडायचे नसतात, चल मी निघते रात्री सांग काय म्हटले सर ते आणि मी जे सांगितल त्यावर विचार कर ",. श्रद्धा.

हो,

अभिजीत घाईने निघत होता त्याच्या केबिन मधून, आदेश आला,.." दादा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणून मुद्दामून ऑफिस सुटल्यावर आलो ",

" आता नाही आदेश मला जायचं आहे",.. अभिजीत.

" दादा खूप महत्त्वाच आहे पर्सनल आहे ",.. आदेश रिक्वेस्ट करत होता,

अभिजीत दोन मिनिट थांबला,.. "बोल पटकन",

"असं नाही दादा वेळ लागेल",.. आदेश.

" ठीक आहे मग मला थोडं काम आहे मी येतोय एका तासात घरी मग बोलू ",.. अभिजीत.

" नाही घरी नाही तू येतो का माझ्या पार्टी ऑफिसमध्ये",.. आदेश.

" ठीक आहे येतो मी तिकडे, काही झालं आहे का भांडणं मारामाऱ्या मुलांमध्ये",.. अभिजीत.

"नाही दादा थोडा वेगळं काम आहे ",.. आदेश.

" ठीक आहे भेटू मग ",.. अभिजीत पटकन निघाला.

आदेश बघत होता एवढी काय घाई आहे याला , कुठे चालला आहे हा दादा? जाऊ दे आपण पार्टी ऑफिस मध्ये जावु, येईल दादा तिकडे.

🎭 Series Post

View all